Remedies for enhancing facial beauty in Marathi | चेहऱ्याची सुंदरता वाढवण्याचे उपाय

सुंदर चेहरा कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटते आपला चेहरा सुंदर आणि गोरा असावा. सगळ्यांनाच वाटते आपण सगळ्यांपेक्षा सुंदर आणि वेगळे दिसावे. पण काही लोक सावळे असतात आणि ते आपला सावळेपणा दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक क्रीम चा वापर करतात ज्यामुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहचु शकते. चेहऱ्याची त्वचा खूप संवेदनशील असते आणि कॉस्मेटिक क्रीम मुळे आपल्या त्वचेला नुकसान पोचु शकते, म्हणून आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी आपल्या चेहऱ्या वर आयुर्वेदिक आणि नैसर्गिक औषधांचा वापर करा. यामुळे आपल्या चेहऱ्या वर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम दिसत नाही आणि आपला चेहरा नैसर्गिकरित्या गोरा होतो आपला सावळेपणा कमी होतो व आपल्या चेहऱ्याची त्वचा चमकदार होते.

चेहऱ्याची सुंदरता वाढवण्याचे उपाय

१) आयुर्वेदात हळदीला एक जंतुनाशक औषध मानले जाते, आणि हळद आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी सगळ्यात उपयोगी आणि गुणकारी मानली जाते. आपल्या देशात बऱ्याच प्रकारचे उत्सव साजरे केले जातात आणि प्रत्येकाला वाटते आपण सुंदर दिसावे. आपल्या इथे लग्नात नवरा व नवरीला हळद लावली जाते जेणे करून त्यांच्या चेहऱ्या वर तेज येईल. आपल्याला पण जर आपली सुंदरता वाढवायची असेल तर रोज सकाळी हळदी मध्ये कच्चा दुध मिसळून चेहऱ्या वर लावा. आणि काही वेळाने चेहरा पाण्याने धुऊन घ्या यामुळे आपला चेहरा सुंदर व चमकदार होईल.

२) पपई खाण्यात खूप स्वादिष्ट असते आणि याचा उपयोग खूप प्रकारे केला जातो. पपई च्या सेवनाने शरीरात ताकद येते तसेच आपण याचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी देखील करू शकतो. पपईच्या गराचा चुरा करून त्याचा लेप बनवा आणि त्याला आपल्या चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावा आणि हा लेप सुकल्यावर कापडाने साफ करून त्यावर तिळाचा तेल चेहऱ्यावर लावा. जर असे आपण दररोज कराल तर आपल्या चेहऱ्याची सुंदरता वाढेल व आपल्या चेहऱ्या वरील सुरकुत्या कमी होतील.

३) लिंबाचा उपयोग आपण जास्त करून गर्मी च्या दिवसात लिंबू सरबत बनवण्यासाठी करतो कारण यामुळे आपल्याला उर्जा मिळते व आपण ताजेतवाने होतो. लिंबाचा उपयोग चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो आणि जर लिंबाचा उपयोग केला तर आपल्याला याचे बरेच फायदे होतील. लिंबा च्या रसात मध बरोबर मात्रेत मिसळून चेहऱ्यावर लावा. कारण हे दोन्ही आपल्या चेहर्यासाठी खूप फायदेमंद आहेत आणि हा लेप आपल्या चेहऱ्यावर १० मिनिटे लाऊन ठेवा, नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या. लिंब हे एक नैसर्गिक फेस वॉश म्हणून काम करतो, याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मळ साफ होते आणि आपली त्वचा चमकदार होते. तसेच यामुळे आपल्या त्वचेतील तेलकट पणा कमी होतो.

प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. जर आपली त्वचा जास्त तेलकट असेल तर लिंबाचा आणि मधाचा वापर करू शकता आणि जर आपली त्वचा शुष्क असेल तर हि एक समस्या आहे कारण याने आपली त्वचा लवकर फाटते त्यामुळे आपल्या त्वचेची आग आग होते. म्हणून याच्या साठी काकडीचा वापर करा आणि याच्यात मध मिसळून आपल्या चेहऱ्यावर लावा असे केल्याने आपल्या त्वचेतील शुष्क पणा दूर होईल आणि त्वचेला पर्याप्त मात्रेत ऑक्सिजन मिळेल.

४) खूप सारे प्रकार आहेत ज्यामुळे आपली त्वचा सुंदर बनू शकते. जसे बेसन मध्ये मध मिसळून, तिळाचा तेल आणि लिंबाचा रस मिसळून रोज सकाळी अंघोळीच्या आधी चेहऱ्यावर लावा असे केल्याने आपल्या त्वचेत चमक येईल व आपली त्वचा सुंदर होईल. दिवसातून दोनवेळा नारळाचे पाणी चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्यावरचे डाग आणि पिंपल्स दूर होतील. सगळ्यात सोपा उपाय हा आहे कि रोज लस्सी मध्ये मध टाकून सेवन करा याच्या नियमित सेवनाने चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि कोमल बनते.

५) केळ्यात खूप पोषक तत्वे आणि प्रथिने असतात जे आपल्या आरोग्या साठी व त्वचेसाठी खूप फायदेमंद असतात. केळ्यांची पेस्ट करून चेहऱ्यावर लावा यामुळे चेहर्याला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि हे चेहऱ्यासाठी खूप उपयोगी आहे, यामुळे चेहऱ्याच्या सावळेपण दूर होतो. लिंबाच्या रसात बदामाचा तेल मिसळून चेहऱ्यावर लावा या मुळे चेहऱ्याचा रंग निखरेल. नारळाचे तेल गरम करून वापरा. तुळशीच्या पानाचा रस काढून त्यात लिंबाचा रस मिळवा आणि याने चेहऱ्याची मालिश करा यामुळे चेहऱ्यावरचे डाग व पिंपल्स दूर होतात.

६) टोमॅटो चा वापर देखील चेहऱ्याच्या सुंदरते साठी केला जातो. टोमॅटो जसा आपल्या शरीरासाठी फायदेमंद असतो तसाच चेहऱ्याच्या सुंदरते साठी देखील उपयोगी असतो, ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी टोमॅटोच्या रसाचा वापर करावा. यामुळे त्वचेतील तेलकट पणा दूर होतो ज्यामुळे चेहरा चमकदार होतो, गुलाबजला मध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे डाग जातात व त्वचा कोमल होते. रात्री झोपण्याचा आधी देशी तुपाने चेहऱ्याची मालिश करा यामुळे आपल्याला खूप फायदा होईल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment