Vijay Aso- Marathi Story | विजय असो | Marathi Katha

एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्‍न करायचे यावरून त्‍या दोघांत खूप भांडणे झाली व त्‍याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्‍या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले.

मारामारीत दोघांचेही अंग रक्‍तबंबाळ झाले, त्‍यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्‍याने सरळ पळून जाऊन आपल्‍या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले.

भांडणात खुराड्याच्‍या बाहेर असलेल्‍या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्‍याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्‍या कोंबडीकडे बघून ”मी जिंकलो, मी जिंकलो” असे ओरडू लागला, स्‍वत:चाच जयघोष करू लागला.

तेवढ्या वरून एक गरूड आला व त्‍याने त्‍या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्‍याने त्‍याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्‍यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्‍हा तो कोंबडा कोंबडीला म्‍हणाला,”मी जर बाहेर राहिलो असतो तर त्‍या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.”

तात्‍पर्य: ज्‍याच्‍या डोक्‍यात यशाची हवा चढते तेव्‍हाच त्‍याच्‍या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्‍ट आहे.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.