Treatment on oily and dry skin in Marathi | तेलकट आणि शुष्क त्वचेवर उपचार

महिला असो वा पुरुष प्रत्येक जण आपण जास्तीत जास्त सुंदर कसे दिसू याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला वाटत असते आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसावेत आणि तेलकट त्वचा व शुष्क त्वचा नसावी. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या, डाग पडतात आणि या समस्येच्या निवारणा साठी बरेच लोक अनेक प्रकारचे कॉसमेटीक्स प्रोडक्ट्स चा वापर करतात. या प्रोडक्ट्स च्या वापराने आपल्याला काही काळा साठी फरक जाणवतो. पण हे कॉसमेटीक प्रोडक्ट्स खूप महाग असतात आणि यांचे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

खूप सारे असे घरगुती उपाय आहेत ज्यामुळे आपण चेहऱ्याची तेलकट त्वचा व इतर समस्यांवर उपाय करू शकता. यामुळे आपली त्वचा सुंदर व बेदाग होईल, तेलकट पणा दूर होईल. जर आपली त्वचा तेलकट असेल किंवा शुष्क असेल तर याच्या वर वेग वेगळे उपचार आहेत. जर आपली त्वचा तेलकट असेल तर पिंपल्स, व्हाईटहेड्स, त्वचेत आग होणे सारखी समस्या होते.

काही लोकांसाठी हि समस्या निकाळी असते आणि अनुवांशिक असते. याच्या वर कितीही प्रोडक्ट्स चा वापर केल्याने जास्त फायदा होत नाही. याच्या वर काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार आहेत जे सोपे व कमी खर्चिक असतात. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी करण्यासाठी काकडी, बटाटा हे एकत्र मिळवून आपल्या चेहऱ्यावर लावत असाल तर आपल्या त्वचेतील तेलकट पणा कमी होईल. लिंबाचा रस, पुदिन्याचा रस आणि मध हे तिन्ही एकत्र करून एक लेप तयार करा आणि हा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा. आपली त्वचा चमकदार होईल आणि चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स कमी होतील.

चंदन एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. जर आपण चंदन, हळद आणि मुलतानी माती एकत्र करून लेप बनवून चेहऱ्यावर लावत असाल तर आपली तेलकट त्वचेची समस्या दूर होईल, कारण यामध्ये चेहऱ्यात असलेला ओलावा रोखण्याची क्षमता असते यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक चमक येते. आपली त्वचा चमकदार होते.

दहीच्या वापराने देखील आपली तेलकट त्वचेची समस्या दूर करू शकतो. यासाठी चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी दही लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. तसेच दही, तांदळाचे पीठ, बेसन आणि हळद मिळवून पेस्ट बनवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावा यामुळे आपल्या त्वचेतील तेलकट पण दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल. जर आपण हे घरगुती उपचार करत असाल तर आपल्याला खूप फायदा होईल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment