वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा | Wishes for Birthday in Marathi | Friend, Brother, Wife, Sister



बर्थडे(Birthday) आहे का? कोणाचा? मित्राचा, बहिणीचा,आईचा कि गर्लफ्रेंडचा, तिला का फक्त Happy Birthday Message करून पाठवणार आहात का? तर मग थांबा!! कारण आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी विशेष, निवडलेले काही सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली मध्ये Birthday Wishes घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपण आपल्या मित्राला किव्हा आपल्या नातेवाईकांना सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून special करूया.




Birthday wishes in marathi for Friend /Birthday Wishes in Marathi For Best Friend

सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्छा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
हैप्पी बर्थडे मित्रा

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

पार्ट्य करा, खा, प्या
नाच,गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!!
अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत.
आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा.
मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण
एक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
|| Happy Birthday||

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.




Birthday wishes in marathi for Wife / Baykocha Vadhdivas

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!




Birthday wishes in marathi for Husband / Navryacha Vadhdivas

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे
, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!




Birthday Wishes in Marathi for Daughter

मोठी झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत! वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगातील सर्व आनंद तुला मिळो

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!




Birthday Wishes in Marathi for Girlfriend

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा...
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस खास आहे, ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे सखे

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ आणि
तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ.

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.




Birthday Wishes in Marathi for Boyfriend

राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.




Birthday Wishes in Marathi for Sister

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर

प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी.

सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…




Birthday wishes in Marathi for sister in law / Vahinicha birtday

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु
आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो
तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा




Birthday Wishes In Marathi For Mother / Birthday Wishes For Aai In Marathi

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..! जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..! Happy Birthday आई..!

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..! आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..! “आई”

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या… १. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा” २. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई” Happy Birthday आई..!

मुंबईत घाई शिडीच्या साई फुलात जाई आणि गल्लो गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत … ती म्हणजे माझी आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत

बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’ वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई!

माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई Happy Birthday Mom

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई.. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई. जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई. ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी. तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”




Birthday Wishes in Marathi for Father/Birthday Wishes For Baba

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

प्रिय बाबा,
आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं
हे खरं आहे..
पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन,
की एक दिवस,
हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…
खरंच बाबा,
केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात
हे यश आहे!
आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
हैप्पी बर्थडे बाबा

आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बाबा

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो Happy Birthday BABA




50th birthday wishes in marathi

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.
हॅपी बर्थडे

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि
निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.
बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.




Belated Happy Birthday Wishes in Marathi

लेट झाला तरी काय झालं आपल्या भावाचा बर्थडे म्हटल्यावर
नाद झालाच पाहिजे हॅपी बर्थडे भावा!

तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो
पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो.
तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच. बिलेटेड हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट!

कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!

वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7
माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे


You May Also Like

Add a Comment