Information about Airplane in Marathi | विमाना बद्दल काही मनोरंजक तथ्य

असं सांगितले जाते की विमानाचा शोध १८९५ मध्ये शीवकर बापुजी तळपदे यांनी लावला तर काही जण अस म्हणतात की १९०३ मध्ये राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला. परंतु आज जगात विमानाचे शोध लावण्याचे श्रेय हे राईट ब्रदर्स ना दिले जाते. परंतु तळपदे यांच्या गोष्टीत देखील दम आहे. तर आता विश्वास ठेवायचा तर कशावर ठेवायचा? तथ्यांबद्दल बोलायला गेले तर तळपदे यांनी राईट ब्रदर्स च्या आठ वर्षा अगोदर विमान उडविलेले होते. परंतु इतिहासात त्याची नोंद न केल्यामुळे आज जगामध्ये हवाई जहाज बनवण्याचे आणि उडवण्याचे श्रेय राइट ब्रदर्स यांना दिले जाते. आज आम्ही तुम्हाला विमाना बद्दल बर्याच मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत. आम्हाला आशा आहे की आपल्याला या गोष्टी आवडतील. तर मग चला जाणून घेऊ या.

१) दररोज सुमारे दोन दशलक्ष जहाजे जगभरात उडतात. आत्तापर्यंत फक्त ५% लोकसंखेने विमानातून प्रवास केला आहे.

२) तंत्रज्ञानाच्या या जगात हवाई जहाज पायलट शिवाय उडण्यास सक्षम आहे (ऑटोपायलट). परंतु प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियंत्रण कक्षात पायलेट असणे आवश्यक आहे.

३) विमानात काम करणाऱ्या वैमानिकासह सर्वच लोकांना इंग्रजी येणे आवश्यक आहे कारण ती फ्लाईट इंटरनॅशनल भाषा आहे.

४) विमान उड्डाण करणारे २ पायलट हे एकाच प्रकारचे अन्न खाऊ शकत नाही. असे अशासाठी की एकाचे आरोग्य बिघडल्यास दुसरा विमान हाताळू शकतो.

५) आपत्कालीन काळात दिलेल्या ऑक्सिजन मास्क च्या मदतीने आपण केवळ पंधरा मिनिटेच जहाजात जिवंत राहू शकतो.

६) हवाई जहाजांमधील जेवण बहुतेक लोकांना आवडत नाही कारण जास्त उंचीवर गेल्यानंतर आपल्या जिभेची चव बदलते. यामुळेच विमानात दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये मिठाचे प्रमाण देखील जास्त असते.

७) हवाई जहाज मध्ये मर्क्युरी (पारा) आणण्यास सक्त मनाई आहे कारण हवाई जहाज ॲल्युमिनियम पासून बनविले जाते आणि पारा ऍल्युमिनियमचा नाश करतो.

८) हवाई प्रवासाच्या वेळी लोक जास्त प्रमाणात गॅस सोडतात म्हणून जहाजांमधील घाण वास कमी करण्यासाठी कोळसा फिल्टरचा वापर केला जातो.

९) नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा प्रथम वेळी चंद्रावर चालले होते तेव्हा त्यांच्याजवळ राईट ब्रदर्स च्या विमानाचा एक तुकडा होता.

१०) विमान अपघातात कोणत्याही अमेरिकन माणसाच्या मृत्यूची शक्यता १.१ दशलक्ष लोकांमधून एक अशी आहे परंतु कार दुर्घटनेत मृत्यू होण्याची शक्यता पाच हजार लोकांमध्ये एक अशी आहे.

११) आज पर्यंत ८०% विमानाचे अपघात विमान हवेत उडल्यानंतर तीन मिनिटांच्या आत घडले आहे. सर्वात मोठी हवाई जहाजाची दुर्घटना १९९७ मध्ये विमान उडते वेळी झाली होती यात सुमारे पाचशे लोकांचा मृत्यू झाला होता.

१२) १९८६ ची गोष्ट आहे, “व्होयेजर” नावाच्या जहाजाने संपूर्ण जगाचे चक्कर मारले होते तेसुद्धा एकदाही खाली न उतरता किंवा परत दुसऱ्यांदा इंधनाचा वापर न करता.

१३) प्रत्येक पाच लोकांमधील एकाला विमानातून प्रवास करताना भीती वाटेते. याला “Aviophobia ” असे म्हणतात.

१४) १९५३ च्या आधी विमानाच्या खिडक्या चौकोन असायच्या परंतु एका अपघाता नंतर, या चौकोन खिडक्यांना जबाबदार ठरवण्यात आले आणि तेव्हापासूनच विमानाच्या खिडक्यांना गोल किनारे करण्यात आले कारण गोल किनाऱ्यामुळे हवेचा जास्त विरोध होत नाही आणि त्यामुळे हवाई जहाजावर अनावश्यक दबाव येत नाही.

१५) गोष्ट १९८७ मधली आहे अमेरिकेतील एका व्यक्तीने हवाई मार्गा च्या एका कंपनीकडून ६९ लाख रुपये देऊन आजीवन पास बनविले. २००८ पर्यंत त्या व्यक्तीने दहा हजाराहून अधिक वेळा हवाई जहाजातून प्रवास केला. त्या कंपनीला एक अब्ज कोटी रुपयांचा तोटा झाला. यामुळे २००८ मध्ये कंपनीला त्या व्यक्तीचा पास रद्द करावा लागला.

१६) हवाई जहाजावर ब्लॅक बॉक्स नावाची एक वस्तू असते. त्याचे काम जहाजाच्या अपघाता विषयी माहिती देणे आहे. जहाजाची कितीही मोठी दुर्घटना झाली असेल किंवा विमानाचे कितीही तुकडे झाले असतील तरी ब्लॅक बॉक्स जशाच्या तसे परत मिळते. वास्तविक हे ब्लॅक बॉक्स एका विशेष प्रकारचा स्टीलचे बनलेला असते. तर मग आपण विचार करत असाल की संपूर्ण जहाज हे त्याच स्टीलने का बनवत नाही? तर त्याचे उत्तर असे की, असे केल्यास विमानाचे वजन इतके वाढेल की ते उडण्यास असमर्थ होईल.

१७) आपण पाहिले असेल की बहुतेक हवाई जहाज हे पांढऱ्या रंगाचे असतात. हे अशासाठी की पांढऱ्या रंगामुळे विमानातील खराबी पटकन लक्षात येते. जसे विमानाला तरड गेल्यास किंवा तेल गळत असल्यास ही खराबी सहज कळून येते. तसेच पांढरा रंग उष्णता प्रतिबिंबित करते. त्यामुळे विमान ३०,००० फूट उंचीवर देखील थंड असते.

१८) विमानाचे डिझाईन अशाप्रकारे केलेले असते की जेणे करून विमान आकाशात असताना त्यावर वीज कोसळत नाही. वर्षातून कमीत कमी एक वेळा किंवा १००० तासाच्या अंतराने आकाशातील वीज विमानावर कोसळते. परंतु १९६३ साला नंतर कुठल्याही विमानाचा या कारणामुळे अपघात झालेला नाही. हे आज अभियंत्रिकीमुळेच शक्य झालेले आहे.

१९) हवाई जहाजाच्या चाकामध्ये २०० psi प्रेशर ची हवा भरली जाते जी कारच्या टायर च्या तुलनेत सहा पटीने जास्त आहे. काही वेळेला आपण ऐकतो की विमानाचे टायर प्रत्येक लैंडिंग नंतर बदलतात. परंतु हे असे नाही जवळजवळ २०० ते २५० लँडिंग झाल्यानंतरच जहाजाचे टायर बदलण्यात येतात. विमानाचे टायर बदलण्यासाठी जैकचा वापर केला जातो.

२०) नेहेमी विमानातून प्रवास करताना विमानाच्या मागच्या बाजूस बसायला हवे कारण जर विमानाचे अपघात झाले तर मागील भागातील प्रवासी वाचण्याची शक्यता ४० टक्के जास्त आहे. ब्लॅक बॉक्स देखील मागच्या भागात ठेवलेले असते.

२१) फोनचा एयर प्लेन मोड कसा उपयोगी येतो? जेव्हा आपण विमानामधून प्रवास करतो तेव्हा फोन एयर प्लेन मोड वर ठेवणे अशा साठी आवश्यक आहे कारण विमान पूर्णपणे वाहतूक नियंत्रण आणि रडारच्या सिग्नलद्वारे पाठविलेल्या सूचना वर अवलंबून असते. हे सिग्नल किंवा संकेत एका निश्चित वेळेमध्ये पाठविले जातात. मोबाइल नेटवर्क त्यास प्रभावित करू शकतात त्यामुळे विमानात प्रवास करताना आपला फोन बंद करणे किंवा एयरप्लेन मोडवर ठेवणे चांगले.

२२) जर चालत्या हवाई जहाजाचा दरवाजा उघडला तर काय होईल? एकदा हवाई जहाज उडण्यास सुरुवात झाली की केबिनमध्ये दबाव निर्माण होतो. हा दबाव बाहेरील दाबापेक्षा खूपच जास्त असतो. हा दबाव लक्षात ठेवूनच विमानाचे दरवाजे बनवले जातात जेणेकरून ते स्वतःहून उघडू शकत नाही. हा दरवाजा अशा प्रकारे डिझाईन केला गेला आहे की उडणाऱ्या जहाजाचा दरवाजा उघडणे जवळ जवळ अशक्यच आहे. आणि जर का दरवाजा उघडलाच तर आतील सामान आणि लोक बाहेरच्या दिशेने फेकले जाऊ शकतात. परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा केबिनमधील दाब बाहेरील दाबापेक्षा अधिक असेल किंवा विमान जास्त उंचीवर उडत असेल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment