भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे. नाती आणि विश्वास हाच विकासाचा पाया आहे.
– धीरूभाई अंबानी
आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.
– धीरूभाई अंबानी
खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते. पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला पण काही त्याला हेरतात तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.
– धीरूभाई अंबानी
जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.
– धीरूभाई अंबानी
जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.
– धीरूभाई अंबानी
जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात, त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला.
– धीरूभाई अंबानी
भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.
– धीरूभाई अंबानी
मला नाही हा शब्द ऐकू येत नाही.
– धीरूभाई अंबानी
काहीतरी मिळवण्यासाठी विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.
– धीरूभाई अंबानी
स्वप्न बघाल तरच साध्य कराल ना.
– धीरूभाई अंबानी
एक दिवस धीरूभाई निघून जाईल, पण Reliance चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील.
– धीरूभाई अंबानी
Reliance हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही.
– धीरूभाई अंबानी
मोठं विचार करा, जलद विचार करा, सर्वांचा पुढे जाऊन विचार करा.
– धीरूभाई अंबानी
विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.
– धीरूभाई अंबानी
आपले स्वप्न विशाल असायला हवेत. आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे. आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी. आपले प्रयत्न मोठे असायला हवे. रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.
– धीरूभाई अंबानी
आपण आपल्या शाशकांना बदलू शकत नाही, पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो..
– धीरूभाई अंबानी
फायदा कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही.
– धीरूभाई अंबानी
रिलायंस मध्ये विकासाची काही सीमा नाही. मी नेहमी माझं दृष्टिकोनात संशोधन आणत असतो. स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.
– धीरूभाई अंबानी
जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि सोबत परिपूर्णता असेल तर यश तुमचा मागे येईल.
– धीरूभाई अंबानी
कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा. अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
– धीरूभाई अंबानी
युवानां एक चांगले वातावरण द्या. त्यांना प्रेरित करा. त्याना लागेल ती मदत करा. त्यांच्यात एक आपार उर्जाचे श्रोत आहे. ते करून दाखवतील.
– धीरूभाई अंबानी
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.