जर आपण केसांच्या समस्ये मुळे त्रस्त असाल तर या समस्ये वर काही उपाय जाणून घेऊया.
आवळा-आवळा हा फळ जरी छोटा असला तरी खूप गुणकारी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. तसेच आवळ्याचा नियमित पणे वापर केल्याने त्याचा आपल्या केसांसाठी देखील फायदा होतो. आवळ्याचा वापर फक्त आहारात न करता आवळा मेहन्दीत मिळवून केसांमध्ये लावा. तसेच आवळा कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि नारळाचे तेल थोडे गरम करून त्यात हे तुकडे टाका व केसा मध्ये लावा आपल्याला फायदा होईल.
black tea (काळा चहा) व coffee
जर आपल्याला आपले केस काळे करायचे असतील तर black tea व cofee च्या अरक ने केस धुवा, असे आठवड्यातून तीन वेळा करा.
एलोवेरा (कोरफड )
जर आपण पांढरे केस व केस गळती पासून त्रस्त असाल तर केसात एलोवेरा जेल आणि लिंबा चा रस मिळवून केसांमध्ये लावा.
तूप
जर आपले केस सफेद होत असतील तर केसांची तुपाने मालिश करा. आपल्या सफेद केसांची समस्या दूर होईल.
दही
जर आपल्याला केस प्राकृतिक रूपाने काळे करायचे असतील तर दहीचा वापर करा. दही मध्ये मेहंदी बरोबर मात्रेत मिळवा आणि हे मिश्रण केसांमध्ये आठवड्यातून एकवेळा लावा आपल्याला फायदा होईल.
कडीपत्ता
जर आपले केस पांढरे होत असतील तर कडीपत्ता आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. कडीपत्याची पाने एका तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्या पाण्याने केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या किंवा कडीपत्याची पाने कापून गरम खोबरेल तेलात मिळवून लावा, याचा आपल्याला फायदा होईल.