आयुर्वेदाचा वापर हा आजपासून नाही तर प्राचीन काळापासून निरंतर केला जात आहे, आयुर्वेद हा जुन्या काळात सुद्धा मानवी आरोग्यासाठी उपयोगी होता आणि आजच्या आधुनिक काळातही आयुर्वेदाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, आयुर्वेदाचा उपयोग केवळ आपल्या शरीरावरील त्वचेसाठी नाही तर अंतर्गत शरीरातील उपचार करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधांचा वापर केवळ भारतातच नव्हे तर विदेशामध्येही केला जातो. कारण आयुर्वेदात अनेक आजारांपासून लढण्याची शक्ती असते.
आजच्या प्रगतशील युगात आधुनिक जीवन शैली ही पुरुषांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडत आहे, यामुळे पुरुषांना आपल्या आरोग्यासंबंधी आधीच सावध व्हायला पाहिजे. पुरुषांची जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवईमुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर तुम्ही आताच तुमच्या आरोग्य संबंधी जागरूक नाही झालात तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या आजाराला पुढे जाऊन सामोरे जाऊ लागू शकते.
पुरुषांसाठी आयुर्वेदिक आरोग्य टिप्स
जंक फूड च्या सततच्या सेवनाने शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते, जर जंक फूड आपल्या रोजच्या जेवणाचा भाग असेल तर आपल्याला हे खाण्याचे लवकरात लवकर कमी केले पाहिजे. आपल्याला आपल्या खाण्यामध्ये २ केळी जरूर खायला हवीत, केळी खाल्याने आपल्या कामासाठी लागणारी ऊर्जा दिवसभर कमी होत नाही आणि हृदयाच्या अनेक आजारापासून आपल्याला दूर ठेवेल. जर आपण पॅक फूड नेहमी खात असाल तर ही सवय आपल्याला बदलली पाहिजे.
व्यायाम किंवा चालण्याचा व्यायाम केल्या शिवाय आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकत नाही. जर आपल्याला तंदुरुस्त रहायचे असेल तर नियमित व्यायाम करा. तसेच चालण्याचा व्यायाम करा. सोडायुक्त कोल्ड ड्रिंक, कॉफी, लाल मासं, तेलकट पदार्थ यांचे सेवन कमी करा व कधी कधीच सेवन करा, कारण यांच्या नियमित सेवनाने आपल्याला नुकसानच होईल. जेवणामध्ये चांगल्या तेलाचा वापर करावा. अश्या पदार्थाचे नियमित सेवनाने आपले वजन वाढेल आणि वाढलेले वजन पुरुषांच्या योन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव होतो. म्हणून जास्त वजन वाढून देऊ नका, जर व्यायामशाळेत(Gym) जायला आपल्याकडे वेळ नसेल तर घरी व्यायाम करा, लिफ्ट चा वापर टाळा, नियमित चालण्याचा वापर करा. ऑफिस, बाजारात चालत जाणे शक्य असेल तर चालत जा किंवा सायकलचा वापर करा. आहारात ताज्या फळांचा तसेच ताज्या भाज्यांचा वापर करावा, यामुळे आपले आरोग्य चांगले राहील. सकाळी नाश्ता जरूर करा, रात्रीचा आहार कमी व हलका करावा, रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून व्यायाम करावा.
सलाड व अंकुरित कडधान्यांचा वापर जेवणात करावा, जेवणात चपाती व भात एकाच वेळी खाऊ नये.
आयुर्वेदिक टिप्स
अनेक असे आयुर्वेदिक औषध आहेत ज्यामुळे आपण आपले आरोग्य सुधारू शकतो तसेच आपले शरीर मजबूत करू शकतो. आयुर्वेद हा खूप सोपा व कमी खर्चिक उपाय आहे. आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत यामुळे केवळ आपले शरीर तंदुरुस्त होत नाही तर आपले मन देखील शांत रहाते. अंघोळीच्या आधी तेल मालिश केल्याने डिमेंशिया च्या उपचाराचा महत्वपूर्ण मदत होते, एनिमा सारखे अन्यकर्म शरीराला आतून स्वच्छ करणाऱ्या प्रक्रियेला मदत करते. अनेक आयुर्वेदिक संस्था ब्राह्मी, अश्वगंधा व इतर मुख्य आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करून शांतीदायक औषध व डिमेंशिया च्या उपचार साठी औषध विकसित करत आहेत. भृंगराज तेलाचा आयुर्वेदात खूप महत्व आहे कारण या तेलाने आपले केस सुंदर व घनदाट बनतात भृंगराज तेलाचा वापर करून केसांची मालिश करा.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.