कार मधून पैसे कसे कमवतात? | Car Business Idea in Marathi

कार मधून पैसे कसे कमवतात? | Car Business ideas in Marathi

Car Business ideas in Marathi: आपल्या कार पासून पैसे कसे कमवतात? या मध्ये काही शंका नाहीये की आजच्या आधुनिक काळात पैसे कमविण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु सर्वात मोठी समस्याच ही आहे की लोक त्या संधी शोधू शकत नाहीत. तुम्हाला त्या संधी सापडल्या तर तुम्हाला अनेक पैसे मिळू शकतात. सध्याच्या काळात जर तुम्हाला बेरोजगारी किंवा पैशांची अडचण जाणवत असेल तर तुम्ही तुमची कार आणि ड्रायव्हिंग स्किल्सचा वापर करून खूप चांगले पैसे कमवू शकता.

जर तुमच्याकडे कार असेल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे कार चालवता येत असेल तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही प्रत्येक महिन्याला 30 ते 50 हजार रुपये कमवू शकतात. जर तुम्ही एखादा चांगला जॉब करत असाल आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा इनकम सोर्स हवा असेल तर पार्ट टाईम मध्ये तुमची कार तुम्ही चालवून 15 ते 20 हजार रुपये महिन्याला एक्स्ट्रा कमवू शकतात.

या लेखात आपण कार मधून पैसे कसे कमवता येतील याविषयी माहिती देणार आहोत. तसे बघायला गेलं तर कार चालवून पैसे कमवायचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी अनेक पर्याय हे योग्यच असतात असे नाही. आज आम्ही जे पर्याय सांगणार आहोत ते लॉयल आहेत. यातून तुम्हाला पैसा हा नक्कीच मिळणार आहे. यापैकी काही पर्याय मार्ग असे देखील आहेत ज्यामध्ये तुम्ही फक्त कार देऊन पैसे कमवू शकतात. यामध्ये मग तुम्हाला एका ड्रायव्हर सारखे काम देखील करावे लागणार नाही.

आपल्या कार पासून पैसे कसे कमवतात? | How to make money from your car in Marathi?

How to make money from your car in Marathi
How to make money from your car in Marathi

कार चालवून पैसे कमविण्याच्या नावावर आजकाल बाजारात खूप जास्त फ्रॉड सुरू आहेत. स्कॅमर्स लोक हे तुम्हाला जास्तीत जास्त पैसे कमविण्यासाठी लालच देतील किंवा त्यासाठी आधी काही पैसे घेऊन ब्लॉक देखील करतील. त्यामुळे अशा कोणत्याही ऑनलाइन फ्रॉड चा शिकार व्हायचे नसेल तर आमच्या आर्टिकल मधील खरे मार्ग समजून घ्या.

हा लेख लिहिण्याचा आधी आम्ही खोलवर शोध घेतलेला आहे. इथे आम्ही तुम्हाला केवळ त्याच मार्गांविषयी सांगणार आहोत जे तुम्हाला खरोखर कमाई करून देऊ शकतील. इथे तुम्हाला तुमच्या मेहनातीचे आणी कष्टाचे पैसे योग्य तेच मिळणार आहेत. चला तर मग आता कार चालविण्याच्या त्या मार्गांविषयी जाणून घेऊयात ज्यातून तुम्ही एक चांगली रक्कम मिळवू शकता.

हे देखील वाचा: Top 51+ small scale business ideas in Marathi

1. कॅब कंपन्या साठी कार चालवून पैसे कमवा | What is Ola/Uber Cab Business in Marathi

What is Ola Cab Business in Marathi
What is Ola Cab Business in Marathi

आजच्या काळात भारतात Ola, Uber आणि यासारख्या अनेक कंपन्या कॅब बुकिंग क्षेत्रात काम करत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की या कंपनी लोकांना स्वतः हायर करतात तर तुमचा हा गैरसमज आहे. या कंपन्यांनी एक निव्वळ इकोसिस्टम बनवलेली आहे आणि यात सर्वसामान्य लोकच काम करतात. या प्रकारच्या कंपनीज कमिशन आधारावर काम करतात. म्हणजेच तुम्ही या कंपन्या सोबत जोडले जाऊन कार चालवू शकतात. तुम्हाला ग्राहक मिळवून द्यायचे काम या कंपन्या करत असतात. भाडे वैगेरे सर्व काही या कंपन्याद्वारे ठरविले जाते मात्र तुम्हाला तुमची रक्कम मिळाल्याने यात तुम्हाला भरपूर फायदा होतो.

अनेक शहरांमध्ये OLA किंवा UBER यासारख्या सुविधा उपलब्ध नाहीयेत. परंतु तुम्ही जर मोठ्या शहरात जात असाल आणि तिथे तुमची सोय असेल तर मग या कंपनीसोबत तुम्ही ड्रायव्हर म्हणून जोडले जाऊ शकतात. यामध्ये तुमची कार देखील तुम्ही ऍड करू शकता.

या कंपन्यांची खास गोष्ट म्हणजे यामध्ये कंपनीकडून तुमच्यावर कोणत्याही प्रकारची बंधनता नसते. म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला वाटेल त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकतात. या कंपनी कडून तुम्हाला एक चांगल्या स्तराची इनकम ही होत असते.

यामध्ये सर्वात खास गोष्ट म्हणून तुम्ही जितके जास्त वेळ काम कराल किंवा जितका जास्त काळ तुम्ही राईड पूर्ण कराल तितकी जास्त इनकम तुमची होणार आहे. याशिवाय प्रोत्साहन म्हणून या कंपनी ड्रायव्हर ला इंसेंटिव्ह देखील देत असतात. कॅब बुकिंग कंपन्यासोबत काम करण्याचा एक मोठा फायदा हा देखील आहे की इथे तुम्हाला डेली पेमेंट चा ऑप्शन देखील मिळतो. म्हणजेच तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दररोज च्या दररोज पैसे काढू शकतात. आता ता कंपन्यांच्या बिझनेस मॉडेल विषयी विचार केला तर जवळपास सगळे काम हे ड्रायव्हर करत असतात मात्र त्या ड्रायव्हर पर्यंत ग्राहक पोहोचवण्याचे काम या कंपनी करत असल्याने त्याचे कमिशन ते ड्रायव्हर कडून घेतात. हे कमिशन एकतर ड्रायव्हर स्वतः भरतो किंवा ऑनलाइन पेमेंट मधून ते कट करून घेतले जाते.

अनेक लोकांची ही तक्रार असते की या कंपन्या सोबत जोडले गेल्यानंतर चांगली कमाई होत नाही मात्र तुम्ही जर योग्य स्ट्रॅटेजी नुसार काम केले तर तुम्हाला यातून भरपूर फायदा हा होऊ शकतो. तुम्ही जर थोडा खर्च करून गाडीत CNG बसवून घेतला तर तुमचा खर्च कमी होऊन जातो. किंवा तुम्ही अशा एखाद्या भागात काम करू शकतात जिथे तुम्हाला अधिकाधिक राईड्स मिळू शकतील. अशा काही टेक्निक वापरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

2. ट्रॅव्हल एजन्सी सोबत संपर्क करून कार मधून पैसे कमवा | Travel Agency Business Plan in Marathi

जर तुम्ही अशा एखाद्या शहरात राहताय ज्यामध्ये अनेक शेजारी पर्यटन स्थळे आहेत तर मग साहजिकच आहे की तिथे अनेक पर्यटक भेट देण्यास येत असतील. यापैकी अनेक पर्यटक हे काहीही गाडी न आणता फिरण्यास येतात मग त्यांना तिथे फिरण्यासाठी एखाद्या कारची आवश्यकता असते. त्यामुळे मग ते एखाद्या ट्रॅव्हल एंजन्सी सोबत कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्या फिरण्यासाठी ट्रॅव्हल एजन्सी त्यांना मदत करत असते.

म्हणजे जर तुमच्याकडे एखादी कार असेल आणि तुमच्याकडे स्किल्स असतील तर मग तुम्ही लोकांना फिरवू शकतात. यासाठी तुम्हाला ट्रॅव्हल एजन्सी सोबत कॉन्टॅक्ट करणे अधिक सोयीस्कर असेल. अशा प्रकारच्या एजन्सी तुम्हाला कमिशन बेसीस वर हायर करतात. टुरिस्ट कंपनी त्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतात आणि तुम्ही त्यांना फिरविल्याच्या मोबदल्यात तुम्हाला देखील एक चांगली रक्कम मिळते. तुम्हाला या ठिकाणी एखादा फिक्सड जॉब हवा असेल तरी देखील टुरिस्ट एजन्सी तुम्हाला यामध्ये मदत करू शकते.तुम्ही केवळ टुरिस्ट ला एका शहरात फिरविण्यापेक्षा एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरविण्याचे काम करून थोड्याफार जास्त प्रमाणात पैसे कमवू शकतात. सोप्या भाशेत सांगायचे झाले तर ट्रॅव्हल एजन्सी तुम्हाला लॉंग राईडला पाठवू शकते.

मुख्य स्वरूपात अशा ठिकाणी किलोमीटरनुसार पैसे आकारले जातात मात्र कधी कधी एखादे पॅकेज देखील त्या पर्यटकांना ऑफर केले जाते. यामध्ये पर्यटक आणि कंपनी या दोघांचा फायदा असतो. तुम्हाला या एजन्सी एकतर एक रक्कमी पैसे देईल किंवा तुम्हाला इथे कमिशन बेसीस वर काम करावे लागणार आहे. तुम्ही जितका जास्त वेळ काम कराल तितके जास्त तुम्हाला फायदा आणि इनकम मिळत जाईल.

3. ऑफिस किंवा कॉल सेंटर साठी कार चालवून पैसे कमवा | Rent a car Business in Marathi

जर तुमच्याकडे एक मोठी म्हणजेच सेव्हन सीटर कार असेल तर मग तुम्ही तुमची कार एखाद्या ऑफिस मध्ये किंवा कम्पनी मध्ये कामाला लावू शकतात. तुम्ही यामध्ये निव्वळ तुमची कार देऊन भाडे घेऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः कार चालवून भाड्यापेक्षा अधिक पैसे कमवू शकतात. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जर समजून घ्यायची असेल तर स्कुल बस चे उदाहरण घेऊयात. अनेक वेळा शाळा कमिशन बेस वर स्कुल बस घेतात. यामध्ये ते मुलांकडून स्कुल बसचे पैसे घेतात आणि त्यातून काही मोठी रक्कम बस मालक आणि चालकाला देतात. अशाच प्रकारे ऑफिस आणि कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना या सुविधा देत असतात.

अशात तुम्ही तुमच्या जवळील ऑफिस किंवा कॉल सेंटर सोबत संपर्क करून त्यांना तुमची कार रेंट मध्ये देत असतात. तुम्ही यात स्वतः त्या लोकांना घ्यायला आणि सोडवायला जाण्याचे काम केल्यास तुम्हाला अधिक इनकम होऊ शकते. तुम्हाला या जॉब मध्ये एक बाधा कायम असेल की तुम्हाला रोज एका निश्चित वेळेवर काम करावे लागणार असेल.

4. आपली कार रेंट वर देऊन पैसे कमवा | Rent Car and Earn Money in Marathi

Rent Car and Earn Money in Marathi
Rent Car and Earn Money in Marathi

जर तुम्ही बघितले असेल तर बाजारात अनेक अशा कंपनी आहेत ज्या लोकांना रेंट वर कार उपलब्ध करून देत असतात. ओला आणि उबेर सारख्या कंपन्यांप्रमाणे या साईट्स देखील कमिशन बेसीस वर काम करतात. ज्या प्रकारे ओला आणि उबेर आणि मध्ये ड्रायव्हर ला कमिशन मिळते त्याच प्रमाणे तुम्ही कार रेंट वर देऊन पैसे कमवू शकतात. तुमची कार जितक्या जास्त वेळेस रेंट वर जाईल तितकी जास्त वेळेस तुम्हाला पैसे मिळतील. जर लोकप्रिय कार भाडेतत्वावर देणाऱ्या कंपन्या शोधायच्या झाल्यास तर त्यात RentalCars आणि Zoom Cars यांची नावे समोर येतात. तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवू शकतात.

परंतु इथे समस्या ही आहे की या प्रकारच्या कंपन्या फक्त मोठ्या शहरात आपल्या स्वर्व्हिसेस देत असतात. त्यामुळे जे मोठ्या शहरात असतात तेच लोक आपल्या गाड्या या भाडे तत्वावर देऊ शकतात. परंतु जर तुम्ही एखाद्या छोट्या शहरात रहात असाल तर तुम्ही एखाद्या जवळच्या लोकल व्यवसायांशी संपर्क करून गाडी भाडेतत्वावर लावू शकतात.

FAQ

उबर ओला ड्रायव्हर एक दिवसात किती पैसे कमवतात?
ओला उबेर सोबत जोडलेले ड्रायव्हर दिवसाला 1000 ते 3000 रुपये कमवतात.

पुण्यात ओला उबेर उपलब्ध आहेत का?
हो, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये ओला आणि उबेर सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.

आज आपण काय शिकलो? | Conclusion

आम्हाला आशा आहे की How to earn money from your car in Marathi हा आमचा लेख तुम्हाला आवडला असेल. आमचा कायम हाच प्रयत्न असतो की आम्ही ज्या विषयावर माहिती देत आहोत त्याची (कार पासून पैसे कसे कमवतात) माहिती तुम्हाला परिपूर्ण मिळावी. जेणेकरून पुढे जाऊन देखील तुम्हाला या विषयावर इतर कुठेही माहिती शोधण्याची गरज पडू नये.

Car Business in Marathi या व्यवसायाबद्दल तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्या शंकांच लवकरात लवकर निरसन करायच प्रयन्त करू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment