Sex Education For Children in Marathi | कोणत्या वयामध्ये मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल माहिती दिली पाहिजे?

भारतामध्ये नेहमीच गोपनीय समजल्या जाणा-या सेक्सबद्दल बोलणे किंवा चर्चा करायला आज सुद्धा चांगले शिक्षित लोक टाळतात, यामुळे मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल माहीती देण्याचा तर विषय खूप लांबचा आहे. पण आपला हा संकोचपणा आपल्या मुलांवर कोणता प्रभाव टाकू शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहात का?

अनेकदा आई-वडील मुलांना सेक्स बद्दल काहीच माहिती देत नाहीत कारण त्यांना सुद्धा त्यांच्या आई-वडिलांनी याबद्दल काहीच माहिती दिली नव्हती. तर मग या गोष्टीमुळे त्यांच्या सेक्स-लाइफ वर कोणता वाईट प्रभाव पडला का? मग आता तर समाज इतका एडवांस झाला आहे कि मुलांना सर्व गोष्टी माहिती असतात. मग त्यांना वेगळ सांगायची गरज काय? पण आपले हेच असे विचार करणे आपल्या मुलांसाठी हानिकारक सिद्ध होतात.

आपण आपल्या मुलांना सेक्स एजुकेशन द्या किंवा नका देऊ, त्यांना पोर्नोग्राफिक जर्नल, फ़िल्म, टीवी, इंटरनेट तसेच शौचालयाच्या भिंतीवर लिहलेल्या सेक्स संबंधित अशी काही चुकीची आणि उत्तेजक माहिती भेटते जी त्यांची दिशाभूल करायला भरपूर असते. यामुळे त्यांचे चंचल मन आपल्या शरीराची अपरिपक्वता(Immaturity) बद्दल जाणून ना घेता सेक्स बद्दल खूप वेग-वेगळे प्रयोग करायला लागतात…..आणि परिणाम….? या मुळे त्यांना अनेक शारीरिक-मानसिक तसेच आपल्या करियर च नुकसान करून घेतात. मग आता एकविसव्या शतकातल्या या युगात सुद्धा आपल्याला कळत नाही कि सेक्स एजुकेशन मुलांना दिले पाहिजे कि नाही? आणि द्यायचं म्हटलं तर कस…..?

लहानपणापासूनच सेक्स एजुकेशन बद्दल मुलांना सांगायला सुरवात करा.

छोटा मुलगा असो किंव्हा मुलगी ते सुद्धा आपल्या सारखे सामान्य माणसच आहेत त्यामुळे सेक्सबद्दल ची भावना त्यांच्यामध्ये सुद्धा विद्यमान असते, त्यामुळे अगदी जन्मापासूनच ही भावना प्रत्येकामध्ये असते. आणि प्रत्येक जण आपल्या शरीराच्या अवयवांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. पण खुपदा पालक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत आणि मुलांना योग्य मार्गदर्शन सुद्धा करत नाहीत.

खूप वेळा तर असे सुद्धा होते कि आपल्या नकळत आपण लहान मुलांना सेक्स बद्दल उत्सुकता जागवून देतो. मुलगा जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला या जगाबद्दल आणि आपल्या शरीराबद्दल काहीच कल्पना नसते. त्यामुळे लहान मुलगा आपल्या अन्य अवयांप्रमाणे आपल्या प्राइवेट पार्ट्स ला सुद्धा हाथ लावायला लागतो तर कधी-कधी बिना कपड्यांचा सगळ्यांसमोर येतो व अशा वेळी पालक आपल्या मुलाला ओरडतात व त्याला कपड्याने झाकायचा प्रयत्न करतात. अशा वेळी कोवळा मन असलेल्या मुलाला आपल्या चुकीची जाणीव होत नाही उलट त्याला उत्सुकता जागृत होते कि का आपल्याला आपल्या शरीराच्या या अवयवाला हाथ का लावून देत नाही आहेत व आई-वडिलांच्या ओरडण्यापासून वाचण्यासाठी तो लहान मुलगा एकटा असताना आपल्या प्राइवेट पार्ट्स ला हाथ लावयला लागतो आणि आई वडिलांना या बद्दल काहीच माहिती नसते. आणि म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या सामान्य क्रियांसाठी ओरडू नका. वेळेनुसार त्यांची वागणूक आपोआप बदलत जाईल.

३-४ वर्ष असलेल्या मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल कोणती माहिती द्यायची?

३-४ वर्षाच्या मुलाला हे समजून सांगितलं पाहिजे कि जस प्रत्येक माणसासाठी ब्रश, टॉवेल सारख्या गोष्टी स्वताच्या आणि वेगवेगळ्या असतात तशाच आपल्या शरीराचे हे अवयव वैयक्तिक असतात आणि हे दुसऱ्यांना उघडून दाखवायचे नाही. तसेच त्यांना हे सुद्धा सांगायचं कि कोणी त्यांच्या प्राइवेट पार्ट्स ला हाथ लावत असतील तर लगेच आम्हाला त्याची कल्पना द्या यामुळे आपण आपल्या मुलांना बाल लैंगिक शोषणापासून वाचवू शकतो.

५-६ वर्ष असलेल्या मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल कोणती माहिती द्यायची.

५-६ वर्षाच्या मुलाला किंव्हा मुलीला आई हे सांगू शकते कि तुमचे प्राइवेट पार्ट्स हे वैयक्तिक आहेत आणि ते मला किंव्हा घरातल्या कोणाला ही दाखवू नका व आता तुम्हाला स्वतः आंघोळ कारायला पाहिजे. यामुळे त्यांना हे समजेल कि त्यांचे प्राइवेट पार्ट्स हे वैयक्तिक आहेत आणि त्यांना कोणाला ही हाथ लावायचा अधिकार नाही आहे.

६-७ वर्ष असलेल्या मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल कोणती माहिती द्यायची.

६-७ वर्षाची मुळे आपल्या आई वडिलांवर भरपूर विश्वास ठेवतात ते आपल्या बाबांना हिरो आणि आईला एक आदर्श समजत असतात. यामुळे आई वडिलांनी सुद्धा आपली जबाबदारी समजली पाहिजे व आपल्या मुलांसमोर अशी कोणतीही चुकीची गोष्ट करू नका ज्यामुळे आपल्या मुलाच्या मनावर वाईट प्रतिमा पडेल, कारण जर पालक आपल्या मुलांना चुकीचे उत्तर देत असतील तर त्यांचे आपल्या आई वडिलांवरून विश्वास कमी ह्वायला लागतो. यामुळे या वयामधील मुलांना पालकांनी बरोबर व परिपूर्ण माहिती दिली पाहिजे.

८-१२ वर्ष असलेल्या मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल कोणती माहिती द्यायची(प्री-टीन्स)

या वेळी मुलांच्या शरीरात भरपूर बदल होतात जसे की पाळी येणे, स्तनांचा विकास होणे, प्राइवेट पार्ट्स वर येणारे केस यासारख्या गोष्टीबद्दल त्यांना समजवून सांगायला पाहिजे. कारण या वयातील मुले आपल्या शरीरात होणाऱ्या बदलामुळे गोंधळलेली असतात. सामान्यतः १२ वर्ष झाल्यावर मुले सेक्स आणि मुलांच्या जन्मासंबंधित( pregnancy) गोष्टी समजायला तयार झाले असतात. त्यांच्या मनार सेक्स बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोचलेली असते. अशा वेळी त्यांना STD(सेक्सुअली ट्रांसमीटेड डिसीज़), लहान वयात होणार्या गर्भधारनेबद्दल माहिती व कोणते नुकसान होतात याबद्दल माहिती दिली पाहिजे.

१३-१९ वर्ष असलेल्या मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल कोणती माहिती द्यायची(टीनएजर्स)

या वयातील मुलांना आपल स्वातंत्र्य पाहिजे असते आणि या वयात त्यांच्या मित्रांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो. कधी कधी नको असताना देखील या वयातील मुले-मुली सेक्स बद्दल प्रयोग करायला सुरवात करतात. मग खूप वेळा मित्रांकडून मिळालेला अपूर्ण ज्ञान त्यांची दिशाभूल करते. तर काही मुले सेक्स बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात अशा वेळी उत्तेजिक माहिती त्यांना सेक्स साठी उत्तेजिक करतात. त्यामुळे या पालकांनी या वयातच त्यांना टीन प्रेगनेंसी, सेक्सुअली ट्रांसमीटेड डिसीज़, गर्भपातमुळे होणारी शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल जाण करून द्या.

मुलांना सावध कसे करायचे?

मुलांना चांगल्या व वाईट स्पर्श काय असतो त्या बद्दल माहिती द्या. आज आपले जवळचे नातेवाईक, शेजारी, शिक्षक तसेच डॉक्टर सुद्धा त्यांना चुकीच्या उद्देशाने स्पर्श करू शकतात. त्यामुळे मुलांना बजावून असे काही होत असेल तर त्याची माहिती आपल्याला द्यायला सांगा. तुमचे हे प्रशिक्षण मुलांना सेक्सुअल एब्यूज़पासून वाचवतील. कारण खुपदा असे होते कि आपल्या जवळच्या लोकांच्या चुकीच्या स्पर्शला मुले चुकीच समजत नाहीत आणि लाडीगोडीने ते त्यांना फसवून त्यांचा गैरफायदा घेतात आणि हे आईवडिलांना समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

सेक्स एजुकेशन का महत्वाचे आहे?

आपण मुलांना सेक्स एजुकेशन बद्दल सांगितले नाही तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मित्रांकडून, मैगज़ीनमधून तसेच इंटरनेटद्वारे सेक्सबद्दल माहिती भेटून जाते, पण तरी सुद्धा का आहे सेक्स एजुकेशन महत्वाचे हे जाणून घेऊया?

१. सेक्स एजुकेशन मुळे त्यांना आपल्या शरीराबद्दल सगळी माहिती होऊ शकते.

२. तो मुलगा-मुलगी दोघांसोबत कंफ़र्टेबल होऊन बोलू शकतो.

३. त्यांच्या सोबत किंव्हा इतरांसोबत होणाऱ्या सेक्सुअल शोषण, बलात्कार सारख्या गोष्टी ते समजू शकतात आणि त्या होण्यापासून थांबवू शकतात.

४. पौगंडावस्था मध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक, भावनात्मक, सेक्सुअल बदलाव जाणून घेण्यासाठी तयार होऊ शकतील.

५. एसटीडी (सेक्सुअली ट्रांसमीटेड डिसीज़) पासून होणार्या रोगांपासून सावध होऊ शकतील.

६. पुढे जाऊन एक सुखद वैवाहिक आयुष्य जगू शकेल तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून योग्यता प्राप्त करेल.

शाळेमध्ये सेक्स एजुकेशन दिले पाहिजे कि नाही?

मुलांना सेक्स एजुकेशन देणे खूप गरजेचे आहे, पण भारतातील शाळेमध्ये सेक्स एजुकेशन दिले गेले तर खालील गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
१. सेक्स एजुकेशन त्या व्यतिने दिले पाहिके ज्यांना या विषयाबद्दल पूर्ण व योग्य ज्ञान असेल, तसेच मुलांच्या प्रश्नाचं योग्य वैज्ञानिक कारणासोबत उत्तर दिले पाहिजे.

२. मुले वयामध्ये येण्याच्या आधी सेक्स एजुकेशन दिले पाहिजे.

३. मुलांना सेक्स एजुकेशन देताना भाषा तसेच आपल्या शब्दांनावर विशेष लक्ष दिले पाहिजे.

४. धार्मिक किंवा सांस्कृतिक गोष्टींचा विचार ना करता वैज्ञानिक व सामाजिक पॅरामिटर्स चा विचार करून सेक्स बद्दल सेक्स एजुकेशन दिले पाहिजे.

५. मुले-मुली एकत्र बसवून या वर माहिती दिली पाहिजे जेणे करून पुढे जाऊन त्यांना एकमेकांसोबत बोलताना लाज वाटणार नाही.

६. सेक्स एजुकेशन देताना स्केचेज़, डायग्राम, चार्ट, स्लाइड्स यासारख्या गोष्टींचा वापर करा.

७. मुलांना जर बोलताना लाज वाटत असेल तर त्यांना वहीमध्ये लिहून प्रश्न विचारायला सांगा.

८. सेक्स एजुकेशन नेहमी ग्रुप मधेच दिली पाहिजे, एकट्याला न्हवे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.