छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र | Sambhaji Maharaj information in Marathi

छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन परिचय आणि इतिहास (Chhatrapati Sambhaji Maharaj History and Biography in Marathi)

Chatrapati Sambhaji Maharaj information in Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन देखील त्यांच्या वडीलांप्रमाणे देशासाठी आणि हिंदुत्वा साठी समर्पित होते. संभाजी महाराजांनी त्यांचा बालपणापासून राज्यातील ज्या राजकीय समस्या आहेत त्यांना सोडवायला सुरुवात केली होती. बालपणात मिळालेल्या अनुभवामुळे आणि त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे बाळ शंभुराजे पुढे जाऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बनले.

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास | Sambhaji Maharaj history in Marathi

नाव (Name) : संभाजी शिवाजी भोसले महाराज
उपनाव (Other Names) : छावा आणि शंभूराजे
जन्मदिन (Birthdate) : 14 मे 1657
जन्म ठिकाण (Born Place) : पुरंदर किल्ल्यावर
आई (Mother): सईबाई
वडील (Father) : छत्रपती शिवाजी महाराज
आजोबा (Grand father) : शहाजी राजे भोसले
आजी (Grand Mother): जिजाबाई
भाऊ (Brother) : राजाराम महाराज
बहीण (Sisters) : शकुबाई, आंबिकाबाई, रानुबाई, दिपाबाई, कमलाबाई, राजकुनवर बाई शिर्के
पत्नी (Wife) : येसूबाई
मित्र (Friend): कवी कलश
कौशल्य (Arts) : संस्कृतचे गाढे पंडित, कला प्रेमी आणि वीर योद्धे
युद्ध (Wars): 1689 मध्ये वाईचे युद्ध
शत्रू (Enemy) : औरंगजेब
मृत्यू (Death): 11 मार्च 1689
आराध्य दैवत (Holly God) : महादेव
मृत्यूचे कारण (Reason Behind Death) : औरंगजेबाने फितुरीने पकडले

हे देखील वाचा: Sambhaji Maharaj quotes in Marathi

संभाजी महाराजांचा जन्म आणि शिक्षण | Sambhaji Maharaj Birth and Education In Marathi

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म 1657 मध्ये 14 मे रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराज 2 वर्षाचे देखील नव्हते झाले तेच महाराजांच्या आई सईबाई मातोश्री यांचे निधन झाले. त्यामुळे संभाजी महाराजांचे पालन पोषण हे शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी केलं. संभाजी महाराजांना छावा म्हणून देखील ओळखतात याचा अर्थ शावक किंवा शेर का बच्चा असा होतो. संभाजी महाराज हे संस्कृत सोबत 8 इतर भाषांमध्ये निपुण होते.

संभाजी महाराज परिवार | Sambhaji Maharaj Family Information in Marathi

संभाजी महाराज हे वीर योद्धे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई होते. सईबाई या महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या. संभाजी महाराजांना एक बंधू देखील होते त्यांचे नाव राजाराम महाराज किंवा रामराजे होय. रामराजे हे सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांचा विवाह हा येसूबाई यांच्याशी झाला होता. त्यांच्या मुलाचे नाव छत्रपती शाहू महाराज होते.

संभाजी महाराजांची कवी कलश यांच्या सोबत मैत्री | Sambhaji Maharaj and Kavi Kalash 

लहानपणी जेव्हा महाराज बाळ शंभुराजांना घेऊन आग्र्याला गेले होते तेव्हा मुघल शासनकर्ता औरंगजेब बादशहाच्या छावणीतून पळ काढल्यानंतर बाळराजे अज्ञातवासात होते. अज्ञातवासात असताना ते महाराजांचे मंत्री रघुनाथ कोरडे यांच्या एका नातेवाईकाकडे राहिले. तिथे संभाजी महाराज जवळपास 1 ते दीड वर्ष थांबले होते. त्यावेळी काही काळ संभाजी महाराज हे एखाद्या ब्राम्हण मुलाप्रमाणे वावरत होते. त्यासाठी त्यांच्यावर उपनयन कार्यक्रम देखील मथुरा येथे करण्यात आला होता. त्यावेळी महाराज संस्कृत देखील शिकले. त्याच काळात महाराजांची ओळख कवी कलशांच्या सोबत झाली. संभाजी महाराजांच्या उग्र स्वभावाला फक्त कवी कलश सांभाळू शकत असे लोक सांगतात.

संभाजी महाराजांच्या लेखणीतून vv
कवी कलश यांच्यासोबत संपर्कानंतर महाराजांची आवड ही साहित्याकडे जास्त झाली. संभाजी महाराजांनी शिवरायांच्या सन्मानात बुधभूषणम हा ग्रंथ लिहिला. पुढील काळात त्यांनी नखशिखांत आणि नायिकाभेद हे ग्रंथ लिहिले.

संभाजी महाराज एक शासनकर्ते | Sambhaji Maharaj as Ruler information in Marathi

11 जून 1665, अवघे 8 वर्षाचे संभाजी राजे पुरंदरच्या तहापोटी त्या मिर्झाराजांच्या छावणीत राहिले. महाराजांनी त्यावेळी असे सांगितले होते की जोपर्यंत सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात करत नाही तोपर्यंत शंभूराजे वेलीस राहणार होते संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहा ची मनसबदारी देखील स्वीकारावी लागणार होती. शिवाजी महाराज स्वतः संभाजी महाराजांच्या सोबत औरंगजेब दरबारी हजर झाले होते. तिथे औरंगजेबाने चलाखी करत महाराजांना आणि शंभुराजांना नजरकैदेत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज व बाळ शंभूराजे युक्ती करत तिथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले.

30 जुलै 1680 रोजी संभाजी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हाती सत्ता सोपवण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांना त्या मंत्रिमंडळातील सदस्यांनवर भरवसा नव्हता. त्यामुळे त्यांनी कवी कलश यांना सल्लागार केले. कवी कलश हिंदी आणि संस्कृत चे विद्वान, काही लोकांनी त्यांना खूप विरोध केला.तरी देखील संभाजी महाराजांनी त्यांच्या शासन काळात खूप जास्त यश बहाल केले.

संभाजी महाराजांचे यश | Achievements of Sambhaji Maharaj in Marathi

संभाजी महाराजांनी त्यांच्या छोट्याश्या जीवनकाळात खूप मोठे यश संपादन केले. त्यांच्या या कार्याचा प्रत्येक हिंदू हा आभारी आहे. त्यांनी औरंगजेबाच्या 8 लाखाहून अधिक सैन्याचा सामना केला आणि सर्वच युद्धात मुघलांना पराभूत केले. औरंगजेब बादशहा जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा उत्तर भारतात इतर हिंदू राजांना स्वतःचे राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी वेळ मिळाला. त्यामुळे या संभाजी राजांच्या प्रति फक्त दक्षिणेतील हिंदू नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात सर्व ऋणी आहेत. कारण त्या काळात जर संभाजी महाराजांनी समर्पण केले असते तर कदाचित पुढील काही काळात औरंगजेबाने उत्तर भारतातील सर्व हिंदू सत्ता नष्ट केल्या असत्या.

संभाजी महाराजांनी आणि स्वराज्याने अनेक वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्रात अडकवून ठेवले. महाराष्ट्राच्या वर पश्चिम घाटात कोणीच माघार घेत नव्हतं. संभाजी महाराज हे फक्त बाहेरच्या आक्रमणापासून सावध नव्हते, त्यांना आतून देखील धोका होता.

तो काळ असा होता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हा मुघलांच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने माखून निघाला होता. महाराजांच्या काळात रामशेज हा किल्ला तब्बल सहा वर्षे अपराजित ठेवण्याची किमया संभाजी महाराजांनी करून दाखवली होती.

पुढे 1682 मध्ये औरंगजेब बादशहा चे पुत्र अकबर याला राजपुतांनी आणि महाराजांनी शरण केले आणि त्याला मदत केली. त्यामुळे औरंगजेब बादशहा आणखीच खचला. काही काळ असाच चालू राहिला की औरंगजेब किल्ले घेण्यासाठी प्रयत्न करत असे तो किल्ला तो कदाचित जिंकत देखील असे पण मराठे पुन्हा तो किल्ला सहज ताब्यात मिळवत. या सर्व गोष्टी बघता उत्तरेतील हिंदूंना असे वाटायला लागले की औरंगजेब आता उत्तर भारतात येऊच शकत नाही आणि त्याच्या मृत्यू हा हिंदुत्वाच्या लढाईत होणारच!

जुन्या हिंदू लोकांचे धर्मांतरण | Reconversion of old Hindu by Sambhaji Maharaj 

शिवाजी महाराजांच्या काळातच मुघलांच्या दबावामुळे जे हिंदू पुढे मुसलमान झाले त्यांचे परतणे सुरू झाले. शिवाजी महाराजांनी सर्वात आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्हा हिंदू बनवले होते. नेतोजीराव महाराजांना सोडून कधी गेलेच नव्हते पण एका खेळीत थोडी गडबड झाल्याने त्यांना मुसलमानांनी हाणून मारून बळजबरीने मुसलमान बनवले. संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली. संभाजी महाराजांनी यासाठी एक विभागाची निर्मिती केली होती जे पुनः धर्मांतरण हा विषय हाताळत.

शिवाजी महाराजांच्या प्रमाणेच संभाजी महाराज देखील भगवान शिवाचे निस्सिम भक्त होते. संभाजी महाराजांच्या नावात शंभुजी हे नाव आहे, जे शंकराचं एक नाव आहे. संभाजी महाराजांना जेव्हा शिवाजी महाराजांच्या समवेत औरंगजेबाच्या समोर जावे लागले तेव्हा काशी विश्वनाथ दर्शन करूनच ते आग्र्याला गेले होते. शंभू राजांना सतत महादेव हे आदर्श वाटत असे.

शिवाजी महाराजांचा मृत्यू आणि हिंदुत्वासमोर संकटे | Death of Shivaji Maharaj and Probles for Hindutwa

Death of Shivaji Maharaj and Probles for Hindutwa
Death of Shivaji Maharaj and Probles for Hindutwa

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर 1680 नंतर मराठा साम्राज्याने खूप कठीण काळ सोसला. औरंगजेबाला वाटले होते की शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे जास्त काळ टिकू शकणार नाहीत, त्यामुळे स्वतः औरंगजेब बादशहा महाराजांच्या मृत्यूनंतर दक्खन ताब्यात मिळवण्यासाठी आला. औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट केली परंतु त्याला स्वराज्य नष्ट करता आले नाही.

1687 मध्ये वाईच्या लढाईत मराठा सैनिक मावळे थोडे कमी पडायला लागले, या लढाईत शंभूराजांचे खंबीर आधार हंबीरमामा नाही जगू शकले. नंतर पुढे संभाजी महाराज 1689 च्या आसपास मुघलांच्या हाती लागले.

संभाजी महाराजांना औरंगजेबाने दिलेल्या शिक्षा | Aurangzeb Cruelty on Sambhaji Maharaj

1689 मध्ये स्थिती बदलली होती. मुघलांनी गणोजी शिर्के यांच्या म्हणजेच संभाजी महाराजांच्या मेहुण्याला फितूर करत संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वरी पकडले. महाराजांना आणि कवी कलशांना कालकोठडीत टाकले गेले. त्यांना वेदा विरुद्ध इस्लाम धर्माचा स्वीकार करायला सांगितले. परंतु महाराजांनी तसे मुळीच केले नाही.

औरंजेबाच्या छावणी पर्यंत महाराजांना आणि कवी कलशांना हत्तीच्या अंबारीला बांधून फरफटत नेण्यात आले. औरंगजेब तेव्हा अकलूजला होता त्याने तिथून त्याची छावणी ही किल्ले धर्मवीरगड येथे हलवली. त्याकाळी त्या गडाला बहादूरगड असे नाव होते. बहादूरगड म्हणजे जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कोणताही डोंगर नाही, त्यामुळे मराठ्यांना येथून शंभुराजांना गनिमीकावा करून सोडवणे तसे मुश्किल होते. संभाजी महाराजांचा ईराणी पद्धती चे लाकडी जोखड गळ्यात अडकवून त्यांचा तख्ताकुलाह करण्यात आला. महाराजांची ही अवस्था सर्व सैनिक आणि त्या मोगली स्त्रिया पडद्याआडून बघत होत्या. सर्वात मोठ्या बाजारपेठेमधून महाराजांची धिंड काढण्यात आली.

जेव्हा शंभुराजांना आणि कवी कलशांना औरंगजेबसमोर आणण्यात आले तेव्हा औरंगजेब बादशहा सिंहसनावरून खाली उतरला. सिंहसनावरून खाली आल्यानंतर औरंगजेब बादशहा गुढगे टेकून खाली बसला आणि त्याचा नमाज म्हणायला लागला. तो त्या अल्लाचा शुक्रिया अदा करत होता. कवी कलश तेव्हा महाराजांच्या सोबत साखळदंडात जखडले होते. संभाजी राजे हे चित्र बघून कवी कलशांना म्हणतात, कविराज सुचतेय का एखादी कविता? त्यावर कवी कलश उत्तर देत म्हणतात का नाही राजे!

यावन रावण की सभा शंभू बंदयो बजरंग
लहू लसत सिंधुर सम खूब खेल्यो रणरंग
ज्यो रवी छवी लखत ही खद्योत होत बदरंग
त्यो तुव तेज निहारिके तखत तज्यो अवरंग!

त्यानंतर औरंगजेब रागाने लालबुंद झाला आणि त्याने शिक्षा फर्मवायला सुरुवात केली. महाराजांना अगोदर कोठडीत ठेवले गेले, अगोदरच अंगावर वार होऊन जखमा झालेल्या होत्या तरी त्यावर कातडे सोलून मीठ मिरची लावण्यात आली. महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांची नखे पकडीने खेचून काढण्यात आली. प्रत्येक शिक्षेची अंमलबजावणी ही पहिले कवी कलशांवर होत आणि मग ती महाराजांवर होत असे. महाराजांचे डोळे सळई घालून काढले. जीभ कापली, अतोनात अत्याचार महाराजांच्या शरीरावर झाले.

महाराजांच्यावर औरंगजेबाच्या शिक्षेचा फरक पडत नव्हता त्यामुळे औरंगजेब अगदी क्रूर शिक्षा देत होता. महाराज झुकायला तयार नव्हते अखेरीस औरंगजेबाने त्याचा मुक्काम हा वडू बुद्रुक तुळापूर येथे हलवला.

महाराजांचे शरीर अगोदरच सोलले गेले होते परंतु आता त्यांचे हात देखील कापले. अखेरीस 40 दिवस छळ सहन केल्यानंतर औरंगजेबाने हा शूर छावा आणि स्वराज्याचा धनी झुकणार नाही हे लक्षात घेत महाराजांचे सर शरीरापासून वेगळे करण्याचा आदेश दिला. 11 मार्च 1689 चा तो दिवस, महाराज आपल्याला सोडून गेले. महाराजांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि महाराजांचे शीर हे भीमा इंद्रायणीच्या काठी भाल्याला अडकवून ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. अखंड महाराष्ट्र दुःखात होता. भीमा इंद्रायणी रडत होती आणि तेथील वातावरण शांत होते. तरी देखील मराठे खचले नाही, औरंगजेबाला त्याचे जीवन स्वराज्यावर ताबा न मिळवता इथेच महाराष्ट्रात संपवावे लागले.

मित्रांनो तुम्हाला जर का हा Sambhaji Maharaj information in Marathi वरील आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा.

Sambhaji Maharaj History in Marathi या लेखामध्ये तुम्हाला काही Update करायचे असतील तर कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या कंमेंट ची पडताळणी करून आमच्या या लेखामध्ये जोडून घेऊ.

हे देखील वाचा
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले

मराठा साम्राज्याची राजधानी किल्ले रायगड

 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment