Information about Indian rupees in Marathi | भारतीय चलन रुपयाची महत्वाची तथ्ये

Information about Indian rupees in Marathi | भारतीय चलन रुपयाची महत्वाची तथ्ये

रुपया, रुपया, रुपया! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात पैशांची खूप जास्त किमंत असते. पैसे नसतील तर आयुष्य नकोस वाटत. तर चला मग जाणून घेऊया रुपयाचा इतिहास, रुपयाची सुरवात कशी झाली?

१) भारतातील चलनाचा इतिहास २५oo वर्ष जुना आहे. याची सुरवात एका राजा द्वारे झाली होती.

२) गोष्ट १९१७ मधील आहे, जेव्हा १ रूपया $१३ डॉलर्स समान होता. मग १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि १ रूपया $१ डॉलर समान झाला. मग हळूहळू भारतावर कर्जाचा भार वाढत गेला, नंतर इंदिरा गांधींनी कर्जाची परतफेड करण्यासाठी रुपयाची किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून आजपर्यंत रुपयाचे मूल्य कमी झाले आहे.

३) अर्ध्यापेक्षा जास्त (५१ टक्के) फाटलेली नोट देखील तुम्ही बँकेकडे जाऊन बदलू शकता.

४) जर इंग्रजांची हुकुमत असती तर आज भारताचे चलन कदाचित पाउंड असते परंतु रुपयाच्या बळकटीमुळे हे शक्य नव्हते.

५) भारतात सध्या ४oo कोटी रुपयांचे बनावट नोटा आहेत. आतातरी हा काळा पैसा समाप्त होईल अशी आशा आहे.

६) सुरक्षिततेच्या कारणांमुळे, आपल्याला नोटांच्या सिरियल नंबरमध्ये I, J, O, X, Y, Z अक्षरे मिळणार नाही.

७) प्रत्येक भारतीय नोटांवर, काही वस्तूचे फोटो छापलेले असतात जसे वीसच्या नोटेवर अंदमान बेटाचे एक छायाचित्र आहे. तर १o रुपयाच्या नोट्सवर हत्ती, गेंडे आणि वाघ लपलेले आहेत व १oo रुपयाच्या नोटेवर पर्वत आणि ढगांचे चित्र आहे. या व्यतिरिक्त, ५oo रुपयांच्या नोटवर स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित ११ मूर्तींची चित्रे आहेत.

८) भारतीय नोटेवर, त्याची किंमत १५ भाषांमध्ये लिहिली जाते.

९) स्वातंत्र्यानंतर, पाकिस्तानी लोकांनी भारतीय चलन तोपर्यंत वापरले जोपर्यंत त्यांनी वापरण्यायोग्य चलनाचे नोट छापले नाही.

१०) भारतीय नोट्स सामान्य कागदापासून बनलेले नसतात तर त्या कॉंटनने बनलेलल्या आहेत. ह्या नवीन नोटा इतक्या भक्कम आहेत की आपण नोटाच्या दोन्ही टोकांना पकडून जोराने खेचल्यास देखील नोट फाटणार नाही.

११) एक वेळ अशी होती जेव्हा बांगलादेश एक ब्लेड तयार करण्यासाठी भारताकडून ५ रुपयांची नाणी मागत असे. ५ रुपयांच्या एका नाण्यापासून ६ ब्लेड बनवले जात असे. एका ब्लेडची किंमत २ रुपये होती त्यामुळे ब्लेड बनवणाऱ्याला चांगला फायदा होत होता. हे लक्षात घेऊन, भारत सरकारने नाणे बनविण्याचे धातूच बदलले.

१२) स्वातंत्र्यानंतर, नाणी तांब्यापासून बनवायचे त्यानंतर १९६४ मध्ये अॅल्युमिनियपासून बनवण्यास सुरुवात झाली व १९९८ मध्ये स्टेनलेस स्टीलपासून नाणी बनवण्यास सुरुवात झाली.

१३) भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे हा फोटो तेव्हा काढला होता जेव्हा ते तत्कालीन बर्मा आणि भारतातील ब्रिटीश सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते व फ्रेडरिक पेथिक लॉरेंस बरोबर कोलकातातील व्हाईसरॉय हाऊस येथे मुलाकातीसाठी गेलेले. हा फोटो १९९६ मध्ये नोटांवर छापण्यात आला. यापूर्वी महात्मा गांधीजींच्या फोटोऐवजी अशोक स्तंभाचे फोटो छापण्यात येत होते.

१४) भारतातील जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा नेपाळमधे चालत नाही आणि आता अगदी भारतातही चालत नाही!

१५) ५oo ची पहिली नोट सन १९८७ मध्ये तयार करण्यात आली, १ooo ची पहिली नोट सन २ooo मध्ये तयार करण्यात आली. आता मात्र १ooo च्या नोट्स बंद केल्या आहेत व ५oo ची नवी नोट बाजारात आली आहे. पहिली २ooo ची नोट २o१६ साली बनवली गेली होती.

१६) भारतात आता पर्यंत ७५, १oo आणि १ooo नाणी मुद्रित केले गेली आहेत.

१७) नोटांवर अनुक्रमांक अशासाठी घातला जातो की त्यामुळे आरबीआय त्या क्षणी मार्केट मधे किती चलन (करंसी) आहे याचा मागोवा ठेवू शकते.

१८) भारताव्यतिरिक्त, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकाची चलने देखील रुपयाच आहे.

१९) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मते, भारत प्रत्येक वर्षी २००० कोटी रुपयाच्या नवीन नोटा छापतो.

२o)रिझर्व्ह बॅंक पाहिजे तितक्या नोटा छापू शकते का?

भारतीय रिझर्व्ह बॅँक आपल्याला मर्जीप्रमाणे नोट छापू शकत नाही. ते फक्त १o,ooo नोटाच छापू शकतात. यापेक्षा अधिक किंमतिच्या नोट छापायच्या असतील तर त्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ मधे बदल करावा लागणार आहे.

२१) जर आपल्याकडे मशीन असेल, तर आपण अगणित नोटा का छापू शकत नाही?

आपण किती नोटा मुद्रित करू शकतो याचे निर्धारण चलन महागाई, जीडीपी वाढ, बँकेतील नोटांचे रिप्लेसमेंट आणि रिझर्व बँकेच्या स्टॉकच्या आधारे केले जाते.

२२) प्रत्येक नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली एक विशिष्ट चिन्ह असते ज्यामुळे ते नाणे कुठे बनवले आहे हे आपण शोधू शकता.

  • मुंबई – हिरा [◆]
  • नोएडा – ठिपका [.]
  • हैदराबाद – तारा [*]
  • कोलकाता – कुठलेही निशाण नाही
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment