गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेमंद असते. आयुर्वेद आणि विज्ञान देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पावसाळ्यात जास्त करून पाण्यासंबंधी आजार होतात आणि पसरतात. खासकरून पोटाचे आजार होतात, म्हणून डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात ज्या प्रमाणे वातावरणात बदल होतो त्या प्रमाणे पाणी प्यावा.
जास्त करून लोक गरम पाणी पीत नाहीत कारण त्यांना गरम पाण्याचे फायदे माहीत नसतात. गरम पाणी आपल्या आरोग्या साठी खूप फायदेशीर असते, यामुळे आपले अनेक आजारांपासून बचाव होते. बऱ्याच देशांमध्ये पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या नुसार चांगल्या आरोग्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी ८ – १० ग्लास पाणी प्यायला हवे. पण जर आपण दिवसातून ३ वेळा गरम पाणी पीत असाल तर याचे आपल्याला खूप फायदे होतील, गरम पाणी आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवते व आपले आरोग्य चांगले ठेवते. गरम पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, याचे आपल्या त्वचेवर देखील चांगले फायदे होतात.
आपले वजन वाढतच असेल आणिकिती ही प्रयत्न केले तरी कमी हो नसेल तर गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून सतत ३ महिने हे प्या. आपल्याला याचा खूप फायदा होईल आणि हळू हळू आपल्याला फरक जाणवेल. कारण गरम पाणी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढून देत नाही आणि चरबी हळूहळू कमी करतो. म्हणून डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. जेवल्यानंतर १ कप गरम पाणी पिण्यास सुरवात करा याचा आपल्याला फायदा होईल.
आपल्याला कधीकधी जाणवते कि जरावेळ उन्हात किवा थंडीत बाहेर गेल्यावर सर्द्दी खोकला होता. याच्यावर जास्त काही करण्याची गरज नाही. आपण रोज ३ ग्लास गरम पाणी पीत जा, असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. कधी कधी बेमोसम आपल्याला सर्दी खोकला होतो अशावेळी गरम पाणी पिल्याने सर्द्दी खोकला जातो. गरम पाणी पिल्याने घश्या संबंधी आजार दूर होतात उदा. घश्यात खवखवणे, कफ, आवाज बसणे ई.
महिलांनी गरम पाण्याचा पिण्यासाठी वापर जास्तीत जास्त करावा, कारण पाळी मुळे महिलांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते, यावेळी गरम पाण्याने पोटाला शेक दिल्याने आराम मिळतो. यावेळी थोडे थोडे गरम पाणी पीत जा.
गरम पाणी पिल्याने शरीरात (detoxification) निर्विशीकरण होते आणि शरीराचे शुद्धीकरण करून शरीरातील अशुद्धी दूर करते. गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते त्यामुळे घाम येतो. घाम आल्याने शरीरातील अशुद्धी दूर होतात. गरम पाण्यामुळे पोटा संबंधी विकार दूर होतात, आणि ज्यांना ग्यास आणि बध्कोष्टता होते त्यांना गरम पाणी पिणे खूप फायदेमंद आहे. म्हणून दिवसातून २ – ३ वेळा तरी गरम पाणी प्या.
चेहऱ्यावर पडणाऱ्या सुर्कुत्यामुळे आपण चिंतीत असतो. पण हि एक नैसर्गीक बाब आहे. परंतु इतरांच्या तुलनेत जास्त व लवकर चेहरयावर सुरकुत्या येत असतील तर हि चिंतेची बाब आहे हि समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी गरम पाणी प्यायला सुरवात करा. काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल, आपली त्वचा चमकदार होईल, चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील आणि आपल्या चेहऱ्याचा रंग निखरेल.
आपले शरीर दुखत असेल तर आपल्याला गरम पाण्याचा सेवन केला पाहिजे, गरम पाणी पिल्याने आपली डोकेदुखी व पोटदुखी आणि शरीराचे दुखणे या समस्यांपासून आराम मिळेल. आपल्या त्वचे संबंधी समस्या होणार नाहीत, गरम पाणी पिल्याने आपल्या त्वचेत ओलावा (Moisture) राहतो. त्यामुळे त्वचेच्या रोगांपासून बचाव होतो. याच्या व्यतिरिक्त गरम पाणी केसांसाठी खूप फायदेमंद असतो. यामुळे केसांचा चमकदार पणा वाढतो तसेच केसांच्या वाढीसाठी फायदेमंद आहे. गरम पाणी पिल्याने पाचन क्रिया सुधारते, जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पीत जा.