हनुमान जयंती शुभेच्छा 2024 | Hanuman Jayanti Wishes in Marathi | Hanuman Jayanti Marathi messages

Hanuman Jayanti Wishes in Marathi 2024 | हनुमान जयंती शुभेच्छा 2024 🚩

Hanuman Jayanti Wishes in Marathi 2021
Hanuman Jayanti Wishes in Marathi 2021

Hanuman Jayanti Wishes in Marathi: श्री रामांचा सर्वात प्रिय भक्त म्हणजे हनुमान. रामनवमी  नंतर येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाते. या दिवशी या पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच संपूर्ण भारतात बजरंग बली हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हनुमान संपूर्ण भारतभर अनेक नावांनी परिचित आहेत. हनुमानाला मारुती, महावीर, बजरंगबली, अंजनेय, महारुद्र, पवनपुत्र अशा अनेक नावांनी संबोधिले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचे मंदिर फुलांनी सजवून खास पूजा-अर्चना केली जाते, तर काही लोक Hanuman Jayanti Marathi messages चे संदेश आपल्या प्रियजनांना पाठवतात.

यंदा हनुमान जयंती 23 April 2024 रोजी साजरी केली जाणार आहे व त्यासाठी तुम्हाला जर का तुम्हाला Hanuman Jayanti message in Marathi आपल्या मित्रमंडळींना तसेच नातेवाईकांना Facebook आणि Whatsapp द्वारे पाठवायचे असतील तर आम्ही या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Hanuman Jayanti msg In Marathi तसेच Hanuman Jayanti Status in Marathi.

तसेच मित्रांनो आम्ही या लेखामध्ये सुंदर सुंदर असेल हनुमान जयंती फोटोजचा (Hanuman Jayanti Images In Marathi) देखील समावेश केलेला आहे, तुम्हाला जो फोटो आवडेल तो डाउनलोड करून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.

Hanuman Jayanti Marathi messages 2024 | हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा 🚩

Hanuman Jayanti Marathi messages 2023
Hanuman Jayanti Marathi messages 2024

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
🚩🚩हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा🚩🚩

भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारूती,
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना,
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे,
सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका..
🚩🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!🚩🚩

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
🚩🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🚩🚩

मुखी राम नाम जपि योगी बलवान
लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान
आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान
हृदयी वसती राम असा भक्त हनुमान
🚩हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!!🚩

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

Hanuman Jayanti status in Marathi

Hanuman Jayanti Wishes in Marathi
Hanuman Jayanti Wishes in Marathi

ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
🚩असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान🚩

ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
🚩हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा🚩

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

राम लक्ष्मण जानकी…
जय बोलो हनुमान की…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

चरण शरण में आयें के धरू,
तिहारो ध्यान,
संकट से रक्षा करो हे महावीर हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

Hanuman Jayanti Message In Marathi | हनुमान जयंतीनिमित्त मेसेज

Hanuman Jayanti Message In Marathi
Hanuman Jayanti Message In Marathi

प्रभू रामचंद्राचे एकनिष्ठ भक्त
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩🚩

भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो…
🚩🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम…
🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा🚩

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम…
🚩🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩🚩

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान…
🚩🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩🚩

Hanuman Jayanti WhatsApp Status In Marathi | हनुमान जयंतीसाठी मराठी स्टेटस

Hanuman Jayanti WhatsApp Status In Marathi
Hanuman Jayanti WhatsApp Status In Marathi

बोला बजरंगबली की जय,
बोला रामभक्त हनुमान की जय…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी,
करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

12 names of hanuman in marathi
12 names of hanuman in marathi

भुजंग धरूनी दोन्ही चरणी
झेपे सरशी समुद्र लंघुनी,
गरूड उभारी पंखां गगनी
गरूडाहुन बलवान,
तरून जो जाईल सिंधु महान
असा एकच श्री हनुमान…
🚩🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩🚩

मनोजवं मारूततुल्य वेगं
जितेद्रिंयं बुद्धिमतां वरिष्ठम् …
🚩🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩🚩

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।🚩

कोटिच्या कोटि उड्डाणें,
झेपावे उत्तरेकडे,
मंद्राद्रीसारिखा द्रोणू,
क्रोधें उत्पाटिला बळें

अंजनीसूत,
पवनपुत्र
श्री बजरंग बली की जय🚩

श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩

Hanuman Jayanti Marathi Shubheccha | हनुमान जयंतीसाठी शुभेच्छा संदेश

Hanuman Jayanti Marathi Shubheccha
Hanuman Jayanti Marathi Shubheccha

मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

लंका जाळून सीता मातेला सोडवली,
रामभक्त जय जय बजरंग बली…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

जर तुमचे मन शांत असेल
तर तुमच्या मनासारखा बलवान कोणीही नाही
कारण खरी शक्ती शरीर नाही तर मन लावत असतं…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

Hanuman Jayanti Quotes In Marathi | हनुमान जयंती मराठी सुविचार

Hanuman Jayanti Quotes In Marathi
Hanuman Jayanti Quotes In Marathi

जय जय बजरंग बली,
तोड दुश्मन की नली…
🚩🚩हॅपी हनुमान जयंती🚩🚩

जिनको श्रीराम का वरदान हैं ,
गदा धारी जिनकी शान हैं
बजरंगी जिनकी पहचान हैं ,
संकट मोचन वो हनुमान हैं ।
बोला जय जय हनुमान🚩

जिनके सीने में श्री राम हैं ,
जिनके चरणों में धाम हैं ,
जिनके लिए सब कुछ दान हैं ,
अंजनी पुत्र वो हनुमान हैं ।
बोला जय जय हनुमान🚩

hanuman jayanti images in marathi
hanuman jayanti images in marathi

Shri Hanuman aarti in Marathi | श्री हनुमानाची मराठी आरती 🚩

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ||
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ||
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुवनी ||
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी || १ ||
जय देव जय देव जय हनुमंता ||
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता || जय || धृ ||
दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ||
थरथरिला धरणीधर मानीला खेद ||
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ||
रामी रामदासा शक्तपचा शोध ||
जय देव जय देव जय हनुमंता || २ |

Maruti Stotra Lyrics In Marathi | श्री मारूत्री स्तोत्र 🚩

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णव गायका ||२||
दीननाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा| पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीळा, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडीले माथा, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छें करू शकें | तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा | वाढतां वाढतां वाढें, भेदिले शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही | पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही | नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्र्लोकी, लाभली शोभली बरी | दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळा गुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू | रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम॥

Hanuman chalisa in Marathi | श्री हनुमान चालीसा 🚩

Hanuman Jayanti Message In Marathi

दोहा :

श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।।
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।।
जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।

रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।

महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।

कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।

संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।

विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।

भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।

लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।

सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।

जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।

तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।

जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।

दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।

राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।

सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।

आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।

भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।

नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।

संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।

सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।

और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।

चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।

साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।

राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।

तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।

अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।

और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।

संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।

जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।

जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।

जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।

तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।।

दोहा :

पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।

Anajani Chya Suta Song Lyrics | अंजनीच्या सुता मराठी गाणे 🚩🚩

Anajani Chya Suta Song Lyrics
Anajani Chya Suta Song Lyrics

अन एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया

बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हा
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया

अरे हादरली ही धरणी, थरथरले आसमान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण

हे द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका

तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका

अरे दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला

पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे आले किती गेले किती संपले भरारा

तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा

धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा

तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान
हे राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि
राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि ६वेळ

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि

राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि
राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि
राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि🚩
राम लक्षूमन जानकी जय बोला हनुमान कि 🚩

लक्ष्य दया: मित्रांनो तुम्हाला या पोस्ट मधील Hanuman Jayanti Wishes in Marathi तसेच Hanuman Jayanti Marathi Status आवडले असतील, तर Facebook आणि Whatsapp द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच सुंदर सुंदर Hanuman Jayanti Marathi message असतील तर कंमेंट बॉक्स द्वारे नक्की नोंद करा आम्ही तुम्ही दिलेले Hanuman Jayanti Marathi SMS या पोस्ट मध्ये Update करू धन्यवाद🙏

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Hanuman Jayanti shubhechha Marathi,hanuman jayanti wishes in Marathi, hanuman jayanti message in Marathi, Hanuman Jayanti Marathi Status, Hanuman Jayanti quotes Marathi, Hanuman Jayanti Msg In Marathi, Hanumaan Jayantichya Hardik Shubhechha, बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.

सर्वांना मराठी वारसा टीम तर्फे हनुमान जयंतीच्या शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा…🚩

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Ram Navami Wishes in Marathi 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “हनुमान जयंती शुभेच्छा 2024 | Hanuman Jayanti Wishes in Marathi | Hanuman Jayanti Marathi messages”

Leave a Comment