Students घर बसल्या पैसे कसे कमवू शकतात? | Ways to make money online for students in Marathi 2024

Ways to make money online for students in Marathi 2024

Ways to make money online for students in Marathi: मित्रांनो तुम्ही जर विद्यार्थी असाल तर घर बसल्या ऑनलाइन पैसे कसे कमवता येतात याविषयी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Earn Money Online Step by step guide in Marathi आणि टिप्स देणार आहोत.

आज विद्यार्थ्यांना internet वर वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे आज तुम्हाला हे जाणून घ्यायला मिळेल की आपल्या मोकळ्या वेळेत आपण additional money कशा प्रकारे कमवू शकतात. तुम्ही ऑनलाइन जॉब शोधण्यासाठी किंवा नवीन स्किल्स विकसित करण्यासाठी तुमच्या आवडीनुसार online job शोधू शकतात. यामध्ये तुमच्या आवडी निवडी देखील जॉब शोधताना मदत करतात. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि real online job च्या शोधत असाल तर students साठी ऑनलाइन पैसे कमविण्यासाठी बेस्ट टिप्स आज सांगतो आहोत.

Work from home jobs for students in Marathi

1. Freelance Writing (फ्रीलांसिंग लेखन)

ज्या कोणाला लेखन करायची आवड असेल ते Freelance Writing करू शकतात. Freelance writing हा जॉब ऑनलाइन जॉब पैकी खूप चांगला जॉब आहे. तुमच्या लेखन कौशल्यामध्ये ग्रामर आणि रिसर्च स्किल्स असायला हव्यात. एखादा computer किंवा मोबाईल आणि इंटरनेट या दोनच गोष्टींची गरज या कामासाठी असेल.

एक विद्यार्थी म्हणून तुम्ही अनेक writing jobs freelancing websites वर जाऊ शकतात. जास्त करून writing jobs मध्ये web pages साठी writing, ब्लॉग पोस्ट आणि articles यांचा समावेश होतो. तुम्हाला एक blog पूर्ण करण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाईल. त्यामध्ये तुम्हाला ते काम पूर्ण करून घ्यायचे असते.

सामान्यपणे प्रति शब्द (number of words), प्रति लेख (each blog), किंवा प्रोजेक्ट च्या आधारावर writing jobs किंवा तासानुसार पैसे देतात. खाली काही top sites देत आहे ज्यांच्या आधारे तुम्हाला online freelancing jobs मिळू शकतात.

Upwork, Guru, PeoplePerHour, TextBroker, Write.com, iWriter, Break Studios, LoveToKnow

2. Data Entry (डेटा एन्ट्री)

डेटा एन्ट्री हे देखील एक चांगले काम आहे. कॉम्प्युटर आणि चांगला टायपिंग स्पीड असणारे विद्यार्थी हे काम करू शकतात. Data Entry Jobs मध्ये Customers साठी Fast आणि Easy data type करणे समाविष्ट केलेले असते. अनेक विद्यार्थी डेटा एन्ट्री काम पार्ट टाईम मध्ये करत असतात. फक्त डेटा एन्ट्री चे काम घेण्यापूर्वी ते काम Genuine आहे कि नाही हे एकदा पडताळून पहा.

भाषांतर करणे (Translation)

तुम्हाला जर आता दोन भाषा येत असतील किंवा तुम्ही एखादी दुसरी भाषा शिकत असाल तर तुमच्या त्या भाषेच्या ज्ञानाचा वापर तुम्ही काही extra income करू शकता. अनेक कंपन्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या documents, सर्टिफिकेट, ऑडिओ फाईल आणि अनेक इतर गोष्टींचे भाषांतर करायला देतात.

तुम्ही जर एखाद्या भाषेत चांगले असाल आणि भाषांतर करू शकत असाल तर तुम्ही भाषांतर करून देण्याची सेवा देऊ शकतात. भाषांतर एजन्सी किंवा Freelancing साईट्स वर जाऊन भाषांतरच्या नोकरी तुम्ही मिळवू शकतात. तुमच्या स्किल्स अनुसार तुम्हाला विविध प्रकारचे translation jobs मिळू शकतात. इथे काही websites आणि कंपन्या दिलेल्या आहेत जिथे जाऊन तुम्हाला translation ची नोकरी मिळू शकते.

WordExpress, WordLingo, Translatorbase

3. ब्लॉगिंग (Blogging)

Students साठी एखादा अतिरिक्त income म्हणून ब्लॉगिंग कडे तुम्ही बघू शकता. जर तुमच्याकडे काही कला असेल किंवा तुम्हाला लिहायला आवडत असेल तर एखाद्या विषयावर तुम्ही content लिहून तुमच्या ब्लॉग ला इतरांसोबत शेअर करू शकता. तुम्ही शिकत असलेल्या विषयाला अनुसरून देखील तुम्ही ब्लॉग लिहू शकता किंवा एखाद्या common पण interesting अशा विषयावर तुम्ही ब्लॉग लिहू शकतात. एकदा तुमच्या ब्लॉग वर ट्राफिक यायला सुरुवात झाली की मग तुम्ही लगेच ब्लॉग ला monetize करण्यासाठी अनेक मार्गांचा वापर करू शकतात.

Earn money using blogging in Marathi | ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवावे

सर्वात आधी तुम्हाला एक domain name निवडायचा आहे. एखाद्या लोकप्रिय domain registration कम्पनी सोबत तुम्हाला ते domain name register करून घ्यायचे आहे. तुमचा ब्लॉग तुम्ही स्वतः डिझाईन करू शकतात किंवा त्यासाठी एखाद्या फ्रीलांसिंग वेब डिझाईनर ला देखील hire करू शकता. ब्लॉग लिहिल्यानंतर त्यावर इमेजेस ऍड करणे मात्र विसरू नका कारण त्याने ब्लॉग अधिक आकर्षक वाटतो. तुम्हाला ऑनलाइन टूल्स च्या माध्यमातून देखील images बनवता येतात. इंटरनेट वर अनेक ऑनलाइन इमेज एडिटिंग टूल्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही हे करू शकतात. Canva Online Image tool हे एक असे टूल्स आहे ज्याच्या मदतीने तुम्ही फ्री मध्ये इमेजेस बनवू शकतात. सहज सोप्या आणि आकर्षक अशा

इमेजेस तुम्ही canva च्या मदतीने बनवून तुमच्या ब्लॉग वेबसाईटला अधिक आकर्षक बनवू शकतात. तुमची वेबसाईट इंटरनेट वर दाखविण्यासाठी एक होस्टिंग तुम्हाला खरेदी करावी लागणार आहे. वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही तुमच्या ब्लॉग ला पुढे नेऊ शकतात. जर तुम्ही नियमित रूपाने ब्लॉग वर Quality पोस्ट लिहीत राहिला तर तुमच्या ब्लॉग कडे अनेक visitors आकर्षित होतील. विद्यार्थी त्यांच्या मोकळ्या वेळात एक ब्लॉग सुरू करून त्याला चालवू शकतात. जर तुमच्या ब्लॉगवर एक चांगल्या आकड्यात ट्राफिक येत असेल तर तुम्हाला एक स्टेबल इनकम सोर्स मिळू शकतो.

ऑनलाइन पैसा कमविणे हा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला फक्त हे समजून घेण्याची गरज आहे की तुम्ही जे काही करणार आहात त्यात तुम्हाला स्किल्स असणे गरजेचे आहे. Online jobs करून किंवा online पैसे कमावून एखादा विद्यार्थी student loan  घेत असेल तर त्याची परतफेड करू शकतो किंवा शिक्षण खर्चात हातभार लावू शकतो. तुम्हला एखादी चांगली गोष्ट विकत घ्यायची असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.

मित्रांनो तुम्हाला आता Ways to make money online for students in Marathi या लेखाच्या मदतीने हे तर कळलेच असेल students सुद्धा घर बसल्या चांगली इनकम करू शकतात.

हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. जेणे करून त्यांना सुद्धा त्याचं शिक्षण घेता घेता part-time income करता येईल.  तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नमूद करा. आम्ही लवकरात लवकर तुमच्या शंकांच निराकरण करू. Online earning tips in Marathi साठी या लिंक वर क्लिक करा.

हे देखील वाचा

Earn money using blogging in Marathi

How to earn money from Google in Marathi

How To Earn Money From Youtube in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

3 thoughts on “Students घर बसल्या पैसे कसे कमवू शकतात? | Ways to make money online for students in Marathi 2024”

Leave a Comment