Facts About M.S. Dhoni In Marathi | महेंद्र सिंह धोनी बद्दल अनोख्या गोष्टी

” महेंद्र सिंह धोनी “ भारताचा आता पर्यंतचा सर्वात उत्कृष्ट आणि यशस्वी कर्णधार. चला तर मग जाणून घेऊया ह्या व्यक्ती बद्दल अश्या काही गोष्टी ज्या तुम्हाला आजपर्यंत माहित नसतील.

MS धोनीचं बालपण:

– महेंद्र सिंह धोनीचा जन्म झारखंड मधील रांची येथे पान सिंह आणि देवकी सिंह यांच्या घरी ७ जुलै १९८१ रोजी झाला.
– धोनी चा बालपण जास्तकरून खेळ खेळण्यातच गेला, त्याला त्याची आई, बहिण व मित्रपरिवार क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोस्ताहित करत असे.

MS धोनीचा इतिहास:

– MS धोनी हा एक असा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याला ICC ODI Player Of The Year 2008 हा सन्मान मिळाला.
– MS धोनी ने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हा बांग्लादेश विरुद्ध २००४ मध्ये खेळला आणि यात तो पाहिल्याचं चेंडू वर एकही धाव न घेता बाद झाला होता.
– MS धोनी ने Indian Premier League (IPL) सामन्यांमध्ये आपला संघ Chennai Super Kings ला २०१० व २०११ मध्ये विजय मिळवून दिले त्याच बरोबर Champions League T-२० देखील २०१० व २०१४ मध्ये विजय प्राप्त केले.
– MS धोनी ने रणजी ट्रॉफी १९९९-२००० साठी वयाच्या १८ व्या वर्षी पदार्पण केल.
– MS धोनी ने त्याच पाहिलं आंतरारष्ट्रीय क्रिकेट शतक हे त्याच्या चौथ्या सामन्यामध्येच पटकावल होत.

MS धोनी चे कर्णधार पदाबद्दलचे काही रोचक गोष्टी:

– धोनी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचे तसेच T-२० चे कर्णधार होते.
– महेंद्र सिंह धोनी आजपर्यंत क्रिकेट इतिहासात एकदिवसीय क्रिकेट संघाचे एक यशस्वी कर्णधार मानले जातात.
– MS धोनी कर्णधार असताना भारताने पहिले ICC T -२० विश्वचषक (worldcup) २००७ मध्ये आपल्या नावी केला.
– MS धोनी ने त्याच्या कर्णधार कालावधीत श्रीलंका व न्यूझीलंड मध्ये प्रथम ODI सिरीज मध्ये विजय प्राप्त केले.
– MS धोनी लगातार सात वर्ष (२००८-२०१३) पर्यंत ICC World One Day Eleven मध्ये सहभागी झाले आहेत.
– MS धोनी कर्णधार असतानाच तब्बल २८ वर्षानंतर भारतीय क्रिकेट संघाने ODI World Cup २०११ पुन्हा एकदा आपल्या नावी केला.
– सन २०१३ मध्ये प्रथमच भारताने Champions Trophy देखील पटकावली.
– MS धोनी जगातील पहिले असे कर्णधार आहे ज्यांचे नाव ICC च्या सर्व चषकांवर (CUP आणि Trophy) वर आहे.
– MS धोनी भारताचे एकमेव असे कर्णधार आहे ज्याने भारताला १०० हून अधिक ODI सामने जिंकले आहेत.
– MS धोनी IPL च्या प्रथम सामन्यातील सर्वात महाग खेळाडू होते ज्याने CSK सोबत १.५ दशलक्ष डॉलर मध्ये करार केला होता.
– MS धोनी एकमेव असे कर्णधार आहे जो ODI सामन्यात ७ व्या क्रमांकावर खेळून देखील सामन्यांमध्ये शतक पटकावले. हे त्यांनी २०१२ मध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध केले होते.
– MS धोनी कर्णधार रुपात सर्वात जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे तसेच जास्त क्रिकेट सामने जिंकवून देण्यात येणाऱ्या कर्णधार मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

MS धोनी बद्दल काही अनोख्या गोष्टी :

– ३ जुलै २०१० ला MS धोनी याचे लग्न त्यांची बालमैत्रीण साक्षी हिज सोबत झाले. MS धोनी व साक्षी या दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले.
– धोनी व साक्षी या दोघांचे वडील एकाच कंपनीत जॉब करत होते.
– MS धोनी याचा helicopter shot हा उत्कृष्ट व प्रसिद्ध शॉट ओळखला जातो.
– हा शॉट धोनी अगोदर टेनिस ball सोबत सर्वात जास्त खेळत असे.
– प्रत्येक सामना जिंकल्या नंतर स्टंप आठवण म्हणून घेणे हे धोनी चा छंद आहे.
– MS धोनी वर सध्या प्रदर्शित झालेला चित्रपट ” MS DHONI THE UNTOLD STORIES” खूप प्रसिद्ध झाला आहे. आणि लवकरच या चित्रपटाचा पुढील भाग देखील प्रदर्शित होणार आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment