12 Benefits of Blogging in Marathi | ब्लॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत

Topics

12 Benefits of Blogging in Marathi | ब्लॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत

तुम्ही कधी ब्लॉगिंगबद्दल(Blogging) ऐकले आहेत का? जर आपण ब्लॉगिंगबद्दल अजून सुद्धा कधीही ऐकले नसेल तर आपण हा लेख चांगल्या प्रकारे वाचला पाहिजे कारण आज मी तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल आणि ब्लॉगिंगमुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे.

तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या शंका हा लेख वाचल्यानंतर नक्की दूर होतील. ब्लॉगिंगबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे कारण आजपर्यंत कोणीही त्याबद्दल पूर्ण माहिती पुरवली नाही आहे. खासकरून मराठी मध्ये तर ब्लॉगिंग बद्दल कोणतीही माहिती इंटरनेट(Internet) वर उपलब्ध नाही आहे.

आज बरेच असे लोक आहेत जे आपल्या ९ ते ६ नोकरी करून खुश नाही आहेत. कारण त्यांना त्यांच्या इच्छेनुसार काहीही करता येत नाही आहे. उलट त्यांना कंपनी किव्हा बॉस सांगेल तसे काम करायला लागते आणि एवढं सगळं करून सुद्धा त्या कामाचे क्रेडिट मॅनेजर आणि कंपनीतली सिनियर लोक घेऊन जातात. अशाने या लोकांना personal आणि professional लाईफ मध्ये समतोल राखता येत नाही आहे.

जर का मी तुम्हाला सांगितले कि तुम्ही तुमच्या मर्जीने तुम्हाला हवे असलेले काम घर बसल्या करू शकता आणि तुम्हाला त्या कामाचे पैसे सुद्धा भेटतील तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण खरच ब्लॉगिंग करून तुम्ही घरी बसल्या हवे तेवढे कमावू शकता. फक्त गरज आहे थोड्या मेहनतीची आणि संयमाची.

जर तुम्ही नवीन ब्लॉग सुरु करण्याचा प्लॅन करत असाल तर सर्व प्रथम हा आमचा ब्लॉग वाचा.

ब्लॉगिंगची सुरवात करण्याआधी तुम्हाला ब्लॉगिंगबद्दल जाणून घेण महत्वाचे आहे. कारण मी अशा खूप ब्लॉगर्स ला बघितले आहे जे हौशीत ब्लॉग सुरु तर करतात पण त्यांच्यात संयमाची कमी असल्याने ते हताश होऊन ब्लॉगिंग बंद करतात. म्हणूनच, कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती मिळवणे शहाणपणाचे आहे. म्हणून आज मी विचार केला की ब्लॉगिंगच्या फायद्यांविषयी तुम्हाला पूर्ण माहिती देतो, जेणे करून तुम्ही सुद्धा तुमचा एक ब्लॉग सुरु कराल. तर चला मग मित्रांनो जाणून घेऊया ब्लॉगिंगमुळे होणारे 12 फायदे.

१. ब्लॉगिंगमुळे तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकता येतात.

ब्लॉगिंगचा अर्थच असा आहे कि आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवणे. त्यामळे ब्लॉग लिहताना आपण प्रयन्त करतो कि ज्या विषयावर आपण blog म्हणजे लेख लिहत आहोत त्याची पूर्ण माहिती इंटरनेट किव्हा पुस्तकातून काढून त्याचा पूर्ण अभ्यास करूनच ती माहिती आपल्या ब्लॉग वर सादर करतो. अशाने तुम्ही त्या विषयाचा सखोलपणे अभ्यास करता आणि त्यातूनच आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकता येतात.

२. ब्लॉगिंगमुळे तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार मांडू शकता.

कोणत्याही गोष्टीबद्दल स्पष्टपणे विचार मांडणे आणि नवीन कल्पनांबद्दल विचार करणे हे देखील एखाद्याच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. आणि आपल्याला शाळेमध्ये या गोष्टींबद्दल शिकवले जात नाही. म्हणूनच जर तुम्ही नियमित ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला तुमचे विचार जीवनात स्पष्टपणे मांडायला मदत होईल. ब्लॉगिंग आपल्याला सभोवतालच्या गोष्टींबद्दल अधिक सखोलपणे विचार करण्यास प्रवृत्त करते, जसे की आपले कुटुंब, समाज इ. तसेच ब्लॉगिंगमुळे आपण स्वतःबद्दलचे सामर्थ्य आणि कमकुवतेबद्दल देखील जाणून घेऊ शकतो जेणेकरून तुम्ही त्यात सुधारू आणू शकाल.

3. ब्लॉगिंगमुळे आपण चांगले लिहू शकता

म्हणतात ना जे काम आपण सारखे सारखे करतो त्यात आपल्याला निपुणता भेटते. तशाच प्रकारे जर आपण ब्लॉगिंग करत असाल तर निरंतर निरनिराळ्या गोष्टींबद्दल लिहून तुम्ही तुमच्या लिखाणावर प्रभुत्व मिळवू शकता. त्यामुळे ब्लॉगिंग हळू हळू तुमची लेखन क्षमता वाढते.

४. ब्लॉगिंगमुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

मी बरेच ब्लॉगर्स पाहिले आहेत ज्यांना पूर्वी इतका आत्मविश्वास नव्हता परंतु काळाबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आहे. ब्लॉगिंग च्या मदतीने तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. कदाचित तुम्ही एखाद्या ठिकाणी चुकीचे देखील असाल पण तुम्हाला तुमचे मत मांडायचा आत्मविश्वास वाढेल. आणि तुम्ही पुढच्या वेळी एखाद्या विषयावर तुमच मत मांडताना घाबरणार नाहीत.

५. ब्लॉगिंग द्वारे तुम्ही पैसे देखील कमवू शकता.

होय मित्रांनो, हे खरे आहे की आपण ब्लॉगिंग करून खूप चांगले पैसे कमवू शकता परंतु त्यासाठी आपल्याला मेहनतीसोबत थोडा संयम सुद्धा ठेवायला लागेल. असे बरेच ब्लॉगर्स आहेत जे महिन्याला लाखो रुपये कमवतात. कारण तुमचा ब्लॉग एका दिवसात प्रसिद्ध कधीच होणार नाही त्यासाठीच्या तुम्हाला ३-६ महिन्याची मेहनत घ्यावी लागेल म्हणून, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण संयम बाळगणे आवश्यक आहे आणि आपले कार्य काळजीपूर्वक केले पाहिजे. आणि याचा निश्चित परिणाम तुम्हाला मिळेल.

६. महिलांसाठी ब्लॉगिंग / Blogging for Housewives

अनेक स्त्रिया ज्या घरात असतात त्या घरात बसून बसून कंटाळून जातात. अशा स्रियांना कळत नाही कि मोकळ्या वेळामध्ये त्यांना काय करायला पाहिजे? अशा स्त्रियासाठी ब्लॉगिंग उत्तम मार्ग आहे थोडे पैसे कमवायचा. जर का अशा महिला ब्लॉगिंग करायला सुरवात करतील तर त्यांच्या वेळेचा योग्य वापर होऊ शकतो तसेच त्यातून त्या चार पैसे पण कमवू शकतात. यामुळे त्यांच्या परिवाराला ते आर्थिक दृष्ट्या सपोर्ट करू शकतात आणि यामुळे त्यांचा घरात मन सन्मान पण वाढेल.

वृद्ध आणि अपंग व्यक्ती सुद्धा ब्लॉगिंग अगदी साजह रित्या करू शकतात कारण यामध्ये त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही.

७. ब्लॉगिंग मुळे तुम्ही इतरांना मदत करू शकता

आपण एखाद्याला मनापासून मदत करू इच्छित असाल तर देव देखील आपल्याला मदत करतो. होय मित्रांनो, आपण आपल्या ब्लॉगवरुन जर का चांगले पैसे कमवत असू तर हि आपली जबाबदारी बनते की आपण आपल्या ब्लॉगवर आलेल्या वाचकांना देखील योग्य माहिती देऊन त्यांची मदत केली पाहिजे. जर आपण दुसर्यांसोबत चांगले करू तर देव सुद्धा आपल्यासोबत चांगले करतो. मी अशा खूप ब्लॉगर्स ला ओळखतो जे स्वतःच्या प्रॉफिटमधील बऱ्या पैकी मिळकत गरीब लोकांना दान करतात.

८. ब्लॉगिंगसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्व ज्ञानाची गरज नाही आहे.

जसे इतर कोणतेही कमी करण्यासाठी तुम्हाला त्या कामातील माहिती गरजेची असते परंतु ब्लॉगिंगमध्ये असे काहीही नाही आहे. कोणीही हे अगदी सहजपणे शिकू शकते. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे केवळ 15 मिनिटांत आपण आपला ब्लॉग तयार करू शकता. यासाठी कोणत्याही कोडिंग किंवा तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही आहे.

९. ब्लॉगिंग पूर्णपणे फ्री आहे.

आजकाल कोणीही ब्लॉग सुरू करू शकतो. Google द्वारे प्रदान केलेले प्लॅटफॉर्म ब्लॉगर(Blogger) हे एक फ्री प्लॅटफॉर्म आहे. तसेच तुम्ही आपले स्वतःचे डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून आपला ब्लॉग प्रारंभ करू शकता आणि तो देखील परवडणार्‍या दरावर. जर का तुम्ही डोमेन आणि होस्टिंग खरेदी करून ब्लॉग बनवणार असाल तर वर्डप्रेस WordPress या फ्री content management system चा वापर करा.

१०. तुम्ही जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून ब्लॉगिंग करू शकता.

ब्लॉगिंगचा सगळ्यात मोठा फायदा जो मला वाटतो तो म्हणजे मी कुठे हि बसून ब्लॉग लिहू शकतो. त्यासाठी फक्त दोन गोष्टींची आवश्यकता लागते ती म्हणजे लॅपटॉप आणि इंटरनेट connection. अशाने तुम्हाला तुमच्या परिवारापासून लांब जाण्याची गरज सुद्धा लागत नाही. तुम्ही जिथे आहेत तिथून काम करत करत पैसे कमवू शकता.

११. ब्लॉगिंगमुळे तुमचा स्वतःचा बिझनेस तयार होईल

जस जस तुम्ही ब्लॉगिंग च्या क्षेत्रात पुढे जाल तसतसा तुमचा बिझनेस सेट अप होत जाईल, यामुळे तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःचे बॉस असाल, तुम्हाला कोणाच्या हाताखाली काम करायची गरज लागणार नाही. उलट जेव्हा तुमचा ब्लॉग खूप प्रसिद्ध होईल तेव्हा तुम्हाला तो Manage करण्यासाठी इतर लोकांना कामावर ठेवण्याची गरज लागेल.

१2. तुमचा ब्लॉग तुम्हाला तुमच्या मृत्यू नंतर देखील अमर ठेवेल.

जस कि आपल्याला माहिती आहे या जगातील प्रत्येक जीवित वस्तू एक ना एक दिवस मरून जाणार आहे. परंतु असे म्हटले जाते कि writing तुमच्या मरणानंतर सुद्धा जिवंत राहते. त्यामुळे तुम्हाला तुमचे विचार तसेच तुम्हाला असलेली माहिती हि अमर ठेवायची असेल तर आजच ब्लॉगिंग करायला सुरवात करा!!

तसेच ब्लॉगिंग सोबत Digital Marketing बद्दल सुद्धा पूर्ण कल्पना तुम्हाला असणे गरजेचे आहे. तुम्हाला पुढील लिंक वर क्लिक करून Digital Marketing PDF फ्री मध्ये भेटून जातील.

तर मित्रांनो मला आशा आहे कि तुम्हाला ब्लॉगिंग (blogging) करण्याचे फायदे समजले असतील. मित्रांनो तुमच्याकडे एक विनंती होती, कि तुम्ही सर्व हा लेख तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेर करा जेणे करून जो कोणी ब्लॉगिंग सुरु करायचा विचार करत असेल तर त्याला यातून मदत होईल.

All the best

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “12 Benefits of Blogging in Marathi | ब्लॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत”

Leave a Comment