International Women’s Day Information in Marathi | ८ मार्च जागतिक महिला दिन

International Women’s Day Information in Marathi | जागतिक महिला दिनाचा इतिहास

International Women’s Day (IWD) हा जागतिक महिला दिन दर वर्षी ८ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. हा दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी साजरा केला जातो.

सर्वात प्रथम हा दिवस अमेरिका मध्ये सोशलिस्ट पार्टी च्या सांगण्यावरून २८ फेब्रुवारी १९०९ ला साजरा केला गेला. परंतु नंतर हा दिवस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करू लागले. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि पहिले काही देशांत महिलांना मतदान कण्याचा अधिकार नव्हता. त्यांना हा अधिकार देण्याच्या उद्देशाने १९१० मध्ये सोशलिस्ट इंटरनेशनल च्या कोपेनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. ह्या दिवसाचे महत्व अजूनच वाढले जेंव्हा फेब्रुवारी १९१७ मध्ये महिना अखेर रविवारी महिलांनी “bead and peace” साठी आंदोलन केले आणि नंतर ते हळू हळू वाढत गेले व जार ला रशियाची सत्ता सोडावी लागली. त्यानंतर जी सरकार तयार झाली त्यामध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला.

रशिया मध्ये जेंव्हा आंदोलन सुरु झाले होते तेंव्हा तिथे ज्युलिअन कालनिर्णय वापरत होते (आता ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरला जातो). ज्यानुसार फेब्रुवारी चा अखेरचा रविवार हा २३ तारखेला होता परंतु जगभरात त्यावेळी ग्रेगोरीयन कालनिर्णय वापरत असल्यामुळे आणि त्या कालनिर्णयानुसार २३ फेब्रुवारी हा दिवस बाकी जगभरात ८ मार्च होता. म्हणूनच ८ मार्चला जगभरात जागतिक महिला दिनाच्या स्वरुपात मनाला जातो.

नारी शक्ती चा उत्सव म्हणजेच : जागतिक महिला दिन

मित्रानो महिलांमध्ये अपार शक्ती आणि क्षमता आहेत. व्यावाहारीक जगात सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपली कीर्ती स्थापित केली आहे. आपल्या अद्भुत साहस, अथक परिश्रम तसेच दूरदर्शी बुद्धिमत्तेच्या जोरावर विश्वपलटावर स्वतःची अशी एक ओळख बनविण्यात ती यशस्वी झाली आहे. मानसिक संवेदना, करुणा, वात्सल्य अश्या भावनांनी परिपूर्ण असलेल्या अनेक स्त्रियांनी जग निर्माण करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. अश्याच या स्त्रियांचे व्यक्तित्व तसेच कार्यत्वाला संक्षिप्त अशी ओळख करून देण्याचा प्रयत्न महिला दिनाच्या दिवशी केला जातो.

अश्याच काही महिलांचे कर्तुत्व जाणून घेऊया

एक असा क्षेत्र, जिथे महिला सक्षमीकरण करण्याच्या वाटेवर आहेत आणि आपल्या पक्षाची मजबूत बाजू दाखवत आहेत. हा क्षेत्र म्हणजे देशाची सुरक्षा (देशाचे सैन्य). देशाची सुरक्षा खूप महत्वाची आहे, तर मग या क्षेत्रात देखील महिलेची भागेदारी कमी का आकारली जावी. देशाच्या मिसाईल सुरक्षेमध्ये असलेले ५००० किलोमीटर अग्नीक्षामक वाला मिसाईल म्हणजे “अग्नी-५” , या मिसाईल चे संपूर्ण परीक्षण करून जगाच्या नकाशात भारताचे नाव लौकिक करणारी महिला म्हणजे “टेसी थॉमस”.

डॉ. टेसी थॉमस यांना काही लोक ‘मिसाइल वूमन’ म्हणून ओळखतात, तर काहींनी त्यांना ‘अग्नी-पुत्री’ अशी पदवी दिली आहे. गेले २० वर्षांपासून टेसी थॉमस ह्या क्षेत्रात खंबीर पणे उभ्या आहेत. डॉ. टेसी थॉमस ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्या देशाचा मिसाईल प्रोजेक्ट सांभाळत आहेत. डॉ. टेसी थॉमस यांनी हे यश असेच सहज नाही मिळवले, त्यासाठी त्यांना त्यांच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. साधारणपणे रणनैतिक अवजारे आणि परमाणु क्षामक मिसाईल वाल्या क्षेत्रात फक्त पुरुषांचे वर्चस्व असायचे परंतु ह्या धारणेला तोडून डॉ. टेसी थॉमस ने सिद्ध केल कि उंच भरारी हि हिमतीच्या जोरावर देखील घेतली जाऊ शकते.

डॉ. किरण बेदी, भारतीय पोलीस सेवेची प्रथम वरिष्ठ महिला अधिकारी आहे. त्यांनी वेगेवगळ्या पदांवर राहून आपल्या कार्यकुशलतेची ओळख करून दिली. त्यांनी संयुक्त आयुक्त पोलीस प्रशिक्षण तसेच दिल्ली पोलीस स्पेशल आयुक्त (खुफिया) या पदावर काम केले आहे. ‘द ट्रिब्यून’ च्या वाचकांनी त्यांना ‘ वर्षाची सर्वश्र्ष्ठ महिला ‘ म्हणून निवडले. त्यांच्या मानसिक तसेच निडर दृष्टिकोनामुळे पोलीस कार्यप्रणाली तसेच कैदिंसाठी अनेक आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाचे योगदान आहे.

निस्वार्थ कर्तव्यापणा यासाठी त्यांना शौर्य पुरस्कार मिळाले त्याचबरोबर त्यांच्या अनेक कार्याला जगभरात मान्यता मिळाली, ज्याचे परिणाम म्हणजे आशिया चा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ‘रमन मैगसेसे’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. व्यावसायिक योगदानाशिवाय त्यांच्या द्वारे २ स्वयं सेवी संस्थांची स्थापना करण्यात आली. ह्या संस्था म्हणजे १९८८ मध्ये स्थापन झालेली ‘नव ज्योती’ व १९९४ मध्ये स्थापन करण्यात आलेली ‘इंडिया विजन फाउंडेशन’. ह्या संस्था रोज हजारो गरीब अनाथ मुलांपर्यंत पोहचून त्यांना प्राथमिक शिक्षण व स्त्रियांना प्रौढ शिक्षण उपलब्ध करते.

खेळाच्या क्षेत्रात देखील महिलांनी आपले वर्चस्व यशस्वी पणे बनवले.

भारतीय ट्रैक ऍण्ड फ़ील्ड ची राणी मानली जाणारी ‘पी.टी.उषा’ भारतीय खेळत १९७९ पासून आहे. त्या भारतीय खेळाडूपैकी आता पर्यंतच्या उत्कृष्ठ खेळाडू मानल्या जातात. त्यांना “पय्योली एक्स्प्रेस” हि उपमा देण्यात आली आहे. १९८३ मध्ये सियोल येथे झालेल्या दहाव्या एशियाई खेळांमध्ये धावण्या मध्ये , पी.ती.उषा यांनी ४ सुवर्ण व १ रोप्य पदक पटकावले.

ज्या ज्या धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला तिथे तिथे त्यांनी आपली कीर्ती स्थापित केली. उषा यांनी आतापर्यंत १०१ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. त्या दक्षिण रेल्वे मध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहेत. १९८५ मध्ये त्यांना ‘ पद्मश्री आणि अर्जुन ‘ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

एक भारतीय महिला बॉक्सर आहे, ‘मेरी कॉम’ पाच वेळा विश्व बॉक्सर प्रतीयोगीतेमध्ये विजेत्या राहिल्या आहेत. २ वर्षाच्या अभ्यासाने व प्रोत्साहाने त्यांनी परत खेळात सहभागी होऊन सलग ४ वेळा विश्व गैर-व्यावसायिक बॉक्सिंग मध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यांच्या या वापसी वर प्रभावित होऊन एआइबीए ने त्यांना ‘मॅग्नीफ़िसेन्ट मैरी (प्रतापी मैरी)’ या नावाने संबोधले. त्या २०१२ च्या लंडन ओलम्पिक मध्ये महिला बॉक्सिंग मध्ये भारताकडून सहभागी होणारी एकमेव महिला होती.

‘मेरी क्युरी’ ह्या भौतिक व रसायनशास्त्रात विख्यात होत्या. मेरी यांनी रेडियम चा शोध लावला. विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये (भौतिक व रसायन विज्ञान) मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या प्रथम महिला आहेत. ह्या वैज्ञानिक आईच्या दोन्ही मुलीनी देखील नोबेल पुरस्कार प्राप्त केले आहे.

ह्या सगळ्या महिलां व्यतिरिक्त अनेक महान स्त्रिया आपल्या भारताला मिळाल्या आहेत. भारतासारख्या शक्तिशाली देशाची कमान इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील यांसारख्या स्त्रीयांद्वारा संचालित केले गेले आहे. लोकसभा अध्यक्ष मीना कुमारी त्याच बरोबर बाकी अनेक राज्यांच्या महिला मुख्यमंत्री आजही आपल्या कार्याची यशस्वी रित्या अंबलबजावणी करत आहेत.

महादेवी वर्मा, सुभद्रा कुमारी चौहान, महाश्वेता देवी, आशापूर्णा देवी, मैत्रिय पुष्पा अश्या अनेक महिलांनी असामन्य परिस्थिती मध्ये देखील साहित्य क्षेत्र उत्कृष्ट रचनांनी सुशोभित केले आहे.

आज स्त्रिया ह्या ट्रेन, विमान यांबरोबरच ऑटो रिक्षा देखील सफलता पूर्वक चालवत आहेत. भारताच्या मुली सुनीता विलियम्स आणि कल्पना चावला अंतरीक्ष जगाच्या शान मानल्या जातात. प्रथम रेल्वे गाडी चालवणारी महिला सुरेखा यादव ह्या फक्त भारताची नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे महिला चालक आहे.

अश्या अनेक अनेक स्त्रिया आपापल्या क्षेत्रात आपले नाव लौकिक करत आहेत. आज महिला फेसबुक व अन्य सोशल नेटवर्किंग द्वारे आपल्या गोष्ठी सांगत आहेत. देशभरच्या बातम्या ची खबरबात ठेवत आजची महिला घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टी योग्य प्रकारे सांभाळत आहे.

८ मार्च ला साजरा केला जाणाऱ्या महिला दिन निमित्त साऱ्या स्त्रियांना संबोधित ह्या काही कवितेच्या ओळी.

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणुन कळली तो जिजाऊचा “शिवबा” झाला…
ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणुन कळली तो मुक्ताईचा “द्यानदेव” झाला…
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणुन कळली तो राधेचा “श्याम” झाला…
आणी ज्याला स्त्री पत्नि म्हणुन कळली तो सितेचा “राम” झाला…
“प्रत्येक महान व्यक्तिंच्या जीवनात आणी यशात स्त्रीयांचा सिंहाचा वाटा आहे”
म्हणुनच; स्त्री-शक्तिला माझा सलाम

“जागतिक महिला दिनाच्या”
“हार्दीक शुभेच्छा”

Women’s Day Quotes In Marathi | जागतिक महिला दिना शुभेच्छा संदेश आणि सुविचार

तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,
तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे,
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल
तर सारं काही व्यर्थ आहे.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी.
महिला दिनाच्या शुभेच्छा

ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक
तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला
मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
आपली भूमिका योग्य पद्धतीने
साकारणाऱ्या माझ्या आई,
बहीण, पत्नी आणि लेकीस
महिला दिनाच्या शुभेच्छा

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.