इंदिरा गांधी संपुर्ण माहीती मराठी मध्ये | Indira Gandhi Biography in Marathi

इंदिरा गांधी संपुर्ण माहीती मराठी | Indira Gandhi Biography in Marathi

Indira Gandhi Biography in Marathi: इंदिरा गांधी ह्या भारताच्या चौथ्या आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या. त्या एक अशा महिला आहेत ज्यांनी न केवळ भारतीय राजकारणात तर विश्वाच्या राजकारणाच्या क्षितिजावर एक आपली छाप सोडली होती. याच कारणामुळे त्यांना लोह महिला (Iron Women) म्हणून संबोधित केले जाते. इंदिरा गांधी भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांची कन्या होती आणि नेहरू प्रधानमंत्री होते तेव्हाच तिने राजकारणात स्वतःची चांगली ओळख बनवली होती.

एका राजनैतिक नेताच्या रूपात इंदिरा गांधीला खूप निर्दयी मानले जाते. प्रधानमंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी प्रशासनाचे गरजेपेक्षा जास्त केंद्रीकरण केले. त्यांच्या शासन काळामध्ये भारतात एक मात्र आणीबाणी लागू केली गेली आणि सर्व राजनैतिक प्रतिस्पर्धीयांना जेल मध्ये टाकण्यात आले. भारताच्या संविधानाचे मूळ स्वरूपाचे संशोधन जेव्हढे त्यांच्या राज्यात झाले, तेवढे कोणाच्याच राज्यात झाले नाही. त्यांच्या शासन काळात बांगलादेश मुद्द्यावरून भारत-पाक युद्ध झाले आणि बांगलादेशचा जन्म झाला. पंजाब मधून आतंकवादीना नष्ट करण्यासाठी त्यांनी अमृतसर मध्ये स्थित सिख लोकांचे पवित्र स्थळ ‘स्वर्ण मंदिर’ मध्ये सैन्य आणि सुरक्षा दलांद्वारे ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ राबवले . याच्या काही महिन्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. आपली प्रतिभा आणि राजकीय पराक्रमासाठी इंदिरा गाँधी यांना भारतीय इतिहासात नेहमी ओळखले जाईल.

Indira Gandhi Marathi Mahiti

  • जन्म: १९ नोव्हेंबर १९१७, इलाहाबाद, यूनाइटेड प्रोविंस
  • मृत्यु: ३१ ऑक्टोबर, १९८४,नवी दिल्ली
  • कार्य/पद: राजकारणी, भारताची पूर्व प्रधानमंत्री
  • पूर्ण नाव : इंदिरा प्रियदर्शिनी गांधी

आरंभिक जीवन | Early Life of Indira Gandhi in Marathi

Early Life of Indira Gandhi in Marathi
Early Life of Indira Gandhi in Marathi

इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ ला उत्तर प्रदेश च्या इलाहाबाद मध्ये प्रसिद्ध नेहरु परिवारत झाला होता. त्यांचं पूर्ण नाव ‘इंदिरा प्रियदर्शिनी गांधी’होते. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरु आणिआजोबा  मोतीलाल नेहरु होते. जवाहरलाल आणि मोतीलाल  दोघेही यशस्वी वकील होते आणि दोघांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले होते. इंदिराच्या आई चे नाव कमला नेहरू होते. त्यांचा परिवार आर्थिक व बौद्धिक दृष्ट्या संपन्न होता. त्यांचे आजोबा मोतीलाल नेहरु यांनी त्यांचे इंदिरा नाव ठेवले होते.

इंदिरा दिसायला अत्यंत प्रिय होती म्हणून पंडित नेहरू त्यांना ‘प्रियदर्शिनी’ ह्या नावाने बोलवायचे. आई-वडिलांचे आकर्षक व्यक्तिमत्व इंदिराला वारसा म्हणून मिळाले होते. इंदिरा गांधी यांना बालपणात एक स्थिर कौटुंबिक आयुष्य मिळाले नाही कारण त्यांचे वडील सतत स्वातंत्र्य आंदोलनात व्यस्त असायचे आणि जेव्हा त्या १८ वर्षच्या होत्या तेव्हा त्यांची आई कमला नेहरू यांचे क्षयरोगामुळे निधन झाले.

वडिलांची राजकीय प्रतिबद्धता आणि आईच्या आजारपणामुळे इंदिराला जन्माच्या काही वर्षानंतर सुद्धा शिक्षणासाठी अनुकूल वातावरण नव्हते. राजकीय कार्यकर्त्यांच्या रात्र-दिवस येण्या जाण्यामुळे घराचे वातावरण सुद्धा अभ्यासासाठी अनुकूल नव्हते म्हणून पंडित नेहरू यांनी त्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांचे व्यवस्थापन घरीच केले. इंग्रजी विषयाव्यतिरिक्त इंदिरा गांधी कोणत्याही इतर विषयांमध्ये कार्यक्षमता प्राप्त करू शकल्या नाहीत. यानंतर त्यांना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या द्वारा स्थापित केलेल्या शांतिनिकेतन च्या विश्वभारती इथे अभ्यासासाठी पाठवण्यात आले. हे झाल्यानंतर इंदिरा यांनी लंडनच्या बॅडमिंटन स्कूल आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये अध्ययन केले, परंतु अभ्यासामध्ये त्या विशेष यश मिळवू शकल्या नाहीत आणि त्या सर्वसाधारण विद्यार्थी म्हणून ओळखल्या जात होत्या.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये अभ्यास करताना त्यांची भेट फिरोज गांधी यांच्यासोबत नेहमी व्हायची, ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करत होते. फिरोज यांना इंदिरा गांधी या इलाहाबाद मध्ये असतानाच ओळखत होत्या. भारतामध्ये परतल्यानंतर या दोघांचा विवाह 16 मार्च 1942 ला आनंद भवन, इलाहाबाद मध्ये झाला.

स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभाग | Indira Gandhi’s Participation in the freedom movement in Marathi

इंदिरा गांधी यांनी लहानपणापासूनच आपल्या घरामध्ये राजकीय वातावरण पाहिले होते. त्यांचे वडील आणि आजोबा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये योगदान देणाऱ्या महत्त्वाच्या आंदोलकांमध्ये गणले जात होते. या वातावरणाचा प्रभाव इंदिरा गांधी यांच्यावर झाला. त्यांनी तरुण मुला-मुलींना एकत्र करून एक वानरसेना बनवली होती, जी विरोध प्रदर्शन आणि झेंडा मिरवणूक या सोबतच संवेदनशील प्रकाशन त्याचबरोबर प्रतिबंधित साहित्य याचे अभिसरण देखील करत असत. लंडनमध्ये शिकत असताना त्या इंडियन लीगच्या सदस्य झाल्या. इंदिरा गांधी या ऑक्सफर्ड मधून शिकून 1941 मध्ये भारतामध्ये परतल्या आणि यानंतर लगेचच भारतीय स्वतंत्रता चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. स्वतंत्रता चळवळीच्या आंदोलना दरम्यान सप्टेंबर 1942 मध्ये त्यांना अटक करण्यात आली यानंतर मे 1943 मध्ये त्यांची ब्रिटिश सरकारने सुटका केली.

फाळणी नंतर झालेल्या दंगली आणि अराजकते दरम्यान इंदिरा गांधी यांनी शरणार्थी लोकांना संघटित करण्याचे त्याचबरोबर पाकिस्तान मधून आलेल्या शरणार्थी लोकांची काळजी घ्यायचं महत्त्वपूर्ण कार्य केलं.

राजकीय जीवन | Political life of Indira Gandhi in Marathi

अंतरिम सरकारच्या घटनाानंतर जवाहरलाल नेहरू यांना भारताचे पहिले प्रधानमंत्री पद देण्यात आलं. यानंतर नेहरू यांची राजकीय सक्रियता बऱ्याच प्रमाणात वाढली. त्रिमूर्ती भवन स्थित असलेल्या नेहरूजी यांच्या निवासस्थानावर येणाऱ्या सर्वांच्या स्वागताची तयारी या स्वतः इंदिरा गांधी करायच्या. यानंतर वय वाढत असलेल्या वडिलांची काळजी घ्यायची जबाबदारी देखील इंदिरा गांधी यांच्यावर पडली. इंदिरा गांधी ह्या पंडित नेहरू यांच्या विश्वासू, सचिव आणि नर्स झाल्या.

इंदिरा गांधी यांना परिवाराच्या वातावरणामधून राजकीय विचारधारेचा वारसा प्राप्त झाला होता आणि आपल्या वडिलांची मदत करता करता त्यांना देखील राजकारणाचे चांगले ज्ञान प्राप्त झाले होते. काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणी मध्ये यांना सन 1955 मध्येच सामील करून घेण्यात आले होते. पंडित नेहरू इंदिरा गांधी यांच्यासोबत राजकीय समुपदेशन करत आणि त्याच्यावर अंमलबजावणी देखील करत.

Political life of Indira Gandhi in Marathi
Political life of Indira Gandhi in Marathi

हळूहळू इंदिरा गांधी यांचं काँग्रेस पार्टीमध्ये वर्चस्व वाढत गेलं आणि वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी सन 1959 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्ष देखील झाल्या. नेहरू यांच्या या निर्णयानंतर त्यांच्यावर पक्षामध्ये परिवारवाद पसरवण्याचा आरोप देखील करण्यात आला परंतु पंडित नेहरू यांची शक्ती एवढी मोठी होती की या गोष्टींची जास्त चर्चा झाली नाही. सन 1964 मध्ये नेहरू यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी निवडणूक जिंकून या शास्त्री सरकारमध्ये सूचना आणि प्रसारण मंत्री झाल्या. इंदिराजींनी आपली नवी जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडली आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून ऑल इंडिया रेडिओचे कार्यक्रम मनोरंजक केले आणि त्याचा दर्जाही वाढवला. 1965 मध्ये भारतीय पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान आकाशवाणी च्या माध्यमातून भारतीय लोकांची राष्ट्रप्रती असलेली भावना अधिक मजबूत करण्यामध्ये अतुलनीय योगदान दिले. इंदिरा गांधी यांनी युद्ध सुरू असताना सीमेवर जाऊन आपल्या जवानांचे मनोबल वाढवलं आणि स्वतःच नेतृत्व दाखवून दिलं.

प्रधानमंत्री पदावर | Indira Gandhi as a prime Minister in Marathi

  • इंदिरा गांधी या चार वेळा भारताच्या प्रधानमंत्री होत्या, लगातार तीन वेळा ( 1966-1977) आणि पुन्हा एकदा चौथ्यांदा ( 1980-84)
  • सन 1966 मध्ये भारताचे द्वितीय प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या अकस्मात मृत्यूनंतर श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या प्रधानमंत्री झाल्या.
  • ​ 1967 च्या निवडणुकीमध्ये त्या खूपच कमी मतांनी बहुमत मिळवून जिंकल्या आणि प्रधानमंत्री झाल्या.
  • सन 1971 मध्ये त्या बहुमताने निवडून आल्या आणि प्रधानमंत्री झाल्या. त्यांचा कार्यकाळ 1977 पर्यंत होता.
  • 1980 मध्ये त्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाल्या आणि 1984 पर्यंत या पदावर त्यांनी कार्य केलं.

लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे अध्यक्ष के कामराज यांनी इंदिरा गांधी यांचं नाव प्रधानमंत्री पदासाठी सुचवलं परंतु वरिष्ठ नेता मोरारजी देसाई यांनी सुद्धा प्रधानमंत्री पदासाठी स्वतःचे नाव प्रस्तावित केले होते. काँग्रेस संसदीय पक्षा द्वारे मतदान केल्यानंतर या गोष्टी सोडवण्यात आल्या आणि इंदिरा गांधी या पुन्हा एकदा बहुमताने विजयी झाल्या. 24 जानेवारी 1966 ला इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. सन 1967 मध्ये काँग्रेस सरकारला निवडणुकीमध्ये खूप नुकसान झाले परंतु सरकार बनवण्यामध्ये हा पक्ष यशस्वी झाला. दुखावलेल्या मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधी चा विरोध कायम ठेवला आणि अखेर 1969 मध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले.

जुलै 1969 मध्ये इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.

सन 1971 मध्ये मध्यवर्ती निवडणूक 

पक्ष आणि देशामध्ये आपली स्थिती मजबूत करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी लोकसभा भंग करून मध्यवर्ती निवडणुकांची घोषणा केली ज्यामुळे विरोधी पक्षाला देखील धक्का बसला. इंदिरा गांधी या गरिबी हटाव हा नारा घेऊन निवडणुकांमध्ये उतरल्या आणि हळूहळू त्यांच्या पक्षामध्ये निवडणुकीचा माहोल बनू लागला आणि काँग्रेसला बहुमत मिळाले. एकूण 518 पैकी 352 जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या.

‘महाआघाडी’ (काँग्रेस (ओ), जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष यांची युती) जनतेने नाकारल्याचे निवडणूक निकालांनी स्पष्ट केले होते. आता केंद्रामध्ये इंदिरा गांधी यांची स्थिती खूपच मजबूत झाली होती आणि त्या स्वतः निर्णय घेऊ लागल्या होत्या.

पाकिस्तान सोबत युद्ध । India VS Pakistan War Information in Marathi

सन 1971 मध्ये बांगलादेश या मुद्द्यावर भारत पाकिस्तान मध्ये युद्ध सुरु झालं, पहिल्यासारखंच याही वेळी पाकिस्तानला तोंडघशी पडावे लागले. 13 डिसेंबरला भारताच्या सेनेने ढाका शहराला चारी बाजूंनी घेरले. 16 डिसेंबरला जनरल नियाजी यांनी 93 हजार पाकिस्तानी सैनिकांसोबत एकत्र येऊन हत्यार टाकून दिले. युद्ध हरल्यानंतर जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती झाले आणि त्यांनी भारतासमोर शांती वार्ता चा प्रस्ताव ठेवला ज्यास इंदिरा गांधी यांनी मंजुरी दिली आणि यानंतर दोन्ही राष्ट्रांमध्ये शिमला करार झाला.

India VS Pakistan War Information in Marathi
India VS Pakistan War Information in Marathi

इंदिरा गांधी यांनी अमेरिकेला सहयोग न करता सोवियत संघ म्हणजेच रशिया सोबत आपली मित्रता आणि सहयोग वाढवला, आणि याच्या परिणामामुळे 1971 च्या युद्धात राजकीय आणि लष्करी पाठबळाचे मोठे योगदान होते.

पाकिस्तान युद्धानंतर ची स्थिती 

पाकिस्तान युद्ध नंतर इंदिरा गांधी यांनी आपलं लक्ष देशाच्या विकासासाठी केंद्रित केलं. संसदेत त्यांना संपूर्ण बहुमत प्राप्त होते ज्यामुळे निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्रता होती. त्यांनी 1972 मध्ये विमा आणि कोयला उद्योग चे राष्ट्रीयकरण केले. त्यांच्या या दोन्ही निर्णयांना अपर्जन समर्थन प्राप्त झाले. याशिवाय त्यांनी जमीन सुधारणा, समाजकल्याण आणि अर्थव्यवस्थेतही अनेक सुधारणा राबवल्या.

आणीबाणी (1975 – 1977) | 1975 Emergency Information in Marathi

सन 1971 च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांना चांगले यश मिळाले होते त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये विकासाचे कार्यक्रम हाती घेतले होते परंतु देशाच्या आत मध्ये समस्या वाढत होत्या. महागाईमुळे लोक त्रस्त झाले होते. युद्धामध्ये झालेल्या खर्चामुळे आर्थिक ओझं देखील वाढलं होतं. आणि याच दरम्यान दुष्काळ आणि अकाळी वातावरणाने परिस्थिती अजून बिघडवली. तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या किमती वाढत असल्यामुळे भारतामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत होती आणि देशात असलेले विदेशी मुद्रेचे भांडार petrol खरेदीमुळे जवळपास संपत आले होते. एकूणच भारतामध्ये आर्थिक मंदीचा काळ चालू होता आणि त्याच्यामुळे सर्व उद्योगधंदे चौपट झाले होते. महागाई देखील खूप वाढली होती आणि सरकारी कर्मचारी देखील महागाईमुळे वेतन वाढ मागत होते. या सगळ्या समस्या सुरू असतानाच सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील लावले गेले.

केंद्र सरकार या सगळ्या कठीण परिस्थिती सोबत झुंजत असतानाच इलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांना निवडणूक संबंधित एका महत्वपूर्ण केस वर निर्णय ऐकवला, ज्यामध्ये त्या सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाही अशी तरतूद होती. इंदिरा गांधींना हा निर्णय मान्य नव्हता आणि म्हणूनच त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याची पुनश्च दाद मागितली आणि न्यायालयाने 14 जुलै पर्यंत वेळ मागितला होता परंतु विरोधी पक्षाला अजिबात वेळ वाया घालवायचा नव्हता आणि म्हणूनच जयप्रकाश नारायण आणि इतर समर्थन करणारे कार्यकर्ते यांनी या आंदोलनाला उग्ररूप दिले. या सर्व परिस्थिती सोबत दोन हात करण्यासाठी 26 जून 1975 ला सकाळी देशामध्ये emergency लागू करण्यात आली. आणि जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई आणि इतर छोट्या-मोठ्या हजार एक कार्यकर्त्यांना जेलमध्ये डांबण्यात आले.

सरकारने वर्तमानपत्र रेडिओ आणि टीव्हीवर देखील बंदी घातली. मूलभूत अधिकार देखील जवळपास समाप्त झाले होते.

इंदिरा यांनी जानेवारी 1977 मध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आणि या सोबतच राजकीय कैद्यांना जेलमधून सोडण्यात आले. मीडियाची स्वतंत्रता पुन्हा एकदा बहाल करण्यात आली.

कदाचित इंदिरा गांधी यांना स्थितीचे बरोबर मूल्यांकन करता आले नाही आणि त्यामुळे जनतेचे समर्थन विरोधी पक्षाला मिळायला लागले ज्यामुळे विरोधी पक्ष अधिक सशक्त होऊन उदयास आले. जनता पार्टीच्या एकरूप एकजूट विपक्षाला आणि त्यांच्या सहयोगी दलाला 542 मधून 330 जागा प्राप्त झाल्या, तर दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस सरकारला मात्र 154 जागा मिळवता आल्या.

सत्तेमध्ये परत येणे :-

81 वर्षीय मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वामध्ये जनता पार्टीने 23 मार्च 1977 ला सरकार बनवली परंतु हे सरकार पहिल्यापासूनच आंतरिक कलहामध्ये गुंतलेले होते आणि अंततः या कारणांमुळे ऑगस्ट 1979 मध्ये हे सरकार देखील पडले.

जनता पार्टीच्या शासन काळात इंदिरा गांधी यांच्यावर अनेक आरोप लावले गेले बऱ्याच कमिशन देखील नियुक्त करण्यात आल्या. त्यांच्यावर देशाच्या बऱ्याच कोर्टामध्ये केसेस फाईल करण्यात आल्या श्रीमती गांधी या काही काळासाठी जेलमध्ये देखील होत्या.

एका बाजूला जनता पार्टीच्या आंतरिक कलहामुळे त्यांचं सरकार सगळीकडे विफल ठरत होतं तर दुसऱ्या बाजूला इंदिरा गांधी सोबत होणाऱ्या गैरवर्तुनुकीमुळे जनतेच समर्थन इंदिरा गांधींना पुन्हा एकदा मिळू लागले होते.

जनता पार्टी सरकार चालवण्यामध्ये असफल ठरली आणि देशामध्ये मध्यवर्ती निवडणुका कराव्या लागल्या. इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी साठी जनतेची माफी मागितली ज्याच्या परिणामामुळे त्यांच्या पार्टीला 592 मधून 353 जागा प्राप्त झाल्या आणि इंदिरा गांधी या पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाल्या.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि हत्या, 1984 | Operation blue star Information in Marathi

बिंद्रानवालेचे नेतृत्व मध्ये पंजाब मध्ये नक्षलवाद्यांची ताकत डोके वर काढू लागली होती आणि बिंद्रानवाले याला असं वाटत होतं की आपल्या नेतृत्वामध्ये पंजाबला वेगळे अस्तित्व प्राप्त होऊ शकते. परिस्थिती खूपच बिघडली होती आणि असे वाटू लागले होते की नियंत्रण आता केंद्र सरकारच्या हातात देखील नाही. दुसऱ्या बाजूला भिंद्राणवाले ला असं वाटत होतं की शस्त्रांच्या बळावर तो स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करू शकतो.

Operation blue star Information in Marathi
Operation blue star Information in Marathi

सप्टेंबर 1981 मध्ये भिंद्राणवाले आणि त्यांचा आतंकवादी समूह हरी मंदिर साहेब या मंदिराच्या परिसरात तैनात झाला होता. आतंकवाद्यांना मारून टाकण्यासाठी इंदिरा गांधींनी सेनेला मंदिरात प्रवेश करण्याचे आदेश दिले. या गोष्टी घडत असताना सुवर्ण मंदिरच्या परिसरात हजारो बळी गेले, आणि यामुळेच सिख समाजात इंदिरा गांधींच्या विरोधात प्रचंड रोष आक्रोश निर्माण झाला होता.

ऑपरेशन ब्लू स्टार च्या अवघ्या पाच महिन्यानंतरच 31 ऑक्टोबर 1984 ला इंदिरा गांधींच्या दोन शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

Final Words

तर मित्रांनो मला अशा आहे Indira Gandhi Biography in Marathi या लेखातून तुम्हाला इंदिरा गांधी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती समजायला मदत झाली असेल, तरी सुद्धा तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आमच्या मराठी वारसा ची टीम तुमच्या शंकांचे निरसन करेल.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment