भारत या महान देशाबद्दल सर्व काही जाणून घेणे तर अशक्यच आहे, पण आज मी तुम्हाला Facts about India in Marathi सांगणार आहे, ज्या तुम्हाला अजूनही माहिती नसतील.
भारत हा एक मोठा देश आहे केवळ क्षेत्र आणि लोकसंख्येच्या बाबतीतच नव्हे तर विविधतेच्या दृष्टीने देखील खूप महान आहे. या महान देशाबद्दल सर्व काही जाणून घेणे तर अशक्यच आहे, पण आज मी तुम्हाला भारताबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्हाला अजूनही माहिती नसतील.
१) बुद्धिबळ या खेळाचा शोध सर्वप्रथम भारतामध्ये लागला.
२) भारत हे जगातील दुसरे सर्वात सुप्रसिद्ध देश असून मोठा भूखंड असलेला सातवा देश आहे.
३) भारतातील बॉलीवूड जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता आहे.
४) भारतात एकूण चार धर्म जन्माला आले – हिंदू, बौद्ध, जैन, शीख.
५) कुंभ मेळा उत्सव हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येने साजरा करण्यात येणारा उत्सव आहे.
६) भारतात शास्त्रज्ञ आणि अभियंते ह्यांची संख्या जास्त असून याकरिता भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.
७) मानवी इतिहासातील भारतीय पाककृती सर्वात जुनी व वारंवार तयार केलेली पाककृती मानली जाते.
८) भारतीय रेल्वेमध्ये 1.4 दशलक्षपेक्षा अधिक कर्मचारी आहेत.
९) जगातील सर्वात मोठा क्रिकेट स्टेडियम भारतात आहे , HPCA Stadium – हिमाचल प्रदेश.
१०) भारतीय राष्ट्रीय कब्बडी संघाने आतापर्यंतचे सर्व विश्वचषक पटकावले आहेत.
११) भारतात सर्वात जास्त संख्येने डाक घर आहेत.
१२) सक्रिय सैन्य साठी भारताचा जगात चीन व अमेरिका नंतर तिसरा क्रमांक येतो.
१३) १९८६ पर्यंत, भारत हा एकमेव देश होता जिथे हिरे अधिकृतपणे शोधून खणले जात.
१४) भारताने जागतिक योगा दिन दिलेला आहे, जो 5000 वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात आहे.
१५) भारतात सर्वात जास्त शाकाहारी लोक आहेत.
१६) महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात जगातील सर्वात जास्त नियोजित नगरे आहेत.
१७) सापशिडी खेळाचा शोध भारताने केला.
१८) भारत जगातील सर्वात मोठं दूध उत्पातक देश आहे.
१९) अमेरिका नंतर भारत जगातील दुसरे देश आहे जिथे जास्त प्रमाणात इंग्लिश भाषा बोलली जाते.
२०) भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेलं देश आहे.