Time Management in Marathi | वेळेचे नियोजन
जर तुमच्या परीक्षा खूप जवळ आल्या असतील आणि तुम्हाला तणाव जाणवत असेल, कारण तुम्ही अभ्यास केला नव्हता आणि आता तुमचे मन देखील अभ्यासात लागत नाही. फक्त डोक्यात तणाव भरलेला आहे की परीक्षेत काय होईल? वेळ कमी शिल्लक आहे, कशी करणार आहेस ही सगळी तयारी? आणि चांगले मार्क्स कसे मिळतील? तुम्ही देखील या सर्व गोष्टींचा विचार तर करत नाही ना? तुम्हाला देखील हे वाटत नाहीये ना की खूप उशीर झाला आहे?
मी तुम्हाला सांगतोय की खूप उशीर झालेला नाहीये, एक छोटीशी चूक झालेली आहे परंतु प्रत्येक चुकीला सुधारले जाऊ शकते. जेव्हा तुमच्याकडे खूप सारा वेळ हा अभ्यास करण्यासाठी होता तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेला योग्य प्रकारे वापरले नाही. परंतु एक लक्षात ठेवा की खेद वाटून घेऊन काही एक होणार नाहीये. खेद करत बसण्यापेक्षा जितका थोडासा वेळ शिल्लक आहे त्यात तुम्ही जीव ओतून द्या, विचार करायला एक सेकंद सुद्धा वेळ वाया घालवू नका.
सर्वात आधी तुमच्या डोक्यातून या सर्व गोष्टी काढून टाका की आता काहीच होऊ शकत नाही आणि आता खूप उशीर झाला आहे. आता जो काही वेळ शिल्लक आहे त्याचा हृदयापासून नाही तर विचारपूर्वक वापर करा.
तुम्ही स्वतः आठवून बघा की उद्या करेल, उद्या अभ्यास करेल अस करत करत तो उद्या कधी आलाच नाही! परंतु आज संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. विचार करा की हा अभ्यास नाहीये हे तुमच्या समोरील आव्हान आहे , ही परीक्षा नाहीये हे एक युद्ध आहे, आणि हे युद्ध खूप छोटे आहे. कारण जीवनात पुढे जाऊन तुम्हाला अशा आव्हानांचा सामना करावा लागनार आहे, अशा काही युद्धांत उतरून लढावे लागेल की तुम्हाला कळून जाईल की जीवन जगणे सोपे नाहीये.
आज तुम्ही जो अभ्यास करणार आहात तो येणाऱ्या उद्यासाठी तुम्हाला तयार करत आहे. विचार करा की तुम्ही जर आत्ताच खचून गेलात तर पुढे काय करू शकाल? तुम्ही सर्व काही विसरू शकता, सर्व फालतू गोष्टी मनातून काढून टाका, फक्त हृदयापासून अभ्यास करायला लागा.
आपल्या स्वतःसाठी नका करू परंतु कमीत कमी आपल्या आई वडीलांसाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी अभ्यास करा. जेणेकरून त्यांना पुढे जाऊन तुमच्या अयशस्वी पणा वर खेद नसेल, त्यांना दुःख नसेल तुमच्या गरिबी वर आणि त्यांना त्रास होणार नाही तुमच्या बेरोजगारी वर! त्यांना एक दिवस तुमचा अभिमान असायला हवा. आणि अभिमान वाटेल अशी गोष्ट एका दिवसात घडत नाही, त्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागते. या परीक्षेत स्वतःला सिद्ध करून दाखवा की तुम्ही काहीही करू शकता. जरी वेळ कमी उरला आहे तरी अजूनही तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवू शकता. जर तुम्ही हे करून दाखवले तर तुमचा आत्मविश्वास खूप जास्त वाढेल.
लक्षात ठेवा कोणाचे व्हिडीओ बघून नाही तर आपल्याला स्वतःच्या कामांमधून खूप जास्त प्रेरणा मिळत असते. मी या लेखामधून मध्ये तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुमचा वेळ हा खूप जास्त मूल्यवान आहे. फक्त एकच सांगेल की व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी समजल्या असतील तर सर्व काही सोडून देऊन परीक्षेच्या तयारीला सुरुवात करा. आणि असे काही करून दाखवा की तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटेल.
Thanks