Holi SMS in Marathi | Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा! Rangpanchmi 2024

होळी – धुलिवंदन शुभेच्छा मराठी | Holi – dhulivandan wishes Marathi

Holi Wishes in Marathi 2024: होळी हा भारताचा एक मुख्य सण आहे जो प्रत्येक धर्मात साजरा केला जातो. या दिवशी, प्रत्येकजण आपल्या कुटुंब आणि मित्रांसह हा उत्सव साजरा करतो. या दिवशी आपण सर्वांना Holi Marathi SMS करून शुभेच्छा देतो. रंगांचा उत्सव “होळी” खूप जवळ आहे, म्हणूनच आम्ही या लेखात घेऊन आलो आहोत Best Holi Wishes in Marathi. या लेखातील सुंदर Holi Marathi Mesages तुम्ही तुमच्या नातेवाईक तसेच मित्रांना whatsapp व Facebook द्वारे पाठवू शकता.

2024 मध्ये 25 मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे. पण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये कॉरोनच्या वाढत्या संसर्गामुळे आपण थोडी काळजी घेऊनच या वेळी होईल साजरी केली पाहिजे. मित्रांनो, होळी हा फक्त एकमेकांना रंग लावण्याचा सण नसून, तर तो प्रेम, सलोखा आणि आपुलकिंच्या भावनांचा सण आहे … या दिवशी एकमेकांना रंग लावून आपण सर्व जुन्या वाईट गोष्टी विसरून नवीन रीतीने आपले आयुष्य सुरू करतो. तसेच मित्रांनो तुम्हाला जर का होळी या सणाबद्दल माहिती हवी असेल तर पुढील खालील लिंक वर क्लिक Holi Information in Marathi. या लेखामध्ये आम्ही होळी सणाबद्दल माहिती, होळी कशी साजरी केली जाते तसेच होळी साजरी करतानाची कोणती काळजी घ्यायला पाहिजे या बद्दल माहिती दिली आहे.

Happy Holi Wishes In Marathi 2024 | होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Happy Holi Wishes in Marathi
Happy Holi Wishes in Marathi

सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!😀😄🙏

उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका
😀होळीच्या हार्दिक शुभेच्छा😀😀

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
😀होळीच्या हार्दिक शुभेच्छा😀😀

सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
😊होळीच्या हार्दिक शुभेच्छा😊🙏

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

होळी संगे केर कचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
🙂होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙂

Holi Marathi Shubhechha
Holi Marathi Shubhechha

पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !🙂

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
😄होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !😄

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
😄होळीच्या हार्दिक शुभेच्छा !😀🙏


Happy Holi Messages In Marathi | होळी उत्सवाच्या शुभेच्छा!

Happy Holi Messages In Marathi
Happy Holi Messages In Marathi

होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
😄हॅपी होली😄

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
😄होळीच्या हार्दिक शुभेच्छा😄

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
🙏तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!🙏

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला
😊 होळीच्या तुम्हाला शुभेच्छा! 😊

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
😊 तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा 😊

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या
😄 खूप खूप शुभेच्छा 😄

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😄

प्रेम रंगाने भरा पिचकारी
पुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
🙂 सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
😄 होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 😄

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
😀तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,😀
😀होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙂😀

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
🙂 रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! 🙂

आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂🙂

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला
पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि
उल्हासाचा होवो वर्षाव
🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙂

तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
🙂 तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂


Holi Marathi Status for Whatsapp in Marathi | होळी सणाचे मराठी स्टेटस 🙂

Holi Marathi Status for Whatsapp in Marathi
Holi Marathi Status for Whatsapp in Marathi

रंगपंचमीला ती म्हणाली,
“कलर न लावता… असं काही कर कि,
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”
मग काय घेतला पट्टा..
आणि चोप-चोप चोपली..
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…😘

होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
😀रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! 😊

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
😀होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!😘

Holi wishes for friends Marathi | होळीच्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
🙂 रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙂

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
🙂 हॅपी होळी 🙂

नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
😀होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे,
कोरडे झाले ओले एकदा रंग लागले
तर सर्व होतात रंगीले
🙂 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून!
🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी
🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
🙂 होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा 🙂

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
😀🙂 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙂😀

Holi Greetings in Marathi | होळी ग्रिटींग मराठी

Holi status in Marathi
Holi status in Marathi | Holi SMS in Marathi

फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची
नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन
या सणाचा आनंद द्विगुणित करू.
😊 होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 😊

भेटीलागी आले।
रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे।
रंग तुझा।।
वदलो बा माझी ।
पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात।
मिसळतो।।
😊 होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊


Holi quotes in Marathi | होळी शुभेच्छा संदेश मराठी

Holi SMS in Marathi
Holi SMS in Marathi

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
😊 होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 😊

आम्रतरूवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगांची उधलण होई
होळी जीवन गाणे गाई
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 😊

झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
😊 होळीच्या हरित शुभेच्छा 😊

रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 😊

भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
😊 होळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊


Happy Rangpanchami Wishes In Marathi | रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Rangpanchami Wishes In Marathi
Happy Rangpanchami Wishes In Marathi

रंग न जाणती जात अन् भाषा
उधळण करूया, चढू दे प्रेमाची नशा…
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे
भिजुनी फुलवूया प्रेम रंगांचे मळे
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

रंगून जाऊ रंगात आता
होऊ स्वैर स्वच्छंद…
तोडून सारे बंध
आज उधळू आनंद…
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊😀

बेभान मन
बेधुंद आसमंत
सर्वत्र आनंद
सारेच व्हा
होळीच्या रंगात दंग
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळुया आज हे रंग
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वतःचा विसरूनी,
एकीचे महत्त्व सांगतात…
😊😊 रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊

रंगात होळीच्या रंगूया चला
स्नेहाच्या तळ्यात डुंबुया चला…
रंग सारे मिसळूया चला
रंग रंगांचा विसरूया चला
सोडूनी भेद नी भाव
विसरूनी दु:खे नी घाव,
प्रेमरंग उधळूया चला…
😊😊 रंगपचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊😊

पिचकारीतील पाणी,
अन् रंगांची गाणी…
रंगपंचमीच्या सणाची,
अशी अनोखी कहाणी…
विभिन्न रंगांनी रंगलेला हा सोहळा
लहान-मोठ्यांचा उत्साह कसा जगावेगळा
😊 रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा 😊

जीवनाच्या वाटेवर,
पुन्हा मागे वळून पाहू,
सोडून गेल्या क्षणांना,
आठवणींत जपून ठेवू…
उरले सुरले क्षण जेवढे
आनंदाने जगत जाऊ..
रंगात रंगून होळीच्या
हर्ष उधळत राहू…
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊

रंगात रंगले जीवन
हर्षात फुलले मन
रंगपंचमीच्या रंगांची रंगली
अशी काही शिंपण
हृदयी उरले प्रेम
अन् मनात नव्या नात्यांची नवी गुंफण…
😊 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏

तर मित्रांनो, या होळीला सर्व वाईट गोष्टींचा होळी मध्ये दहन करा आणि होळीच्या रंगांसारखे नवीन रंगेबीरंगी जीवनाची सुरू करा आणि आपले जीवन यशाच्या रंगांनी रंगवा. आपणा सर्वांना मराठी वारसा टीम तर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा.  या दिवशी दारू, जुगार इत्यादी वाईट सवयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कोणताही आनंदोत्सव साजरा करण्याचा हा मार्ग नाही, त्या दिवशी आपण वाईट गोष्टींमध्ये सामील व्हावे.

आम्हाला आशा आहे Holi Wishes in Marathi या आमच्या लेखातील छान छान Happy Holi Marathi message वाचून तुम्हाला आनंद झाला असेल.

मित्रांनो तुम्ही अजून पर्यंत आमचे हे Holi SMS in Marathi तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत whatsapp आणि facebook वर forward केला नसाल तर आत्ताच करा. आणि तुम्हाला हे होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आवडले असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Holi Information in Marathi

Good evening Wishes Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Holi SMS in Marathi | Holi Wishes in Marathi | होळीच्या हार्दिक शुभेच्छा! Rangpanchmi 2024”

Leave a Comment