डोळे हे आपल्या शरीरातील महत्वाचा भाग आहेत. डोळ्यांमुळे आपण आजू बाजूचे सुंदर जग बघू शकतो. आपल्याला डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे , कारण डोळे हे खूप नाजूक व संवेदनशील असतात. वातावरणातील छोट्याश्या बदलावा मुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. पावसाळ्यात, थंडी मध्ये व उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांवर प्रभाव पडतो. खासकरून पावसाळ्यात हवे मध्ये ओलावा व प्रदूषण असतो, त्यामुळे डोळ्यातून पाणी येतो आणि उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे डोळ्यांची आग होते आणि डोळ्यातून पाणी येतो तसेच हिवाळ्यात हवेत गारवा असतो व बोचर्या थंडीमुळे डोळ्यातून पाणी येतो. असेच अजून हि कारण असू शकतात.
उन्हाळ्यात हवेत धूळ असते व हवा जोरात वाहत असते, ज्यामुळे हेवेमुळे व धुळीमुळे डोळ्यातून पाणी येतो, आणि डोळ्यात कचरा गेल्यामुळे हि डोळ्यातून पाणी येतो, आपल्या डोळ्यात खाज होत असेल तरी देखील डोळ्यातून पाणी येतो किंवा डोळ्यात एलर्जी झाली असेल तर आपण डोळे चोळतो व त्यामुळे डोळ्यातून पाणी येतो.
डोळे फुगणे
आपल्या कधी लक्षात आले असेल आपल्या डोळ्याला कधी कधी सूज येते आणि फुगल्या सारखे होतात याचे कारण काय असेल? काहीवेळा खूप वेळ झोपल्याने लहान मुलांचेच नाही तर मोठ्यांच्या डोळ्यात थोडी सूज येते आणि डोळयांन संबंधी कोणत्याही समस्येत डोळ्यातून पाणी येतो.
डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांची आग आग होणे
या समस्येवर उपाय देखील सोपे आहेत. या साठी आपल्याला काही गोष्टींवर लक्ष द्यायला हवा. जर आपल्या डोळ्यात कोणत्या हि प्रकारची समस्या असेल तर आपण सगळ्यात आधी थंड पाण्याने डोळे धुऊन घ्या आणि मऊ व स्वच्छ कापडाने डोळे पुसून घ्या. पण डोळे साफ करताना ते जोरात चोळू नका, जर डोळ्यात खाज होत असेल तर साफ रुमालाने डोळ्यांची हलकी मालिश करा. डोळे साफ करण्यासाठी शुद्ध गुलाब जल चा वापर करू शकता, म्हणजे डोळ्यात शुद्ध गुलाब जलाचे २ ते ३ थेंब टाकून काही वेळासाठी डोळे बंद करा, आपल्याला आराम मिळेल.
आणि जर आपल्या डोळ्यात सूज आली असेल किंवा डोळे फुगले असतील तर रात्री दुधाची मलई डोळ्यांवर ठेऊन झोपा, सकाळी डोळे एकदम ताजे तवाने वाटतील. शुद्ध मध आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगली असते. जर आपण रोज डोळ्यांना मध लावत असाल तर आपल्या डोळ्यात सूज व डोळे झोंबणार नाही. गर्मी मुळे डोळे लाल झाले असतील तर थंड काकडीचे गोल तुकडे आपल्या डोळ्यांवर ठेवा यामुळे आपल्याला दोन फायदे होतील, आपल्या डोळे झोंबणार नाही व आपल्या डोळ्यातील लालसर पणा दूर होईल व आपल्या डोळ्याच्या खालचे डार्क सर्कल ( काळपट पणा ) कमी होतील.
आजकल मोबाईल, टीव्ही व कॉम्पुटर च्या सतत वापराने आपल्या डोळ्यात पाणी येण्याची समस्या होते व डोळे दुखतात म्हणून मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटर चा जास्त वापर करू नका. फक्त कामा पुरते वापरा. सकाळी बाहेर फिरायला जाताना देशी काजळ
नेहमी डोळ्यात लावा यामुळे डोळ्यांना आराम मिळतो व डोळे साफ राहतात.
प्रदूषण व मोबाईल सारखे इतर इलेक्ट्रोनिक वस्तू च्या वापरा मुळे डोळे झोबंणे, त्यातून पाणी येणे हि एक सामान्य समस्या बनली आहे. डोळ्यातून पाणी येणे डोळ्यात आग होणे हे डोळ्यांच्या कमजोरीचे लक्षण आहे या सारखी समस्या ड्राय आय सिंड्रोम ची कारण असू शकतात. ड्राय आय सिंड्रोम ने पिडीत व्यक्तीला हिवाळ्याच्या दिवसात त्रास वाढतो. डॉक्टरांच्या नुसार डोळ्यातून पाणी येत राहतो. यासाठी खूप कारण असू शकतात उदा. वातावरणात होणारे बदल, हार्मोन मध्ये बदलाव, मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटरच्या प्रमाणा पेक्षा जास्त वापराने, आणि इतर आरोग्या संबंधी समस्यांमुळे.
जर कोण्याच्या डोळ्यातून पर्याप्त अश्रू येत नसतील किंवा अश्रू लवकर सुकणे त्यालाही ड्राय आय सिंड्रोम सारखी समस्या होते. डोळ्यात खाज येणे , अंधुक दिसणे आणि डोळ्यात काहीतरी रुपल्या सारखे वाटणे हे याचे संकेत आहेत. डोळे चोळल्यामुळे लाल होतात, वाढत्या वयामुळे डोळ्यातून पाणी निघणारे तंत्र कमजोर होतो, त्यामुळे डोळे सुकतात आणि डोळ्यात लाली येते त्यामुळे डोळ्यात आग आग होते.
वृद्ध माणसांच्या डोळ्यातून पाणी येणे हि एक सामान्य समस्या आहे. वाढते वय तसेच हार्मोन मध्ये बदलाव सुरु होतो त्यामुळे डोळ्यांच्या तरलतेवर वाईट प्रभाव पडतो. पण एक आश्चर्याची बाब असते कि ड्राय आय सिंड्रोम च्या रोग्यांचे डोळे अधिक तरल दिसतात. डॉक्टरांच्या अनुसार डोळे सुकल्या मुळे डोळे जरुरी तरल ठेवण्यासाठी अधिक अश्रू स्त्रवित करतात. आपण आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याला डोळ्यां संबंधी कोणतीही समस्या असेल किंवा त्रास होत असेल तर त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी करावी.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.