छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले – Chatrapati Shivaji Maharaj Fort
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्य व महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महान आणि शूरवीर योद्धा होते. नियोजनसोबत योग्य राज्यकारभाराने महाराजांना सदैव विजय पथावर ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शासन काळात जवळपास 360 किल्ले जिंकले. महाराजांनी अनेक किल्ल्यांची निर्मिती देखील केली. छत्रपतो शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्राला आणि या सह्याद्रीला असंख्य किल्ल्यांची संपत्ती लाभली आहे.
त्यातील काही प्रमुख किल्ले देखील आहेत. परंतु किल्ल्यांची देखभाल व्यवस्थित होत नसल्या कारणाने आज महाराजांच्या या जिवंत स्मारकांची अवस्था बिकट होत चालली आहे. अस असलं तरी देखील महाराजांच्या या किल्ल्यांवर गेल्यावर तीच उर्जा, शक्ती आणि प्रेरणा आपल्याला मिळत असते. आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच किल्ल्यांविषयी – Shivaji Maharaj Forts आपण माहिती घेणार आहोत.
Shivneri Fort Information in Marathi / किल्ले शिवनेरी
17 व्या शतकातील हा किल्ले शिवनेरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान होय. किल्ल्यावर शिवाई देवीचे एकमंदिर देखील आहे. देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्यात हा किल्ला असल्याने याचे नाव शिवनेरी ठेवण्यात आले. दुर्भाग्य असे की मराठ्यांना या किल्ल्यावर कधीच अंमल आणता आला नाही. मराठ्यांनी किल्ला घेण्यासाठी 2 वेळा अपयशी प्रयत्न केले.
मुख्य दरवाजा सोबत आणखी एक साखळी दरवाजा देखील गडावर जाण्यासाठी आहे. या साखळी दरवाजाने पर्यटक साखळीचा आधार घेत गडावर जाऊ शकतात. किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ आणि बाळ शिवाजी राजे यांचा पुतळा आहे. गडावर बदामी नावाचा पाण्याचा तलाव आहे आणि गंगा व यमुना नावाच्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत. विशेष म्हणजे कितीही कडक उन्हाळा पडला तरी देखील या दोन टाक्यांमधील पाणी कधीच आटत नाही.
Torna Fort Information in Marathi / तोरणा किल्ला
छत्रपती शिवरायांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे किल्ले तोरणा! याच किल्ल्याला प्रचंडगड असे देखील नाव आहे. प्रचंड म्हणजे भव्य आणि गड म्हणजे किल्ला! महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून जणू स्वराज्याचे तोरणच बांधले होते. किल्ल्याच्या आत खूप साऱ्या स्मारकांची आता निर्मिती केलेली आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4603 फूट इतक्या उंचीवर आहे.
18 व्या शतकात संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने गडावर ताबा मिळवत गडाचे नाव फुतुलबैग असे ठेवले.
Rajgad Fort Information in Marathi / किल्ले राजगड
राजगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील एक गिरिदुर्ग आहे. मराठा साम्राज्याची म्हणजेच स्वराज्याची राजगड ही पहिली राजधानी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनाचे जवळपास 26 वर्ष याच गडावर व्यतीत केले. हा किल्ला त्या 17 किल्ल्यांपैकी एक आहे जो 1665 मध्ये झालेल्या मुघल सरदार मिरझाराजे जयसिंग सोबतच्या पुरंदरच्या तहात द्यावा लागला होता. राजगड खूप साऱ्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म देखील याच गडावर झाला होता. महाराजांच्या पत्नी आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई यांचा मृत्यू याच गडावर झालेला आहे. अफजलखानाच्या शिराचे दफन देखील याच गडावर करण्यात आले व महाराज आग्र्याहून सुटून याच गडावर दाखल झाले.
Lohgarh Fort information in Marathi / लोहगड किल्ला
प्राचीन काळापासून या किल्ल्याला खूप महत्व आहे. हा किल्ला खंडाळा घाटाच्या व्यापारी मार्गावर आहे. पाच वर्षापर्यंत हा किल्ला मुघल साम्राज्याचा भाग होता. वेगवेगळ्या साम्राज्यांनी या गडावर राज्य केले आहे त्यात मुख्यतः सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, ब्राम्हण, निजाम, मुघल आणि मराठे आहेत.
1648 मध्ये महाराजांनी लोहगड जिंकून घेतला. पुढे पुरंदरच्या तहानुसार 1665 मध्ये महाराजांना हा किल्ला मुघलांच्या ताब्यात द्यावा लागला. 1670 मध्ये महाराजांनी पुन्हा हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. याच लोहगड किल्ल्याचा उपयोग महाराज खजिना लपवण्यासाठी करत असत असे म्हणले जाते. पेशव्याच्या काळात नाना फडणवीस या गडावर खूप काळ थांबले आणि त्यांनीच इथे वेगवेगळी स्मारके बांधून घेतली. सध्या हा किल्ला भारत सरकारच्या नियंत्रणात आहे.
लोहगड महाराष्ट्रातील गिरीदुर्गांपैकी एक आहे.
Vijaydurg Fort Information in Marathi / विजयदुर्ग किल्ला
विजयदुर्ग हा सिंधुदुर्गाच्या तटावरील सर्वात जुना किल्ला आहे. हा एक सुंदर आणि अभेद्य सागरी किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा विजय म्हणून ओळखला जातो.
या किल्ल्याचा उपयोग मराठे आपल्या युद्धनौकांचे नांगर टाकण्यासाठी करत असत. विजय दुर्ग किल्ला पहिले घेरिया नावाने ओळखला जात असे परंतु 1653 मध्ये शिवरायांनी दुर्गावर ताबा मिळवल्यानंतर त्याचे नामकरण विजयदुर्ग असे केले. या किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने महत्वाचा यासाठी आहे कारण महाराजांनी दोनच किल्ल्यांवर स्वतःच्या हाताने भगवा ध्वज फडकवला त्यापैकी हा एक किल्ला, दुसरा म्हणजे किल्ले तोरणा!
आत्ताच आलेला मराठी चित्रपट किल्ला याची शूटिंग याच विजयदुर्गावर झालेली आहे.
Raigad Fort Information in Marathi / श्रीमान किल्ले रायगड
महाराष्ट्राच्या इतिहासात एके काळी बनलेला हा किल्ला म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी होय. स्वराज्याचे छत्रपती याच गडावर झाले. स्वराज्याची राजधानी हाच गड होता. अखंड महाराष्ट्राचे पालनहार शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक याच गडावर झाला. महाराजांची शेवटची आठवण देखील याच रायदुर्गावर आहे.
महाड मध्ये स्थित असलेल्या या गिरीदुर्गाला पहिले रायरी या नावाने ओळखले जायचे. 1656 मध्ये चंद्रराव मोरे यांच्याकडून महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. महाराजांनी पुढे गडाची सुधारणा करत नावात देखील बदल केला. राजीयांचा गड आणि गडांचा राजा म्हणजेच रायगड असे नाव या गडाला महाराजांनी दिले. महाराजांनी याच गडाला पुढे स्वराज्याची राजधानी बनवले. अखंड महाराष्ट्राचे छत्रपती याच गडावर राज्याभिषेकाच्या माध्यमातून झाले. 1680 साली छत्रपतो शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास देखील याच रायगडी घेतला.
1689 मध्ये झुल्फिकारखान याने गडावर ताबा मिळवून गडाचे नाव इस्लामगड ठेवले. पुढे जाऊन 1818 मध्ये इंग्रजांनी गडावर तोफा लावून वास्तू उध्वस्त केल्या.
Sindhudurg Fort Information in Marathi / किल्ले सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक बलाढ्य किल्ला आहे. बुलंद आणि बेलाग सागरी किल्ल्यांपैकी हा देखील मराठा नौसेनेचा एक महत्वाचा भाग आहे. महाराजांच्या चरणचिन्हांचे आणि हाताच्या निशानाचे किल्ल्यावर एकमात्र मंदिर आहे.
नौदलातील नावांच्या साठी हा किल्ला म्हणजे एक सुरक्षित ठिकाणी होते. या किल्ल्याची निर्मिती हिरोजी इंदुलकर यांनी 1664 मध्ये केली होती. या किल्ल्याच्या निर्मितीचे मुख्य ध्येय हे भारतात होणारे परकीय आक्रमण रोखणे हाच होता. हा किल्ला जवळपास 48 एकरात पसरलेला असून किल्ल्याच्या भिंती या 30 फूट इतक्या उंच आहेत.
सध्याच्या काळात हा किल्ला पर्यटनाचे केंद्र बनला आहे. या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला धक्क्यावरून बोट घ्यावी लागते.
Panhala Fort Information in Marathi / पन्हाळगड
12 व्या शतकात निर्माण झालेला पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्राच्या अतिप्राचिन किल्ल्यांपैकी एक आहे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनातील 500 पेक्षा जास्त दिवस या किल्ल्यावर काढले आहेत. 1689 मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ल्यावर औरंगजेबाने ताबा मिळवला. 1692 मध्ये काशी रंगनाथ सरपोतदार यांनि परशुराम पंत यांच्या प्रतिनिधित्वात गडावर ताबा मिळवला.
1701 मध्ये औरंगजेबाने पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला परंतु काहीच महिन्या नंतर रामचंद्र पंत अमात्य यांनी किल्ला स्वराज्यात आणला. पुढे 1844 मध्ये किल्ल्यावर ब्रिटिशांनी ताबा मिळवला.
Murud-Janjira Information in Marathi / मुरुड जंजिरा
मुरुड जंजिरा हा जलदुर्ग त्याच्या स्थानामुळे आणि स्थापत्य कलेमुळे खूप जास्त प्रसिद्ध आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर चार हत्ती तुमचे स्वागत करतात. शरभ शिल्प तिथे राहणाऱ्या सिद्द्यांचे सामर्थ्य दर्शवत असतात. भारतातील सर्वात मजबूतसागरी किल्ला कोणता असेल तर तो म्हणजे मुरुड जंजिरा होय.
17 वया शतकात बनलेला हा किल्ला प्राचीन स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. गडाच्या सुवर्णकाळात गडावर 572 तोफा होत्या. यातील प्रमुख 3 तोफा म्हणजे कलाल बांगडी, चावडी आणि लांडाकासम या होत्या. आजही या तीन तोफा आपण गडावर पाहू शकतो.
Sinhagad Fort Information in Marathi / सिंहगड किल्ला
महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगडाच्या महत्व खूप विशेष आहे. सहयाद्री रांगेच्या भुलेश्वर या उपरांगेत असलेला सिंहगड हा किल्ला जमिनीपासून 760 मीटर उंचीवर तर समुद्र सपाटीपासून 1312 मीटर इतक्या उंचीवर स्थित आहे. हा किल्ला पुणे शहरापासून दक्षिण पश्चिमेला स्थित आहे.
मुघलांच्या सोबत झालेल्या भीषण युद्धात मराठ्यांनी या किल्ल्यावर कब्जा मिळवला. या लढाईत तान्हाजी मालुसरे यांनी आपला जीव गमावला. तान्हाजीरावांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या मुखातून उद्धार बाहेर पडले, “गड आला पण सिंह गेला”. त्यामुळे अगोदर कोंढाणा नावाने ओळखला जाणारा किल्ला आता सिंहगड म्हणवू लागला. तान्हाजींच्या या शौर्याची गाथा आपल्याला कायम प्रेरणा देत असते.
Pratapgad Fort Information in Marathi / प्रतापगड किल्ला
प्रतापगड म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक भव्य किल्ला! चोहोबाजूंनी जंगलाने वेढलेला हा किल्ला खऱ्या अर्थाने त्या अफजलखानाचा कर्दनकाळ ठरला. रडतोंडीचा घाट हा त्या अफजल्याच्या जीवावर बेतला खरा! महाराजांच्या आणि अफजलखानाच्या लढाईचा साक्षीदार हा किल्ला आजही शिवप्रतापाने आपल्या अंगावर शहारे आणतो.
हे देखील वाचा
Pemgiri Fort (किल्ले पेमगिरी) information in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले आपल्या महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे मला किल्ल्यांची माहिती वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद सर….