या 20 हेल्थ टिप्सचे अनुसरण करून दिवसभर सक्रिय रहा | 20 tips to stay healthy in Marathi

11 May 2020, लेखक: रोहित म्हात्रे | नियमित अपडेट साठी फॉलो करा : फेसबुक | इन्स्टाग्राम | ट्विटर


जर आपण आपले वजन वजन कमी करू इच्छित असाल आणि दिवसभरात उत्साही राहू इच्छित असाल तर या 20 टिप्स लक्षात ठेवा. खरे तर डाएट च्या निगडित अनेक छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ शकत नाही आणि अश्या खूप गोष्टी खातो ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होत नाही. येथे आम्ही तश्याच काही गोष्टींबद्दल आपणाला सांगणार आहोत.


1. रोज खूप सारे पाणी प्या आणि कॅलरी-मुक्त पदार्थ खा.


2. सकाळी-नाश्ता (ब्रेकफास्ट) नक्की करा. नाश्ता केल्याने अनेक आजार होत नाहीत.


३. रात्रीच्या जेवणात थोडे हलके जेवण घ्या.


४. दिवसभर थोडे थोडे खात राहा. जेवणाच्या दरम्यान जास्त अंतर(gap) ठेवू नका.


५. जेवणात प्रोटीन (protein) असेल याची काळजी घ्या .६. मसालेदार पदार्थ कमी खा.


७. जेवताना लाल हिरवा केशरी रंगाचे पदार्थ जरूर घ्या. हा नियम नक्की पाळा आणि जेवताना ह्या रंगाचे पदार्थ जसे कि गाजर, संत्रे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.


८. वजन कमी करायचे असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा.


९. वजन कमी करायचे असेल तर रोज जेवण करायच्या आधी कमी कॅलरीज असलेल्या भाज्यांचे सूप घ्यायला पाहिजे. ह्यामुळे २०% कॅलरी प्रमाण कमी होऊन तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल.


१०. कॅलरी वर भर असलेले डाएट बनवण्यापेक्षा पोषण तत्त्वांनुसार डाएट बनवा.


११.जेवणाचा रेकॉर्ड ठेवा. जशे कि आपण किती खाल्ले आणि कित्ती पाणी प्यायले. ह्यासाठी भरपूर अँप्स (apps) आहेत तशेच आपण फूड डायरी पण ठेवू शकता.


1२. हळू हळू जेवण जेव्हा. वैज्ञानिक संशोधनातून असें कळले आहे कि जे लोक भरभर जेवतात ते जाड होतात म्ह्णून हळू हळू जेवा.


१३. रात्रीचे जेवण वेळेवर करा आणि दिवसभर फळ आणि भाजीपाला खा.१४. थंड शीतपेये पिऊ नका.


१५. जेवण बनवताना फॅट कडे (fats) लक्ष ठेवा .जेवणात तेल लोणी क्रीम ह्याचा वापर कमीत कमी करा .


१६. रात्री जेवणाच्या वेळी चटरपटर खाऊ नका.


१७. रात्री जेवणात कार्बोहैड्रेट (carbohydrate) असलेले पदार्थ खाऊ नका. कार्बोहैड्रेट चे पदार्थ सकाळी खाल्लेलं चांगले असतात कारण कार्बोहैड्रेट शरीरात इंधन म्हणून काम करतात. पण रात्री असे पदार्थ खाण्याचे टाळा.


१८. रात्रीच्या जेवणानंतर काही खाऊ नका. ह्या गोष्टीत स्वतःशी प्रामाणिक राहा आणि रात्रीच्या जेवणानंतर काहीच खाऊ नका.


१९. स्वतःचे जेवण दुसऱ्यांसोबत वाटून खा. हा कॅलरी तपासण्याचा चांगला उपाय आहे.


२०. रात्रीच्या वेळी लॅपटॉप किव्हा टीव्ही जास्त वेळ बघू नका व रात्री ७-८ तास नियमित झोप घ्या.या 20 हेल्थ टिप्सचे अनुसरण करून तुम्ही जीवन जगलात तर तुम्हाला भरपूर फायदा होईल.


Comments

PR

Priya Deshpande

good

PR

Priya Deshpande

Thanks :)

Add a Comment
The answer is
;
;