TIME Management tips in Marathi | TIME importance motivation in Marathi

मित्रांनो आज या TIME Management tips in Marathi लेखामध्ये मी आपल्याला या विश्वातील सर्वात शक्तिशाली गोष्टीविषयी सांगणार आहोत. जर तुम्ही हे शिकलात आणि तुम्हाला या गोष्टी हाताळता आल्या तर विश्वास ठेवा तुम्ही त्या सर्व गोष्टी करू शकता ज्यांची स्वप्ने तुम्ही आज बघत आहेत.

मित्रांनो मी ज्या शक्तिशाली गोष्टीविषयी बोलत आहे ती आहे वेळ! आज हा लेख बघितल्यानंतर तुम्ही पैशाहून जास्त याची किंमत (TIME importance motivation in Marathi) करायला शिकाल.

TIME Management tips in Marathi

तुम्हाला माहीत आहे का यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीत काय फरक असतो? यशस्वी व्यक्ती जाणून असतो की त्याला त्याचा पैसा आणि वेळ कुठे इन्व्हेस्ट करायची आहे आणि त्यामुळेच तो यशस्वी आहे. दुसरीकडे दुसरा व्यक्ती ते जाणून घेत नाही आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टींमध्ये पैसा आणि चुकीच्या कामांमध्ये वेळ वाया घालून बसतो. त्यामुळेच हा दुसरा व्यक्ती अयशस्वी आहे.

पैसे कसे गुंतवायचे हे समजते परंतु वेळेचं काय? हे एका उदाहरणामधून तुम्हाला समजून सांगते. हुसेन बोल्ट हा एक 100 मीटर धावण्याच्या शर्यतीतील चॅम्पियन आहे. मागील तीन ऑलम्पिक मध्ये ते फक्त 115 सेकंद पळाले आहेत. यासाठी त्यांना 119 मिलियन डॉलर्स मिळाले आहेत. म्हणजेच 1 सेकंदाला त्यांना 1 मिलियन डॉलर मिळाला होता, पण या 115 सेकंदासाठी त्यांनी स्वतःला 20 वर्ष ट्रेन केले होते. म्हणजे 115 सेकंदांसाठी 20 वर्षे त्यांनी इन्व्हेस्ट केले होते.

अशीच एक गोष्ट आहे पिकासो ची! ते एकदा बसलेले असताना त्यांच्याकडे एक महिला आली व ती त्यांना म्हणाली की माझे चित्र काढाल का? पिकासो ने 2 मिनिटात त्या महिलेचे चित्र काढले. त्यांनी ते चित्र तिला दिले आणि सांगितले की हे 1 मिलियन डॉलर स्केच आहे. ती महिला हैराण झाली तेव्हा तिने बाजारात विचारणा केली असता तिला त्या चित्राची तीच 1 मिलियन डॉलर किंमत कळाली.

ती महिला पुन्हा पिकासो कडे आली व विचारू लागली की 2 मिनिटांमधे तुम्ही हे चित्र काढले तरी १ मिलियन का किंमत का? त्यावर पिकासो म्हणाले की या 2 मिनिटांच्या चित्रासाठी मी माझे 25 ते 30 वर्ष मेहनत घेतली आहे. तेव्हा जाऊन कुठे माझ्या 2 मिनिटांच्या चित्राला अशी किंमत मिळाली आहे. याला म्हणतात वेळेची इन्व्हेस्टमेंट!

त्यामुळे तुम्हीही तुमची वेळ अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा जे तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतात. सांगायचे तात्पर्य हेच आहे की आज तुमच्याकडे वेळ आहे, त्याला नवीन गोष्टी आणि स्किल्स शिकण्यासाठी इन्व्हेस्ट करा. याचे रिटर्न्स तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर मिळत राहतील. आज जर तुम्ही ही वेळ वाया घालवणार असाल तर तुम्हाला याचा पश्चाताप आयुष्यभर सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तुमच्या वेळेची कदर करा, आज जर तुम्ही वेळेची कदर केली नाही तर पुढे वेळ देखील तुमची कदर करणार नाही. जर तुमची वेळ चांगली असेल तर सर्व लोक चांगले असतात परंतु जर तुमचा वेळ वाईट सुरू असेल तर आपली माणसे देखील बदलून जातात.

संघर्षाचा किंवा वाईट काळ आला असेल तर पराभूत होऊन जाऊ नका, कारण वेळेचे एक तथ्य आहे, वेळ कितीही कठीण जरी असली ना तरी ती बदलतेच. आपण इतिहासात खूप कमी लोकांना जाणतो कारण त्यांनी त्यांचा वेळ इन्व्हेस्ट केला होता, बाकीच्यांसारखा त्यांनी वेळ वेस्ट केला नव्हता!

शाहरुख खान जे बॉलिवूड चे सुपरस्टार आहेत ते इतक्या उच्च स्तरावर असून देखील ते फक्त 4 तास झोपतात, बाकीचा पूर्ण वेळ ते काम करत असतात. तुम्ही त्यांचे चाहते असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्की माहीत असेल.

मी जेव्हा लोकांना भेटते तेव्हा ते म्हणतात करायचे खूप काही आहे परंतु वेळ नाहीये. आम्ही कायम सांगत असतो की मित्रा तुझ्याकडे वेळेची नाही वेळेच्या नियोजनाची कमतरता आहे. कारण एका दिवसात प्रत्येकाकडे फक्त 24 तास असतात, याच 24 तासात धीरूभाई यांनी रिलायन्स बनवली, याच 24 तासात जॅक माँ यांनी अलिबाबा बनवली होती. तर मग तुम्हाला वेळेची कमतरता का भासते? तुम्हाला वेळेचे नियोजन करता येत नाही का?

इथे एक स्वतःची ट्रिक मी तुम्हाला सांगते, या ट्रिक चे अनुसरण मी रोज करते.

सकाळी उठल्यानंतर दैनंदिनी मध्ये मी एक लिस्ट बनवते, या लिस्ट मध्ये दिवसभरात होणाऱ्या गोष्टींना लिहून त्यांना प्राधान्याने क्रमांक देत असते. यात कोणते काम सर्वात पहिले करायचे आहे आणि कोणते सर्वात शेवटी या गोष्टी येतात आणि रात्री तोपर्यंत झोपत नसते जोपर्यंत माझे हे सर्व काम पूर्ण झालेले नसतात.

याने माझ्या वेळेचा पूर्ण उपयोग होतो आणि असाही वेळ येत नाही की मी मोकळी असते. खूप वेळा काय करायचे आहे हेच आपण विसरत असतो! त्यामुळे प्रत्येक काम हे लिहून ठेवा, ते काम करायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळू शकेल. यातून तुमचे आउटपुट देखील वाढेल. ही गोष्ट नक्की अनुसरून बघा तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

मित्रांनो वेळ ही खूप मोठी गोष्ट आहे, ही वेळ तुमचे आयुष्य बनवू पण शकते आणि बिघडवू पण शकते. याला कारण एकच असेल की तुम्ही तुमची वेळ इन्व्हेस्ट करता आहात की वेस्ट! कारण वेळ ही त्या गोष्टींपैकी आहे जी कधी परत भेटत नाही. या जगात कोणी इतके श्रीमंत नाही की जे गेलेली वेळ परत मिळवू शकतील. आणि कोणी इतकाही गरीब नाहीये की जो येणाऱ्या वेळेला बदलू शकणार नाही. त्यामुळे वेळ तुम्हाला बदलेल त्या अगोदर तुम्ही वेळेला बदला.

शेवटची एक गोष्ट म्हणजे कधीच तुमच्या वेळेला कोणाच्या वेळेशी तुलना करून बघू नका. कारण प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच्या टाईम लाईन नुसार यशस्वी होत असतो. कोणी व्यक्ती 25 वर्षाचा असताना करोडपती बनू शकतो तर कोणी 50व्या वर्षी मरू शकतो. काही 50 50व्या वर्षी करोडपती बनतात आणि तर काही 90 व्या वर्षी निधन पावतात.

त्यामुळे आज आता याच क्षणापासून वेळेचे योग्य नियोजन करा आणि कामाला लागा !!

ऑल द बेस्ट!

मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हा TIME Management tips in Marathi हा लेख वाचून तुम्हाला वेळेचे महत्व समजले असेल. आमचा हा TIME importance motivation in Marathi लेख तुम्हाला आवडला असेल. तुमच्या मित्रांसोबत Facebook आणि Whatsapp वर नक्की शेअर करा.

तुमचे जर काही या लेखाबद्दल प्रतिक्रिया असतील तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

हा Motivational Marathi लेख वाचून तुमच्यात ऊर्जेचे संचार झाले असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत देखील नक्की शेअर करा.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment