Information about about Ratan Tata in Marathi | रतन टाटांबद्दल माहिती

Ratan Tata Biography In Marathi

आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जी चार वेळा प्रेमात पडली आहे परंतु लग्न झाले नाही. अशा एका व्यक्तीविषयी, ज्याचे टाटा कुटुंबाशी रक्त संबंध तर नाही परंतु ते दत्तक घेतलेले मूल आहे. ज्याने टाटाला त्यांच्या काळात शिखरावर पोहचवले. होय! आज मी तुम्हाला रतन टाटा यांच्या बद्दल माहिती देणार आहे. तर चला मग त्यांच्या जीवनाचा तपशील जाणून घेऊ या.

 • संपूर्ण नाव – रतन नवल टाटा
 • जन्म – 28 डिसेंबर 1937, सूरत, गुजरात, भारत
 • सध्याचे निवासस्थान – कुलाबा मुंबई, भारत
 • जात – पारसी
 • वडिलांचे नाव – नवल टाटा
 • आईचे नाव – सोनू टाटा
 • व्यवसाय – एक बिजनेसमॅन आणि गुंतवणूकदार
 • धर्म – पारसी
 • शिक्षण – कोनरेल विद्यापीठ आणि हार्वाड विद्यापीठ
 • पत्नीचे नाव – लग्न झालेले नाही
 • जे आर डी टाटा (काका)
 • नोएल टाटा (सावत्र भाऊ)
 • सम्मान – भारत सरकार कडून पदमभूषण
 • नॅनो कार – रतन टाटा यांनीच भारताची सगळ्यात स्वस्त कार मार्केट मध्ये आणली होती.
 • टाटा इंडस्ट्री – 1981 मध्ये टाटा समूह आणि ग्रुप चे अध्यक्ष

Ratan Tata Information In Marathi

आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जी चार वेळा प्रेमात पडली आहे परंतु लग्न झाले नाही. अशा एका व्यक्तीविषयी, ज्याचे टाटा कुटुंबाशी रक्त संबंध तर नाही परंतु ते दत्तक घेतलेले मूल आहे. ज्याने टाटाला त्यांच्या काळात शिखरावर पोहचवले. होय! आज मी तुम्हाला रतन टाटा यांच्या बद्दल माहिती देणार आहे. तर चला मग त्यांच्या जीवनाचा तपशील जाणून घेऊ या.

१) टाटा समूहाच्या अंतर्गत १oo कंपन्या आहेत. टाटा समूहामध्ये चहापासून ते ५ स्टार हॉटेल्स पर्यंत, सुई पासून ते स्टीलपर्यंत, नॅनो कार पासून ते विमानापर्यंत सर्व काही मिळते.

tata company information in marathi
tata company information in marathi

२) रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. रतन टाटा पारशी धर्माचे आहेत.

३) रतन टाटा दहा वर्षांचे असताना त्यांच्या पालकांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मग जमशेदजी यांचे पुत्र रतनजी टाटा यांच्या पत्नी नवाजबाई (रतन टाटाच्या आजी) यांनी रतन टाटा यांना दत्तक घेतले आणि त्यांचे पालनपोषण केले.

४) रतन टाटा यांनी कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल (मुंबई) आणि बिशॉप कॉटन स्कूल (शिमला) येथे त्यांचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. नंतर १९६२ साली ते आर्किटेक्चरमधील बी. एस. पूर्ण करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाकडे गेले. त्यानंतर १९७५ मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

५) त्यांना पाळीव प्राणी खूप आवडतात. तसेच त्यांच्या कडे विमान उडवण्याचे लायसेंस देखील आहे.

६) रतन टाटा यांचे कर्मचाऱ्याप्रती प्रेम काबिल-ए-तारीफ़ आहे. टाटा समूहामध्ये नोकरी करणे ही सरकारी नोकरीपेक्षा कमी नाही. रतन टाटा पेटीएम(PAYTM), ओला इत्यादींसारख्या नवीन स्टार्टअप मधे देखील गुंतवणूक करतात.

७) रतन टाटा यांनी आयबीएमची नोकरी नाकारली आणि टाटा स्टीलचे कर्मचारी म्हणून १९६१ साली टाटा समूहात आपल्या करियरची सुरूवात केली होती. १९९१ मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले आणि २o१२ मध्ये निवृत्त झाले.

८) रतन टाटा यांनी आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीला सर्वोच्च पातळीवर आणले आहे. त्यांच्या कारकिर्दीत कंपनी चा नफा हा ५ पटीने वाढला. सुरवातीला त्यांनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी सिद्ध करून दाखवले होते.

९) रतन टाटा यांना २ooo सालामध्ये पद्मभूषण (भारताचे तिसरे सर्वोच्च सन्मान) पुरस्कार व २oo८ मध्ये पद्मविभूषण (भारताचे दुसरे सर्वोच्च मानधन) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

१०) २oo८ मध्ये २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात हॉटेलमध्ये जखमी झालेल्या सर्वांचे उपचार टाटा यांनीच केले होते. हॉटेल च्या शेजारी असलेल्या दुकानांत जखमी झालेल्या सर्व लोकांना टाटा यांनी मदत केली होती. जोपर्यंत हॉटेल बंद होते तोपर्यंत कर्मचार्यांना त्या दिवसासांचे पूर्ण वेतन दिले जात असे. मुंबईच्या ताज हॉटेलचे बांधकाम जमशेदजी टाटा, ज्यांनी टाटा कंपनीची स्थापना केली होती, त्यांनीच केले होते . हे हॉटेल १९o३ मध्ये ४ कोटी २१ लाख रुपयांच्या बजेट मध्ये बांधले गेले होते.

ratan tata information in marathi
Ratan tata information in Marathi

११) गोष्ट सन १९९९ मधली आहे. इंडिका लाँच होऊन केवळ एकच वर्ष झाले होते. रतन टाटा हे फोर्डचे मुख्यालय डेट्रॉईटला गेले होते हे सांगण्यासाठी की टाटा मोटर्सचे ला तुम्ही विकत घ्या. त्या दिवशी बिल फोर्डने यांनी त्याचा भरपूर अपमान केला होता. त्या दिवशी ते म्हणाले की तुमचे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनाची खरेदी करुन मी तुमच्यावर उपकार करीत आहे. टाटा यांना बरेच सुनवण्यात आले की, एखादी गाडी तयार करणे शक्य नसताना तुम्ही या व्यवसायात का आलात? त्यावेळी रतन टाटा यांना खूप वाईट वाटले. त्याच रात्री, ते संपूर्ण टीमसह डेट्रॉईटवरून मुंबईला परतले. ते हट्टी स्वभावाचे होते. टाटा मोटर्सवर वर स्वतंत्र वेळ दिला. काही दिवसांनंतर टाटा मोटर्सने चांगली सुरुवात केली, परंतु बिल फोर्डची कंपनी कर्जात बुडाली. २oo९ साली फोर्ड कंपनी डुबण्याच्या काठावर आली तेव्हा टाटा समूहाने त्यांना एक प्रस्ताव पाठवला की आम्ही तुम्हाला खरेदी करतो. अगदी त्याचप्रमाणे, फोर्डची संपूर्ण टीम डेट्रॉइटहून मुंबईला आली आणि म्हणाली, “आपण आमच्या जैगुआर लैंडरोवर खरेदी करून आमच्यावर उपकार करीत आहात.” रतन टाटा यांनी जैगुआर लैंडरोवरला ९६oo कोटी रूपयांत विकत घेतले.

Ratan tata biography in Marathi
Ratan tata biography in Marathi

१२) रतन टाटा चार वेळा प्रेमात पडले, पण ते विवाहित नाही. आणि एकदा तर त्यांचे लग्न होणारच होते. वास्तविक, रतन टाटा अमेरिकेत शिकत असताना ते एका मुलीच्या प्रेमात पडले, व दोघे ही लग्नासाठी तयार झाले होते. त्यांच्या आजीच्या आजारामुळे ते भारतात आले परंतु त्यांची प्रेमिका भारत-चीन युद्धामुळे फारच घाबरलेली होती आणि भारतात आली नाही. आणि काही दिवसांनंतर, त्यांच्या प्रेमिकेने अमेरिकेमध्ये दुसऱ्या कोणा बरोबर लग्न केले.

१३) टाटा कंपनीचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना वगळता, कोणत्याही पहिल्या पाच अध्यक्षांना वारस नव्हते. १८८७ मध्ये टाटाची स्थापना करणारे जमशेदजी स्वतः अध्यक्ष बनले. १९o४ मध्ये ते मरण पावले. त्यानंतर जमशेदजी यांचे पुत्र सर दोराबजी टाटा १९o४ मध्ये अध्यक्ष झाले. १९३२ साली ते मरण पावले. दोराबजीच्या मोठ्या बहिणीचा मुलगा नौरोजी सकलतवाला याला टाटा कंपनीची कमान देण्यात आली. ते १९३८ साली मरण पावले. मग जमशेदजीच्या चुलत भावाचा मुलगा जे.आर.डी. टाटाला, टाटा कंपनीवर हुकूमत देण्यात आली. १९९१ मध्ये, ते निवृत्त झाले. आणि त्यानंतर रतन टाटा अध्यक्ष पदी आले. २o१२ मध्ये रतन टाटा निवृत्त झाले. रतन टाटा च्या सावत्र भावाच्या सख्या मेवण्याला म्हणजे सायरस मिस्त्री यांना टाटा कंपनीची कमान देण्यात आली. २०१६ मध्ये मिस्त्री यांना कंपनीतून काढून टाकण्यात आले. आता नटराजन चंद्रशेखर हे अध्यक्ष आहेत.

१४) रतन टाटा हे भारताचे किंवा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती का नाहीत?

हाच प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. उत्तर असे की, ते एक उद्योजक आहेत आणि अंबानी कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर हा एका कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि टाटा सन्स हे टाटा ट्रस्टद्वारा चालवले जाते. ट्रस्टमधे कोणत्याही एका माणसाचा हिस्सा नाही हे सर्वजण जाणून आहेत. ६६% टाटाची मिळकत ही ट्रस्टमधे जाते. रतन टाटाच्या सेवानिवृत्तीनंतर टाटा सन्स च्या नव्या चेअरमनची नेमणूक करावी, असा निर्णय घेण्यात आला होता. तर अंबानीला आपले व्यवसाय अधिकार आहेत, त्यांचा व्यवसाय ते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या हातात सोपवू शकतात. आणि म्हणूनच रतन टाटा सर्वात श्रीमंत नाही. अशा ह्या खऱ्या भारतीयला सलाम

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Information about about Ratan Tata in Marathi | रतन टाटांबद्दल माहिती”

Leave a Comment