लोकं नाव ठेवतात त्याच उत्तर कसं द्यायचं | Motivational tips in Marathi
Motivational tips in Marathi: हे विश्व ना मैत्रीने चालते, ना प्रेमाने चालते, चालते ते फक्त स्वार्थाच्या बळावर चालते! मी संपूर्ण आयुष्य पुस्तकांच्या पानामध्ये या जगाचा अर्थ शोधत राहिलो आणि जाणून घेऊन आश्चर्य वाटले की हा देखील एक स्वार्थ होता की जो मला जगाचे प्रत्येक पान शिकवून गेला.
मित्रांनो जगाचा अर्थच स्वार्थ हा आहे. बघा ना कधी कधी स्वतःमध्ये तेवढी क्षमता असताना देखील हवी ती किंमत मिळत नाही जी आपण एखाद्याच स्वार्थ पूर्ण केला तर सहज मिळते. अरे वेड्या, शिकायचं आहे तर जीवनाशी खेळायला शिक, कारण लोक फक्त जीवनातील चांगल्या खेळाडूंना लक्षात ठेवतात.
मित्रांनो, मला हारताना बघून लोकांना वाटले होते की मी हार मानेल, आतून खचून जाईल, परंतु त्यांना हे माहीत नव्हते की मी माझा मार्गच बदलून टाकेल! जे तुमच्या स्वप्नांना लाथ मारत असतील त्यांच्या पायाला देखील त्रास होतच असेल ना? त्यामुळे त्यांना तुमच्या यशाचा मलम नक्की लावा.
जो माणूस पाण्यात बुडतो ना त्याला फक्त आणि फक्त श्वास आठवत असतो, तसेच जेव्हा तुमचे ध्येय हे त्या श्वासाप्रमाणे बनेल आणि त्यासाठी तुम्ही झटायला लागता तेव्हा समजून घ्या की यश हे खूप जवळ आले आहे. कोणत्याही व्यक्तीची महत्वाची बाब हे त्याचे टॅलेंट नाही तर तो स्वतः असतो, कारण त्याचे टॅलेंट हे त्याच्यामधूनच आलेले आहे.
हसणाऱ्याच्या हृदयात देखील अनेक वेदना असतात, मदत करणारा देखील स्वार्थी असतो. जर चिडायचे असेल ना तर त्या गोष्टीला गमवायला तयार राहा जी तुम्हाला कोणत्या तरी नशिबाने मिळालेली असेल. कधी कधी काही लोक काहीतरी नवीन शिकवायला आपल्या जीवनात येतात आणि शिकवून पुन्हा माघारी निघून जातात आणि जो आपल्याला काहीतरी शिकवून निघून जातो ना त्याचे दुःख नाही, त्याचा आदर करायला हवा. कारण परमेश्वर ज्या कामासाठी त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याशी जोडत असतो ना तोच परमेश्वर त्यापेक्षा ही काहीतरी मोठ्या कामासाठी त्याला तुमच्या आयुष्यातून दूर करत असतो.
सत्य हे मातीसारखे असते आणि खोटं हे संगमरवरा सारखे असते! सत्याचा मार्ग अवलंबून चालताना अडथळे येतील परंतु पुढे यश नक्की मिळेल. खोट्या रस्त्यावर कधी घसरून पडाल हे सांगता येत नाही. त्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात सध्या आहेत त्याला त्यांना आजचे सत्य आहे हे समजून स्वीकारा. परंतु मनात हा विश्वास नक्की असू द्या की हे तुमचे प्रॉब्लेम्स तर आहेत जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी कधीपासून धक्का मारत आहेत!
विचार करा की तुम्ही एका खूप मोठ्या गोळ्याच्या मध्यावर उभे आहात आणि कोणतीही एक दिशा पकडा आणि चालत राहा. हा गोळा आहे तुमच्या प्रॉब्लेम्सचा, यात तुम्ही कधी इकडे जाता तर कधी तिकडे जाता आणि फिरून पुन्हा तिथेच येता. परंतु यश हे या गोळ्याच्या बाहेर आहे. त्यामुळे कोणत्याही एकाच कामात तज्ञ बना, आणि त्यात यशस्वी व्हा!
तर मग मित्रांनो वाट कशाची बघताय? उठा आणि काहीतरी खूप मोठं करा. देशात आपले नाही तर जगात आपल्या देशाचे नाव रोशन करा.
जय हिंद, वंदे मातरम!