Benefits of eating while sitting on the ground in Marathi | जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे

आजकाल लोकांना जमिनीवर बसून भोजन करणे कसेतरीच वाटते कारण त्यांना वाटते आपण जमिनीवर बसून भोजन करतो हे लोकांना समजल्यावर लोक काय बोलतील, त्यांना जमिनीवर बसून जेवायला लाज वाटते आणि जास्त करून लोक टेबल किंवा डायनिंग टेबल वर जेवतात. परंतु कदाचित आपल्याला जमिनीवर बसून खाण्याचे फायदे माहित नसतील.

प्राचीन काळात मोठे मोठे ऋषी महर्षी जमिनीवर बसूनच आहार घेत असत यासाठी नाही कि ते असभ्य होते. जमिनीवर बसून भोजन घेतल्याने खूप फायदे होतात. आपण जेंव्हा जमिनीवर बसून जेवता तेंव्हा केवळ फक्त आहार घेत नाही तर एक योगासन देखील करत असता. आपल्या भारतीय परंपरे नुसार जमिनीवर बसून भोजन घेतला जातो. आपण ज्या मुद्रेत बसून भोजन घेतो त्याला सुखासन व पद्मासना शी तुलना केली जाते. हा आसन आपल्या आरोग्या च्या दृष्टीने खूप लाभदायक आहे. ह्या प्रकारे आहार घेल्याने आपण एक योगासन देखील करत असतो म्हणून आपण जमिनीवर बसून भोजन करा.

food2 Marathi varsa

जमिनीवर बसून भोजन केल्याचे फायदे

आपण जेंव्हा जमिनीवर बसून भोजन घेतो तेंव्हा आपल्या पाठीच्या कण्याच्या खालच्या हाडावर जोर पडतो ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो आणि आपली कंबर दुखत नाही. खाली बसल्याने आपला श्वास थोडा मंद होतो, मांसपेशी मधील ताण कमी होऊन शरीरातील रक्तदाब कमी होतो. ज्या मुळे आपल्याला उच्च रक्तदाब किंवा कमी रक्तदाब सारख्या समस्या होत नाहीत आणि हृदया संबंधी आजारांचा धोका टळतो.

जेंव्हा आपण खाली बसून जेवता तेंव्हा आपली पचनक्रिया योग्य प्रकारे चालते. यामुळे आपण केलेला भोजन लवकर पचतो. अजून खाली बसून भोजन करण्याचे फायदे आहेत. जेंव्हा आपण खाली बसून आहार खाण्याच्या आनंद घेत असतो तेंव्हा आपण एक योगाआसन देखील करत असतो. जमिनीवर बसून जेवतो तेंव्हा आपल्याला अन्नाचा घास घेताना वाकायला लागते. आपण घास घेताना वाकतो आणि परत सरळ होतो अशी क्रिया आपण जेवण संपेपर्यंत करत असतो. असे केल्याने आपल्या पोटातील मांसपेशी निरंतर कार्य करत असतात. असे केल्याने आपली पचन क्रिया योग्य प्रकारे चालते आणि आपले भोजन चांगल्या रीतीने पचते.

जेंव्हा आपण सगळे एकत्र खाली बसून आहार करतो तेव्हा परिवारातील सदस्यांमध्ये मधुर संबंध स्थापित होतो. जेंव्हा सगळे एकत्र पद्मासनामध्ये बसून भोजन करतो तेंव्हा आपला मानसिक तणाव दूर होतो आणि आरोग्य पण ठीक राहते आणि आपल्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत होतो.

खाली बसून भोजन केल्याने आपली पचन क्रिया चांगली होते आणि यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. खाली मांडी घालून भोजन केल्याने आपल्या ढोप्याना आराम मिळतो आणि ढोपे दुखीचा त्रास होत नाही, तसेच आपल्या ढोप्यांमध्ये लवचिकता राहते आणि यामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास होत नाही.

food1 Marathi varsa

जेंव्हा आपण खाली बसून भोजन करतो तेंव्हा आपले पोट, पाठीचा खालचा भाग व कुल्ह्या च्या मांसपेशींमध्ये ताण पडतो. यामुळे आपल्याला आराम मिळतो. जर आपला वजन जास्त असेल आणि बऱ्याच प्रकारचे व्यायाम करून देखील वजन कमी होत नसेल तर आपल्याला खाली बसून आहार करायला हवा. जमिनीवर बसणे हा एक व्यायामच आहे. खाली बसणे आणि उठणे हा एक अर्धा पद्मासन आहे ज्यामुळे आपला भोजन लवकर पचायला मदत करतो. मांडी घालून बसल्याने आपल्या शरीराच्या रचने मध्ये सुधार येतो. ज्यामुळे आपल्याला एक निरोगी शरीर मिळतो, आपल्या मांसपेशींना मजबुती मिळते आणि आपल्या रक्तसंचारत कोणतीही समस्या येत नाही.

एका योग्य मुद्रेत बसल्याने आपल्या शरीरातील रक्त संचार ठीक राहते आणि त्याच बरोबर आपल्या नसान मधील दबाव कमी होतो. आपली पचन क्रिया आणि रक्त संचार योग्य तरेने चालण्याने आपल्या शरीरात महत्वाची भूमिका बजावतो. जेंव्हा भोजन लवकर पचतो तेंव्हा हृदयाला कमी मेहनत घ्यावी लागते आणि हृद्य संबंधी समस्या कमी होतात.

आपले हृदय, शरीर, पचन क्रिया व रक्त संचार योग्य प्रकारे चालत असेल तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो आणि आपण जास्त काळासाठी निरोगी राहतो. आपले आयुर्मान वाढते. हे काही जमिनीवर बसून जेवण्याचे फायदे आहेत यामुळे आपल्या शरीरास खूप फायदा होईल आणि हे फक्त आयुर्वेद सांगत नाही तर विज्ञानात देखील सांगितले आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment