श्यामा प्रसाद मुखर्जी | Dr Shyam Prasad Mukherjee Biography in marathi

डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी एक भारतीय एक विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजनेता आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. ते पंडित जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा मंत्री होते पण नेहरू सोबत असलेल्या मतभेदांमुळे त्यांनी मंत्रिमंडळ व काँग्रेस पार्टीचा त्याग केला व एक नवीन राजकीय पार्टी ‘भारतीय जनसंघ’ ची स्थापना केली. केंद्र सरकारमध्ये मंत्री बनण्याच्या आधी ते पश्चिम बंगाल सरकारमध्ये वित्तमंत्री होते. केवळ 33 वर्षाचे असताना ते कलकत्ता विश्वविद्यालयाचे कुलगुरू बनले. या पदावरती नियुक्त होणारे ते सर्वात कमी वयाचे व्यक्ती होते.

  • जन्म: 06 जुलै 1901, कलकत्ता, बंगाल, ब्रिटिश भारत
  • मृत्यु: 23 जून 1953, कश्मीर कारावास, स्वतंत्र भारत
  • कार्य: शिक्षणतज्ञ, विचारवंत, राजकारणी

Dr Shyam Prasad Mukherjee Biography in marathi

आरंभिक जीवन

श्याम प्रसाद मुखर्जी यांचा जन्म ०६ जुलै १९०१ ला कलकत्ता च्या एका अत्यंत प्रतिष्ठित परिवारात झाला. त्यांचे वडील सर आशुतोष मुखर्जी एक शिक्षाविद(Academician) म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या आईचे नाव जोगमाया देवी आणि उमा प्रसाद मुखोपाध्याय त्यांचे छोटे भाऊ होते. श्याम प्रसाद यांनो सन 1917 मध्ये मॅट्रिक केली होती व सन 1921 मध्ये बी.ए.(BA) ला प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. नंतर बंगाली विषयामध्ये एम.ए.(MA) ला सुद्धा ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते आणि 1924 मध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. अशा प्रकारे त्यांनी कमी वयातच शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनिय यश मिळवले होते आणि लवकरच त्यांची प्रसिद्धी एक शिक्षणतज्ञ आणि लोकप्रिय प्रशासकाच्या रूपात झाली. सन 1924 मध्ये त्यांच्या वडिलांच निधन झाल्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयात सराव करण्यासाठी त्यांनी नोंदणी केली.

करियर

सन 1926 मध्ये ते इंग्लंडला गेले आणि 1927 मध्ये बॅरिस्टर बनून भारतात परतले. 1934 मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयाचे कुलगुरू बनणारे ते सर्वात कमी वयाचे व्यक्ती होते. डॉ मुखर्जी या पदावर 1938 पर्यंत कार्यरत होते. 1937 मध्ये त्यांनी गुरु रवींद्रनाथ टागोर यांना कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये भाषणासाठी आमंत्रित केले. कोलकाता विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणी बंगालीमध्ये दीक्षांत भाषण केले.img user Marathi varsa

राजकिय जीवन

डॉ मुखर्जी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात 1929 मध्ये झाली तेव्हा त्यांनी काँग्रेस पार्टीचे तिकीट घेऊन बंगाल विधान परिषदेमध्ये प्रवेश केला पण जेव्हा काँग्रेसने विधान परिषदेचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते एक स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढले आणि निवडून आले.

1941-42 मध्ये ते बंगाल राज्याचे वित्त मंत्री होते. 1937 ते 1941 दरम्यान, कृषक प्रजा पार्टी आणि मुस्लिम लीग यांचे संयुक्त सरकार असताना ते विरोधी पक्षाचे नेते होते आणि जेव्हा फजलुल हक यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी वित्तमंत्री म्हणून काम केले, परंतु 1 वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर ते हळूहळू हिंदूंच्या हिताबद्दल बोलू लागले आणि हिंदू महासभेेत सहभागी झाले. 1944 मध्ये ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते.s Marathi varsa

श्याम प्रसाद मुखर्जी यांनी मोहम्मद अली जिन्ना आणि मुस्लिम लीग यांच्या जातीयवादी राजकारणाला विरोध केला होता. त्यावेळेस जिन्ना मुसलमानांसाठी खूप जास्त सवलतीची मागणी करत होते आणि पाकिस्तान आंदोलनाला पण प्रोत्साहन देत होते त्यांनी मुस्लिम लीगच्या जातीयवादी प्रचारापासून हिंदूंचे संरक्षण केले व मुस्लिम तुष्टीकरण धोरणेचा विरोध केला.

डॉ मुखर्जी धर्माच्या आधारे फाळणीचे कट्टर विरोधक होते. त्यांच्या नुसार फाळणी संबंधित परिस्थिती ऐतिहासिक आणि सामाजिक कारणामुळे उत्पन्न झाली होती. त्यांना हे सुद्धा माहीत होते की आपण सर्व एक आहोत व आपल्यात काहीच अंतर नाही. आपण सर्व एकच भाषा आणि संस्कृतिचे आहोत आणि आपला एकच वारसा आहे. या श्रद्धेने त्यांनी सुरुवातीला देशाच्या फाळणीचा विरोध केला होता पण 1946-47 च्या दंगलीनंतर त्यांच्या या विचारात परिवर्तन आले. त्यांना असे वाटले की मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये मुस्लिम बहूल राज्यांमध्ये हिंदूंचे राहणे असुरक्षित असेल. या कारणामुळे त्यांनी 1946 मध्ये बंगाल विभागणीचे समर्थन केले.

इंदिरा गांधी संपुर्ण माहीती मराठी मध्ये

स्वातंत्र्याच्या नंतर

स्वातंत्र्याच्या नंतर जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले तेव्हा डॉ श्याम प्रसाद मुखर्जी, गांधीजी आणि सरदार पटेल यांच्या मागणीनुसार भारताच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले व उद्योग आणि पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली. भारताच्या संविधान सभेमध्ये आणि प्रांतीय संसदेत ते सदस्य होते आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी आपले विशिष्ट स्थान बनवले होते परंतु त्यांच्या राष्ट्रवादी विचारांमुळे काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचे मतभेद झाले होते. अखेरीस 1950 मध्ये नेहरू लियाकात कराराच्या विरोधात त्यांनी 6 एप्रिल 1950 ला मंत्री मंडळामधून राजीनामा दिला.

त्यानंतर त्यांनी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली जो त्यावेळेसचा सर्वात मोठा विरोधी पक्ष होता. याप्रकारे ऑक्टोबर 1951 मध्ये ‘भारतीय जनसंघाची’ उत्क्रांती झाली. 1952 च्या निवडणुकांमध्ये भारतीय जनसंघाने एकूण तीन जागा जिंकल्या, ज्यामधून एक त्यांची स्वतःची जागा सहभागी होती.

जम्मू कश्मीर आणि धारा 370

डॉ मुखर्जी जम्मू काश्मीर राज्याला एक वेगळा दर्जा देण्याचे घोर विरोधक होते आणि त्यांची इच्छा होती की जम्मू काश्मीर ला सुद्धा भारताच्या अन्य राज्यांसारखे मानावे. ते जम्मू काश्मीरचा वेगळा ध्वज, वेगळा निशान आणि वेगळया संविधानाच्या विरोधात होते. तिथल्या मुख्यमंत्र्यांना (वझिरे-आझम) पंतप्रधान म्हणतात, हे ऐकून ते नाराजी व्यक्त करायचे. त्यांनी देशाच्या संसदेत धारा 370 ला संपविण्यासाठी जोरदार वकिली केली.

ऑगस्ट 1952 मध्ये त्यांनी विना परवाना जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आणि त्या घोषणेला पूर्ण करण्यासाठी ते 1953 मध्ये विना परवाना जम्मू काश्मीरला गेले. तेथे पोहोचताच त्यांना अटक केले गेले व 23 जून 1953 ला त्यांचा रहस्यमय परिस्थितीमध्ये मृत्यू झाला.

टाइम लाइन (जीवन घटनाक्रम)

  • 1901: श्यामा प्रसाद मुख़र्जी यांचा जन्म झाला.
  • 1921: कोलकत्ता विद्यापीठामधून इंग्रजी विषयांमध्ये पदवीधर.
  • 1923: कोलकत्ता विद्यापीठामधून बांगला विषयात पदव्युत्तर.
  • 1923: कलकत्ता विद्यापीठाच्या सिनेटचे नामांकित फेलो.
  • 1924: कायद्याची पदवी मिळवली.
  • 1924: कलकत्ता हायकोर्टामध्ये वकिली करण्यास सुरुवात केली.
  • 1924: त्यांचे वडील आशुतोष मुखर्जी यांचे निधन.
  • 1926: शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.
  • 1927: इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झाले व भारतात परतले.
  • 1934: कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले.
  • 1938: कलकत्ता विद्यापीठाच्या कुलगुरूचा कार्यकाळ समाप्त झाला.
  • 1941-42: बांगलादेशमध्ये वित्तमंत्री.
  • 1944: हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले.
  • 1946: बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला.
  • 1947: केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले.
  • 1950: 6 एप्रिल ला मंत्रिमंडळामधून राजीनामा दिला.
  • 1951: 21 ऑक्टोबरला भारतीय जनसंघेची स्थापना केली.
  • 1953: 11 मे ला जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केल्यावर अटक केली गेली.
  • 1953: 23 जून रोजी गूढ परिस्थितीत मृत्यू झाला.

Final words 

श्यामा प्रसाद मुखर्जी त्यांच्यासारख्या महान देशभक्ताचा खटल्याशिवाय जेल मध्ये असताना अकाली मृत्यू झाला ही एक गंभीर शोकांतिका आहे – मृत्यूच्या वेळी त्यांच्या जवळचे आणि प्रियजनांपैकी कोणीही त्यांच्यासोबत उपस्थित नव्हते. मुखर्जी यांनी भारतासाठी केलेले कार्य आजही कोणी विसरू शकला नाही आहे. मला अशा आहे तुम्हाला आमच्या लेखामधून श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे कार्य जवळून जाणून घ्यायला मदत झाली असेल.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment