Akshay Kumar Biography Marathi | Akshay Kumar Information in Marathi

Akshay Kumar Biography Marathi | अक्षय कुमार यांच्या बद्दल माहिती 

एका सर्व्हे अनुसार मुंबई मध्ये दररोज 20,000 नवीन लोक येतात, यातील जास्तीत जास्त लोक हे चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण करायला येतात. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात मुंबईला लाखो लोक एक ऍक्टर किव्हा actresss बनण्याच्या हेतूने येत असतात. यातील काही मोजकीच मंडळी आयुष्यात यशस्वी होत असतात. आपण आज जाणून घेणार आहोत बॉलिवूड मधील खिलाडीअक्षय कुमार यांच्याविषयी…

मित्रांनो अक्षय कुमार यांनी कधीही मनात विचार आणला नव्हता की ते अभिनय करतील आणि या चित्रपट सृष्टीत एक सर्वात प्रसिद्ध अभिनेता बनतील. परंतू मित्रानो जर कोणी व्यक्ती हा मेहनतीने आणि इमानदारीने स्वतःचे काम करत असेल ना तर देव देखील त्याच्यासोबत कधीच चुकीचे घडू देत नाही.

आपल्यापैकी खूप कमी लोकांना माहीत असेल की अक्षय कुमार यांचे मूळ नाव हे राजीव भाटिया आहे. अक्षय कुमार यांचा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे झाला होता. अक्षय यांचे बालपण हे दिल्लीच्या चांदणी चौक गल्लीत गेले. त्यांचे मन अभ्यासात जास्त लागत नव्हते, त्यामुळे त्यांनी 12 वि नंतर शिक्षण सोडून दिले आणि स्वतःच्या खर्चासाठी ते लहान-मोठी कामे करायला लागले.

Akashay Kumar Information in Marathi
Akashay Kumar Information in Marathi

अक्षय यांना लहानपणापासून खेळाची खूप आवड होती. त्यामुळेच ते मार्शल आर्टस् च्या ट्रेनिंगसाठी बँकॉक ला गेले. तिथे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी शेफ म्हणून नोकरीही केली. आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी अनेक छोटी छोटी कामे केली. त्यानंतर तिथून ते कोलकत्ता येथे आले. कोलकात्यात येउन त्यांनी एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये कामही केले. कोलकत्त्याहून अक्षय मुंबईला आले, इथे येऊन ते कुंदन असलेले दागिने विकायला लागले. हे दागिने ते दिल्लीवरून आणून मुंबईला विकत असे.

आत्तापर्यंत अक्षय कोणतेही ध्येय नसताना काम करत होते, त्यांनी हाच विचार केला होता की त्यांना मेहनतीच्या जोरावर पैसे कमवायचे आहेत. मुंबई मध्ये असताना दागिने विकण्यासोबत ते संध्याकाळी मुलांना मार्शल आर्ट्सची ट्रेनिंग देखील देत. त्याच विद्यार्थ्यांपैकी एक फोटोग्राफर होता, त्याने त्यांना मॉडेलिंग करण्याची ऑफर दिली. त्याने अक्षय यांचे नाव मॉडेलिंग प्रोजेक्ट साठी देखील दिले. अक्षय यांच्या पर्सनॅलिटी कडे बघता त्यांना सिलेक्ट देखील केले गेले. पुढे त्यांनी 2 दिवसात मॉडेलिंग शूट पूर्ण केले आणि त्याचे त्यांना 20,000 रुपये मिळाले.

त्यांनी विचार केला की पूर्ण महिने काम करून देखील कसेबसे 5000 रुपये मिळवतो आणि इथे काहीही काम न करता ,एसी रूम मध्ये बसून मला 20,000 रुपये मिळाले. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की काहीही करून या कामात स्वतःचे जीवन सेट करायचे आहे. पुढेही ते छोटी छोटी मॉडेलिंग करत होते. अक्षय ने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की एकदा त्यांना मॉडेलिंग साठी बेंगलोरला जायचे होते, तेव्हा ते सकाळी उठून व्यायाम करत होते तर त्यांना फोन आला की तुम्ही खूप जास्त उशीर केल्यामुळे तुमचे विमान हुकले आहे. जोपर्यंत ते काही बोलतील तोपर्यंत फोन बंद झालेला होता. त्यांच्या सोबत काय झाले हे त्यांना काहीच समजत नव्हते.

पुढे जाऊन त्यांना कळले की ज्या फ्लाईटने त्यांना जायचे होते ती सकाळी 7 वाजताची होती आणि तर ते ती वेळ संध्याकाळी 7 अशी समजून होते. या गोंधळात त्यांच्या हातून एक मोठा प्रोजेक्ट गेला होता. ते या गोष्टीने खूप निराश झाले परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांना समजावले की जे काही होते ते चांगल्यासाठीच होते.

त्याच दिवशी ते त्यांचा पोर्टफोलिओ घेऊन नटराज स्टुडिओ मध्ये आले. इथे प्रमोदजी कडे काम करणारा मेकअप आर्टिस्ट त्यांना मिळाला व त्याने त्यांचा पोर्टफोलिओ प्रमोदजीना दाखवला. प्रमोदजींना अक्षयचे फोटो आवडले, त्यानंतर त्यांनी अक्षयला आत बोलावले व विचारले की तू माझ्यासाठी फिल्म मध्ये एक छोटेसे काम करशील? अक्षयने लगेच होकार दिला. प्रमोदजींनी अक्षयला त्वरित 5,000 रुपये साइनिंग अमाउंट दिली आणि आपल्या चित्रपटात घेतले.
याच प्रसंगाला आठवून अक्षय कायम म्हणतात की आपण खरतर काही खास करत नाही कारण परमेश्वरच खरा सर्वात मोठा स्क्रिप्ट लिहिणारा आहे. कधी कधी तर तो कमालच करतो!

जर आज त्यांची फ्लाईट मिस झाली नसती तर त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी नसती मिळाली. पुढे त्यांनी 1990 मध्ये अभियानात सुधारणा आणण्यासाठी अभिनयाचा कोर्स देखील केला. त्यानंतर त्यांना फिल्म आज साठी एक छोटीशी ऑफर देखील मिळाली. जेव्हा फिल्म रिलीज झाली तेव्हा त्यांना कळले की त्यांचा अभिनय हा फक्त 7 सेकंदाचा होता. या फिल्मच्या हिरोचे नाव अक्षय होते, त्याचवेळी राजीव भाटिया यांना हे नाव आवडले व त्यांनी स्वतःचे नाव बदलून त्या हिरोच्या नावावरून अक्षय ठेवून घेतले. या प्रकारे राजीव भाटिया अक्षय कुमार बनले.

Akshay Kumar success story in Marathi
Akshay Kumar success story in Marathi

1991 मधील फिल्म सौगंध सोबत अक्षय कुमारने बॉलिवूड मध्ये मुख्य नायकाची सुरुवात केली. पुढे 1992 मध्ये त्यांनी एक यशस्वी फिल्म खिलाडी मध्ये अभिनय केला. बस इथून पुढे त्यांनी कधीच माघार घेतली नाही. 22 ते 23 वर्षांमध्ये त्यांनी 123 पेक्षा जास्त चित्रपट केले. आज ते बॉलिवूड विश्वातील स्टार खिलाडी आहेत.

मित्रांनो आपण आपल्या कष्टाने आणि मेहनतीने काम करत राहा कारण कष्ट करणाऱ्याला देव कधीच निराश करत नसतो. याचे फळ तो उशिरा का होईना पण देतो नक्कीच!

मित्रांनो मला आशा आहे Akshay Kumar Biography Marathi हा लेख वाचून तुम्हाला अक्षय कुमार यांच्याबद्दल थोडी फार माहिती मिळाली असेल.

जर तुम्हाला या Akshay Kumar Information in Marathi या लेखामधील काही गोष्टी चुकीच्या वाटत असतील किव्हा तुम्हाला अजून काही आम्हाला Suggestions द्यायच्या असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment