उद्योगपती जमशेदजी टाटा माहिती | Jamsetji Tata Biography in Marathi
Jamsetji Tata Biography in Marathi: जमशेदजी टाटा हे भारताचे प्रसिद्ध उद्योगपती त्याचबरोबर औद्योगिक घराणे टाटा समूहाचे संस्थापक होते. भारतीय औद्योगिक क्षेत्रामध्ये जमशेदजी टाटा यांनी जे योगदान दिलं ते अतिशय अनन्यसाधारण आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा फक्त युरोपीय लोकच उद्योग स्थापित करण्यामध्ये कुशल समजले जायचे, अशा वेळेस जमशेदजी टाटा यांनी भारतामध्ये औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा करून दिला.
टाटा साम्राज्याचे संस्थापक जमशेदजी द्वारे केले गेलेले कार्य आजही कित्येक भारतीयांना प्रोत्साहित करते. त्यांच्यामध्ये भविष्य ओळखायची एक अद्भुत क्षमता होती, ज्याच्या बळावर त्यांनी औद्योगिक भारताचे स्वप्न बघितले होते. उद्योगांबरोबरच विज्ञान आणि तंत्रशिक्षणासाठी त्यांनी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या.
प्रारंभिक जीवन । Personal Life of Jamsetji Tata in Marathi
जमशेदजी नुसीरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च 1839 मध्ये दक्षिण गुजरातच्या नवसारी मध्ये एका पारसी कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नुसीरवानजी तर आईचे नाव जीवनबाई टाटा होते. त्यांचे वडील त्यांच्या संपूर्ण परिवारामध्ये व्यवसाय करणारे पहिले व्यक्ती होते. जमशेदजी यांचे वय वर्ष केवळ 14 असताना ते आपल्या वडिलांसोबत मुंबईला आले आणि व्यवसायामध्ये उतरले. अगदी छोट्या वयापासूनच त्यांनी आपल्या वडिलांना व्यवसायामध्ये मदत करण्याचे काम चालू केले. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टंट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि दोन वर्षानंतर म्हणजेच 1858 साली ‘ ग्रीन स्कॉलर’ (एक पदवी) उत्तीर्ण होऊन आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये स्वतःला झोकून दिले. यानंतर यांचा विवाह हिराबाई यांच्यासोबत करण्यात आला.
व्यापारामुळे जमशेदजी यांनी इंग्लंड अमेरिका युरोप आणि अन्य बऱ्याच देशांना भेटी दिल्या, ज्यामुळे त्यांचे व्यापार संबंधित ज्ञान आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत झाली. या सर्व प्रकारच्या यात्रा केल्यानंतर त्यांना हा अनुभव आला की ब्रिटिशांचं ज्या कापड उद्योगात अधिपत्य आहे, तिकडे भारतीय कंपन्या देखील यशस्वी होऊ शकतात.
- पूर्ण नाव: उद्योगपती जमशेदजी टाटा
- जन्म: 3 मार्च 1839, नवसारी, गुजरात.
- मृत्यु: 19 में , 1904, जर्मनी.
- कार्य क्षेत्र: उद्योगपती , टाटा समूहाचे संस्थापक.
- पत्नी: हिराबाई दाबू
उद्योगात प्रवेश । Jamsetji Tata Entry into industry in Marathi
वयाच्या 29 व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या वडिलांच्या कंपनीमध्ये काम केले आणि त्यानंतर इसवीसन 1868 मध्ये 21000 रुपयांचे भांडवल घेऊन त्यांनी एक व्यापारीक प्रतिष्ठान स्थापन केले. सन 1869 मध्ये त्यांनी दिवाळी तेल मिल खरेदी केली आणि त्याला एका कॉटन मिल मध्ये बदलून टाकले. आणि त्या मिल चे नाव अलेक्झांडर असे ठेवले गेले. जवळपास दोन वर्षानंतर जमशेदजी यांनी या मिलला चांगला नफा मिळवून विकून टाकले आणि यानंतर 1874 मध्ये नागपूरला त्यांनी एक कॉटन मिल स्थापन केली. जमशेदजी यांनी या मिलचे नाव यानंतर इम्प्रेस मिल असे ठेवले जेव्हा व्हिक्टोरिया महाराणीला “भारताची राणी” हा किताब देण्यात आला होता.
जमशेदजी केवळ एक दूरदर्शी व्यक्तिमत्व नव्हते तर देशामध्ये औद्योगिक विकासाचा मार्ग प्रशस्त करणारे आणि आपल्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची देखील त्यांनी नेहमी काळजी घेतली. कामगार आणि कामगारांच्या कल्याणाच्या बाबतीत ते त्यांच्या वेळेच्या खूप पुढे होते. यशाला त्यांनी केवळ स्वतःची जहागीर समजलं नाही, तर यश हे त्यांच्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कामगारांवर अवलंबून आहे असं त्यांचं स्पष्ट मत होतं.
दादाभाई नवरोजी आणि फिरोजशहा मेहता अशा अनेक राष्ट्रवादी अनेक क्रांतिकारी नेते मंडळींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आणि दोन्ही बाजूंनी त्यांच्या विचार आणि कृतींमध्ये एकमेकांवर खूप प्रभाव टाकला.
आर्थिक स्वतंत्रता हीच राजनीतिक स्वतंत्रताचा आधार आहे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. एक स्टील कंपनी सुरुकरणे, एक अनोखे हॉटेल सुरू करणे, एक विश्व प्रसिद्ध अध्ययन केंद्र स्थापित करणे, एक जलविद्युत प्रकल्प उभारणे ही जमशेदजींच्या आयुष्यातील काही मोठी उद्दिष्टे होती. परंतु त्यांच्या जीवन काळामध्ये यातील फक्त एकच स्वप्न पूर्ण होऊ शकले ते म्हणजे हॉटेल ताज महल ची स्थापना. त्यांच्या राहिलेल्या उद्दिष्टांना आलेल्या पिढीने पूर्ण केले. हॉटेल ताज महल 1903 साली 4 करोड 21 लाख रुपयांचा खर्च करून उभे राहिले. त्यावेळेस हे भारताचे एकमेव असे हॉटेल होते जिथे वीज उपलब्ध होती. या हॉटेलची स्थापना त्यांच्या राष्ट्रवादी विचारांमुळे झाली. तो काळ इंग्रजांचा असल्यामुळे त्यावेळेस भारतीयांना चांगल्या युरोपियन हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला जायचा आणि म्हणूनच ताजमहल सारखे मोठे आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले हॉटेल बांधून जमशेदजी यांनी चांगलेच प्रत्युत्तर सरकारला दिले होते.
देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जमशेदजी टाटा। Jamsetji Tata information in Marathi
देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जमशेदजी टाटा यांचे अनन्य साधारण योगदान आहे. यांनी भारतामध्ये औद्योगिक विकासाचा पाया तेव्हा घातला ज्यावेळेस हा देश पारतंत्र्याच्या साखळदंडांनी जखडला होता आणि उद्योगधंदे स्थापित करण्यामध्ये फक्त इंग्रज कुशल समजले जात होते.
भारताच्या औद्योगीकरणासाठी त्यांनी पोलाद कारखान्यांची स्थापना करण्याची महत्वपूर्ण योजना बनवली. त्यांच्या इतर मोठ्या योजनांमध्ये पश्चिमी घाटांच्या तीव्र कोसळणाऱ्या धबधब्यांमधून वीज उत्पन्न करणे (ज्याचा पाया 8 फेब्रुवारी 1911 ला घातला गेला) हे देखील सामील आहे.
या विशाल योजनांचा पाया रचून त्यांनी त्यासोबतच मुंबईमध्ये एक शानदार ताजमहल हॉटेल देखील उभे केले, जे त्यांची राष्ट्राप्रती भक्ती दर्शवते.
एक यशस्वी उद्योगपती आणि व्यावसायिक सोबतच जमशेदजी टाटा हे खूप उदार प्रवृत्तीचे व्यक्ती होते ज्यांनी आपल्या मिलमध्ये आणि उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी कल्याणकारी योजना लागू केल्या होत्या. याच उद्देशाने त्यांनी कामगारांसाठी पुस्तकालय, गार्डन इत्यादीची व्यवस्था त्याबरोबरच मोफत औषधे या सेवा देखील पुरवल्या.
टाइम लाइन (जीवन घटनाक्रम) । Tata Group Timeline, and Milestones in Marathi
- 1839: 3 मार्च गुजरातच्या नवसारी मध्ये जन्म.
- 1868: जमशेदजी यांनी 29 व्या वयात खाजगी फर्म सुरू केली.
- 1874: मित्रांच्या मदतीने 15 लाख रुपयांचे भांडवल घेऊन त्यांनी एक नवीन कंपनी “सेंट्रल इंडिया स्पिनिंग विविंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी” ची सुरुवात केली.
- 1877: 1 जानेवारीपासून त्यांनी या मिलने कार्य करणे प्रारंभ केले.
- 1886: जमशेदजी यांनी एक पेन्शन फंड ची सुरुवात केली.
- 1903: ताजमहल हॉटेल चे निर्माण केले.
- 1904: जमशेदजी टाटा यांनी 19 मे 1904 ला जर्मनीच्या बादनोहाईम येथे शेवटचा श्वास घेतला.
तर मित्रांनो Jamsetji Tata Biography in Marathi च्या या लेखात जमशेदजी टाटा यांच्याबद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कंमेंट करून नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला या लेखात काही नवीन माहिती देऊन योगदान करायचे असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
तसेच मित्रांनो Jamsetji Tata information in Marathi हा लेख तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
हे देखील वाचा
Jeff Bezos information in Marathi