How To Test A Pregnancy At Home in Marathi | घरी प्रेग्नन्सी (गर्भवती) टेस्ट कशी करावी

होम प्रेग्नन्सी कीट महिलांच्या मूत्रामधील हार्मोन HCG (human chorionic gonadotropin) उपस्थीती शोधून काम करतो. ह्यामुळे हे माहित होते की महिला गर्भवती आहे की नाही आणि गर्भवती असल्याचे समजण्याचे कारण HCG हार्मोन असतात. होम प्रेग्नन्सी कीट हे मेडिकल मध्ये उपलब्ध असते.

घरी प्रेग्नेन्सी टेस्ट कशी करावी

याचा वापर कसा करावा? पहिले आपण होम प्रेग्नन्सी टेस्ट कीट विकत घ्या आणि हे विकत घेण्या आधी काही गोष्टींकडे लक्ष द्या, कारण बाजारात बऱ्याच कंपनींचे होम प्रेग्नन्सी टेस्ट कीट उपलब्ध आहेत. घेतान त्याची कालबाह्य तारीख (एक्सपायरी डेट) जरुर चेक करा. हे कीट चालतेय कि नाही हे चेक करून घ्या. जर तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करत असाल तर अशी कंपनी निवडा जी कीट मध्ये दोन स्टिक्स उपलब्ध करत असेल. जर आपल्याला पहिल्या प्रयत्नात परिणाम नकारत्मक आले असतील तर एक आठवडा वाट बघून पुन्हा प्रयत्न करा.

काही कंपनींचे होम प्रेग्नेन्सी टेस्ट कीट आपली मासिक पाळी न येणाऱ्या दिवशी किंवा त्याच्या आधी गर्भावस्थेची एकदम ठीक स्थिती सांगण्याचा दावा करतात. पण हे बरोबर आहे कारण याची पडताळणी एवढी संवेदनशील असते कि आपल्या मूत्रातील उपस्थित HCG हार्मोन च्या उच्च स्तराचा शोध लावतो, परंतु आपल्या शरीरात उच्च स्तरावर ह्या हार्मोन चे निर्माण होण्या साठी अधीक वेळ लागू शकतो, अशा वेळी टेस्ट नकारात्मक परिणाम दाखवू शकते. पण कदाचित आपण गर्भवती असू शकता म्हणून याचा वापर काळजीपूर्वक करा आणि घाबरू नका हे कोणत्याही महिले सोबत होऊ शकते.

जर आपण टेस्ट करत असाल तर आपण त्या टेस्ट ची वेळ जाणून घ्या म्हणजेच टेस्ट केंव्हा आणि कोणत्या प्रकारे करायची आहे. जास्त करून विशेष गर्भावस्थाच्या टेस्ट साठी मासिक पाळी होत नसेल तर एक दिवस वाट बघण्याचा सल्ला देतात, तसेच एक आठवडा वाट बघणे हे आपल्या साठी चांगले होईल. जर आपण गर्भावस्थे बद्दल जाणून घेण्यासाठी अनिश्चित असाल तर हे कठीण होऊ शकत. पण वाट बघितल्याने आपली टेस्ट अधिक अचूक होण्याची संभावना वाढते कारण गर्भावस्तेत महिलांमध्ये HCG हार्मोन चा स्थर वेगाने वाढू लागतो यामुळे हे आपल्यासाठी सोपे जाईल व आपण घरी प्रेग्नेन्सी टेस्ट करू शकता.

प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे सकाळ आहे कारण यावेळी लघवी जाड व सकेंद्रित असते. यामुळे प्रेगनन्सी ची टेस्ट करणे सोपे जाते आणि यामुळे आपला परिणाम अचूक येतो. जर आपण पहिल्यांदा टेस्ट करत असाल तर आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवा, जास्त करून लघवी तपासणी एक सारखीच असते पण त्याच्यावर दिलेल्या सूचन नीट वाचल्या पाहिजेत.

खूप वेळा असे बघण्यात आले आहे कि जास्त करून महिला हि टेस्ट करायला घाबरतात त्यामुळे आपण पहिले हे सुनिश्चित करा की आपल्याला हि टेस्ट करायची आहे की नाही. प्रेग्नेन्सी टेस्ट करणे हा एक रोचक अनुभव असतो म्हणून अशा वेळी घाबरायचे नाही, आपल्या जरुरती नुसार वेळ काढून हि टेस्ट करा. कोणतीही घाई करू नका. यात आपण आपल्या मैत्रिणीची मदत घेऊ शकता. कोमट पाण्याने आणि साबणाने आपले हात स्वच्छ धुऊन घ्या आणि होम प्रेग्नेन्सी कीट वर दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रेग्नेन्सी टेस्ट करा.

हि टेस्ट करताना कोणतीही घाई करू नका, सावकाश करा. या टेस्ट मध्ये साधारणत: १ ते ५ मिनिटांचा अवधी लागतो. पण योग्य परिणामसाठी १० मिनिटांचा अवधी देखील लागू शकतो.

 

पण कोणत्याही तपासणी च्या आधी त्याच्यावरील सूचना नीट वाचल्या पाहिजेत आणि हि टेस्ट करताना स्वतःला वेळ द्या आणि कोणतीही घाई गडबड करू नये. घाबरून जाऊ नका, मन विचलित होऊन देऊ नका. जास्तकरून प्रेग्नन्सी तपासणीत त्या स्टिक वर अधीक व वजा चे चिन्ह असतात. कोड केलेला रंग, प्रेग्नेंट व नॉन प्रेग्नेंट अश्या सूचना त्याच्यावर दिलेल्या असतात.

जर इशारा खूप हलका दाखवत असेल तर आपल्याला तो हि आपण सकारात्मक प्रकारे घेतला पाहिजे कारण आपल्या लघवीत उपस्तीत HCG तपासणीत सापडला आहे आणि थोडासा हलका हार्मोन आपल्या लघवीत सापडला असेल तर आपण प्रेग्नेंट आहोत असे समजा. जर आपला परिणाम positive असेल तर सुनिश्चित करण्यासाठी आपण डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे. साधारत: रक्ताची तपासणी करून हे केले जाते आणि जर परिणाम negative असेल तर आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे.

जर आपण तपासणी करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रेग्नन्सी टेस्ट करायच्या आधी जास्त तरल पदार्थ पिऊ नका. कारण यामुळे लघवी पातळ होईल आणि आपल्याला योग्य परिणाम मिळणार नाही. आणखीन काही लक्षणे म्हणजे आपली मासिक पाळी चुकणे, वजन वाढणे, कोरड्या उलट्या होणे अशी काही लक्षणे असतील तर त्वरित डॉक्टर चा सल्ला घ्यावा. कारण अशावेळी डॉक्टर चा सल्ला घेणे हे सगळ्यात महत्वाचे आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment