Marathi prem kavita | kavita in marathi | मराठी कविता संग्रह | Love kavita in marathi

💘 आवडत मला पावसात चिम्ब चिम्ब भिजण.
अनुभवते मी बीजा च अन्कुरन्यासाठी रुजन.

💘 कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.

💘 तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते

💘 दिवसागन श्वास नविन
श्वासागन भास नविन
पण तुझ होकारानेच सुरु होइल
माझ्या आयुष्याचा प्रवास नविन !!!

💘 मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.

💘 मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो

💘 माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं

💘 आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो

💘 ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.

💘 कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत .

💘 तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला
तिचाच चेहरा दिसतो

💘 तू अस्स कशी पाहिलास कि वाटल,
खरच पाऊस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाईचा स्पर्श घडायला हवा.

💘 मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून

💘 “मला विसरण्याची
तुझी सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!”

💘 “या सौद्यातील नफा तोटा नाहीच
तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा !!!!”

💘 अंतर ठेवून ही बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची गोडी चाखता येते.

💘 अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले….
🙂 मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..

💘 अज़ून तरी मी तुला
कधी निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नाना
तू कधि उत्तर दिले नाही….

💘 अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे

💘 अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस

💘 अबोल शब्दातही प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी माझे प्रेम नि:स्वार्थ आहे..

💘 अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..

💘 अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काही काळ का असो
माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास

💘 अलगद धरलेला हात
तू अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास

💘 अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसर्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही

💘 अस कधीतरी घडाव , कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव… ..
तिने हळूच माझ्याकडे बघाव , मी बघतांना तिने हळूच लाजाव… . .
भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव,
भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव… .
मी दिसताच तिने मग हळूच हसाव, आणि मी नसतांना तिने रडाव … ..
तिला चीडवल्यावर तिने मुद्दाम रुसा ,
मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुलद्याव… . .
तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव निघाव,
स्वप्नातही तिला मीच दिसावं…. . .अस कधीतरी घडाव,
कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव…♥

💘 असं कधीच नाही होणार,
आपण एकमेकांशिवाय जगणार
कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला,
दुस-या शब्दाची मदत घ्यावीच लागणार

💘 असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं
प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो …
पण राबवायचा नसतो प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं
नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं…
असं फक्त प्रेमच असतं

💘 असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं आणि मी तुझ्या
अस़चं तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि मी तुझ्या
पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं, कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !
कसं सांगू तुला किती जड झालंय जगायला
एकेक महिना तुझा चेहरा नाही मिळत बघायला.

💘 असायला हवी अशी एखादी तरी. जिच्यात मी हरवून जावे …….!
रागावले जरी तिला कोणीही घाव माझ्या हृदयात व्हावे …
इजा झाली माझ्या अंगी तर आईग …. तिने म्हणावे …….!
असायला हवी अशी एखादी तरी जिच्यात मी हरवून जावे …….!

💘 असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे…

💘 असे कितीतरी बंध जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…

💘 असे म्हणतात… हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे
हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा …,
हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा कारण
असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते

💘 आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ………
चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ………..
पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे

💘 आज एक चूक घडली,
ती माझ्यावर चिडली,
स्वतः बनून अबोली,
गजरा मात्र विसरली.

💘 आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.

💘 आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..
जगण्याचे कारण आहे प्रेम तुझे असेच ते जपुन ठेव..
माझे आयुष्य तर कधीच संपले होते माझा प्राण बनुन तु आलीस..
मरेल ग तु दुर गेलीस तर मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस

💘 आज तुझ्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत,
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधात आहेत.

💘 आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही, कधी रडु लागलो…

💘 आज सारे विसरली तू नावही न येई ओठांवर…..
कसे मानू तू कधी खरे प्रेम करशील कुणावर……

💘 आज ही माझी सकाळ तुझे नाव घेऊन होते
आणि तुझ्याच स्वप्नां मध्दे माझी सर्व रात्र जाते

💘 आजच कदाचित तुझ्या नसण्याचे कारण मला कळले……….
म्हणूनच गणित जीवनाचे आज क्षितीजाला बघून कळले….

💘 आजही मन जागत होते तुझ्या येण्याच्या आशेवर
आणि डोळे लागुन राहिले होते तुझ्या येण्याच्या वाटेवर

💘 आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील
जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन…
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन…
तेव्हा तुला माझे शब्द पटतील तुझ्याही नजरेत तेव्हा…
माझ्यासाठी अश्रू दाटतील…. माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील कारण
तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ओठ तेव्हा माझे नसतील…

💘 आठवणी तर नेहमी पाझरतात
कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
अस वाटत कोणीतरी साद घालतय
आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून

💘 आठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी …मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

💘 आठवणी येतात….! आठवणी बोलतात…..!
आठवणी हसवतात……! आठवणी रडवतात…….!
काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात……!
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात…

💘 आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारण मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.

💘 आठवणींचा हा गुच्छ,
कोप-यात मनाच्या साठवण्यासाठी.
सोंग करुन विसरल्याचं,
पुन्हा एकदा आठवण्यासाठी.

💘 आठवणींच्या मागे धावलो कि माझं असंच होतं.
आठवणीं वेचत जाताना, परतायचं राहुन जातं.

💘 आठवणींतल्या आठवणींना हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी मंद गालातल्या गालात हसायचं असतं.

💘 आठवणींनी पाणावलेल्या डोळ्यांत,
तुला ईतरांपासुन लपवु कसे?
भरभरुन वाहणा-या अश्रुंना थोपवुन,
खोटे हासु आणायचे तरी कसे?

💘 आठवणीच्या सागरातमासे कधिच पोहत नाही अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही.. … अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

💘 आठवणीच्या हिंदोळ्यावर तुझे माझे भेटणे एकांती पावूल वाटेवर तुझ्या आठवणीतच माझे चालणे

💘 आठवणीत कधी जेव्हा मन वेड हरवते कोसळणाऱ्या पावसात मग आसवांना लावपते लपलेच प्रेम आणि न विसरलेल्या आठवणी ढगालेल तेच वातावर पण कोसळत नाहीत आता पुन्हा त्याच टपोर्या थेंबाच्यासरी वाहत राहता आता फक्त त्याच वेड्या आठवणीच्या लहरी

💘 आता तरी हो बोल.. तरसवतात मला तुझे ते ओठ अबोल.. कसं सांगू तुला सजनी तु माझ्यासाठी आहेस किती अनमोल !

💘 आधीच नाक तुझं एवढे एवढे, त्यावर रागाचे ऒझे केवढे. नजर तर अशी करारी, कि काळजाला नुसते जखमांचे धडे

💘 आन्तरीचा भावन्नाना शब्दाची गरज नसते. निशब्द नजरेला ओळखण्याचे सामर्थ्य मात्र लागते…….

💘 आपण घालवलेला एकही क्षण विसरायला सांगू नकोस …… तुला विसरनारे असतिलही त्यात मला मोजू नकोस !!!”

💘 आपली पहीली भेट.. नवी ओळख.. एक सुगंध मनात ठेऊन गेली. तसं पाहीलं तर अनोळखीच होतो आपण, तरी एक बंध मनात ठेऊन गेली.

💘 आपल्याला प्रेम करता येते कोणताच तेढ न ठेवता मग आपण ते व्यक्त का करत नाही कोणतेच आढेवेढे न घेता ?

💘 आभाळ बरसताना सरळ दार लावून घ्यावं नाहीतर स्वत:ला दिशाहीन जाऊ द्यावं

💘 आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते.

💘 आयुष्यभर ह्रदयाची, बनून राह राणी… तू ह्रदयात असता , हवं काय आणि…

💘 आयुष्यात झालेली जखम, कधितरी भुलवावी लागेल…… तुलाही आता, आयुष्याची नवीन सुरुआत करावी लागेल…..

💘 आयुष्यात प्रेम तसं , कमीच मिळालं… म्हणूनच प्रेम फार , जवळून कळालं…

💘 आयुष्यात माणसाला, बरंच काही मिळतं, बरंच काही हरवतं, जेंव्हा प्रेम होतं.

💘 आयुष्यातील सारे दुःख या डोळ्यांसमोर फिके आहे कारण आता नजरेसमोर तुझ्या आठवणीचेच धुके आहे

💘 आवडलं कुणी तर वेड होऊन जावं झपाटल्यासारखं प्रेम करावं बेधुंद होऊन तिच्यावर मरावं फुलासारखं तिला जपावं तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं तिची ढाल बनून आयुष्य जगावं फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवावं तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं प्रेमानेच तिचही मन जिंकाव

💘 आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा, थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा, क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा, तो अनअमोल आनंद होता आमच्या प्रेमाचा.

💘 आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे, काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात …. ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात पण कारण नसतानाही जेव्हा आश्रू येतात ………. ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात

💘 आसवांची फुलेच दिलीस मला तु मौन राखिले तरी का डोळ्यात तुज्या सदा प्रश्नभाव राजसा प्रीत माजी हि खरी

💘 आहेस तरी तू कोण? काळजाचा प्रत्येक ठोकाही तुझेच नाव सांगून जातो, तुझ्या आठवणीत दिवस संपून जातो, ओठांपर्यंत येते तुझे नाव, स्वप्नांच् याच जगात राहू दे मला असे तू परत परत सांगून जातो

💘 इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस.. दूर आपण झालो कधीचे..प्लीज़, आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेक अप तरीही,डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.. खरेच सांगू का तुला,माझ्या मनात तू आत राहू नकोस! यायचे आहे तर समोर ये…होऊ दे खरीखुरी भेट ! वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे….असे छान सरप्राइज स्ट्रेट…!!!**

💘 इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल

💘 उडोणी एक फुलपाखरु, तुझंपाशी आले … तूही एक फुल, बहुदा त्यालाही कळाले …

💘 उभा मी शांत आज , तूझ्याकडे पाहत… समोर माझ्या एक फुल , नुकतच होतं फुलत…

💘 ऋतू बदलत जातात दिवस उजाडतो,मावळ्तो सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती बदलत नाहीत ती फ़क्त माणसा माणसांमधली अनमोल नाती…… प्रेमाची

💘 एक क्षण तूझ्या सहवासात असलेला एक क्षण तुझ्या विरहात असलेला एक क्षण तुझ्या प्रतिक्षेत असलेला एक क्षण तुझ्या आठवणीने फुललेला एक क्षण तुझ्याबरोबर हसलेला माझ्या मनात मात्र खोलवर ठासलेला असा माझा एक क्षण तुझ्याचसाठी जगलेला जनु चंदनाप्रमाणे

💘 एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.आणि, आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठी

💘 एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात

💘 एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी

💘 एक मनी आस एक मनी विसावा तुझा चंद्र्मुखी चेहरा रोजच नजरेस पडावा नाहीतर तो दिवसच नसावा.

💘 एकटेपणा तेव्हा वाटत नाही… जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो… जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते

💘 एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल

💘 एका इशाऱ्याची गरज असेल हृदयाला किनाऱ्याची गरज असेल मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन, जिथे तुला आधाराची गरज असेल….

💘 एका मिनिटा मध्ये ७२ वेळा आपलं हृदय धडधडत असते …………. पण तुझे हृदय एका मिनिटात एकदाच जरी धडधडले तरी तू जिवंत राहू शकशील, ………… कारण एका मिनिटात ७१ वेळा माझे हृदय तुझ्यासाठीच धडधडत असते ♥ ♥ ♥

💘 एकांत क्षणी…कधी तरी असं वाटतं कुणीतरी आपलं असावं दुखाःच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.

💘 एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .

💘 एखाद्याला आपलं करता आलं नाही म्हणून जीव जाळायचा नसतो जीवनच संपल्यावर आपण त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो

💘 ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते.. माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते.. डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते.. अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.

💘 ओंठ जरी माझे मिटलेले डोळे मात्र उघडे होते तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते

💘 ओठ माझे तुझ्या ओठांवर , येऊन विसावतात… ते क्षण एकांतात आठवले , तरी लाजवतात…

💘 ओठांनी अबोल असली तरी डोळे खुप काही बोलायचे मनातील वादळ नकळत खुप काही लपवायचे

💘 ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही

💘 ओठाना जे जमत नाही ते फूल बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो

💘 ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे

💘 कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो कदाचित मी तो नाही ज्याची तू वाट बघतेस पण ती तूच आहेस जिची मी आतुरतने वाट बघत असतो कदाचित मी तो नाही ज्याच्यावर तू प्रेम करतेस पण ती तूच आहेस जिच्यावर मी अगदी जीवापाड प्रेम करतो

💘 कधि तू कधि मी एकमेकांशी भांडू …. राग ओसरल्यावर मात्र पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू….

💘 कधी अचानक रुसतेस मनापासुन हसतेस तू, साद घालते मनास ऐसे जीवनगाणे तू,

💘 कधी इतकं प्रेम झालं…. काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलंस…. काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच नाही आठवत, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच नाही राहवत.

💘 कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर माझे मलाच ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही

💘 कधीतरी माझेही आयुष्य तुझ्या प्रेमाने उजळेल माझ्या प्रीतीचे चांदणे तुझ्याहि डोळ्यातून विरघळेल

💘 करतो किती गं बहाणे, तुला रोज भेटायचे… अन् तुला हे वेडे, सांग कधी गं कळायचे…

💘 कळू दे प्रेम जरा , तुझ्याही ह्रदयातले… सोपे होईल मग मलाही , सांगणे मनातले…

💘 कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला

💘 कशाला हे मन कुणाच्या प्रेमात पडतं, तू प्रेमात पडलास आपल्याला का सांगत, कशाला कुणाच्या आठवणीन रात्र रात्र जागत, कुणी भेटलं नाही तर अश्रू का गाळत, कशाला कुणाला भेटायला मन इतकं तडफडत, भेटून गेल्यावरही भेटीसाठी का तळमळत, कशाला कुणासाठी मन क्षण क्षण झुरत, रात्रंदिवस विचार करून या जीवाला छळत, कां इतकं कुणी मनास आवडून जात, रंगेबिरंगी स्वप्नांना मनात पेरून जात, हे माझं प्रेम मनाला कसं कळत, कां आतला आवाज ऐकून मन वेड होत, काही कां असे नां काहीतरी असं घडतं, हेचं आपलं प्रेम आपल्याला कळून जात……,

💘 कस असत ना आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या सहवासात वावरतो त्या व्यक्ती सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतो पण तीच व्यक्ती जेव्हा आपणास सोडून जाते आपल्या जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत………..कारण आपल्याला त्या व्यक्ती ची सवय झालेली असते तिच्या सहवासात राहण्याची आणि तीच व्यक्ति जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो तो फ़क्त एकांत आणि तिच्या आठवणीत आपण खुप खुप रडतो एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच

💘 कसं आवरू ह्रदयाला , तूच आता सांग … तू दूर जाता, आठवणींची लागते रांग …

💘 कसे करू माफ़ तुला जे घाव तू मला दिले…… घेऊन माझी फूले तू काटेच मला दिले……

💘 का कळत नाही तुला माझंही एक मन आहे जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे सगळं कळतयं त्याला की तु माझआ होवू शकत नाही कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे..

💘 का कसे कुणाचे तरी मन कुणावर तरी जडते? मग फक्त तिचेच स्वप्न रोज भल्या पहाटे पडते. आता मोहक तिचे रूप माझ्या रोजच्या आठवणीतले, नि रोजचे हे शब्दाश्रू माझ्या मनांतल्या साठवनितले.

💘 का तुझ्या माझ्या नात्याला , प्रेमाचे नाव द्यावे … नुसतं नावानेच काय त्याला , प्रेमाचे भाव यावे …

💘 का मलाच तुझी इतकी आठवण येते, माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत सरते, प्रत्येक क्षण तुला मन घेऊन फिरते, तुझे नाव ओठांवर नेहमी माझ्या रुळते, स्वप्नातही तुझी आठवण मला गं छळते, बंद पापण्या असतांनाही मन तुलाच बघते, रोज रात्री निजतांना उचकी गं लागते? तुलाही येते आठवण तेव्हा मज कळते, प्रेमात पडल्यावर सखे असेच गं घडते, हे मन बावरे होऊन आठवणींच्या झुल्यावर झुलते….

💘 का विसराव मी तीला का विसराव तीने मला जीने माझ्या कवि मनाला आपल्या प्रेमातून जन्म दिला

💘 कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा, पाऊस अलगद मनात दाटतो.

💘 काय उपयोग वाईट वाटून सगळीच प्रेम नाही फळत दु:ख आपल्या मनातलं कोणालाच नाही कळत

💘 काय तरी ह्रदयात , तुझ्याही माझ्याही… दुर नाही राहवत , आता जराही…

💘 काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात

💘 काय सांगू तुला , हाल माझ्या ह्रदयाचे… वाटेकडे तुझ्या , डोळे नेहमीच लागायचे…

💘 काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो

💘 काही थेंब तिच्या ओठांवर थांबले क्षणभर मी पाहतच राहिलो आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.

💘 काही नाती अमुल्य असतात त्यांची किंमत करू नये जपावं हाताच्या फोड्यासारखं उगाचचं गंमत करू नये

💘 काही नाती जोडली जातात, कही जोडावी लागतात काही जपावी लागतात तर काही आपोआप जपली जातात यालाच प्रेम म्हणतात !

💘 काही भाव बोलून जातात, तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो. ओली हवा धूंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते. काही नाती ओढ लावतात, ते प्रत्येक नाते प्रेमाचे नसते. प्रत्येक नाते प्रेमाचे हवे, अशी काहीच गरज नसते, तर प्रत्येक नात्यात प्रेम असावे, याला खूप महत्व असते..

💘 किती सहज म्हणुन गेलीस सखे, वेळ पाहुन लिहीत जा .. माझ्यावर रागवण्यापेक्षा तुन तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा…

💘 कितीही ठरवलं तरी तुझ्यावर रुसून राहता येत नाही…, उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही..

💘 कितीही म्हटलं तरी, मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही.., आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं या चातकाला व्याज मागता येत नाही.

💘 कितीही रागावलीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही, कारण तुझ्याशिवाय मी कुणावर प्रेम करणार नाही.

💘 कितीही सुंदर चेहरा असला तरी, त्या चेहऱ्यान वेड लावलं असलं तरी, फक्त आकर्षून घेण्यासाठी त्या चेहऱ्याचा उपयोग होतो, पण खंर प्रेम मिळवायचं असेल, न कायमच कुणाला वेड लावायचं असेल, तर फक्त सुंदर मनाचाच उपयोग होऊ शकतो. सुंदर मनावर झालेलं प्रेम दूर जाऊनही मन विसरू शकत नाही. कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू शकतो, पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..

💘 किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत .. पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत .. प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .

💘 किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या

💘 कुठे तरी, काही तरी घडलय त्याचं कोणासोबत तरी बिनसलय मग उगाचच नाही मन माझं माझ्यापसुन दुर गेलय….

💘 कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार , भरलेच आसवांनी तर डोळे पुसणार , केल परक जगानं तर आपल करुन घेणार , कुणीतरी असाव

💘 कुणीतरी मला वीचारले की ,,,,,,,, ‘तू तीला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादे पर्यंत जाऊ शकतो ??? मी हस्त उततर दीले , जर मला मर्यादाच ओलाद्याच्या असत्या त् .मी तीला कधिच मिळवले असते

💘 कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.

💘 कोणाची तरी ओढ लागली की ओढाताण होतेच ! वणवा लागतो मनाला, नि आयुष्याचे कोरडे रान होते

💘 कोणाच्या तरी मनात घर करून राहता आले तर पहा, कोणावर प्रेम करता आले तर पहा, स्वःतासाठी सगळेच जगतात, जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पहा, वेलीला ही आधार लागतो, जमलचं तर एखाद्याच्या मनाला आधार देऊन पहा

💘 कोणाशी तरी तासंतास बोलत रहावं, आणि बोलता बोलता तिच्या नजरेला भिडावं…… तिनी लाजून गालातल्या गालात गोड हसावं, आणि मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे एक -टक पाहत रहावं……. तिच्या नकळत तिला अलगद जवळ घ्यावं, तिनी श्वास घ्यावा आणि माझं हृदय धडकावं…….. तिच्यावरचं माझं प्रेम तिला न सांगताच कळावं..

💘 कोणी कोना पासून दूर नसते…. कोणी कोणाच्या जवळ नसते, प्रेम तर स्वताहून जवळ येत असते, … …. .. जेव्हा कोणीतरी कोणाच्या नशिबात असते..

💘 कोपरांकोपरा ह्रदयाचा, तुझ्या आठवणींनी भरलेला… तरीही माझ्या प्रेमाबद्दल, तुला प्रश्न पडलेला…

💘 कोमल तुझ्या चेहर-या वरुन अश्रु का ओघळावे गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे हे डोळ्यांनाही न समजावे?

💘 क्षण असा एकही जात नाही की तु माझयासवे नाही नेहमीच असते मी तुझया सहवासात सारखाच ध्‍यास असतो तुझयाच मनात

💘 क्षण सरून गेलेले आज आठवती पुन्हा जुन्या आठवांची जखम देई दर्द पुन्हा पुन्हा

💘 क्षणात ओघळून जाणारे प्रेम नसतेच कधी, प्रेम असते सोबत नसताना पण आयुष्यभर साथ निभावणारे, दूर राहूनसुद्धा सतत सोबत असल्याचा एहसास देणारे, कधी मैत्रीच्या रुपात तर कधी बेधुन्द प्रीत बरसवनारे..

💘 क्षणोक्षणी आठवण येते अन जाते या आठवणिला तरी काही कळते कधी त्रास देते तर कधी छळते कधी पाकळ्यांप् रमाणे गळते तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते ही आठवण अशी का वागते जणू सुखद क्षणांमधून चमकते कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते..

💘 खरं प्रेम करणारे सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

💘 खरं प्रेम करणाऱ्‍यां साठी एक सुंदर वाक्य: जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुपहसवते, तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..

💘 खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं, कधीही न बदलणारं, लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी आपल्याच विश्वात रमणारं!

💘 खरं प्रेम म्हणजेतडजोड करण्याची तयारी असणं. खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे. खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे. खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळयेणे. खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं. खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं

💘 खरी जरी असेल प्रित तुझी… का केली नाही तु व्यक्त… सदा वात बघण्यात तुझी… आटले माझ्या देहाचे रक्त..

💘 खरे प्रेम असावे….. कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही, त्याच्याशि वाय ते कधीच उगवत नाही…. खरे प्रेम असावे….. गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले, तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही…. खरे प्रेम असावे….. आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण. . कुठेही गेले तरी न संपणारे, सदैव आपल्या बरोबर असणार कारण….. प्रेम हा काही खेळ नाही, टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही

💘 खळखळणारा झरा तू चंचलतेचा वारा तू, लाट धावते ज्याच्यासाठी कधी तो शांत किनारा तू,

💘 खास मुलीच्या मनातलं.. कितीदाही भेटलो तरीही, प्रत्येक वेळी तीचं हुरहूर असते.. तुझ्या मिठीत आल्यावर मी, स्वःतालाही हरवून बसते.. तुझ्या स्पर्शाने अंगावर, गुलमोहर फुलतो.. आकाशातला चंद्र, मुखचंद्रावर येतो.. डोळ्याने तू काही सांगताचं, शब्दही विरून जातात.. स्पर्शाच्या तुझ्या भाषेला, मग डोळेही फितूर होतात.. दोन ह्रदयांची धडधड, एकसारखीचं असते.. तू माझा कधी होतोस, अन् ????? मी तुझी झालेली असते.

💘 खुणवीत आहे काही तिळ तुझ्या गालावरचे, मलाच समजत नाही ते शब्दात कसे सांगायचे.

💘 खुप कमी बोलतेस.. पण तेवढ्याच बोलण्यात मन चोरतेस.. हळूच येउन मनाच्या तारा हळुवार छेड़तेस.. अन अश्या अबोल भेटीतच खूप आठवणी मनास देऊन जातेस

💘 खुप काही सांगायच होत तुला पण शब्दांनी साथ सोडून दिली कधी वेळेच कारण पुढे आल तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली.

💘 खुप वेळेस तुझ्या आठवणी , पाउल न वाजवताच येतात. आणि जाताना मात्र , माझ्या मनाला पाउल जोडून जातात.

💘 खूप खूप वाटतं केव्हा तरी, धावत तुझ्याजवळ जावं.. बाहुपाशात घेऊन तुला…, सारं जगं विसरावं… गतकाळच्या आठवणींना, पुन्हा एकदा जागवावं… दु:ख सार सारून, तुला डोळ्यांत साठवावं… आयुष्याच्या संध्याकाळी, बेधुंद होऊन जगावं… उरलेल्या दिवसांसाठी, सुःख जरा मागावं… छेडून अंतरंगाची तार, सुःखद स्वप्नांना जागवावं…

💘 खूप प्रेम करतो तुझ्यावर, सत्य हे जाणून बघ, एकदा तरी मला तू, आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ, आयुष्भर साथ देईन तुझी, एकदा आपले करून बघ. तुझ्यासाठीच जगत आहे, तुझ्यावरच मरत आहे, असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. वाटलेच कधी तुला तर, बघ प्रेम माझे तपासून, पण मी खरंच खूप प्रेम करतो, तुझ्यावर अगदी मनापासून…..!! घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन, मनापासून….. फक्त तुझ्यासाठी….

💘 खूप प्रेम करूनही प्रेम मिळत नाही.. तेव्हा लोक प्रेम मनात जतन करतात.. त्याग करू तिच्यासाठी किवा त्याच्यासाठी.. असे उगाच स्वतच्या जखमांना झाकण्याच्या फोल प्रयत्न करतात.. विसरणे किवा समर्पण हे खूप कठीणच तसे.. पण लोक आता हल्ली त्यागापेक्षा समर्पणच योग्य मानतात..

💘 गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं परक्यापेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात एकमेकांच्या पाठीवर मग् नजरेआडुन होतात वार भळभळणार्या जखमेतुन विश्वास घाताच रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे . पण;दुसर्याला मारुन जगण हा कुठला न्याय आहे माणुस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्यासाठी थोडं दुसर्यासाठी जगायचं जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बनवायचं असतं अशावेळी आपणच आपल्या मनाला आवरायचं असतं .

💘 गवतावरील दव-बिंदू म्हणजे तुझे तारुण्य तुझी मीठी म्हणजे प्रेमाचे अरण्य

💘 गाणा-या पक्षाला विचार झुळझुळणा-या वा-याला विचार झगमगत्या ता-याला विचार उसळत्या दर्याला विचार सारे तुला तेच सांगतील मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

💘 गालावरची खळी पड़ते डोळ्यात तुजे स्वप्न रंगवतो का बर असा मी स्वताला तुझ्यात गुंतवतो

💘 गुण दोषांचा स्वीकार तू माझ्यावरचा अधिकार तू, शब्दांमद्ये आकार तू प्रेमामध्ये साकार तू,

💘 गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.. आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तू आहेस…..

💘 चंद्रास सात जशी किरणांची तशी सात तू मला देशील का? जगात आहे मी तुझ्यासाठी माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का.

💘 चांदण्यात राहणारा मी नाही भिंतीना पाहणारा मी नाही तु असलीस नसलीस तरी शून्यातही तुला विसरणारा मी नाही

💘 चालताना हळूच दचकून माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी, प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित मला तुझी साथ हवी…

💘 चिंता नसते कशाचीही , सोबतीला तू असता… आयुष्यभर तू अशीच , सोबत बनून रहा…

💘 चेहर्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं… आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं…

💘 जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत

💘 जगाची रीतच न्यारी आहे इथे सगल्याना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हनत नाही शेवट पर्यन्त साथ दे पण शक्य आहे तो पर्यन्त तरी माझा हातात हाथ घे.

💘 जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.

💘 जमलंच तर तुला, आणखी एक जादु करुन जा… निरोप घेताना सखे, तु तुझ्या आठवणीही घेऊन जा ..!

💘 जर 10 लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण 1असेन. जर 1जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन. पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तर. तेव्हा मी या जगात नसेन.

💘 जर तुझे स्मितहास्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही जर तुझा आवाज मला मिळाला तर मधुर संगीताची मला गरज नाही जात तू माझ्याशी बोलतोस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही जर तू माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुद्धा मला गरज नाही

💘 जर तुला मला आजमवायच होत तर फक्त तुज्या गाहिर्‍या डोळ्यांनी पाहायच होत…. अग मी तर असाच बेशुद्धा झालो असतो त्यात एवढ का लोभस हसायच होत…

💘 जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून, तर ……… वाचता वाचता का होईना, ती झोपली असती मला छातीशी धरून

💘 जर मी चुकलो ……. तर बरोबर करायला तुझा हाथ हवा आहे, जर मी हरलो ………. तर मला प्रेरणा द्यायला, मार्गदर्शन करायला तुझा हाथ हवा आहे, आणि जर मी मेलो …….. तरी सुद्धा माझे डोळे बंद करायला मला तुझा हाथ हवा आहे

💘 जवळ असूनही लक्षातच आलं नाही कारण तुझी काळी कधी खुललीच नाही मिटलेल्या ओठानमागची नि:शब्द भाषा कळलीच नाही

💘 जाता जाता तुला सांगुन जातोय माझ तुझ्यावर प्रेम आहे तुझ्याशिवाय माझे जगणेच व्यर्थ आहे …. माहित नाही तू माझी होशील की नाही पण तुझ्याशिवाय जीवनात दुसरे कोणी असणार नाही …. माहित नाही काय होईल कधाचित आयुष्भर एकटे राहने माझ्या नशिबी राहिल …..

💘 जाताना एकदा तरी नजर वळवून जा, इतरांना नाही निदान मला कळवून जा, मन हि अशीच जुळत नसतात, हि मनाची कळी एकदा फुलवून जा, प्रेम केलय काही नाटक नाही, सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवून जा, इतरांना नाही निदान मला कळवून जा

💘 जाताना तू म्हणालीस, विसरुन जा म्हणून… मला विसर म्हणताना, तुझ्या डोळ्यात पाणी का म्हणून…

💘 जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं.

💘 जीवन नावाचा एक पुस्तक असता, त्यात प्रेम नावाचा एक पान असता, ते पान फाटला म्हणून – पुस्तक फेकून द्याचा नसता.

💘 जीवन मिळते एकाचं वेळी…… मरणं येतं एकाचं वेळी… प्रेम होतं एकाचं वेळी… ह्रदय तुटतं एकाचं वेळी… सर्व काही होतं एकाचं वेळी… तर तिची आठवण… का..?. येते वेळो वेळी..

💘 जीवनाचा धागा धरता धरता मिळाला प्रेमाचा दोरखंड कदाचित म्हणूनच आपलं प्रेम राहिला अजरामर अखंड

💘 जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात वाहून जाते सहवासचे पाणी तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो कारण भिजत राहतात त्या आठवणी.

💘 जीवनातल्या प्रत्येक शब्दाना तुझी साथ हवी आहे, माझ्या गीतानमधे तुझे सुर हवे आहे, माझ्या आश्रुना तुझा बाँध हवा आहे, माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा गंध हवा आहे, या जीवनात आणखी काही नको फक्त तूच हवी आहे.

💘 जुळत नसतात बंधन कधीही इतक्या सहज …. कशी आलीस तु जिवनात माझ्या, आता वाटते आहे ति फक्त तुझिच गरज…….

💘 जे जे हवे होते मला मी तेच होते टाळले मी नेमके माझ्यातुनी तुजलाच होते गाळले झाली किती स्मरणे तुझी झाल्या किती जखमा नव्या नुसताच वारा लागला अन रक्त हे साकाळले मी शोधले पत्ते तुझे थकवून सारी अंतरे सांगे निखारा कालचा ज्याने नकाशे जाळले आले नव्याने बहर हे आला तसावारा पुन्हा मी पाहता वळुनी पुन्हा सारेच होते वाळले फसवून नियतीने दिल्या दु:खासवे मी रंगलो मी घाव सोसत राहिलो बाकी उगा किंचाळले

💘 जे तुला जाणवतं मलाही जाणवतं पण व्यक्त होत नाही त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!

💘 जेवढं बांधावं काव्यात तेवढी तु निराकार होत जातेस… समजुन सोडवावं म्हटलं तर आणखीनच गुंतत जातेस…

💘 जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी मला विचारेल कि, बाबा, तुमचे पहिले प्रेम कोण होत ? … तेव्हा मला कपाटातून जुने … फोटो काढून दाखवायचे नाही आहेत, मला फक्त माझा हाथ वर करून बोटाने दाखवायचे आहे कि, ती किचन मध्ये उभी आहेना तीच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे

💘 झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत्त……….., गळताना ते नेहमी सांगत असत्त…………, कोणावर कितीही प्रेम केल तरी………, शेवटी कुणीच कुणाच नसत…… दुख पोटात ठेवून ओठावर हसू फुलवावे लागते, सुकणार आहोत हे ठाऊक असूनही कळ्यांना सुद्धा उमलावे लागते…

💘 झालेच नाही आपले बोलणे सगळा एकान्त असताना आज सगळं सुचत जातय एकटा कविता करताना…

💘 झोका घेताना येणारी तुझी आठवण म्हणजे तुझ्या सोबत घालवलेल्या गोड क्षणांची साठवण

💘 झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली., प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली., माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.

💘 ठोठावून दार ह्रदयाचे , जेव्हा तू आत येशील … पसारा तुझ्याच आठवणींचा , ह्रदयात पाहशील …

💘 डबडबलेल्या आसवानां बाहेर येण्या साठी पापण्या मिटाव्या लागतात ते अश्रु टीपण्या साठी प्रेमळ हाथच असावे लागतात

💘 डोळे तुझे कातील , ह्रदयावर वार करतात…. ह्रदयातील प्रेमाची अलगद , तार छेडतात….

💘 डोळे पुसण्यास माझे पाऊस धावूनी आला, थेंब कोणता तुझा नि माझा हेच कळेना म्हणाला.

💘 डोळे पुसायला कुणीतरी असेल तर रुसायला बर वाटत ……… ऐकणारे कुणीतरी असेल तर मनातल बोलायला बरे वाटते ….. कौतुक करणारे कुणीतरी असेल तर थकेपर्यंत राबायला बर वाटत ……. आशेला लावणार कुणीतरी असेल तर वाट बघायला बर वाटत ……….. आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तर मरेपर्यंत जगायला बर वाटत

💘 डोळ्यांच काय ते नेहमी पाणावतात माझ तुझ्यावरच प्रेम अप्रत्यक्षपणे खुणावतात

💘 डोळ्यांनी व्यक्त केलेस ते डोळ्यानिच ऎकले पापण्या मिटता मिटता आसवांनीच टिपले

💘 डोळ्यातल्या स्वप्नाला कधी प्रत्यक्षातही आन किती प्रेम करतो तुझ्यावर हे न सांगताही जाण

💘 तसं सगल्याना नाही जमत तुझ्यासारख वागणं, ओठानवर जरी नसलं तरी मानत माझं असन…

💘 तसे प्रत्येकाला वाटते की सुखात सहभागी होणारा, दुःखात पाठीशी असणारा, संकटात हातात हात धरणारा, असा एक लाईफ़ पार्टनर असावा जसा तुझ्यासारखा.

💘 तिचं कामच आहे आठवत राहणे, ती कधी वेळ काळ, बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते, कधी हसवते तर कधी रडवून जाते. असे माझे विरह प्रेम.

💘 तिचं ते खोटं बोलणं बोलताना दूसरी कडेच पाहणं मधेच खाली पाहून लाजणं लाजताना मग पुन्हा हसणं

💘 तिच्या एका नजरेनं केलं काळजाचे पाणी, आता दिवस रात्र गातो मी मात्र तिचीच गाणी, तिची अदा आहे जीव घेणी, तिचा आवाज म्हणजे मधूर वाणी, जर असेल माझे भाग्य तर होईल ती माझी फुलराणी,

💘 तिने मला विचारले..? तु किती प्रेम करतोस माझ्यावर.. … . मी म्हंटले- आग वेडे .. . पडणा-या पावसाचे थेंब कधी मोजता येतात का..?

💘 तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच…तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन…

💘 तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून

💘 ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ? तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडते का, मी तर तुझी सावली आहे.. ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ? मला अंधाराची खुप भीती वाटते रे…. तो : भिवु नकोस… मी आहे ना… अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईन ना… ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल …

💘 ती अशी आली जीवनात की डोळे माझे बोलके झाले तिने हसून डोळे झाकले आणि आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले

💘 ती असावी मनात आणी सतत विचारात आठवण कधी आली तर यावी समोर क्षणात कधी रुसणारी कोपरयात कधी हसणारी गालात स्वच्छन्द बागडणारी आणी कधी मला ठेवणारी भानात अशीच यावी आयुष्यात होउन एक नवी पहाटदवबिन्दुसम निरागस ती अन् तशीच रहावी माझ्या मनात…

💘 ती आली आयुष्यात मी बेभान झालो, कळले नाही कधी मी तिच्यात गुंतलो., जेव्हापासून तिच्या प्रेमात मी हरवून गेलो, कळले नाही कसा शब्दांशी खेळू लागलो., तिच्या प्रेमरंगात मी देहभान विसरलो, तिच्या प्रितीन पुरता मी झपाटला गेलो., वेगवेगळ्या भावनांना ती जन्म देते, माझ्या हातून सार ती लिहून घेते., माझी कविता म्हणजे तिचा न माझा संवाद असतो, मी फक्त तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो., कवी नाही मी हे माझं प्रेम आहे, चार दोन कविता करून प्रेम थोडच थांबणार आहे., माझं प्रेम जगावेगळ ते कधीच मिटणार नाही, हे जग सोडेपर्यंत हि भावना मनातून जाणार नाही…..

💘 ती वा-याची एक झुळुक हळुच शेजारुन जाणारी, जाता जाता पाहत वळुन मंद गालातल्या गालात हसणारी.

💘 तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही र

💘 तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो ,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो, असे का बरे होते.. हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो…♥

💘 तु माझी न झाल्याने तुझ्यावर मी चिडलो होतो, म्हणुन आहेर न देताच मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!

💘 तु येणार असताना मध्येच पावसावं येणं कळत नाही, पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात भिजण्याचा त्यात आनंद मिळ्त नाही.

💘 तु समोर असल्यावर आसपास कुणी नसाव एकसारख तासन्तास वाटतं पहात बसाव

💘 तुज्या डोळ्याना पाहिल्यावर मला शिंप्ल्यांची आठवण यायची तुझी पापनीही तुझया डोळ्याना अगदी मोत्यासारखी जपायची

💘 तुझ ते झुरने मला त्यावेळेसच जाणवले होते जेव्हा त्या शांत कातरवेळी तुझे डोळे पानावले होते

💘 तुझ प्रत्येक म्हणन ऐकल, तुझ्यासाठी जगणच टाळल, अगदी तुला विसरायचेही तुला दिलेल प्रत्येक वचन पाळल !

💘 तुझं खरं-खोटं खरचं आता लक्षात आलं तात्पर्य एवढंच की सारं खोटं माझ्या पक्षात आलं

💘 तुझं चोरून पाहणं जेव्हा मला माहीत झालं तेव्हापासून मला पाहणं तू का गं रहित केलं ?

💘 तुझं जाणं आयुष्यातून, खरंच नाही परवडलं … अजूनही तुझ्या आठवणींनी, मला नाही सोडलं…

💘 तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे माझ्या मनासाठी अजूनही काही ओले बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी

💘 तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

💘 तुझा ‘अनोळखी’पणा ही आता ओळखीचा वाटायला लागला आहे. अनोळखी ‘तु’ असलीस तरीही तो माझ्या ओळखीचा झाला आहे.

💘 तुझा तो पहिला स्पर्श आजही मला आठवितो ते दुर्मिळ रोमांचीत क्षण आजही मनात साठवितो

💘 तुझा माझा प्रत्येक क्षण अजुन आठवांत आहे तू परतून येशील पुन्हा ही आस मनात आहे

💘 तुझा हात सोडतांना आभाळ भरलं होतं गेला देहातून प्राण प्रेत माझं उरलं होतं

💘 तुझी आठवण आली की मला काहिच सुचत नाही तु म्हणतेस कविता कर माझ्यावर पण शब्दच फुटत नाही डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र तुच दिसतेस सर्व जागी अशी किलींग विचीत्र तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही खुप गोड हसतेच तु खुप गोड लाजतेस तु प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही

💘 तुझी आठवण आली ना की मला माझाच राग येतो, संपले ना सर्व तुझ्याकडुन, मग असा का त्रास देतो? नको त्या खोट्या शपथा, नको त्या सुखद आठवणी, आठवुन सर्व काय करु? मग डोळ्यांत येते पाणी.

💘 तुझी आठवण येण्यासाठी, काळ वेळ लागत नाही. तीही माझ्या सारखीच आहे, तिलाही तुझ्या शिवाय राहवत नाही.

💘 तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो..

💘 तुझी एखादी कविता दे ना माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला सुरुवात केली आहे मी आता माळ आठवणींची ओवायला

💘 तुझी नी माझी जोडी अशी जसे दोन डोळे सखे सोबती…. मी वात तर तु पणती ह्रद्यात आहे तुझी मुर्ती ….. आपल्या कुडलीत फळाची आहे युती नवसाला पावेल गणपती…. जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी …. हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती …. नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती …. डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,… नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती.., तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती… आपण बनलो आहोत एकमेकांसाठी… बनशील ना माझ्या जन्माची सोबती.

💘 तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

💘 तुझे गालात ते गोड हसणे आठवल्याशिवाय राहवत नाही… तुझ्या चेहरयाशिवाय काहीच बघावस वाटत नाही… तुझ्या नितळ प्रेमाला माझं हृदय विसरू शकत नाही… आणि तू समोर नसलीस की जगावसच वाटत नाही

💘 तुझे नाव घ्यायला आता मला माझया ह्रदयाला विचारव लागतय बघितलस माझ हृदय ही आता अगदी तुझया सारखच वागतय

💘 तुझे माझे कधी पटतच नाही, तरीपण तू नसली तर मला करमत नाही, दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग, तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही, तसच तुझे माझे कधी पटतच नाही, तरीपण तू नसलीस की मला करमत नाही एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस मला दिवस वाटत नाही माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे का तुला दिसत नाही, सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते जगण जगणंच वाटत नाही

💘 तुझे हसने सर्वापेक्षा ही गोड आहे तुझ्या त्या हास्या कडेच तर माझ्या प्रेमाची ओढ आहे

💘 तुझेही पाय मातिचेच असतिल याची जाणिव आधिच होती म्हणुनच तुला वाहिलेली प्रत्येक ओंजळ सुंदर फुलांची पण कागदिच होती

💘 तुझ्या पत्राची राहिली नाही आता मुळीच आस कधी भेटलीस अचानक तर बोल मात्र हमखास

💘 तुझ्या असण्यात तर माझा आनंद जुडला आहे , तुझ्या डोळ्यात तर माझा गाव वसला आहे . तुझ्या ओठांवरचं हसु कधीच कमी होऊ देऊ नकोस. . . . तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे.

💘 तुझ्या आठवणी म्हणजे… मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे… नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे… स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी म्हणजे… विरह सागरात हरवलेली नाव

💘 तुझ्या आठवणी, सदैव सोबत राहतील, आयुष्य जगायला, बळ देत राहतील !

💘 तुझ्या आठवणींचा एक थेंब नेहमी माझ्या डोळ्यांच्या कोप-यात असतो, पानांवर दव चमकावे तसे नजरेत माझ्या चमकतो.

💘 तुझ्या आठवणीत मी जगतो, असं मी कधीच म्हणणार नाही. कारण आठवण्यासाठी मुळात, मी तुला कधी विसरतच नाही.

💘 तुझ्या आठवनितुन सावरल्यावर कळले , तू मला कधीच विसरली होतीस , तुला विसरान्याचे आठवनित ठेवान्यासाठी , बांधलेली गाठ मात्र जाता-जाता सोडून गेलीस

💘 तुझ्या आणि माझ्यामध्ये आता फक्त इतकेच अंतर उरले पाऊस येऊन सरून गेलाय आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले

💘 तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास आयुष्य जगायला पुरेसा आहे मला काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

💘 तुझ्या चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकढे ओढ आहे. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील राग आहे. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे.

💘 तुझ्या डोळ्यात पाहता मीच मला दिसते तुझ्यात असलेली मी पाहुन गालातल्या गालात हसते

💘 तुझ्या डोळ्यात मला माझी प्रीत दिसते तुझ्या ओठावर मला माझे गीत दिसते

💘 तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे, मला खुपच अवघड वाटतं. कविता-चारोळ्या तर लांबच, ‘नाजुक’ शब्द सुद्दा जरा जड वाटतं

💘 तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर

💘 तुझ्या नुसत्या भासाने, श्वास सुसाट धावतात माझे. मनी फक्त आस तुझी, जवळ आठवणींचे ओझे.

💘 तुझ्या पासुन दुर होण, माझ कोणतही पथ्य नाही…. कारण फक्त एकच की, पुन्हा एकदा प्रेमात पडुन विरह सहन करण आता मला शक्य नाही…

💘 तुझ्या प्रत्येक सुखात भागीदार व्हायचं … तुझ्या प्रत्येक दुखात तुझा आधार व्हायचं ….. तुझ्या प्रत्येक श्वासातला श्वास व्हायचं ….. तुझ्या प्रत्येक ठोक्यातील भाग व्हायचं… … तुझ्या मनातील वेदनांचे मलम व्हायचेआहे….. देवा जवळच्या प्रार्थनेतील मागणं व्हायचं… . तुझ्या अंधारलेल्या जीवनातील दिवा व्हायचं… .. तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं तुझ्या हसण्याचे कारण व्हायचे आहे…. श्वासाच्या शेवटल्या क्षण पर्यंत तुझ व्हायचं…

💘 तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे शेवटच्या क्षणा पर्यंत मी फक्त तुझीच आहे

💘 तुझ्या प्रेमाची आता , सवय झाली इतकी … तू सोबत असण्याची , स्वप्ने पडतात दिवसाही …

💘 तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय की मलाच मी सापडत नाही, एकटा शोधावा म्हटल पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

💘 तुझ्या माझ्या सुखात समान वाटा दुःखाचा काळजाचा ठोका दोघांच्याही हक्काचा

💘 तुझ्या मिठीतील गोडवा नेहमीच मला भावतो जसा थंडीच्या दिवसातील गारठा क्षणार्धात निघुन जातो

💘 तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… आपल्या दोघांची ती पहीलीच भेट.. तु केसात माळलेल्या गुलाबाच्या फुलाच ते देठ.. ♥ मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… आपल्या दोघांच ते तासन तास गप्पा मारण… विषय संपलेला असतांनाही त्याच्यावरतीच ते कीस पाडण… ♥ मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… चेह-यावरच तुझ ते अलगद लाजुन हसण.. आणि लाजता लाजताच हळुच ते माझ्याकडे बघण ♥ मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय… कारण…. एकदाच…. मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय…

💘 तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला

💘 तुझ्या स्वप्नील डोळ्यांत मी स्वतःला शोधत होतो तुला हसताना पाहुन मी नेहमीच हरवत होतो

💘 तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर लाजाळूचं झाडही पान पसरतं तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन पान मिटायलाही ते विसरतं

💘 तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण आज मला खुप आठवतो.. तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन मला खुप हसवतो.. तुझ ते माझ्या कड़े पाहण हळूच काहीतरी इशारे करण माझ्याकड़े बघून हसण.. अचानक नजर फिरवून लाजन अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी.. तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी. तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी.. ♥♥तुझ्यावर प्रेम करण्यासाठी♥♥

💘 तुझ्याच त्या स्मितहास्यात किती होकार लपले होते कधी काळी मला ते लाखोंनी भेटलेही होते..

💘 तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन…………… … ती आपली मुलगी असेल

💘 तुझ्यापुढं मला हे जगच वटतं लहान, जिथं आहे तुझे प्रेम महान, म्हणून्च माझं आयुष्य तुझ्यापुढं टाकलं मी गहान.

💘 तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मनात आठवत राहिल दिलासा देणारं तुझं बोलण मनाला नेहमीच हसवत राहिल

💘 तुझ्यावर प्रेम करतो हे तुला सांगायचं राहिलं हे सांगायच्या आधीच तुला दुस-याबरोबर फिरताना पाहिलं

💘 तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही,, … कारण, तुझ्याशिवा य माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही

💘 तुझ्याविना प्रेमाची कल्पनाच असह्य झाली प्रेमाला काय महत्व? हे तू मज शिकविले, प्रेम म्हणजे तू … तू म्हणजे आयुष्य. आयुष्यात प्रेमाचा अर्थ समजावला तुने तुझ्या प्रेमाची आता इतकी सवय झाली तुझ्याशिवाय प्रेमाची कल्पनाच असह्य झाली .

💘 तुझ्याशिवाय माझ्या मनात कोणा मुलीचा विचार असणार नाही तुझ्याशिवाय तसे मला फुकटचे कोणी पोसणार नाही!

💘 तुझ्यासाठी आणलेले गुलाबच लाल फुल माझ्या हातातच राहिले कारण दुसरया कुणी दिलेलं गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं

💘 तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय…

💘 तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा करून आटापिटा शोधिला तुझा थवा देवाला दिला रुपया सव्वा आता तू मला भेटशीन कव्वा

💘 तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काहीनको फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय

💘 तुम्हाला माहिती आहे देवाने असे का केले की आपल्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे दिले पण हृदय मात्र एकच दिले ??…. कारण ह्या पृथ्वीवर येऊन आपण आपल्या आवडीचे दुसरे हृदय शोधावे म्हणून.

💘 तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही, इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल

💘 तुला आठवल की तो किनारा आठवतो पायखालची ती ओली वाळूही आठवते या आठवणींच एक छोटस गाव मी वसवते हे सार डोळ्यात घेऊन पापणी डोळ्यांना मिटवत

💘 तुला काय वाटल,मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही,तु जशी रागावून गेलीस तसा काय मी रागावू शकत नही!! तुझ्या आठवणित डोळे माझे नेहमीच रडतात, पण मी कधीच रडत नाही, तुझ्या आठवणीत मन नुसत घुसमटत असत, पण मी कधीच नाही, कारण तु सुखी आहेस, तसा मिही जिवन्त आहे कारण मि तुझ्याशिवाय जगू शकता हे विष मी आता सहज पिऊ शकतो

💘 तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं. सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

💘 तुला पाहिलं त्याक्षणापासून , रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो… तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो…

💘 तुला राग आला कि तू दिसतोस छान पण एकटक पाहत राहिले की खाली झुकवतोस मान तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणारआहे तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे.

💘 तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी पण पायात अडकली आहे करियरची बेडी

💘 तू सहजच वाचून घेत असतेस माझ्या चेहऱ्यावरचे भाव मग का बर आणतोस न वाचल्याचा आव

💘 तू अशी लाजलिस की मलाही काही सूचत नाही तुज़े मुरकने पहिल्याशिवाय मला चैन पडत नाही

💘 तू आणि तुझीच आठवण आता आहेत साथीला तुझ्यामुलेच फुटलेत पंख मनातल्या प्रीतिला

💘 तू आणि पाऊस, असेच अवेळी येता, नको नको म्हणता, चिंब चिंब करून जाता.

💘 तू आणि मी,अशी फक्त कल्पना असावी सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ असावी गुलमोहराचा बहर,आणि तिथेच आपली भेट असावी जसे एखाद्या पाखराची,गोड ड्रीम डेट असावी … तू मात्र आवडत्या,आकाशी रंगाच्या पोशाखात असावी आकाशालाही हेवा वाटावा ,इतकी तू सुंदर दिसावी रंगलेल्या त्या गप्पांमध्ये,प्र ेमाची पण ओढ असावी एकमेकात गुंतून जाताना,परतीची मात्र तमा नसावी निरोप घेताना डोळ्यां मध्ये,अश्रुची एक झलक दिसावी डोळ्यां मधले भाव जाणुनी,नाजुकशी ती मिठी असावी जीवओतला तुझिया पाई,आशा तुझीही हीच असावी एकांताची साथ अशी हि, दरवेळी रम्य असावी.

💘 तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द तू केसात माळलास गजरा मी गुंतविले माझे शब्द काय सांगू तुला … त्या मोगऱ्याच्या सुगंधाने झाले माझे हृदय बेधुंद

💘 तू क्षितिजासारखा…… जवळ यायला लागलं की लांब राहतोस आणि यायचं थांबलं की आशेने पाहतोस

💘 तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी माझ्यासारखे असे काही झूरतात, माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

💘 तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब गालावरच राहायला तरसता, क्षणभर का होईना ते गुरुत्वाकर्षण विसरतात

💘 तू निखळ हसायचीस तेव्हा, मनात रिमझिम बरसात व्हायची तुझी निरागस बडबड कधी, चेह~यावर हलकसं स्मित उमटवून जायची

💘 तू पाहता क्षणी मजला काळजाचे ठोके चुकले लाजेचा पडदा येतामधे डोळे माझे आपोआप झुकले ..

💘 तू बोलत नाही काही अन् मी ही बोलत नाही पण क्षण आठवांचे गुणगुणतात काही

💘 तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कुठल्या जन्माचं ऋण होतं

💘 तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.

💘 तू माझ्या कवेत अन् , तुझे लाजूण चूर होणे… तुझ्या लाजण्याहून सुंदर , काय अजून पाहणे…

💘 तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला सुंदर दान पदरात टाकयला त्याने किती उशीर केला.

💘 तू म्हणजे आकाशातील, जणू एक चांदणी… चंद्रही बघतोय बघ, त्याच्या चांदण्या सोडूनी…

💘 तू म्हणजे तूच आहेस, मी म्हणजे मी तुझाच आहे जन्मभर राहिली साथ आपुली हीच प्रेमाची हमी आहे रुसणे,रागावणे मला चालणार नाही, तुझ्या गुलाबी गालावर ओठाने स्पर्श करणार नाही.

💘 तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे अग वेडे कस सांगू .. तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे

💘 तू रोज माझ्या समोरुन जातेस, पण हिम्मत होत नाही बोलण्याची, मनात तू आहेस खरी पण भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

💘 तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस | तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस |

💘 तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्या शिवाय माझा दिवस जात नाही.

💘 तूच सांग मी हसू तरी कस तू रुसलास तर जगू तरी कसं माझं सगळ आभाळ तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच दुसर कोण आहे शब्द शब्द मी मनात साठवून ठेवते तू भेटल्यावर मन मोकळ करते तुलाही ठाऊक आहे किती प्रेम करते तूच आहे सखा तुला आपल मानते तूच सांग मी जगू तरी कसं तू रुसलास तर हसू तरी कसं

💘 तेज असावे सूर्यासारखे प्रखरता असावी चंद्रासारखी शीतलता असावी चांदण्यासारखी प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.

💘 तेव्हा सागर किनारी साक्षीने तू घेतल्यास किती शपथा….. किती मारल्यास मिठया तू तो चंद्र ढगात लपता……..

💘 तो असेल माझ्यासाठी मैत्रीचे स्वस्तिक , प्रेमातील नास्तिक मी होऊन जाईन आस्तिक

💘 तो चंद्र आणि मी आठवतं प्रिये तुला दोघेपण कसे गोड हसतो हे सांगत होतीस मला

💘 तो चंद्र नभीचा भुलवतो बघ मज शीतल प्रेम लहरींनी आंस परी जळण्याची मजला मी तुझीच रे दिवाणी

💘 तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय

💘 तो रस्ता मला पाहून आज हसला, म्हणाला प्रेमात बिचारा फसला… हो, ती हवा आजही तिथेचं होती, नेहमी तुझे केस विसकटणारी..

💘 त्या दिवशी ची सर्वे कामे मी अलगद केली होती जाताना मी मात्र तुला घट्ट मिठी मारली होती

💘 त्या दिवशी तु फक्त माझी आणि माझी झाली होतीस कमरेला माझ्या हात घालून जेंव्हा तू घट्ट बिलगली होतिस

💘 त्या दिवशी निरोप घेताना माझ्याकडे बघुन गालात हसलीस पहिल्यांदाच काळजात धक होऊन मनात माझ्या रुतुन बसलीस

💘 त्या दिवशीही जेंव्हा ति समोर आली तेंव्हा काहीही बोललो नाही मनात सारे गेले राहुन शब्दच आज सुचलेच नाहीत

💘 त्या वळणावर मी तुला पुन्हा वळून पाहिले काय करू तुला पहिल्या शिवाय नाही राहवले

💘 थोडे थोडे म्हणताना शब्दच सारे संपून गेले दार उघडून पहिले तर रक्ताळलेले हृदय हसत मेले

💘 दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं….. तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं !

💘 दिवेलागण वणव्यासारखी पसरते रात्र झाल्यावर पण आपलं घर मात्र उजळतं तू दाराशी आल्यावर

💘 दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा… भेटायचो आपण ज्या ठिकाणी, जमल्यास त्या रस्त्यावर येऊन जा.. काय असते मनाची घालमेल, कातरवेळी तू बघून जा.. माझ्यासमोर तुझ्या नजरेत पाहून जा, क्षणोक्षणी मला मारण्यापेक्षा एकदाचं संपवून जा… दुस-याची होण्याआधी, पहिले मन माझे मारून जा

💘 देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो

💘 दोघांच्या नात्याला काय नांव आहे हे महत्वाचे नाही, नात्या मधील भावना कशी आहे हे महत्वाचे आहे …. राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग त्यांना Best Couple म्हणते

💘 नजरेत जरी अश्रू असले तरी ओठावर हास्य असाव ओठावरच्या हास्यामागे नजरेतल्या अश्रूना लपवाव.

💘 नज़र ना लागो मला कुणाची म्हणून तू माझी नजर काढून गेली ……… आठवणीत राहावे हे प्रेमळ क्षण म्हणून तू गालावर माझिया काळजाचे बोट लावून गेली

💘 नातं जपलं की सगळं जमतं, हळुहळू का होईना कोणी आपलसं बनतं, ओळख नसली जन्माची तरी साथ देऊन जातं, आठवणीँचं गाठोड अन् डोळ्यात प्रेमाचा ओलावा देऊन आपलसं करुन जातं..

💘 नाही कळले प्रेम तुला, मी शब्दांतून मांडलेले. भावनांचे ते विलक्षण मोती, माझ्या हृदयातून सांडलेले…

💘 निखळ मनाचे तुझे वागणे मला प्रेमाने साद घालणे, राग लोभ जरी आले गेले उरले केवळ जीव लावणे,

💘 निळाईच्या गर्द ह्रदयात कदातरी सामावून घेशील का? आकाशाचं स्वप्न नको मला एकदातरी आपलं म्हणशील का?

💘 नुसता कुणाला सांगता यावा म्हणून तुझा विरह जपत नाही … दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड मला दुसरे नावही खपत नाही ….

💘 नुसतेच बघायचे, न बोलता हे तुझे नेहेमीचे ओठ मुके, नजर खाली मला कसे कळायचे?

💘 नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू ………. पण तुला पाहिल्यापासून सारख वाटत आहे कि आपण भेटत राहिलो तरच जगू

💘 नेहमीच विचारायची ती मला का प्रेम करतो तू एवढं सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला हिप्नोटाइज करतोस तू मला स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला वाटायच सांगाव तिला अग वेडे प्रेम काय सांगून केले जाते बुडायला काय पाणीच लागतं अथांग काय फक्त सागरच असतो अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर चंद्रही भारावतो ह्या लाटाना म्हणूनच त्याही उफाणतात पोर्णिमा आणि अमावस्येला प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो तुझ्या असण्यातच आता माझं असण असते म्हणूच सांगतो माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत

💘 पटकन हसणे पटकन रुसणे मोहक तुझी आदा तुझ्या मोहक सौंदर्यावर आहे मी मनापासून फ़िदा

💘 पहिल्यांदा बोललीस, आणि घाबरुनच गेलीस. पुन्हा एकदा बोललीस, आणि कायमची विरघळलीस.

💘 पाऊलांची चाहूल तुझेच भास शेवटचा वाटेवर अडकतात श्वास

💘 पाऊस एकदाचा पडून जातो पावसाचे दिवस असले की आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात एकदा डोळे पुसले की

💘 पाऊस पडून गेलाय मौसम सांद्र आहे … सांगावेसे वाटतेय मला की तू माझा चंद्र आहे !!!

💘 पाऊस म्हणजे खरं सांगतो परीक्षा असते स्वत:ची किती गोष्टींची कबुली आपण देत राहतो स्वत:शी

💘 पाठवितो तारका किती मी सांगण्या माझी प्रीत तुजवरी जाळूनी तू त्यांना परी का ग मजला दूर करी?

💘 पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन, फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण, मला तुझीच साथ हवी आहे, तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि, तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही, आज कळल मला, आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात, त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात, तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल, दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल, हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु, बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु, जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही, जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही, जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही, जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

💘 पान जरी कोरं असलं,तरी पानालाही भावना असतात.मन जरी वेडं असलं,तरी मनालाही भावना असतात.पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.मनं हे असचं असतं,इकडून तिकडे बागडत असतं.मनाला काही बंधनं असतात,म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात

💘 पाय मुकेच चालतात, परी मन आठवणींना ठेचाळते. नजरे समोर गाव तुझे अंधुक, अन ही वाट स्वप्नांकडे जाते.

💘 पायातल्या काट्याने फ़क्त पाय दुखावतो मनातल्या काट्याने पूर्ण माणूस विव्हळतो

💘 पावसात भिजवासं वाटतंय , तुला घेवून आज… चल भिजू पावसात , हातात घालून हात…

💘 पावसासाठी आम्ही दोघे होतो एकदम वेडे , चिंब आम्ही होऊन जातो पडताच नक्षत्रांचे सडे .

💘 पाहशील जिथे जिथे नजर उचलून… मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 🙂 आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू…. तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..

💘 पाहीलस….आता या डोळ्यातून आसवही ओघळत नाही तुला पुन्हा पुन्हा आठवून जखमांना मी चिघळत नाही

💘 पाहून तुझ्याकडे, तो चंद्रही म्हणत असावा… रंग चांदण्यांसारखा , तुझ्यात कुठून यावा…

💘 पुन्हा एकदा प्रेमात पडण्याचा विचार आहे… तु एकदा हा बोल मग आपली साता जन्माची गाठ आहे..

💘 पुन्हा पुन्हा सांगाव तुला, तू आता माझ्या मनात नाहीस, आता मी तुला, कशातच शोधत नाही !

💘 पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये, उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये, पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये

💘 पूर्ण होणार नाही म्हणुन स्वप्नच ब घायच नाही का ..,…? आपण कधी आवडीने जीवन जगायच नाही का ……?स्वप्न जरुर बघाव आणि जीवनही जरुर जगाव कारण ….. स्वप्नांमुळेच तर आपल जीवन जगण्यायोग्य बनत असत उद्या कशासाठी जगायच हे स्वप्न मधुन ठरत असत…

💘 प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या सोबतीतला, प्रत्येक क्षण असा कि लाजवेल तो सुखाला.

💘 प्रत्येक जण कोणासाठी तरी झुरत असतो, जसा पाऊस त्या सरींसाठी, धरती त्या आकाशासाठी , सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी, पण कोणाचेही प्रेम कधी अपुरे राहत नाही , कारण सर्वाना विश्वास असतो त्या मिलनाच्या क्षिताजाचा ..

💘 प्रत्येक दिवशी आठवतात या प्रेमाची खुप कारणं, सर्वात सुंदर हेच आपलं एकमेकांच्या मनात राहणं

💘 प्रत्येक मुलीच्या आयुष्यात ऐक तरी असा मुलगा असतो.. ज्याला ती कधिच विसरु शकत नाही… आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्यात ऐक तरी अशी मुलगी असते.. जिला तो मिळवू शकत नाही…

💘 प्रत्येक वेळी फुलं समजून तुला जपत गेलो काट्यांची ओळखही होऊ दिली नाही, प्रत्येक क्षणी तुझ्या चेहऱ्यात चंद्र पहात गेलो सूर्याची किरण तुझ्यावर पडू दिली नाही, असं नाही की माझ्या प्रेमाला तू साथ दिली नाही तरी राहिली अधुरी प्रेम कहाणी, काही सीमारेषा तू न मी कुणीही पुसू शकलं नाही..

💘 प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच मागायचं का पहा कधीतरी स्वताहून देता आल तर… पाखर सुद्धा भेटतात परस्परांच्या ओढीन बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर

💘 प्रत्येक शब्द तुझ्यासाठी , प्रत्येक ओळ तुझ्यासाठी , तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो तरी, सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना.

💘 प्रत्येकाच्या मनाचा मी खूप विचार केला.. माझ्या मनाचा विचार करणार कोणीच नव्हत.. आपलेच लोक मला एकट टाकून गेले… तेव्हा रडायलाही माझ्या डोळ्यात पाणीच नव्हत..

💘 प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे.

💘 प्रियकर :- एक सांगू! प्रेयसी :- सांगना प्रियकर :- तुझे स्मितहास्य खरच खूप सुंदर आहे! ♥♥ प्रेयसी :- मी एक सांगू! प्रियकर :- सांगना! प्रेयसी :- हे स्मितहास्य फक्त तुझ्यामुळेच अस्तित्वात आहे

💘 प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस प्रेयसी :- असे का ? प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस

💘 प्रियकर :- देवा, माझी तुझ्याकडे नम्रपणे प्रार्थना आहे कि तू माझ्या सोनुला नेहमी खुशीत, मजेत, समाधानात, आरोग्यात व सदा आनंदात ठेव. देव:- अरे, तुझ्यापेक्षा मला तिची जास्त काळजी आहे आणि तुझ्या आधीपासून आहे, आणि म्हणूनच मी खास तिच्यासाठी तुला बनविले आहे …. फक्त तिच्या आनंदासाठी नाही तर तुझ्या आनंदासाठी सुद्धा !!! एकूण काय कि तुम्ही दोघे बनलात खास एकमेकांसाठी

💘 प्रियकर :- २ minutes डोळे बंद करतेस..??? प्रेयसी :- हो, हे बघ केले… प्रियकर :- खूप अंधार दिसतोयना..??? प्रेयसी :- हो… प्रियकर :- असे आहे माझे आयुष्य तुझ्याशिवाय…

💘 प्रियसी म्हणाली माझ्यासाठी जीव दे तरी तिचं म्हणणं खरं होवु दे तरी तिचं म्हणणं खरं होवु दे दिवस रात्र कर फक्त तीचेच विचार अभ्यासाचा मात्र करु नको प्रचार अभ्यास कधीही करता येईल पण प्रियसीला मात्र एकदाच मिळवता येईल

💘 प्रीतीचे ते उमलते फुल आठवणीत आहे दरवळत तुझ्या प्रेमासाठी भांड- भांड भांडलो तरी तुला कसे नाही कळत

💘 प्रेम – एक अवर्णनीय अशी भावना ♥तुला जायायचं होतं तु गेलीस..मला गमवायचं होतं मी गमवलं.. फरक फक्त एवढाचं आहे की..? तु आयुष्यातला एक क्षण गमावला.. आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य गमावलं…..♥

💘 प्रेम आणि पाऊस दोन्ही हि एकच आहेत. दोन्ही हि नेहमी अविस्मरणीय असतात. पाऊस जवळ राहुन अंग भिजवतो आणि प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!

💘 प्रेम आहे निशब्द शब्दांनाही न सापडणार प्रेम आहे गुपित कुणालाही न उलगडणारं प्रेम आहे भावनिक स्पर्शालाही न कळणारं प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार.

💘 प्रेम एक आठवण आहे हळूवारपणे जीवलग माणसाशी ह्रदयात केलेली साठवण आहे

💘 प्रेम कधी मागून मिळत नाही ते आतून जाणवावं लागतं, नजरेतून कळलं तरी शब्दांतून सांगावं लागतं…. रोज तुझी आठवण येते आणि रोज डोळ्यांत पाणी उभं राहत, तू जवळ हवीस असं वाटताना खूप दूर आहेस,हे सांगून जातं…. कित्येकदा तुला सांगावसं वाटतं पण शब्द ओठातच गुदमरतात, पापण्यांची अबोल किलबिल होते आणि शब्द डोळ्यांतच उमटतात…. माझ्या नजरेचा अथॅ तुला समजावा म्हणून मी शब्दांची वाट धरली, ते शब्द वाचूनही तू अबोध राहिलीस या वाटेवर येऊन मी चूक तर नाही केली..? का,कोणासाठी इतके वाटावे? का,कोणासाठी इतके झुरावे? अनोळखी,तरीही परिचित असावे, यालाच का प्रेम म्हणावे? असं नातं आहे आपल्यात जे आपल्या दोघानाही सांगता येत नाही, मनात भावनांची गुंफण होऊनही शब्द् माञ ओठांवर येत नाहीत..

💘 प्रेम कर अस अगदी माझ्यासारखं प्रेमासाठी मार चंद्रावरुन उडी आणी मोडुन घे स्वत:ची तंगडी प्रेमासाठी केलास जरि कोणाचा खुन तरी पळुन जावु नकोस भिऊन प्रेमासाठी काढ अंगातील रक्त पण प्रेमातुन होवु नको विरक्त प्रेम कर अस अगदी माझ्यासारखं

💘 प्रेम करणं सोपं नसतं… प्रेम करणं सोपं नसतं… सर्व करतात, म्हणून करायच नसतं.. चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं… पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं…. तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं… कारण प्रेम करणं सोपं नसतं…

💘 प्रेम करणार तू अन त्रास मनाला दगा देणार ती अन दोष देवाला

💘 प्रेम करत असाल तर खर करा टाइम पास म्हणून करू नका, तुमच्या विरहात एखाद्याला जगन मुश्किल करू नका

💘 प्रेम करतो तुझ्यावर… सोडून मला जाऊ नकोस… खुप स्वप्न बघितलित….. तोडून कधी जाऊ नकोस…. कधी प्रेम करायचीस माझ्यावर… हे कधी विसरु नकोस….. नको करूस प्रेम… तिरस्कार मात्र करू नकोस… विसरलीस माझ प्रेम तरी चालेल…. मैत्री माझी विसरु नकोस….. सोडून गेलीस तू मला…. प्रेम माझ विसरु नकोस… मरणाच्या वाटेवर असताना… कालजी माझी करू नकोस… मरण जरी आल मला…. मरना वर माझ्या अश्रु मात्र काढू नकोस

💘 प्रेम करतो हे सांगण, तसे अगदी सोपे आहे, पण खरे प्रेम निभवण, आहे खूप कठीण, बोलायला तर लोक,…..¤ ¤ सहजच बोलून जातात , … वेळ येते निभवण्याची खरी, तर म्हणतात आपल्यात, आता दुरीच बरी…….

💘 प्रेम करतोस ना तिच्यावर,मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव, तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव…. असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार, तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार… नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल, का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल… नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव, नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव… नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी, काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी… खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती, कशाला दाखवतोस उगाच तिला जिवाचि भिती…तूझे हे सच्चे रुप पाहून कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग तुझ्या प्रेमाचा आजार…अखेर तरीही नसेल तिचा होकार तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा एकतर्फी प्रेमाचा बाजार…

💘 प्रेम करायचाच म्हटल तर कुनाशिही जमत नाही मनासारख्या जोड़ी दाराशिवाय संसारात मन रमत नाही

💘 प्रेम कस असत ते मला बघायचंय भरभरून तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय..♥ ♥♥ श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय ..♥♥♥

💘 प्रेम कसे करावे याचे देखिल क्लासेस आहेत… फेल होणा-यांचा हातात दारुन भरलेले ग्लास आहेत..!

💘 प्रेम कसे करावे.. ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा.. प्रेम कसे करावे.. ह्याचाहि कुठेतरी क्लास असावा..आणि.. .. … .आणि प्रेमात नापास होणाऱ्यांसठी १७ नंबरचा फॉर्म असावा

💘 प्रेम काय असत हे माहीत नव्हत, प्रेमात कस पडतात ते माहीत नव्हत, प्रेम हा मुळात आपला विषयच नव्हता, मग त्यात पास होण्याचा प्रश्नच येत नव्हता.. तिच्या अबोल हसण्याला मी काय नाव देऊ, डोळ्यातल्या भावनांना कसे जाणून घेऊ, तिच्यवर खरेच प्रेम केले, हे तिला पटवून कसे देऊ…

💘 प्रेम जेव्हा उमलत होतं तेव्हाच सारं बरसत होतं आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला तेच तेव्हा फसवत होतं.

💘 प्रेम नसावे कापरासारखे झुर्रकन उडून जाण्यासारखे प्रेम असावेअत्तरासारखे आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे.

💘 प्रेम प्रेम प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं . पकडलो गेलो कुणासमोर तर मात्र शेम असतं .

💘 प्रेम म्हणजे डोळ्या समोर झालेली चोरी पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही आणि जे चोरीला गेला आहे ते परत मागवसही वाटत नाही आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही

💘 प्रेम म्हणजे….. रोज रात्री आकाशात तारा तूटतो का हे पाहणं असतं, कारण त्या तुटणाऱ्‍या ताऱ्‍याकडे तो आपलाच व्हावा हे मागंण असतं….. प्रेम म्हणजे….. डोळे बंद केले की त्याचंच दिसणं असतं, तर डोळे उघडले की त्याचचं शोधणं असतं….. प्रेम म्हणजे….. एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं प्रेम म्हणजे….. आपलं आकाशात उंच-उंच उडणं असूनही, नजरेचं तो खाली कुठे आहे हेच शोधणं असतं….. प्रेम म्हणजे….. प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं….. प्रेम म्हणजे….. कधीही न आवडलेल्या गोंष्टीच तो भेटल्यावर त्याला आवडतात म्हणुन आवडणं असतं….. प्रेम म्हणजे….. त्याच्या गुणांवर तर भाळायचेच असतं,पण त्यापेक्षाही त्याच्यात असलेल्या दोषाचं स्वीकारणं असतं….. प्रेम म्हणजे….. त्याचं या जगातील अस्थित्व संपलय निव्वळ त्याला दिलेल्या वचनामुळे डोळ्यात अश्रू असून सुद्धा ओठावर हसणं असतं………..

💘 प्रेम हा असा शब्द आहे कि जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही आणि जर त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत नाही

💘 प्रेम हृदयातील एक भावना.. कुणाला कळलेली.. कुणाला कळून न कळलेली.. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली.. तर कुणी आयुष्यभर लपवलेली… कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. तर कुणाची गंमत झालेली.. कुणाचे आयुष्य उभारणारी.. तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी.. फक्त एक भावना.

💘 प्रेम हे असच असत…. करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत… उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत… प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते… लोक म्हणतात काय असतप्रेमात.., करून बघा एकदा.., काय नसत प्रेमात…? प्रेम हे सांगून होतनसत…, मित्रानो ते झाल्यावरच कळत असत.. दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूकधागा असतो… दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना ऐकवणारा एक भाव असतो… प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते… दोन शब्दात ती कधीच समजत नसते …

💘 प्रेम हे जिवनासाठी आहे , पण जिवन हे प्रेमासाठी नाही, प्रेम हे जिवनात असु शकते, पण जिवन प्रेमात असु शकत नाही , प्रेमात जिवन वाया घालवू नका , पण जिवनात प्रेम करायला विसरु नका

💘 प्रेम हे तेव्हा आहे जेव्हा प्रियकर प्रेयसी कडे किस मागतो, व प्रेयसी आपले डोळे बंद करून ला किस करायला परवानगी देते ……………… पण प्रियकर तिच्या ओठांवर किस न करता कपाळावर किस करून म्हणतो , आपल्याकडे अजून पूर्ण आयुष्य पडले आहे ♥ ♥ ♥ तात्पर्य :- प्रेमाचा व विश्वासाचा पूल फक्त आणि फक्त मानसिक संबधाने बांधला जातो.

💘 प्रेम हे फुलपाखरा सारखे आहे जेव्हा तुम्ही त्याला पकडायला जाता तेव्हा ते दुसरीकडे उडून जाते पण जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा ते हळूच येते आणि तुम्हाला स्पर्श करते, तुमचे होउन जाते म्हणून वाट बघुयात आपापल्या फुलपाखराची

💘 प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते. आणि आयुष्यभर निभवायचे असते. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते.

💘 प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग खुपच अरुंद असतो ज्याच्यावरुन दोघेजण कधीच एकत्र चालू शकत नाही, कारण त्यांना पुढे चालण्यासाठी मनापासुन एक होणे गरजेचे आहे.

💘 प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय, कधी न जाणवणारा सुगंध सभोवार दरवळू लागलाय

💘 प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही.

💘 प्रेमाचे गुंतवून धागे दूर अशी जाऊ नकोस, मलासुध्दा मन आहे हे विसरुन जाऊ नकोस

💘 प्रेमाच्या गावात घसरला पाय, आजच्या मुलींचा भरवसा काय? एकाला हाय,दुस-याला बाय तिस-यासंगे पळून जाय……

💘 प्रेमाच्या वेलीवर सर्वच फ़ुले फ़ुलतात असे नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात असे नाही प्रेमा सारखे बंधन ज्याला सिमा नसतात हे आपण जाणतो पण प्रेमाच्या बंधनाला सर्वच जाणतातच असे नाहीकुणी तरी म्हटलय प्रेमा मध्ये हातावरील रेषांना ही.. आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत सर्वच थांबतात असे नाही..

💘 प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

💘 प्रेमात नसावा आकस प्रेमात नसावी इर्षा एकमेकांवरील विश्वास हीच असते प्रेमाची अपेक्षा

💘 प्रेमात असं थांबायच नसतं, मागे न वळता पुढेच चालायच असतं.. ऎकमेकांची साथ घेऊन जग जिंकायचं असतं

💘 प्रेमात आलेले अश्रु आणी लहान मुलाचे अश्रु दोन्हि सारखेच असतात कारणं दोघांनाही माहीत असतं की दुःख काय आहे पण कोनाला सांगु शकत नाही.

💘 प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला गोडी येणार नाही आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

💘 प्रेमात नसते कधी शिक्षा प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा करून तर बघा निस्वार्थी मनाने उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा

💘 प्रेमात पडलं की असच होणार..! दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार, स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुनउरणार … येता जाता उठता बसता, फक्त तिचीच आठवण होणार तुमच काय, माझं काय, प्रेमात पडलं की असच होणार..!

💘 प्रेमाला नात्यात बसवण खुपदा प्रेमाला घातक ठरत पण ते तस नाही बसवल तर लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.

💘 प्रेयसी :- प्रेमाचे चिन्ह जे बदाम त्यातून नेहमी आरपार गेलेला बाण का दाखवितात ? प्रियकर :- जसे रस्त्यावरील रहदारीचे चिन्ह गाडी चालविण्याराला सावधानतेचा इशारा देते, तसेच प्रेमात पडू पाहणार्या मित्र- मैत्रिणी साठी हा सावधानतेचा इशारा आहे, कि बाबांनो प्रेमात पडत आहात, पण जरा जपून, हा बाण टोचतो आणि हृदय दुखवले जाते

💘 प्रेयसी :- माझ्यावर प्रेम करशील , माझे बाकी राहिलेले आयुष्यभर ? प्रियकर :- नाही, तुझ्यावर प्रेम करत राहेन, माझे बाकी राहिलेले आयुष्यभर

💘 फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी, तो आहे दूर कुठे तरी.. फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी… नाही मी तिचा , हे जाणून नहि…. फक्त माझ्याचसाठी जगणारी… अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं, आजून हि पाळणारी…

💘 फुल कधी म्हणत नाही की सुगंध नेहमी वा-यावरच फिरतो, कारण, त्यालाही माहीत असतं कितीही दुर गेला तरी तो फुलाचाच असतो

💘 फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणी प्रेम करायला जन्माला यावं लागतं

💘 फुलांनाही तू जवळ करू नकोस भरोसा नाही त्यांचा मनाचा चुकून स्पर्श करशील ओठांनी, पण फायदा घेतील ते तुझ्या भोळेपणाचा…

💘 बंद घरात बंद तो चिमणा, काचेच्या खिडकीवर झडपा मारत होता… प्रेमासाठी आसुसलेला तो स्वत्ताची रक्तबंबाळ चोचही विसरत होता

💘 बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बैचेन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित, ज्याच्यावि ना आयुष्य थांबते…♥ ♥♥

💘 बघतो दुरूनच तुला मी रात्र रात्र मज झोप नाही भोवती तुझ्या फिरताना छंद दुसरा उरलाच नाही

💘 बर्फासारख्या थंडी मध्ये , तुज्या मिठीत लपावस वाटत . एका जन्माच आयुष्य , एका क्षणात जगावस वाटत٠٠••♥♥

💘 बोटांना माझ्या आता वेगळं राहायला आवडत नाही .. तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय त्यांना ही करमत नाही ….

💘 बोलत नाहीस पण हसतेस मी बघितले की लाजतेस नक्की प्रेम करतेस ? का मला उगीचच कोड्यात असे टाकतेस.

💘 बोलताही येत नाहीआणि लपविताही येत नाही तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगताही येत नाही पहिले जेव्हा तुला फक्त तुलाच बघत राहिलो फक्त तुलाच पहावे असेच दिनक्रम करत राहिलो … खरच तुझ्या नादाने मी स्वता लाच हरवत राहिलो काय करू प्रेमाचा ताज महल्ला सजवीताही येत नाही बोलताही येत नाही आणि लपविताही येत नाही

💘 भरू दे आकाश कितीही ढगांनी खऱ्या प्रेमापुढे ते ढग ही निवतील, लाख येवू दे अडथळे, , तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील..

💘 भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात सांभाळण्यासाठी होत बरच काही माझ्या या विचित्र स्वभावाला तुझ्याकडे आहे का औषध खरच काही….

💘 भावना ओंजलित घेउन नको जगुस ,,,,,,, त्या व्यक्त करन्यात मजा आहे… डोळ्यात अश्रु नेहमीच येतात, ते पुसुन हसन्यात मजा आहे…….

💘 भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते

💘 भावनांच्या एका दुरच्या गावी एक वेडा राहातो क्षणोक्षणी जागेपणी तुझी स्वप्ने पाहातो

💘 भावनाना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रुना लापवन्या इतके ते सुद्धा कठिन असते .

💘 भिजून गेला वारा ….. रुजून आल्या गारा … बेभान झाली हवा …. पिऊन पाऊस ओला …… येना जरा तू येना जरा …… प्रेमाची चाहूल देना जरा ……

💘 भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो, तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.

💘 मऊपण काय असत हे तिच्या एका स्पर्शाने सांगितलं त्या एका स्पर्शातच मी तीच प्रेम मागितलं

💘 मन भिजून जात ना, ऐनवेळी पावसान गाठल्यावर.. अगदी तसाच वाटते मग, तुझ्या कुशीत मिटल्यावर..

💘 मनात आठवणी तर खुप असतात… कालांतराने त्या सरून जातात… तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात… जे हृदयात घर करून राहतात

💘 मनात आहेस तु ,पण जीवनात आली नाहिस तु . दिलात आहेस तु ,पण संसारात आली नाहीस तु . फुलात आहेस तु .पण सुंगध द्यायला आली नाहिस तु . हृदयाच्या स्पदंनात आहेस तु ,पण माझ्या आयूष्यात आली नाहिस तु . पण माझे श्वास तुझ्याविना जीवन जगु शकत नाही . तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवला . पण माझ्या प्रेमाचा विश्वास घात केलास तू .

💘 मनात तुझ्या नसतानाही मागे वळून पाहशील का ? तुझ्याचसाठी थांबलो इथे दोन शब्द बोलशील का ? पाहून पाहून दमलो मी अखेरतू पाहशील का ? कोंडल्या भावना,वाट देशील का ? स्वप्न पाही मन माझं तुझंही असच होतं का ? मनात तुझ्या नसतानाही कबुल तू करशील का ?

💘 मनात दाटले भावनांचे धुके, तुझ्या जिद्दीपुढे हरून, माझे शब्दही झाले मुके….

💘 मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते …..

💘 मनातले बोल ओठांवर येत नाही कधी तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते

💘 मनातले सारे काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो . . एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं

💘 मला कळतय ग तुझं उदास आणि बैचेन मन मी पण तुझ्याच आठवणीत हरवुन जातो प्रत्येक क्षण

💘 मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे

💘 मला तुझ्या ह्रदयात शोध , मी तुला तिथेच भेटेन… मी जगेण तरी कसा , जर तुझ्या दुर असेन…

💘 मला वाटले होते कि प्रेम हे मनाचे मृगजळ आहे आणि हि एक फक्त कल्पना आहे जी बिलकुल अस्तित्वात नाहीये, पण जेव्हापासून मी तुला पाहिले आहे तेव्हा पासून मला प्रेम जाणवायला लागले आहे, ते मृगजळ नसून खरे आहे हे कळायला लागले आहे, एवढंच नव्हे तर मला हेही कळाले आहे कि प्रेम हे दुसरीकडे तिसरीकडे कुठेही नसून तुझ्या व माझ्या हृदयात वास्तव्यास आहे

💘 मला वेड लागलय हा दावाच तकलादू आहे मी वेड्यासारखा वागतोय ही तर प्रेमाची जादू आहे !!

💘 मलाही कळले नाही , तू माझी झालीस कधी… आठवण तुझीच आता , सारखी येत होती…

💘 मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय मग तरीही आपण गप्प का आहोत .. कारण मनातल ओठांवर यायला वेळ लागतो , आणि जे आगदी ओठांवर आलाय ते बोलून दाखवायलाही

💘 मागूनही जे मिळत नसतं….तेच खरं प्रेम असतं…. मनात असूनही जे देता येत नसतं….तेच खरं प्रेम असतं…. खूप समजावूनही जे भरकटत असतं…तेच खरं प्रेम असतं…. उभ्या संकटातही जे शांत असतं….तेच खरं प्रेम असतं…. सांडलं तरी जे भरत असतं….तेच खरं प्रेम असतं…. विसरलं तरी जे आठवत असतं….तेच खरं प्रेम असतं…. वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं….तेच खरं प्रेम असतं…. डोळे बंद केलं तरी जे दिसत असतं….तेच खरं प्रेम असतं…. हवं असतानाही जे मागता येत नसतं….तेच खरं प्रेम असतं…. अन् न मागताही जे मिळत असतं….तेच खरं प्रेम असतं….

💘 माझं स्वप्न आहे, तुझ्यासोबत जगण्याचं, हातात हात घेऊन,एकाच दिशेन चालण्याचं, माझं स्वप्न आहे,तुला जवळून पाहण्याचं, जवळ तुला घेऊन,एकदा मिठीत घेण्याचं, माझं स्वप्न आहे,तुझ्या सोबत राहण्याचं, छोठसं घरट बांधून,त्यात दोघांनीच राहण्याचं, माझं स्वप्न आहे,तू स्वप्न बघण्याचं, आणि दोघांनी मिळून,ती पूर्ण करण्याचं, माझं स्वप्न आहे,मी चित्र रेखाटण्याचं, त्यात रंग भरून,ते तू रंगवण्याचं

💘 माझं स्वप्नं मी पाहतो नेहमी एक स्वप्नं जागेपणी तीच तू , तोच मी , डोळ्यातून बोलणारी , स्पर्शातून फुलणारी , ती प्रीतही तशीच आहे. पण आज आहेत आपल्याभोवती, सुखदु:खाच्या चार भिंती, आपल्या छोट्याशा विश्वाची, आपल्यापुरती समाप्ती. या वात्सल्य विश्वात , रांगतंय भविष्य आपलं एक सुंदर गोड स्वप्नं , आपल्या प्रीतीला पडलेलं ! माझं एव्हढ स्वप्नं, जरा पहाटेला कळू दे. तुझ्या कुशीत माझ्या, प्रेमाचा अंकुर फुलू दे…..

💘 माझा आधार व्हायला शब्द कधिही तयार असतात अगदि तसच माझा आजार व्हायला तुझ्या आठवणिही तयार असतात

💘 माझा श्वास तर केवळ तुझ्या मनात दरवळतो मी तर तू दिलेल्या श्वासातूनच जीवन जगतो

💘 माझी कविता वाचताना…… नेहमी डोळे गळतात, तिच्या आयुष्याचे धागे म्हणे माझ्या जीवनाशी जुळतात

💘 माझे डोळे, तुझे झाले पाहीजे ………. तेव्हाच तुला कळेल माझ्या नजरेत तू किती सुंदर आहेस ते माझे हृदय, तुझे झाले पाहीजे ……… तेव्हाच तुला माझ्या प्रेमाच्या नाजूक भावना कळून येतील माझे कान , तुझे झाले पाहीजे ………. तेव्हाच प्रत्येक क्षणाला माझ्या मनातून निघणारा आवाज (I Love You) हा तू ऐकू शकशील

💘 माझे तुझ्यावरचे प्रेम हे एका कागदा सारखे आहे, एक असा कागद ज्यावर तू तुझी भावना लिहू शकतेस, तुझा राग खरडू शकतेस, तुझे आश्रू पुसण्यासाठी मला वापरू शकतेस, फक्त वापरून झाल्यावर मला फेकून देऊ नकोस, कारण मला सदैव तुझ्याबरोबर राहायचे आहे …….. पण हो, जर तुला खूप थंडी वाजून आली तर मात्र उब मिळविण्यासाठी तू मला जाळू शकतेस ♥ ……….. कारण मरताणा सुद्धा तुला उब देण्यासारख निस्वार्थी व विशाल प्रेम मी तुज्यावर करतो

💘 माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली .

💘 माझ्या आठवणींना, तुझ्या सोबतीची जोड असते. तू सोबत असलीस, कि प्रत्येक आठवण गोड असते.

💘 माझ्या ओंजळीतुन तुझ्या आठवणींची नेहमी पिसं मी उडवावी… अलगद अशी उडुन ती, पुन्हा माझ्याच पदरत पडावी…

💘 माझ्या डोळ्यांची भाषा तुझ्या डोळ्यांनी बोलशील का? सावली सारखी सखे माझ्या सोबत चालशील का?

💘 माझ्या प्रत्येक श्वासात तुझ्या आठवणींचा गंध आहे दूर बघ तो पारवा कसा आपल्यातच धुंद आहे

💘 माझ्या मनात काय आहे, ते तु अचुक ओळखतेस .. ओळखूनी मग असे तु मला पुन्हा पुन्हा तेच का विचारतेस !

💘 माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही. जोपर्यंत त्या गीताला तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

💘 माझ्या सावलीला हि सवय तुझ्या आठवणींची.. आठवणी त्याच तुझ्या पांघरून घेण्याची.. क्षिताजाच्या समांतर तुही आहेस आशा बाळगण्याची.. एकटेपण स्वतःच स्वतःशी वाटून घेण्याची.. सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची..

💘 माझ्या हसण्याला तू पण खळखळुन दिलीस दाद त्या शीतल चंद्राच्या छायेत पण मज वाटली घालावी तुला साद

💘 माझ्याकडे कारण नाही की, तू मला का आवडतेस.. माझ्याकडे प्रुफ नाही की, मी तुझ्यावर प्रेम करतो.. माझ्याकडे माप नाही की, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवतो.. माझ्याकडे फक्त एवढेचं आहे की, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझाचं आहे हे ठाम सांगू शकतो..

💘 माझ्याकडे बघुन जेंव्हा एखादे फ़ूल हसते खरे सांगू…… त्यात मला तुझे रुप दिसते.

💘 माझ्यावरचा तुझा अधिकार, आता मलाही नकोय, श्वासा वरचा हा भार, आता मलाही नकोय !

💘 माझ्यासमवेत जगताना तू किती भावुक होतोस सर्व काही मलाच देऊन तू रिकामा कसा राहतोस

💘 माझ्यासाठी प्रेम म्हणजे मोठ्ठ कुतूहल आहे पडले नाही तरी लागते अशी एक चाहूल आहे

💘 माझ्याहून अधिक माझा तुझ्यावर विश्वास होता मला काय ठाऊक तो उधार घेतलेला श्वास होता

💘 माहीत नाही पुन्हा कधी भेटु वेगळ्या रस्त्यावर चलताना अन जुळतील का आपल्या तारा वेगळ्या जगात राहताना…

💘 मिटलेल्या डोळ्यांमध्ये तुझेच प्रतिबिंब बेमोसमी पावसात नुस्ता भिजलोय चिंब चिंब

💘 मिठीत तुझ्या असतांना,वेळेनही थोडं थांबावं.. अन् शक्य नसल या आयुष्यात तरी, जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये, गणितच थोडं वेगळ असावं..

💘 मी असाच आहे.. मी असाच आहे.. कसाही असलो तरी फक्त तुझाच आहे.. भेटलो नाही कधी तरी..? भेट तुझी नि माझी नेहमीच आहे.. रागवणं हा तर फक्त बहाना आहे.. प्रेम वाढविण्याचा हा नविन FORMULA आहे.. तुझी आठवण येते, हे तर कारण आहे..? वेडे, तुला विनाकारण छळणं हा तर, माझा स्वभाव आहे..

💘 मी आपला येडा खुळा बोलतो दिल खुलास पण जीव जडलाय माझा तुझ्यावर, आहे का तुला त्याचा आभास !

💘 मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़ अजुन ही तुला हे कसे कळत नाही तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

💘 मी खुपदा प्रयत्नकेला, तुला कायमच विसरण्याचा , पण का कुणास ठाऊक, कुठल्या न कुठल्या कारणाने, प्रत्येक वेळी नजरेसमोर, आला नेहमीच चेहरा तुझा, ठरवल विचारातून दूर जायचं तुझ्या, नेमका त्याच वेळी आठवणीत यायचा तू माझ्या, तुला विसरण्याच् या नादात मी पडली प्रेमात तुझ्या, म्हणूनच ठरवली आता नाही जाणार दूर आयुष्यातून तुझ्या

💘 मी डोळे बंद करताच तुजी आठवण तुला सोबत घेऊन येत होते….. उघडतच डोळे निघून जातेस म्हणून मी कायमचे डोळे मिटले होते….

💘 मी तर तेथेच होते वाट बघत…. तुझिच नजर ना वळली…. प्रित मझ्या मनाची सदा… तुलाच ति का न कळली?

💘 मी प्रेम केलं…………… तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर, हृदयातील स्पन्दनावर, माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर, मी फक्त प्रेम केलं …………… प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मानाने………. प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने……… मी फक्त प्रेम केलं मनापासून…….मनावर…

💘 मी सांगत नाही तुला , भरभरुन प्रेम दे… पण जेवढं देशील , ते ह्रदयातून येऊ दे…

💘 मी ही प्रेम केलेलं त्याच्यावर पण त्याला नाही ते जाणवलं त्याने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल म्हनाला ….. मित्र राहिल आयुष्यभर पण प्रेम करणार नाही संकटाच्या वेळी साथ देईल पण संसार करणार नाही….

💘 मुक्या भावनांना तेव्हा शब्दांची गरज नव्हती मनातल्या समुद्राला थांगपत्त्याची गरज नव्हती चांदण्यांच्या ओहोटीतही शब्दचंद्र अपूर्ण होता निदान तेव्हा निमित्ताला कारणांची गरज नव्हती

💘 मुक्या हुंदक्याचे गाणे कोणाला कळावे, छळावे स्वता: ला निखारे क्षणांचेच व्हावे…… जडे जीव ज्याचा त्याच्याच का रे नशीबी असे घाव यावे…….

💘 मुसळधार पाऊस… छत्री एकच हवेत गारवा… मनात अंगार पाऊस चिंबचिंब…भिजलेला कधी तुझ्या..मनात कधी माझ्या..मनात.

💘 मोकळ्या हवेचा श्वास दे, मला पुन्हा एकदा जगण्याचा भास दे. आज चांदण्याही विजलेत बघ, त्यान्हाही चमकण्याचा ध्यास दे

💘 मोठे होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगांव लागत , सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं , मनापासुन प्रेम करणारा कधीच वेडा नसतो , कारण ते ‘ वेड ‘ समजून घेण्यासाठी कधीतरी मनापासुन प्रेम करावं लागतं

💘 मोलाचे वाटतात मला तुझ्या सोबतचे क्षण पण ते निघून जातात पुन्हा बेचैन होते मन

💘 मौन असह्य झाल्यावर तू एक उसासा सोदलास. अन पुन्हा पुढचा क्षण त्या मुक्या मौनाला जोडलास..

💘 यापुढे मला नाही जमणार हसर्‍या चेहर्‍यामागे दुःखं लपवायला तुझ्या गोठ्यातली मी गाय नाही प्रत्येक गोष्टीपुढे मान झुकवायला

💘 यालाच प्रेम म्हणायचं असत…♥♥ ♥उगाचच्या रुसव्यांना तू मला मनवण्याला, प्रेम म्हणायच असत…♥♥ ♥एकमेका आठवायला… आणि आठवणी जपण्याला, प्रेम म्हणायचं असत….♥♥ ♥थोडस झुरण्याला, स्वतःच न उरण्याला, प्रेम म्हणायचं असत…♥♥ ♥भविष्याची स्वप्न रंगवत, आज आनंदात जगण्याला, प्रेम म्हणायचं असत…♥♥ ♥कितीही रागावल तरी, एकमेका सावरायला, प्रेम म्हणायचं असत…♥♥ ♥शब्दातून बरसायला, स्पर्शाने धुंद होण्याला, प्रेम म्हणायचं असत…♥♥ ♥तुझ माझ अस न राहता, ‘आपल’ म्हणून जगायला, प्रेम म्हणायचं असत……..

💘 यालाच म्हणतात का प्रेम….? तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा, आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा, यालाच म्हणतात का प्रेम….? तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल, आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल, यालाच म्हणतात का प्रेम….? तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास, आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणाराभास, यालाच म्हणतात का प्रेम….? तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव, आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव, यालाच म्हणतात का प्रेम….? तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेलात िला स्पर्श, आणि हे सर्व वाचून, तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्याअ क्षयला झालेला हर्ष, कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम….!

💘 युध्दात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं पण महागाईच्या या जगात युद्धा आणि प्रेम टिकवणं अक्षम्य असतं.

💘 येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.

💘 येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही.

💘 येती भरून आकाशी पावसाळी हे ढग किती साहू रे मी सख्या तुझ्या विरहाची धग.

💘 रात अशी ही तंद्रित पापणिहि बघ लवते आहे ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे

💘 रातराणी उमलावी तशी उमलतेस, मनापासून दरावळतेस, खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस

💘 रातराणीच्या फुलांनी हि सांज बहरू दे, तुझ्या आठवणींच्या सुगंधाने माझे मन दरवळू दे.

💘 रात्रं पटकन सरते तुला उराशी धरून मग दिवसभर तुला पहात राहते मी परक्यासारखं दुरून

💘 रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं.. हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं ती नसताना तिचं असणं प्रेम असतं.. गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं.. तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं.. तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं..

💘 रात्रीची जागी राहून मी त्या चांदनिला बघत होती ती सुद्धा माझ्याप्रमाणे एकटीच हसत होती……..

💘 रिकाम्या आभाळातच चांदण्यांची जोडी असते, फरक एवढाच ती आपणास दिसत नसते. सागरामधील शिंपल्यातहि एक मोती असतो, जो सहज कोणालाही मिळत नसतो, तशीच हि मैत्री असते जी जीवनात सगळ्यांच्याच येते पण तिची ओढ सगळ्यानाच नसते…….

💘 रुप तुझे वर्णाया अक्षरे माझी तोकडी पडावी , एक स्मितहास्य तुझे बस्स, एक गझल बनावी आसमंत गंधाळावा, सुगंधीत श्वासांनी तुझ्या, छटा आसमंताची त्या, माझ्या मिठीत मिळावी मादकता तुझ्या स्पर्शात, नजरेत असे नशा, फक्तच कल्पनेने तुझ्या, काळीजं घायाळावी असूया तुझ्या सौंदर्याची ग्रह, तारे, नक्षत्रांनाही, अंश तुझा मिळावा, आसक्ती त्यांनाही असावी, विसावता मिठीत माझ्या गौरवर्ण मुर्त तुझी, अमुर्त ती प्रीत माझी आपसुकच विरघळावी…

💘 रुसून बसने तिचे मला खूप आवडते काही न बोलता ओंजळीत टाकली फुले की मिठीतच स्थिरावते

💘 रेशमी धाग्यांचं ते एक बंधन असतं सुगंधी असं ते एक चंदन असतं, पावसात कधी ते भिजत असतं वसंतात कधी ते हसत असतं, जवळ असताना जाणवत नसतं, दूर असताना रहावत नसतं, प्रेमाचं नातं हे असच असतं, म्हणुन ते जपायचं असतं..

💘 रोज फूल तोडत होतो मी तुझ्या केसांसाठी पण तू सुगंधही नाही ठेवलास माझ्या सरत्या श्वासांसाठी

💘 रोजचेच झालय आता एकांता मध्ये जाणे अन् तुझ्या आठवणीत स्वाताला विसरुन बसणे

💘 लग्नानंतर तुझे नाव बदलायचा बेत नाही …. कारण आता या नावाशिवाय मला जगताच येत नाही !!!

💘 लाटांचे प्रेम होते किना-यावर, पण तिचे लग्न झाले सागराबरोबर, किना-याची प्रिती तिला खेचत आणते. पण किना-याला डाग लागु नये म्हणुन ती परत जाते. हेच खर प्रेम.

💘 लिहतो आहे कविता फक्त तुझ्यासाठी .. वेडा प्रेमी झालो फक्त तुझ्यासाठी .. आणखी कुणाला नाही बघणार आता हे नयन माझे.. तरसतील नयन माझे फक्त तुला पाहण्यासाठी.. प्रत्येक श्वास माझा आठवण काढेल तुझीचं.. हा श्वास ही निघेल कदाचीत फक्त तुझ्यासाठी .. सर्वांन पेक्षा मला तु खुपचं जास्त आवडतेस.. मी प्रेम ही शिकलो ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी .

💘 लोक म्हणतात कि मनाची जखम बरी होण्यास वेळ हेच औषध आहे पण खरेतर वेळेपेक्षा प्रेम हे मनाची जखम लवकर भरून काढते प्रेमाचे औषध घेऊन जर आपला साथीदार जर आपल्यासमोर असेल तर मनाच्या जखम कशी टिकून राहणार … नाहीका

💘 वर्षाच्या प्रत्येक महिन्याला.. महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला दिवसाच्या प्रत्येक तासाला तासांच्या प्रत्येक मिनिटाला मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला आठवण येते तुझी मला प्रत्येक क्षणा- क्षणाला.

💘 वाट पाहता पाहता तुझी , संध्याकाल ही टळुन गेली. तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या, पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ..

💘 वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , एकदा मनापासून मला आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन

💘 वाटलं होतं होकार देशील म्हणून मी तुला प्रफोज केलं पण जेव्हा तू नकार दिलास तेव्हा मात्र माझं काळीज फाटलं होतं

💘 वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे ते सहज कस कोणाला वाचता येईल

💘 विरहातही प्रेम असत प्रेमात सगळ माफ असत सजा देणारे तुम्ही आम्ही कोण प्रेमच प्रेमाची परीक्षा पाहत असत

💘 विसरण्याची …, हजार कारणे शोधशील तु … एकही सापडणार नाही … इतका दुरावा असेल .., तुझ्यात नि माझ्यात की .., यापुढे मी कधीही … आठवण तुझी काढणार नाही … श्वासांत मात्र उरतील …, श्वास तुझे … तेवढे मात्र …, शेवट पर्यंत जपणार मी … त्यावर तुझा हक्क …, कदापि असणार नाही

💘 विसरण्यासाठीच तुला आता, मि खूप काही करत आहे.. विसरूनच जाईन तुला, असंच पक्क मनीशी ठरवत आहे. पण नकळत कुठून एक झुळूक वाऱ्याची येते. स्पर्शून या वेड्या मनाला वाहवत नेते.पुन्हा तुझ्याच स्वप्नांत, गुंतवून मला जाते.. ठरवलेलं पक्क मनाशी.मनातच राहते. अन् पुन्हा,आठवणींची तुझ्याच, अखंड साखळीच सुरु होते.

💘 वेड मन हरवलय माझे तुझ्या प्रेमात, त्याला समजवू तरी कसे? मैत्री बदलते रे प्रेमात , पण प्रेमाला मैत्रीचे नाव देउ तरी कसे…

💘 वेड्या क्षणी भास् होतो तू जवळ असल्याचा डोळे उगीच दावा करतात तू स्पष्ट दिसल्याचा

💘 वेदना फक्त ह्रृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचीत कधी ङोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दूखःव्यक्त करता आले असते तर कदाचीत कधी अश्रूंची गरज भासलीच नसती. आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते, तर भावनांना किँमत कधी उरलीच नसती..

💘 वेळ बदलते ….. आयुष्य पुढे सरकल्यावर आयुष्य बदलते …. प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत …… आपल्या लोकांबरोबर पण आपली लोक मात्र बदलतात ….. वेळ आल्यावर ”

💘 वेळीच आवरायला हवं होतं, काळजाला या माझ्या … सोसवत नाही आता, तुझा जरासाही दुरावा …

💘 व्हायचं ते होऊन गेलं घडायचं ते घडून गेलं, कळत नाही कसं पण मन प्रेमात पडून गेलं, कळलं नाही मलाही कधी हातून निसटून गेलं, तू भेटलीस अन मला सोडून गेलं, कधी तुझ्या डोळ्यांत मन हरवत गेलं, कधी तुझ्या केसांत मन गुंतत गेलं, विचारलं तेव्हा मनाला हे काय चाललं, तुला काही कळत नाही इतकचं मला म्हटलं, माझचं मन माझ्याकडे ढुंकूनही पहात नाही, तू नाद लावलास त्याला आता ते माझं राहिलं नाही..

💘 शब्द तर अंतरीचे असतात,दोष माञ जिभेला मिळतो. मन तर स्वतःचच असत, झुराव माञ दुसर्यासाठी लागत. ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतात,आणि रङाव माञ ङोळ्याना लागत. असचं नात जपत जगणं हेच तर खरं जीवन असत

💘 शब्द सागरात उडी मारून मी शब्द शोधात आहे, माझं प्रेम व्यक्त करण्या साठी मी ह्या चारोळी लिहितो आहे.

💘 शांत असा मी कधीच नव्हतो.. प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!! असता जवळी तू, कधी हताश नव्हतो.. नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..?

💘 शाळेत एका लहान मुलाने आपल्या मैत्रीणीला विचारलं : ” काय गं हे प्रेम काय असतं ? … …… .. मैत्रीण : ” प्रेम म्हणजे…. मला माहीतीये की तू मधल्या सुट्टीत रोज माझ्या बॅगेतल्या कप्प्यातली चोकलेट चोरून खातोस, आणि तरीही मी आज ती त्याच ठिकाणी ठेवली आहेत

💘 शिकवं थोडं मलाही प्रेम व्यक्त कसं करावं, अबोल राहूनही डोळ्यांनी कसं बोलावं, गुंतूनही मनानं गुंतणार नाही कसं सांगाव, न पाठ फिरल्यावर साद कशी घालावं, फक्त एका कटाक्षान वेड कसं लावावं, हळूच गोड हसून मनास कसं फसवाव, न बोलता कुणाच हृदय कसं जिंकाव, चोर पावलांनी हृदयात कसं शिराव, कुणाला वेड लावून त्यास कसं झुरवाव, कुणी प्रेमात डुंबल्यावर आयुष्यातून कसं निघावं

💘 शुन्यच आहे आयुष्य माझे उणे तु असताना धरलास का हात सांग तु सोडुनच जायचे असताना…

💘 तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

💘 श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती, केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी, शाळेतले दिवस माझे नि तुझे तुला भिजुन प्रथमत: पाहिले, भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले, श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी, तिथेच ठरविले मी, जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी

💘 संशय मनात रुतून बसतो तोच खरा घातक असतो या संशयालालवकर दुर कर आणि प्रेम वेड्या…….च्या ह्रदयात उभार प्रेमाचं घर.

💘 सखे कशी विसरशील तू आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या, पारम्ब्यांच्या झुल्यावर माझ्यासोबत झुललेल्या…..

💘 सखे तू अशी नेहमी वेड लाऊन का जातेस डोळे मिटले कि तू स्वप्नात येऊन जातेस

💘 सख्या रे काय सांगु तुला जीव माझाच मजवरी उधार झाला या वेड्या सखीने तर तो ही मजपासुनी दुर नेला…

💘 सगळंच बरोबर करताना काही चुका करुन गेलो, त्यात न विसरना-या व्यक्तीलाही मी आज विसरुन गेलो

💘 सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर………. तु नक्किच आहेस…. पण…………. त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे……. ♥

💘 समईला साथ आहे जोतीची, अंधाराला साथ असते प्रकाशाची, चंद्राला साथ असते चांदण्याची, प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची

💘 समक्ष तर एक शब्दही बोलत नाहीस, मग स्वप्नात कशी येतेस मनमोकळ्या गप्पा मारायला ?

💘 समुद्र काठावर रंगबेरंगी शिंपल्यांची रास असावी …….! आपण गुंग होवून त्यात खेळत बसावं …..! अगदी सहजपणे त्यातला एक शिंपला उचलून उघडावा ……..! अन त्यात मोती सापडावा अगदी तुझ्यासारखा

💘 समुद्रकाठी बसणारे लोकं सर्व वेडे असतात मात्र खरे प्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात

💘 समुद्राच्या किनाऱ्‍याची किँमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पाहावं लागतं, पाण्याची किँमत समजण्यासाठी दुष्काळात जावं लागतं, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावं लागत.

💘 सये रोज नव्याने दरवळतो तुझ्या आठवणीचा सुगंध मग उगाचच जडतो जीवाला तुला आठवायचा वेडा छंद

💘 सर्वांची नजर चुकवून तुझे माझ्याकडे बघने हे मला माहीत असतत तुझे हे बघने मला कळता असत् पण तुझ्या नकळत माजे तुला बघने हे तुला कळता नसत

💘 सवयींचे काय , त्या कशाही जडतात, हळु हळु अंगवळणीही पडतात, म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते? एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.

💘 सहवासाची संगत तू चांदण्यांची गंमत तू , रवि किरणांचा तुच तजेला जलधारंची गंमत तू .

💘 सांग सख्या , मी गेल्यावर तुज माझी आठवण येईल का? जाता जाता माझ्यासाठी तु, दोन अश्रु गाळशील का?

💘 सांगितले वारंवार तुला तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही प्रेमात सर्वात मोठा असतो तो विशवास तो माझ्यावर तु ठेवलास नाही

💘 साकारलेल्या त्या भावनांना का आज शब्दच नाहीत ? का त्या डोळ्यांमध्ये माझी एक ओळखही नाही

💘 सागरची प्रत्येक लाट माझ्या ओळखिची होति कारण ती त्याच्या येवढिच माझीही होती

💘 साथीला आता तु नाहीस, हे ह्रदयाला कसं समजावु, अविरत पाझरणार्‍या डोळ्यांना, तु नसण्याचं शल्य कसं दाखवु….

💘 सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

💘 सुख दुखाचा विचार करताना मी तुलाच समोर पाहिले माझे संपूर्ण जीवनच तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले

💘 सुखदुःखाच्या वळणावरती निर्भय होऊनी येशील का ? ताण मनातला तुझा झुगारुनी साथ तुझी मज देशील का ? गळून पडतील दुःखे सारी रममाण माझ्यात होशील का?

💘 स्वतःचं मन मारून तुला बरं जगता आलं आपल्यांशी देखील तुला परक्यासारखं वागता आलं

💘 स्वतालाच विसरून स्वतालाच प्रेम म्हणजे देण असत आयुष्याला सुरात बांधेल प्रेम अस गाण असत मोती काय चांदण काय प्रेम कधी कोणी मोजत का? चंद्र समोर असताना कोणी चांदण शोधत का

💘 स्वप्न मलाही पडतात, पण त्यांच्या मागे मी धावत नाही माझ्या आठ बाय दहाच्या खोलित राजवाड्याचा दरवाजा मावत नाही

💘 स्वप्नातल्या परीला, आज मी सत्यात पाहिले… हळव्या त्या मनाला, मी ते हळूच सांगितले… पाहून त्या परीला, माझे हे मन फुला सारख फुलले… अन तिला समोरून जाताना पाहून, परत भेटू.अस ते हळूच बोलले.

💘 स्वप्नातील साज घेऊन ती आली ना सांगताच ती या मनाची झळी हृदय आता तिच्या शिवाय धडकेना, का माझिया प्रियाला प्रीत कळेना

💘 हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही. काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.सहवासाच्या खेळामधल्या आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय हाती काहीच न लागे.

💘 हलकेच येवून कानात , तुला सांगायचंय काही… मिठीत तुझ्या येऊन , थोडं रहायचंय राणी…

💘 हल्ली मला भावनांचा थांगच लागत नाही , क्षणभरही मनाला आता उसंत मिळत नाही .

💘 हल्ली हल्ली मला तुझी स्वप्ने पडतात, स्वप्नातून तू जाताच मला झोपेतून जागं करतात.

💘 हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला

💘 हात तुझा हाती होता.. काहीच फरक नाही पडला.. मृत्यु उभा माझ्या दारी होता.. बस..हात तुझा हाती होता.. प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला.. … माझ्यासाठी खास होता.. बस.. हात तुझा हाती होता.. डोळ्यांतुन ओघळलेला थेंब माझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता बस..हात तुझा हाती होता.. तो रुसलेला ओला रुमाल.. पाऊले मागे फिरताना हसला होता बस..हात तुझा हाती होता.. क्षणांत वाढणारे अंतर पण.. श्वासांत तुझाच दर्प होता बस..हात तुझा हाती होता.. प्राण नेण्या मृत्यु चुकला होता.. वचनांच्या बंधनात बहुदा फसला होता बस..हात तुझा हाती होता..

💘 हात हजार मिळतात अश्रू पुसण्यासाठी डोळे दोनही मिळत नाहीत सोबत रडण्यासाठी

💘 हातात हात घेशील जेव्हा भिती तुला कशाचीच नसेल… अंधरातला काजवाही तेव्हा सुर्यापेक्षा प्रखर असेल…

💘 हास्य तुझे ते अजुनही मला बेहोश करते तुझी ती कातील अदा मला नेहमिच आठवते … तुझे ते नशिले डोळे अजुनही माझ्यावर राज्य करतात तुझ्या स्मृतीतु परतण्याची आशा दाखवतात खरे होते ग प्रेम माझे तरी तु निघुन गेलीस जाताना मात्र माझा जीव जाऴुन गेलीस तरीही या वेड्या मनाला तुझ्या परतण्याची आशा आहे अश्रुंना तरी समज माझ्या ही प्रेमाची भाषा आहे समज ना ग ही भाषा एकदातरी परतुनी ये मजजवळ तु आतातरी..

💘 हिवाळ्यातील हि गुलाबी हवा सोबत ती हि असावी घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्या थंडीसही जागा नसावी

💘 हृदय काहितरी सांगतय तुला, वाट पाहते आहेस तु कोणाचितरी…… का लपवतेस भावना तुझ्या मनात, हो कोनाच्यातरी मनाची रानी…

💘 हृदयाच्या रम्य मंदिरात, प्रेमाच्या सुंदर वेलीवर भावनांच्या सदैव जलाने, सिँचन करणारे पहिले फुल म्हनजे प्रेम होय

💘 हृदयासारख सोप्प नाही काही या जगात तोडायला मनाला गरज नसते पंखांची स्वप्नांच्या आकाशी ऊडायला

💘 हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे

💘 हे सांगू की ते सांगू करत तेच तर सांगायाच राहीले तिचे ते मुके शब्द मी माझ्या मुकया डोळ्यांनीच पाहिले

हे देखील वाचा

Good morning quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment