Moral Story In Marathi ! अपयश यशाची पहिली पायरी

जिंकू तर सर्व शकतात परंतु पुन्हा पुन्हा पराभवाचा सामना करणे हे सर्वांना जमते असे नाही. आज आपल्या प्रत्येक युवकांत यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या Qualities आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही त्या यशासाठी किती वेळा पराभवाचा सामना करू शकता? आणि तितक्या वेळा पराभूत होऊन त्यापेक्षा एक जास्त वेळा प्रयत्न करू शकता? आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला looser म्हणेल, तेव्हा देखील तुम्ही किती जास्त वेळा प्रयत्न करू शकता?

Before You Become Winner, You Have to become Loser.

तुम्हाला विजेता होण्याच्या आधी एकदा का होईना पराभूत व्हावेच लागणार आहे.

Before You Get Your Success, You have to become Unsuccessful!

तुम्हाला यशस्वी होण्याच्या आधी एकदा अपयशी व्हावेच लागणार आहे.
त्यामुळे Take a Chance! संधी शोधा!
जेव्हा पराभव व्हायला लागेल तेव्हा आणखी एक संधी घ्या. आणखी एक चान्स! फक्त एकाच चान्स चा फरक असतो पराभूत होणाऱ्या आणि जिंकणाऱ्या व्यक्तींमध्ये! विचार करा की तुमचे यश हे 10व्या मजल्यावर आहे, तर ज्या शिड्यांच्या वापर करून तुम्हाला चढायचे आहे त्यांचे नाव पराभव आहे! त्यांचे नाव चूका आहे!

Don’t Get Afraid To Make A Mistake

चूक करण्याला कधीच घाबरू नका. पराभवाला कधीच घाबरू नका आणि ऐका जोपर्यंत श्वास चालतो आहे तोपर्यंत हारने चांगल्या प्रकारे शिकून घ्या. जर तुम्हाला प्रत्येक वेळी भीती वाटत असेल तर मी तुम्हाला एक पध्द्त सांगतो,
प्रत्येक दिवशी एक असे नवीन काम करा ज्यात तुमचा पराभव होणे अटळ आहे. प्रत्येक दिवशी अशा एका पराभवाचा नक्की स्वीकार करा, जो तुम्ही या आधी कधीच केलेला नाही.

प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट करा, ज्याची तुम्हाला कायम भीती वाटते!
Bring the Best Version of yourself out-off You.

तुमच्यातील जे तुमच्यापेक्षा चांगले व्हर्जन आहे त्याला बाहेर काढा. तुम्ही जो विचार करताय त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त चांगले आहात. तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळा पराभव स्वीकारू शकतात, जेव्हढा तुम्ही आज पर्यंत स्वीकारलेला आहे. तुम्ही त्यापेक्षा जास्त मोठे यश आणि विजय मिळवू शकता, जितका तुम्ही विचार करत आहात. तुम्ही या संपूर्ण विश्वाच्या समोर एक उदाहरण बनून राहू शकता. आज तुम्हाला कोणी ओळखत नाही परंतु याचा काहीच फरक पडत नाही, कारण काही ताऱ्यांना चमकायला वेळ लागतो. आणि तो तारा, तो सितारा तुम्ही आहात!
वेळ लागेल हे सर्व घडायला परंतु येणारी वेळ ही तुमचीच असेल! आज आपल्या मेहनतीवर जोर द्या, मेहनतीचे तिकीट काढा आणि सुरुवात करा त्या अखंड प्रवासाला जो तुम्ही अजून सुरू देखील केला नाहीये. याचा अंत कोणी करू शकणार नाही!
You are Powerful! तुम्ही ताकदवान आहात, तुम्ही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या ताकदवान आहात, तुम्ही खरे मनुष्य आहात. फक्त एकदा आठवून बघा की तुम्ही कोण आहात?

कोण आहात तुम्ही? एक तो जो संपूर्ण विश्वाच्या समोर आदर्श बनू शकतोय की एक तो जो की संपूर्ण विश्व बदलू शकतोय. सकारात्मक विचार करा. जर कोणी तुम्हाला वाईट म्हणत असेल, काही येत नाही याला अस म्हणत असेल तर तुमचे तोंड बंदच ठेवा आणि पुढे जात राहा! कारण एक खरा माणूस हा तोंडाने बोलत नाही तर तर त्यांच्या यशाच्या गोष्टी या लोकांच्या तोंडून ऐकू येतात. लोकांना काहीही म्हणू देत, तुम्ही स्वतःशी काय बोलताय? लोक काहीही करू देत, तुम्ही स्वतःकडून काय करवून घेता? लोक कितीही यशस्वी होऊ द्यात, तुम्ही किती अपयश पचनी पाडू शकता? पराभवाने पराभव होत नाही, पराभवाने विजयाची भूक वाढते! भुकेलेला वाघ हा कधी पण खतरनाक असतो. त्यामुळे भुकेलेला वाघ बना!

कायम स्वतःला सांगत रहा की आज जिंकायचे हे नाही माहीत परंतु आज मी पराभव स्वीकारण्यासाठी नक्की जात आहे. आणि नंतर स्वतःचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे शक्य आहे ते करा. पराभूत व्हा आणि पुन्हा प्रयत्न करा.

Don’t Quit As Loser , पराभूत होऊन थांबु नका!

भव्यदिव्य यशाच्या मागे अनेक पराभव दडलेले असतात. तुम्ही, एका खऱ्या माणसाप्रमाणे जीवन जगा! पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला loser म्हणेल, तेव्हा काही बोलू नका आणि स्वतःशी बोला की हो मला माहित आहे मी loser आहे, कारण मला माहित आहे How to Lose! जेव्हा मला कळेल की मी का हारतोय तेव्हा एक दिवशी मी विजयी नक्की होईल!
एक गोष्ट नमूद करू इच्छितो, कदाचित ही गोष्ट एखाद्या मृत्यू झालेल्या शरीरात देखील जीव टाकू शकते. आपले विचार हे उच्च ठेवा, देशात आपले नाही तर जगात देशाचे नाव रोशन करा.

Kabir Das Ki Rachnaye In Hindi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment