Andhra Pradesh information in Marathi । आंध्र प्रदेश राज्याबद्दल महत्वाची माहिती

Andhra Pradesh information in Marathi । आंध्र प्रदेश राज्याबद्दल महत्वाची माहिती

Andhra Pradesh information in Marathi: मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत Information about Aandra Pradesh state information in Marathi या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आन्ध्र प्रदेश राज्याच्या राजधानी पासून आन्ध्र प्रदेशच्या सांस्कृतिक आणि सामाजिक माहिती पर्यंत सर्व प्रकारची माहिती तुम्हाला सांगणार आहे.

Important information about andhra pradesh in Marathi । आंध्र प्रदेश राज्याबद्दल महत्वाची तथ्ये

Important information about andhra pradesh in Marathi
Important information about andhra pradesh in Marathi

राजधानी – अमरावती

अधिकृत भाषा – तेलगू

क्षेत्र – 1,60,205 किमी

लोकसंख्या – 4,93,90,000

साक्षरता दर – 67.4 %

जिल्हे – 13

लोकसभा जागा – 25

राज्यसभेच्या जागा – 11

स्थापना – पहिल्यांदा (1 ऑक्टोबर 1953), दुसऱ्यांना (1 नोव्हेंबर 1956), तिसऱ्यांना (2 जून 2014)

पहिले मुख्यमंत्री – टंगुटूरी प्रकाशम

पहिले राज्यपाल – चंदूलाला माधवलाल त्रिवेदी

 


Aandhra Pradesh Populaion Information In marathi । आंध्र प्रदेशच्या लोकसंख्येबद्दल माहिती

1. आंध्र प्रदेश, सुमारे 5 दशलक्ष लोकसंसंख्येसह भारतात 10 वे अधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.

2. 1000 पुरुषांच्या प्रती महिलाचे प्रमाण 993 आहे आणि राष्ट्रीय प्रमाण 926 पेक्षा ते जास्त आहे.

3. राज्यात 88.5% लोकसंख्या तेलगू भाषा बोलते. तेलगू भारतात तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.

4. राज्य प्रमुख भाषिक अल्पसंख्याक गटामध्ये उर्दू (8.63%), हिंदी (0.63%) आणि तमिळ (1.01%) सहभागी आहेत.

5. आंध्र प्रदेश चे मुख्य वंशीय गट तेलगू आहे, जे प्रामुख्याने आर्य आणि द्रविड या मिश्र वंशासंबंधित आहेत.


Aandhra pradesh state symbols in Marathi । आंध्र प्रदेश चे राज्य प्रतीके

1. राज्य वृक्ष – कडुनिंब

2. राज्य फूल – कुमुद (पाण्यातील कमळ)

3. राज्य फळ – आंबा

4. राज्य प्राणी – काळा बोकड

5. राज्य पक्षी – नीलकंठ पक्षी

6. राज्य खेळ – कबड्डी


Aandhra Pradesh history in Marathi । आंध्र प्रदेशच्या इतिहासासंबंधित माहिती

आंध्र प्रदेशचा उल्लेख ऋग्वेदी आणि महाभारत अश्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये झाला आहे. 2800 वर्षापूर्वी रचलेल्या ऋग्वेदीच्या ऐतरेय ब्राम्हण(Aitareya Brahmana) शाखेपासून अशी माहिती मिळते कि ‘आंध्र ‘ नावाची जात उत्तर भारतातून दक्षिण भारतात गेली होती. चालू आंध्र प्रदेश हे नाव त्या प्राचीन आंध्र जाती वरूनच ठेवले गेले आहे.

आंध्र प्रदेश मध्ये आढळलेल्या अनेक शिलालेखांवरून असे कळते कि हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग होता. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असलेल्या मेगास्थेनिस(Megasthenes) ह्या राजदूताने असे लिहिले आहे की, आंध्र प्रदेश मध्ये 1 लाख पायदळ सैन्य, 100 हत्ती आणि 200 घोड्यावर बसलेला पायदळ सैन्य तैनात केले गेले होते.

अशोकने त्याच्या 13व्या शिलालेखमध्ये असे लिहिले आहे कि आंध्र जातीला तो खूप प्रिय होता. अशोकाच्या मृत्यू नंतर मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले आणि त्यानंतर आंध्रप्रदेश मध्ये सातवाहन पुढे आले .

सातवाहनांनी आंध्र प्रदेशच्या मुख्य प्रदेशावर जवळजवळ ३ऱ्या शतकापर्यंत वर्चस्व गाजवले. त्यानंतर १२व्या आणि १३व्या शतकापर्यंत तिथे वेगवेगळी राजघराणी राज्य करू लागली जसे कि इक्ष्वाकु राजवंश, पल्लव, आनंदगोत्रिका, विष्णूकुंडीनास, पूर्व चालुक्य, चोल आणि काकतिय.

सन इ.स. 1323 मध्ये दिल्ली च्या सुलतानाने गियास-उल-तुघलक(Ghiyath al-Din Tughluq) यांनी उलघ खानच्या साहाय्याने आंध्र प्रदेश जिंकण्यासाठी प्रचंड सेना पाठवली आणि तिथला राजा प्रतापरुद्र(Prataparudra) यांना कैद केले.

आंध्र प्रदेशावर दिल्ली सुलतानाच्या ३ वर्ष वर्चस्वानंतर मुसुनुरी नायकानी(Musunuri Nayakas) सुलतानाचे वर्चस्व मोडून स्वतःचे राज्य स्थापन केले आणि ५० वर्ष चालवले. मुसुनुरी नायकांच्या सफलतेपासून प्रेरणा घेऊन हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगर चे साम्राज्य स्थापन केले जे भारतातील सर्वात मोठे हिंदू साम्राज्य होते .

16व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते 17व्या शतकाच्या शेवट पर्यंत सुमारे दोनशे वर्ष आंध्र प्रदेशात कुतुबशाही राजवंशाचे राज्य होते.

तेव्हा कुतुबशाही साम्राज्यावर ब्रिटिशांनी वर्चस्व स्थापित केले तेंव्हा त्यांनी निजामाला हैदराबादसह काही राज्यांमध्ये राज्य करण्यासाठी परवानगी दिली.

सन 1947 मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यास हैदराबादच्या निजामाला भारतापासून भिन्न व्हायचे होते पण राज्याची 80% हुन अधिक लोकसंख्या हिंदू होती ज्यांनी निजामाला या गोष्टीसाठी प्रतिकार केला.

हैदराबादच्या निजामाने हिंदूंना दडपवण्यासाठी २ लाख मुस्लिम गुंडांची फौज तयार केली होती जेणेकरून हिंदूंनी आंदोलन करू नये.

हैदराबादची स्थिती समजून घेऊन सरदार वल्लभ भाई पटेल यांनी भारतीय लष्कराला ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत हैदराबादला पाठविले आणि निजामाच्या फौजेचा धुव्वा उडवला. निजामाने सरदार वल्लभ भाई पटेल यांचे पाय पकडून माफी मागितली आणि भारतात सहभागी होण्यासाठी तयार झाला.


Geography of Aandra pradesh in Marathi । आंध्र प्रदेशच्या संबंधित भौगोलिक माहिती

1. आंध्र प्रदेश 1,60,205 चौरस किलोमीटर च्या परिसरासह भारतात आठवे सर्वात मोठे राज्य आहे.

2. आंध्र प्रदेश च्या सीमा पाच राज्यांना लागून आहेत – तेलंगाना, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक आणि तामिळनाडू. तसेच उत्तर-पूर्व दिशेला केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी (Puducherry) आहे.

3. राज्याच्या पूर्व किनार्यावरील आंध्र प्रदेशाला ‘कोस्टल आंध्र’ आणि पश्चिम भागाला ‘रायलसीमा’ असे म्हणतात.

4. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प ‘नागार्जुन श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प ‘ हा आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे.

5. आरमा कोंडा(Arma Konda) हा शिखर समुद्रसपाटीपासून १६८० मी. इतक्या उंचीवर आहे. हा फक्त आंध्र प्रदेशातच नव्हे तर पूर्ण पूर्व घाटावरील उंच शिखर आहे.

6. कृष्णा आणि गोदावरी ह्या नद्या राज्यातील प्रमुख नद्या आहेत. गोदावरी हि दक्षिण भारतातील सर्वात लांब आणि रुंद नदी आहे .

7. राज्याचा समुद्रकिनारा गुजरात (1600 किमी) नंतर सर्वात लांब आहे. (972 किमी)

8. अनंतपूर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असून लोकसंख्येनुसार पूर्व गोदावरी हा आहे.

9. विशाखापट्टणम जिल्ह्यात लाम्बसिंगी गावाला दक्षिण भारतातील काश्मीर म्हणतात आहे कारण दक्षिणेत हि एकुलती एक जागा आहे जेथे बर्फ पडतो. हे गाव समुद्र पातळीपासून फक्त 1000 मीटर उंचावर आहे.


Cultural and social information about Andhra Pradesh । आंध्र प्रदेश संबंधित सांस्कृतिक आणि सामाजिक माहिती

1. चितूर जिल्हामध्ये स्थित तिरुपती भारताच्या पवित्र शहरांपैकी एक आहे. या शहरामध्ये तिरुमला मधील प्रसिद्ध तिरुपती बालाजी हे मंदिर स्थित आहे.

2. अनंतपूर जिल्ह्यातील लेपाक्षी या गावात प्रभु शिवच्या नंदीचा भव्य पुतळा आकर्षणाचे एक मुख्य केंद्र आहे.

3. श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन स्वामी चे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे मंदिर आहे. या ठिकाणाला दक्षिण कैलास असे म्हणले जाते.

4. विजयवाडा ते मोगराजापूर मध्ये स्थित असलेल्या लेणींमध्ये प्रभु शिव यांच्या प्रतिमा अतिशय सुंदर आहेत.

5. 1951 मध्ये हैदराबाद मध्ये बांधले गेलेले चारमिनार हे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे.


Facts about Aandhra Pradesh in Marathi । आंध्र प्रदेशच्या अर्थव्यवस्थेसंबंधित मनोरंजक तथ्य

1. शेती हे राज्यातील लोकांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे.

2. तांदूळ हे मुख्य पीक आहे, आंध्र प्रदेश ला ‘भारताच्या तांदळाचा कटोरा’ देखील म्हणतात.

3. हे राज्य भारताच्या एकूण मासे उत्पादन मध्ये 10 टक्के योगदान देते.

4. आंध्र प्रदेश अनेक प्रकारच्या खजिन्यानी भरलेले आहे जसे कि कच्चे तांबे , मॅंगनीज, कोळसा आणि चुना दगड.

5. तुमालापल्ली (Tummalapalli) गावाच्या खाणी युरेनियम समृद्ध आहेत.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख (Andhra Pradesh information in Marathi । आंध्र प्रदेश राज्याबद्दल महत्वाची माहिती) जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

 हे देखील वाचा: ब्लॉगसाठी कल्पना आणि विषय कसे शोधावे

 हे देखील वाचा: ब्लॉगिंग करण्याचे 12 फायदे काय आहेत?

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment