संत एकनाथ महाराजांचा जीवन परिचय | Sant Eknath Information in Marathi

संत एकनाथ महाराजांचा जीवन परिचय | Sant Eknath Information in Marathi

Sant Eknath Information in Marathi: महाराष्ट्र ही महान लोकांची आणि संतांची भूमी आहे. महाराष्ट्र एक अस राज्य आहे ज्यात अनेक महान थोर व्यक्तींनी जन्म घेतलेला आहे. महाराष्ट्राला संतांची जन्मभूमी देखील म्हणले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज पर्यंत आणि संत जनाबाई पासून ते संत गाडगे महाराजांपर्यंत सर्वांनी महाराष्ट्राला एक महान राज्य बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

आज महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात सर्वात पुढे आघाडीवर आहे. याचे सर्व श्रेय त्या संताना जाते. त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून आणि अभंग, भारुडे, कवितांमधून लोकांना मार्गदर्शन केले. या सर्व संतांमध्ये संत एकनाथ महाराज(Eknath Maharaj) यांचे योगदान देखील खूप महत्वाचे आहे. त्यांनी त्या काळात लोकांना देवाचे आणि भक्तीचे महत्व समजून सांगितले.

हिंदू धर्मामध्ये जे भक्तीचे आंदोलन सुरू झाले होते त्याला पुढे नेण्यासाठी खूप मोठे योगदान दिले. त्यांचे हे कार्य बहुमूल्य आहे. आज याच महान संत एकनाथ महाराजांच्या विषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. या संताविषयी सर्व महत्वाची माहिती खाली दिलेली आहे.

संत एकनाथ महाराजांचा जीवन परिचय – Sant Eknath Maharaj Information in Marathi

नाव : संत एकनाथ महाराज
जन्म : इसवी सन 1533
जन्म स्थळ : पैठण
आई : रुख्मिणी
वडील : सूर्यनारायण
मृत्यू : इसवी सन 1599
गुरू : जनार्दन स्वामी

संत एकनाथ महाराजांच्या जीवनाविषयी जास्त माहिती मिळणे तसे कठीण आहे. कारण त्यांच्याविषयी कुठेही माहिती मिळत नाही. परंतु सांगितले जाते की 16 व्या शतकात त्यांनी भक्तीचे आंदोलन पुढे सुरू ठेवले होते.

संत एकनाथ महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पैठण गावात एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांच्या घरातील लोक हे एकवीरा देवीचे खूप मोठे भक्त होते. संत एकनाथ महाराजांचे आई वडील हे ते लहान असतानाच निधन पावले होते. एकनाथ महाराज त्यांचे आजोबा भानुदास यांच्या कडे रहात असे. त्यांचे आजोबा भानुदास हे देखील वारकरी संप्रदायाचे होते. असे सांगितले जाते की संत जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरू होते, ते सुफी संत होते.

एके काळची गोष्ट आहे जेव्हा एका खालच्या जातीच्या व्यक्तीने संत एकनाथ महाराजांना त्याचा घरी जेवायला बोलावले होते. एकनाथ महाराज त्या व्यक्तीच्या घरी देखील गेले होते आणि त्यांनी जेवण देखील केले होते.

यावर संत एकनाथ महाराजांनी कविता देखील लिहिली होती त्यात ते म्हणतात, एखादी व्यक्ती खालच्या जातीची असून देखील ती देवाची तितक्या मनोभावे भक्ती करतात, त्यांचे सर्वस्व देवाला अर्पण करतात, तर असा व्यक्ती ब्राम्हणापेक्षा ही महान आहे.

असे देखील सांगितले जाते की एकदा विठ्ठलाने स्वतः एकनाथांचे रूप घेऊन त्या महार भक्तांच्या घरी जेवण ग्रहण केले होते.

संत एकनाथ महाराजांचे कार्य – Sant Eknath Maharaj Work

संत एकनाथ महाराजांनी संपूर्ण भागवत गीता ही आपल्या भाषेत लिहिली होती. याच लिखाणाला त्यांनी ‘एकनाथी भागवत’ – Eknathi Bhagawat असे नाव दिले होते. त्यांनी रामायणाला वेगळ्या शब्दांमध्ये लिहीत भावार्थ रामायण ही गाथा देखील लिहिली होती. त्यांनी रुख्मिणी स्वयंवर- Rukmini Swayamvar देखील रचिले होते. यात एकूण 764 ओव्या आहेत. शंकराचार्य यांच्या 14 संस्कृत श्लोकांवर हे पुस्तक आधारित आहे.

शुष्काष्टक (447 ओव्या), स्वात्मा सुख (510 ओव्या), आनंद लहरी (154 ओव्या) , चिरंजीव पद, गीता सार आणि प्रल्हाद विजय सारखे ग्रंथ एकनाथ महाराजांनी लिहिले आहेत. भारुड ही संकल्पना महाराजांचीच! मराठी मध्ये एक नवीन गीत संकल्पना म्हणजे भारुड (Eknath Maharaj Bharud) महाराजांनी आणली. भारुड ही संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी काव्यरचना आहे.

संत एकनाथ महाराजांच्या विषयी माहिती घेतल्यानंतर कळते की त्या काळात चालणाऱ्या वाईट रूढी परंपरा त्यांनी डावलून मागे सारल्या होत्या. ते सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना एक समान मानत असे. त्यांनी लोकांना चांगला रस्ता तर दाखवलाच परंतु भविष्यात देखील मार्गदर्शन रहावे यासाठी ग्रंथांची आणि पुस्तकांची रचना केली.

हे देखील वाचा

Spiritual Quotes in Marathi

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.