इंदिरा गांधींच्या मृत्यूपूर्वी काय घडले… | The assassination of Indira Gandhi in Marathi

इंदिरा गांधींच्या मृत्यूपूर्वी काय घडले… | The assassination of Indira Gandhi in Marathi

The assassination of Indira Gandhi in Marathi
The assassination of Indira Gandhi in Marathi

Indira Gandhi assassination information in Marathi: इंदिरा गांधी म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होय. त्यांना आयर्न लेडी या नावाने देखील ओळखले जाते. आयर्न लेडी यासाठी कारण त्यांनी काही असे निर्णय घेतले होते जे आजही कोणी घेऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूचे दुःख प्रत्येकाला आहे. ज्या दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या झाली त्या दिवशी संपूर्ण भारत आपोआप बंद झाला होता. परंतु फारच कमी लोकांना त्या शेवटच्या क्षणी त्या काय करीत होत्या हे माहिती आहे.

31 ऑक्टोबर ला इंदिरा गांधींची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी त्या ओडीसा मध्ये प्रचार करून घरी निघाल्या होत्या. रात्री त्या जेव्हा दिल्लीला पोहोचल्या तेव्हा त्यांना झोप येत नव्हती. इंदिरा गांधी त्या दिवशी झोपू शकल्या नाही. सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या राजीव या पुस्तकात त्यांनी सांगितले आहे की, “त्या रात्री जेव्हा जवळपास 3 वाजले होते तेव्हा मी माझी दम्याचे औषध घेण्यासाठी बाथरूमकडे गेले तेव्हा बघितले की त्या झोपलेल्या नव्हत्या. त्या माझा आवाज ऐकून माझ्याकडे आल्या व मला औषधे शोधायला मदत करू लागल्या. त्या बोलल्या देखील की जर तुझी तब्येत जास्त खराब असेल तर मला उठव, मी जागीच आहे.” म्हणचे त्या दिवशी इंदिराजी झोपलेल्या नव्हत्या.

Indira Gandhi Marathi Mahiti
Indira Gandhi Marathi Mahiti

जरी इंदिरा गांधी रात्री झोपल्या नसल्या तरी देखील सकाळी सात वाजता त्यांनी नाष्टा केला. त्यांनी न्याहारी मध्ये दोन टोस्ट, अंडे आणि संत्र्याचा ज्यूस घेतला होता. त्या दिवशी त्यांनी केशरी रंगाची साडी घातली होती ज्यावर काळ्या रंगाची बॉर्डर होती. त्या दिवशी इंदिरा गांधी यांच्या खूप साऱ्या अपॉइंटमेंट होत्या. संध्याकाळी त्या Peter Ustinov यांच्याशी भेटणार होत्या, ते इंदिरा गांधींवर डॉक्युमेंटरी बनवत होते. त्यानंतर इंदिराजी ब्रिटनचे पूर्व पंतप्रधान आणि मिझोरामच्या एका नेत्यांसोबत भेट घेणार होत्या.

इंदिरा या ब्रिटनच्या राजकुमारी ऐन यांना एक मेजवानी देणार होत्या. नाष्टा झाल्यानंतर त्यांच्याकडे डॉक्टर केपी माथूर हे आले. त्यावेळी इंदिराजी मेकअप करत होत्या. याच वेळेला दररोज डॉक्टर येत असे. जवळपास 9 वाजेच्या सुमारास इंदिरा गांधी बाहेर आल्या त्यावेळी सूर्यकिरणे चांगली पडलेली होती. त्यामुळे त्यांच्या नारायण सिंह या अंगरक्षकाने त्यांच्या वर छत्री धरली.

इंदिराजी त्यानंतर अकबर रोडकडे चालायला लागल्या. त्या अकबर रोडकडे जाणाऱ्या गेट जवळ पोहोचल्या. त्या गेटवर सरदार बेअंत सिंग आणि सोबतीला सरदार सतवंत सिंग कामगिरीवर होते. इंदिराजी जेव्हा तिथे पोहोचल्या तेव्हा त्यांनी स्वतःहुन त्यांना नमस्कार केला. त्याच वेळी बेअंत सिंग यांनी रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि एका मागून एक तीन गोळ्या त्यांनी इंदिराजींवर चालवल्या. इंदिराजी तेव्हा फक्त हेच बोलू शकल्या की हे काय करत आहात तुम्ही!

त्यानंतर सतवंत सिंह यांनी स्टेनगन काढली आणि त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करायला सुरुवात केली. इंदिराजींना जवळपास 30 गोळ्या लागल्या. डोळे, चेहरा, छाती सर्वत्र गोळ्या लागल्या होत्या. यानंतर सोनिया गांधी गाऊन मध्येच पळत बाहेर आल्या. सुरक्षारक्षकांच्या साहाय्याने त्यांनी इंदिराजींना गाडीत टाकले व हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

सोनिया म्हणत होत्या की “मम्मी डोळे उघडा, झोपू नका!”. सोनिया गांधी यांचा पूर्ण गाऊन हा रक्ताने माखला होता. त्यानंतर एम्स च्या डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु इंदीरा गांधी यांनी डोळे उघडले नाही.

इंदिरा गांधींचा मृत्यु
इंदिरा गांधींचा मृत्यु

एक दिवस अगोदर केलेले शेवटचे भाषण

असे वाटते की इंदिराजींना त्यांचा मृत्यू जवळ आला आहे याची जाणीव होती. त्यांनी त्यांच्या एक दिवस अगोदरच्या ओडीसा येथील भाषणात सांगितले होते की ,”मी आज इथे आहे, उद्या कदाचित इथे नसेल आणि मला चिंता नाहीये की मी असेल की नसेल. मला मोठे जीवन लाभले आहे आणि मला गर्व आहे की मी माझे पूर्ण जीवन हे लोकांची सेवा करण्यात घालवले आहे. मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत हेच करत राहील आणि मी जेव्हा मरेल तेव्हा माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून भारताला मजबूत करण्याचे कार्य घडेल.”

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हा लेख वाचून इंदिरा गांधींच्या मृत्यूपूर्वी काय घडले होते या बद्दल थोडी माहिती मिळाली असेल.

तुम्हाला जा का The assassination of Indira Gandhi in Marathi या लेखामध्ये काही चुकीचे वाटत असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आम्ही आमच्या लेखात वेळोवेळी योग्य ते बदल करत असतो.

अधिक वाचा 👇

इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याचा परिचय

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा