Information About India in Marathi | भारताबद्दल काही २५ आश्चर्यकारक तथ्ये

जगभरात भारत हा एक असा देश आहे, ज्यामध्ये प्रत्येक समाज, प्रत्येक संप्रदायाचा लोक मिळून मिसळून राहतात. या देशाचा इतिहास खूप मोठा आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सर्वानाच माहीतही असतील असे नाही आहे. मी या लेखा च्या माध्यमातून भारत देशा बद्दल काही विशेष माहिती सांगणार आहे.

१) चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकावरील देश आहे ज्या देशाचे सैन्य सर्वाधिक क्रियाशील आहे.

२) दर बारा वर्षानंतर भारतात कुंभमेळा नावाचा एक धार्मिक उत्सव आयोजित केला जातो हा कुंभ मेळावा जगातील सर्वात मोठा मेळावा आहे. या कुंभमेळाव्याला इतके लोक जमतात की हा मेळावा अंतराळातून देखील पहिला जाऊ शकतो.

३) व्हॅटिकन सिटी आणि मक्का या दोन धार्मिक स्थळांना जितके दर्शक भेट देतात त्या पेक्षा अधिक दर्शक तिरुपती बालाजी मंदिर आणि काशी विश्वनाथ मंदिरात भेट देतात.

४) २६ मे , हा दिवस स्वित्झर्लंड मध्ये आपले स्वर्गीय राष्ट्राध्यक्ष डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो कारण याच दिवशी कलाम यांनी स्वित्झर्लंड ला भेट दिली होती.

५) जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वाधिक जास्त मशिदी आहेत (३,००,०००).

६) भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेला सर्वात मोठा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.

७) भारतातील तक्षशिला विद्यापीठ ही जगातील पहिली विद्यापीठ आहे. हि विद्यापीठ इ. स. ७०० च्या सुमारास सुरू झालेली.

८) भारतामधे जगातील सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलणारे लोक आहेत.

९) १९८६ पर्यंत भारत हा जगातील एकमेव असा देश होता जिथे सर्वाधिक डायमंड सापडले जायचे.

१०) अंदाजाप्रमाणे येत्या वर्षामध्ये जगभरातील २५ टक्के लोकसंख्या भारतातील असेल.

११) इंग्रजी अभिनेता सर बेन कींगले यांचे जन्मनाव कृष्ण पंडित भांजी आहे आणि ते मूळ भारतीय आहेत.

१२) भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.

१३) जगामध्ये भारत देश हा चित्रपटांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

१४) भारतामध्ये सर्वाधिक खून होतात. दरवर्षी भारतात साधारण ३३,७१९ खून होतात. रशिया देश दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे दरवर्षी २८,९०४ खून होतात.

१५) संपूर्ण भारतात डॉल्फिनला बंदी आहे कारण भारतात याला अमानवी रूपाने पाहिले जाते.

१६) जगातील दोन प्रमुख धर्म, बुद्ध आणि जैन या धर्माची स्थापना भारतामध्ये झाली.

१७) जवळपास १७ शतकापर्यंत भारत जगातील सर्वांत श्रीमंत देश होता.

१८) आज भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

१९) भारताचे राष्ट्रीय पेय चहा आहे.

२०) सुपर कम्प्युटर बनवणाऱ्या तीन मुख्य देशांमध्ये भारत हा एक देश आहे. इतर दोन देश म्हणजे अमेरिका आणि जपान आहेत.

२१) जगातील सर्वात मोठी रस्ता-प्रणाली भारतात आहेत. आपल्या देशात जवळजवळ १९ दशलक्ष रस्ते बांधले गेले आहेत.

२२) भारतात दरवर्षी १.२ दशलक्ष टन आंबे तयार होतात ज्याचे अंदाजे वजन ८००० ब्ल्यू व्हेल समान आहे.

२३) भारताचे मेघालय राज्यात सर्वात जास्त पाऊस पडते.

२४) जगाला योगाची देणगी भारतामुळे मिळाली आहे. जवळजवळ पाच हजार वर्षापासून योगा भारतात अस्तित्वात आहे.

२५) मार्शल आर्टचा उगम देखील भारतातच झाला.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

2 thoughts on “Information About India in Marathi | भारताबद्दल काही २५ आश्चर्यकारक तथ्ये”

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.