लिनक्स काय आहे – What is Linux in Marathi
Linux एक Unix-like Operating System (OS) आहे. Linux ही Operating System Linus Torvalds यांनी निर्माण केलेली आहे. Linux चा उच्चार हा “lie-nux” असा न करता “lih-nux” असा केला जातो. Linus यांनी Linux ला यासाठी develop केले की त्यावेळी उपलब्द असलेली operating system Unix सोबत ते समाधानी नव्हते. त्यांच्या मनात सतत विचार चालू होता की ते याला कशा प्रकारे improve करू शकतील. त्यांनी तेच केले जे त्यांना हवे होते. त्यांनी स्वतःसाठी एक नवीन operating system च बनवली.
जेव्हा Linus यांनी Working version Linux बनवून पूर्ण केले तेव्हा त्यांनी या OS ला FREELY Distribute देखील केले. याचा फायदा असा झाला की त्यांनी खूप लवकर popularity मिळाली. आताच्या काळात करोडोंच्या संख्येने लोक Linux वापरतात. खूप सारे Computer विषयी माहिती असलेले लोक या operating system ला पसंती देतात कारण ही highly customizable आहे. तुम्ही programmer असाल तर तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही याच्या source code ला modify करू शकता आणि स्वतःसाठी त्याच एक वेगळं unique version देखील बनवू शकता. म्हणजेच Linux Operating System चा वापर करून तुम्ही स्वतःची एक operating system देखील बनवू शकता.
ज्या web hosting companies आहेत त्या त्यांच्या Web Server वर Linux install करत असतात. कारण setup करण्यासाठी आणि त्यासोबत maintain करण्यासाठी देखील Linux based servers खूप स्वस्त असतात. याची तुलना windows based server सोबत केली असता हे परवडणारे असते. जसे Linux OS मोफत distribute केले जाते त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे licensing fees ची गरज पडत नाही. याचाच अर्थ असा की हे Linux servers हजारोंच्या संख्येने websites host करत आहेत, ते देखील कुठलाही जादा खर्च न करता! तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक website host करण्यासाठी windows server मध्ये तुम्हाला user licenses ची गरज भासते.
Linux खूप साऱ्या distributions मध्ये उपलब्ध आहे. यातील सर्वात जास्त popular distributions मध्ये Red Hat Enterprise, CentOS, Debian, OpenSUSE आणि Ubuntu यांचा समावेश आहे. Linux खूप साऱ्या hardware platforms वर support करते. त्यात Intel, PowerPC, DEC Alpha, Sun Sparc आणि मोटोरोला देखील आहेत. Linux खूप साऱ्या hardware सोबत compatible असल्याने Linux Operating System च्या वेगवेगळ्या Variations ला Computers सोडता इतरही electronic devices मध्ये वापरले जाते. याचे उदाहरण म्हणजे Cell Phones, Cable Boxes, Sony’s PS2 आणि PS3 Gaming Consoles.
1 thought on “लिनक्स काय आहे | Information about Linux in Marathi”