Topics
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 22 | Happy new year wishes Marathi 2022: मित्रांनो, नवीन वर्ष नवीन अपेक्षा घेऊन येतो, निमित्ताने सर्व लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा पाठवून येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. नवीन वर्षाच्या शुभेच्या देण्याची सुरवात अगदी 31 December च्या संध्याकाळ पासूनच होते.
जर तुम्ही सुद्धा happy new year wishes in marathi मधून status किव्हा Happy new year Images in Marathi मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाईट वर आला आहेत. या वेबसाईट वर तुम्हाला नवीन नवीन Happy new year wishes sms in marathi भेटतील.
तुम्ही हे Marathi new year wishes, whatsapp तसेच facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि हे मेसेज वाचून नवीन वर्षाची उत्साहात सुरवात करा.
Happy new year wishes in Marathi | Happy new year message in Marathi 2022
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2022 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन
वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्षाभिनंदन!
2022 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !
सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्ष शुभेच्छा संदेश | New year messages marathi.
इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवस
तसाच उगवतो अन तसाच मावळतो…
तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..
या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतो
आशेच्या नव्या किरणांचा नजराणा..
त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळी
अन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..
म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.
तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !
नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. !!.
पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
आज वर्षाचा शेवटचा दिवस ..
खूप काही गमावलं पण ..
त्यापेक्षा अजून कमावलं ..
अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,
तितकीच लोक जवळसुद्धा आली ..
खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!
केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो…
धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!
माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,
गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो…
नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2021 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2022 मध्ये पण तयार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,
नवी नाती, नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!
In Advance
New year images Marathi | नवीन वर्ष शुभेच्छा फोटो.
*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2022 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,
आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…
सन 2022 च्या हार्दीक शुभेच्छा…!
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2022 साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
नववर्षाच्या पहाटेसह तुमचंआयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
पाहता-पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन
निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार
Happy New Year 2022
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
नव्या या वर्षात संकल्प करूया साधा,
सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी
मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो
आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती,
या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करताना
खूप काही कमावलं तर खूप गमावलं देखील
आता काय कमावलं अन काय गमावलं
हे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेद
आणि संकल्प घेऊन 2022 मध्ये प्रवेश करूया.
या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व.
आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेल
अशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
संपणार आहे 2021
प्रॉब्लेम सारे आता विसरा
विचार करू नका दुसरा
चेहरा नेहमी ठेवा हसरा
आणि तुम्हाला Happy New Year 2022
सर्वांना गंभीर सूचना,
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास
कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास
ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल
सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा
बदल हा निसर्गाचा नियम आहे
जुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळून
त्याला नवी पालवी फ़ुटते.
काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.
आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.
नवा बहर,नवा मोहोर.
नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,
नव्या वर्षाचे स्वागत करु या.
दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!!
Happy new year 2022
नवीन वर्ष शुभेच्छा प्रेमी – प्रेमिकांसाठी | New year wishes for Boyfriend and girlfriend in Marathi
डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,
तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,
देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट,
हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,
अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.
विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.
झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा.
देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात
तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर.
काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा
आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो.
आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो
त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022
मी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो की
मला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा Dear
आपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा!
तुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले
जे मला कधीच अनुभवलेले नाही.
तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते.
माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे
जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते.
यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022
हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2021 चा प्रवास,
अशीच राहो 2022 मध्येही आपली साथ.
या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,
प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.
यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे,
नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.
या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव.
प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र.
माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.
कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही.
पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.
चुकांना माफी देता येते.
जर तुमच्यात त्या स्वीकारण्याचं साहस असेल
तर मग चला नव्याने सुरूवात करूया.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा | Navin varshachya hardik shubhechha 2022.
या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!
अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे.
पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास अमर्याद
आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे!
आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
स्वागत करू नववर्षाचं.
!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
1 जानेवारी 2022.
ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,
ताज्या भावना, नवीन बांधीलकी
२०२२ च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल.
तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे!
२०२२ हे वर्ष आपल्या जीवनाला नवीन आनंद,
नवीन उद्दीष्टे, नवीन यश आणि नवीन प्रेरणा घेऊन येतील.
वर्षभर तुम्हाला आनंदाने भरलेले शुभेच्छा.
तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल!
Funny new year wishes in Marathi | Funny new year SMS in Marathi
वाघ कधी लपून शिकार नाही करत,
घाबरट लोकं समोर वार नाही करत,
आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी,
एक जानेवारीची वाट नाही बघत,
म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन
पूर्ण होवोत तुमचे सगळे एम,
सदैव वाढत राहो तुमचं फेम,
मिळत राहो प्रेम आणि मैत्री व मिळो लॉट ऑफ फन आणि मस्ती,
विश यू ए हॅपी न्यू ईयर.
सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील,
एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला,
नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा.
कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर,
आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी?
त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.
आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय,
कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस,
कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….
नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2022
इतिहास साक्षी आहे…जेव्हा नववर्ष आलं आहे…
तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही….
देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.
ज्याची इच्छा असेल तो तुमच्याजवळ येवो.
या वर्षी तुम्ही राहू नका बिना लग्नाचे देव करो
तुमची होणारी सासू तुमच्यासाठी स्थळ घेऊन येवो.
नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स,
जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो.
मला चुकीचं समजू नका.
तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.
मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे.
पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.
नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत,
नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी,
कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल,
आनंद तर तेव्हा मिळेल जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg.
मिठाई पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.
मी देवाला म्हटलं की माझ्या मित्रांना येणाऱ्या २०२२ वर्षात सुखी ठेव..
😜
😜
😜
देव म्हणाला – ठीक आहे पण फक्त ४ दिवस..
ते चार दिवस तू सांग..
😜
😜
😜
मी म्हटलं..
1) Summer Day
2) Winter Day
3) Rainy Day
4) Spring Day
😜
😜
😜
देव Confused झाले आणि म्हणाले – नाही फक्त ३ दिवस..
😜
😜
😜
मी म्हटलं ठीक आहे..
1) Yesterday
2) Today
3) Tomorrow
😜
😜
😜
देव पुन्हा Confused होऊन म्हणाले – फक्त २ दिवस..
😜
😜
😜
मी म्हटलं ठीक आहे..
1) Current Day
&
2) Next Day
😜
😜
😜
देव पुन्हा Confused होऊन म्हणाले – नाही फक्त एकच दिवस……
😜
😜
😜
मी म्हटलं..
1) Everyday
😜
😜
😜
देव हसले 😄 आणि म्हणाले अरे बाबा माझा पिछा सोड 🙏🙏 – तुझे मित्र नेहमी खुश आणि सुखी राहतील..😊
🎉हैप्पी न्यू इयर 2022🎉
New Year Motivational Messages in Marathi / नववर्षासाठी प्रोत्साहनपर मेसेजेस
अशीच आशा करतो की,
तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ,
राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात,
येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो.
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे.
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे.
नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो
यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण,
हॅपी न्यू ईयर.
Naveen varsh aapnans sukh samadhanache,
Aanandache, aishwarya, aarogyache javo.
Naveen varshat aaple jeevan aanadmaye,
Sukhmaye hove, aashi shricharni prarthana.
Happy New Year.
नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे
आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.
जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की,
तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील.
नववर्षाभिनंदन.
जगभरात नववर्षाचा जल्लोष साजरा केला जातो.
मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात.
हॅपी न्यू ईयर.
आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक दिवशी यश मिळो,
प्रत्येक दिवस आनंदी असो.
हॅपी न्यू ईयर.
मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या
आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!
Happy new year wishes to friends | नवीन वर्ष शुभेच्छा मित्रांनसाठी.
कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही.
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री
आणखी मजबूत झाली.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!
मला माहित आहे की हे वर्ष एक प्रकारचे कठीण वर्ष होते,
परंतु मला आशा आहे की 2022 एक उत्कृष्ट वर्ष असेल.
आपण आणि आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
आपली मैत्री कायमच आनंद देते.
इतकी वर्षे माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.
पुढचे वर्षात आपणास सर्व सुख आणि आनंदाच्या शुभेच्छा.
माझा खरा मित्र असल्याबद्दल मी तुझ्यावर माझ्या भावासारखं प्रेम करतो.
जेव्हा मी माझा मार्ग गमावणार होतो तेव्हा तु मला योग्य मार्गाकडे नेले.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022 !
नवीन वर्ष आपण मित्रांसाठी एक पर्वणीच आहे.
मागील वर्षाचे क्षण लक्षात ठेवू आणि
नवीन वर्षाचे एकत्र पार्टी करत स्वागत करु.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
मागील वर्षांमध्ये आपण माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय मित्र आहात.
मी आशा करतो की आपण जसे आहात तसेच नेहमी रहाल.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
जेव्हा गोष्टी कठीण होतात आणि मी आयुष्यापासून कंटाळलो
तेव्हा मला धरून ठेवल्याबद्दल धन्यवाद.
देव आपल्याला कायम आणि सदैव आशीर्वाद देईल.
नवीन वर्षाच्या खूप-खूप शुभेच्छा.
आपल्यासारखा मित्र तिथ
नवीन वर्षाचे स्वागत करण्यास नसल्यास आनंद कमी वाटेल.
मैत्रीच्या सर्व चांगल्या क्षणांबद्दल धन्यवाद.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
31st December Quotes in Marathi
तुमच्या डोळ्यात असतील जी काही स्वप्नं
आणि मनात असतील
ज्या काही इच्छा-आकांक्षा,
या नववर्षात त्या होवोत खऱ्या
ही आहे मनापासून इच्छा..
Happy New Year 2022..!
आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी मनातून जवळ आहोत,
म्हणूनच न सांगताही
एकमेकांचं दुःख समजून घेतो..
नव्या वर्षातही असंच राहूया..
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!
उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा,
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा..
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
चुकतो तो माणूस,
सुधारतो तो मोठा माणूस,
मान्य करतो तो देवमाणूस,
पण कलियुगात..
पाणी पाजतो तो माणूस,
चहा पाजतो तो मोठा माणूस,
पार्टी देतो तो “देवमाणूस”…!!!
31st जवळ आलाय..!!!
ग्रुप मधे कोण देव माणूस आहे?
देव जाणे..!!!🤔🤔🤔
मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!
🤑 — विकणे आहे — 🤑
फक्त एक वर्ष वापरलेलं
जानेवारी 2021 मॉडेल,
सिंगल हँडेड,
एकदम टिपटॉप कंडीशन..
2021चं *”#कालनिर्णय”*
विकायचं आहे.. फक्त..
..
इच्छुक लोकांनीच
संपर्क करावा..
🙏🙏धन्यवाद🙏🙏
नवीनवर्ष येणार म्हणून,
जास्त उड्या मारू नका..
फक्त कलेंडर बदलणार आहे..
😔 बायको 😔
तिच राहणार आहे..😜
31 डिसेंबर 2021
मराठी वारसा टीम तर्फे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा (New year wishes in Marathi) . तुमचा हा वर्ष आता पर्यंत व्यतीत केलेल्या वर्षांपेक्षा अधिक सुखद तसेच अधिक आनंददायक जावो हीच सदिच्छा!!
आम्हाला आशा आहे happy new year wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान new year message in Marathi मध्ये वाचून तुम्हाला आनंद झाला असेल. आणि तुम्ही अजून पर्यंत आमचे हे new year marathi wishes तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला आमचे नवीन वर्षाचे संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.
जर तुमच्या कडे सुद्धा काही नवीन happy new year in 2022 marathi messages असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी marathivarsa@gmail.com वर नक्की शेअर करा आम्ही तुम्ही दिलेले new year wishes in marathi आमच्या वेबसाईट द्वारे हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू!
हे देखील वाचा: गुढी पाडवा शुभेच्छा संदेश!
हे देखील वाचा: वाढदिवस शुभेच्छा मराठी
हे देखील वाचा: नए साल की शायरी हिन्दी में
Great work
Wow very nice wishes sar I ❤️ it
Oustanding post. As a blogger, I used to believe that it is really difficult to be authentic but, your ingenuity in creating this article blew my mind. Thank you so much.
Amazing As Always!