Sant Dnyaneshwar Suvichar in Marathi । Sant Dnyaneshwar Quotes in Marathi
माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो
– संत ज्ञानेश्वर
मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत राहण्याऐवजी, जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
– संत ज्ञानेश्वर
कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेऊन, मी माझ्या आसपासच्या माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
– संत ज्ञानेश्वर
मी स्त्री व्हावे कि पुरुष, काळा कि गोरा, माझ्या शरीराची ठेवण, सर्व अवयव ठीकठाक असणे , हे देखील माझ्या हाती नव्हते मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
– संत ज्ञानेश्वर
हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखिल काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का ? , ते तसे का ?, असे का नाही? वैगेरे प्रश्न विचारत राहून वैताग्ण्या ऐवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल, हे हि नसे थोडके!
.
– संत ज्ञानेश्वर
आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या किंवा कधीही नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेऊन, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
– संत ज्ञानेश्वर
माझ्या आई वडिलांची संपत्तीक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
– संत ज्ञानेश्वर
माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे हे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपुर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
– संत ज्ञानेश्वर
माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्यावेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
.
– संत ज्ञानेश्वर
ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहुनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात.
– संत ज्ञानेश्वर
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
Best Literature writings in Msrathi , he tried to improve quality level of Marathi language .His writings are excellent wherein deep meanings in large scale come out.