Believe Yourself In Marathi ! ध्येयावर लक्ष केंद्रित करा !

लोकं नाव ठेवतात त्याच उत्तर कसं द्यायचं

हां, ते हसतील कारण त्यांनी त्यांच्या सभोवताली पहिल्यांदा असा मनुष्य पाहिला आहे जो त्यांच्या सोसायटीच्या लेव्हल पेक्षा खुप मोठे स्वप्न बघत आहे. लोकांमध्ये कुतूहल आहे, त्यांच्या चर्चेचा विषय हाच आहे की बघा हा पराभूत होईल! कारण त्यांना असे वाटते की त्यांनी स्वतः ते काम केले असते तर ते स्वतः पराभूत झाले असते. परंतु ऐक, तू तर तू आहेस ना? मला माहित आहे, एकतर तुला माहीत आहे किंवा त्या परमेश्वराला माहीत आहे की तुझ्या ध्येयाला गाठण्यासाठी तू किती बैचेन असतो, तू कोणत्या परिस्थितिचा सामना करू शकतो! जगाने ठेवलेले नाव देखील तुझ्या प्रवासाचा एक भाग आहे, आणि हा खूप महत्वाचा भाग आहे.

अरे कुठलाही आवाज न ऐकता तुम्ही बसने एका शहरातून दुसऱ्या शहरात देखील जाऊ शकत नाहीत. तुम्हाला बस चा आवाज हा ऐकावाच लागणार आहे. त्या फटाक्यांची रोषणाई देखील आवाज झाल्याशिवाय बघायला मिळत नाही. ऐकावे तर लागणार आहे त्यामुळे ऐका!
एक खूप जुनी गोष्ट आहे ती म्हणजे खरा व्यक्ती तो आहे जो त्या दगडांपासून देखील घर बनवतो, जे त्याच्यावर फेकले गेलेले असतात. त्यामुळे म्हणू द्या लोकांना, तुमचे स्वतःचे ध्येयाला प्राप्त करण्यासाठी असलेला वेडेपणा आत्ता लोकांसाठी काहीतरी नवीन आहे. अरे, जेव्हा कधी आपण नवीन ड्रेस पहिल्या दिवाशी घालतो तेव्हा त्याच्याकडे पुन्हा पुन्हा बघितले जाते. तर आपल्या नवीन काहीतरी वेडेपणा वर सभोवताली असलेले लोक कमेंट का करणार नाहीत? त्यांनी उडवलेली तुमची खिल्ली, नकारात्मक बोलणे यांना खोटे ठरवण्यासाठी तितकाच वेळ लागेल जोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय गाठत नाही! तसे बरोबर तर आहे, जेव्हा तुम्ही काहीतरी मोठं करत असाल, तुमच्या ध्येयाला प्राप्त कराल तेव्हा काही लोकांचे चेहरे हे बघण्यासारखे झालेले असतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते, तेच लोक आज इतरांना किती अभिमानाने सांगतात की हो, मी त्याला किंवा तिला ओळखतो! आम्ही त्याला सांगत होतो की इतक मोठं स्वप्न बघू नकोस, हे सर्व आपल्या क्षमतेच्या बाहेरचे आहे, परंतु खरंच त्याला मानायला हवे की काय मनुष्य आहे तो, आम्ही ठेवलेले नावं त्याने हसून स्वीकारले आणि आज बघा तो खरच यशस्वी झालेला आहे. असेच होते या जगात, नाव तोपर्यंत ठेवले जाते जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाहीत. त्यानंतरच हे नाव ठेवणे बंद होईल.

त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याने स्वतःमध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होऊ देऊ नका. फक्त एक हसू दाखवून पुढे जात रहा. कारण तुम्ही जर त्यांच्याशी वाद घालत असाल तर त्यांच्यासाठी चर्चेचा विषय आणखी वाढेल आणि तुमची ऊर्जा तिकडे परावर्तित देखील होईल. त्यामुळे तुमच्या त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, लक्ष केंद्रित करा जी गोष्ट तुम्हाला आवडते त्यावर, तुमच्यासाठी ज्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे त्यावर, जी गोष्ट तुमची ओळख बनणार आहे त्यावर आणि त्या गोष्टीवर त्यासाठी तुम्ही सक्षम आणि लायक आहात!

 

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.