Benefits and Side Effects of Bottle Gourd Juice In Marathi | दुधी भोपळा फायदेमंद कि हानिकारक?

दररोज आपण जो नियमित आहार घेतो, तो आपल्या शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेमंद असतो. अश्याच प्रकारे भाज्यांच्या स्वरुपात खाल्ली जाणारे दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो.

आपल्या पैकी अनेक लोकांना ही भाजी आवडत नसेल परंतु दुधी खाण्याने होणारे फायदे कळल्यावर आपण हि भाजी नक्की आवडीने खाल. अनेक वैद्य देखील आपल्याला दुधी भोपळा व त्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. दुधी भोपळ्याचा रस थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असतो. दुधी भोपळ्यात विशनाशक गुण असतात. यात १२% पाण्याचे प्रमाण असून ह्याची चव इतर भाज्यांपेक्षा वेगळी असते.

दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने जाडेपणा, उच्च रक्तदाब, आम्ल पित्त, हृदय रोग यांसारख्या आजारावर फायदा होतो. परंतु ह्याच रसाचे काही दुष्परिणाम देखील आहेत जे जीवघेणे होऊ शकतात.

चला तर पाहूया दुधी भोपळ्याचे फायदे व दुष्परिणाम:

दुधी भोपळ्याचे फायदे / Benefits of bottle gourd in Marathi

१) वजन कमी करण्यास मदत / Help in Weight Loss

जर आपण वाढत्या वजनामुळे त्रासले असाल तर व्यायामासोबत आपल्या खाण्यापिण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे नियमित व्यायामानंतर दररोज १०० ग्राम दुधी भोपळ्याचा रस प्यायला हवे. हा रस प्यायल्याने बरेच तास आपले पोट भरल्यासारखे राहते व त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याच प्रमाणे दुधी भोपळा कापून त्यामध्ये मीठ टाकून उकडून खाल्ल्याने काही दिवसातच वजन कमी होण्यास मदत होते. यात फायबर अधिक मात्रेत असल्यामुळे भूक कमी लागते व पोट भरल्या सारखे राहते.

2) उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते / Help in lowing High Pressure

जर आपण नियमित पणे एक ग्लास दुधी भोपळ्याचे रस पीत असाल तर आपले उच्च रक्तदाबाची समस्या अधिक प्रमाणात नियंत्रित राहील. हा रस दररोज २०० ग्राम प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रोल प्रमाण कमी करण्यास मदत होते.

Benefits and Side Effects of Bottle Gourd Juice In Marathi
Benefits and Side Effects of Bottle Gourd Juice In Marathi

३) लघवी साठी फायदेमंद / Urination Inflammation

दुधी भोपळा हे शरीराला थंडावा देतो. ह्याचा रसात अधिक मात्रेत पाणी असते जे आपल्या शरीराला थंड ठेवते. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात दुधी अधिक प्रमाणत खाल्ले जाते. जर आपल्याला लघवी करताना जळजळ होत असेल तर आपण दररोज सकाळी दुधी भोपळ्याचा रस सेवन करावा. कारण हि जळजळ लघवी मध्ये Acid चे प्रमाण वाढल्या मुळे होते, आणि दुधी भोपळ्याच्या रसामुळे मिळणाऱ्या थंडावाने हे Acid चे प्रमाण कमी होते.

४) दुधी केसांवर गुणकारी / Bottle gourd is good foor your Hairs

जर आपण आपल्या केसांच्या गळती मुळे व सफेद होण्याने परेशान आहात का? मग आपण दुधी भोपळ्याचा रस प्या किंव्हा ह्या रसात तिळाचे तेल मिसळवून हे आपल्या केसांच्या मुळाशी लावल्याने केस गळती कमी होण्यास मदत होईल. तसेच आवळ्या च्या रसात दुधी भोपळ्याचा रस मिसळवून प्यायलाने केसातील कोंडा कमी होण्यास देखील मदत होते. हे मिश्रण आपण न पिता फक्त केसांच्या मुळाशी देखील लावू शकता.

५) पचनक्रियेस लाभदायी / Beneficial for digestion

पचनक्रिये संबंधी आजकाल अनेक आजार होत आहेत. त्यामुळे दररोज सकाळी दुधी रस प्यायची सवय करावी. यातील फायबर आपले पचनक्षमता वाढवितात. ह्यात असलेले इलेक्ट्रोलाईट शरीरात पचन क्रियेत नियंत्रण ठेवून पोटाचे आजार कमी होतात.

दुधी भोपळ्याचे अजून काही फायदे:

* दुधी भोपळ्याच्या रसामुळे हृदय रोगांवर देखील नियंत्रण राहते.
* ताण तणाव असल्यास दुधी लाभदायी ठरते.
* चेहऱ्याची सुंदरता वाढविण्यास देखील दुधी भोपळ्याचा रस मदत करतो.

 हे देखील वाचा: अननसाचे फायदे
 हे देखील वाचा: हिरव्या कोथिंबीर चे फायदे

दुधी भोपळ्याचे काही दुष्परिणाम / Disadvantages of bottle gourd in Marathi

दुधी भोपळ्याचा रस पिण्याने जसे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात, त्याच प्रमाणे हा रस आपल्या शरीराला हानिकारक देखील आहे.

१) दुध्याचा रस पिताना हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कि, ह्या सोबत इतर काहीही मिसळवू नये.
२) दुध्याचा रस तयार केल्यानंतर ते पिण्या आधी त्याची थोडी चव बघावी. आणि हा रस जर आपणास कडू लागल्यास त्याचे सेवन करू नये कारण यामुळे आपण उलटी, जुलाब व अस्वस्थ होऊ शकते.
३) कडू दुधी भोपळा हा गर्भवती महिलेसाठी अत्यंत हानिकारक असतो. ह्यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो. स्तनपान करणाऱ्या महिलेने देखील कडू दुधी भोपळ्याचा रस पिऊ नये. कारण हा आपल्या व आपल्या बाळासाठी देखील योग्य नाही.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!! मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment