Information About Steve Jobs In Marathi | स्टीव्ह जॉब्स बद्दल आश्चर्यकारक तथ्ये

जेव्हा जगातील सर्वात प्रभावशाली उद्योजकांची नावे घेतली जातात, तेव्हा त्यामध्ये दुसरे तिसरे कितीहि नाव असले तरी , एक नाव निश्चितच येते आणि ते नाव आहे स्टिव्ह जॉब्स (Steve Jobs). चला जगात बदलावं आणणाऱ्या स्टीव्ह जॉब्सविषयी मनोरंजक तथ्ये जाणून घेऊया.

1. स्टीव्ह जॉब्स दत्तक घेण्यात आले होते . त्यांचे खरे वडील सिरियाचे मुस्लिम होते .

२. स्टीव्हचे खरे वडील कॅलिफोर्नियामध्ये रेस्टॉरंट चालवत होते. जॉब्सने बर्‍याच वेळा त्याच्या वडिलांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणही जेवले जेवले होते, परंतु जॉब्स ला व त्याच्या वडिलांना एकमेकांच्या नात्याबद्दल माहित नव्हते.

३. स्टीव्ह जॉब्सने वयाच्या 12 व्या वर्षी प्रथम संगणक पाहिले.

४. स्टीव्ह जॉब्स महाविद्यालयातील आपल्या मित्रांच्या खोलीत खाली जमिनीवर झोपायचे . थंड पेयाच्या बाटल्या विक्रीतून येणाऱ्या थोड्या फार पैशातच जेवण जेवत असे . ते दर रविवारी 11 किलोमीटर चालत जाऊन श्री कृष्णाच्या मंदिरात आठवड्यातून एकदा जाऊन पोटभर जेवण जेवायचे .

५. १९८४ मध्ये त्यांना स्वतःच्या Apple कंपनी तुन नोकरी वरून काढून टाकण्यात आलेले.

६. बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, स्टीव्ह जॉब्स या सर्वांमध्ये एक समान गोष्ट आहे,ती म्हणजे कोणाकडेही महाविद्यालयीन पदवी नाही.

७. कॉलेज सोडल्यानंतर स्टीव्ह जॉब्सने सफरचंदाच्या बागेत काम केले.

८. स्टीव्ह जॉब्स Apple कंपनीच्या मदतीने वयाच्या 25 व्या वर्षी च लक्षाधीश झाले.

९. स्टीव्ह जॉब्सने आपल्या आयुष्यात program ची एक ओळही लिहिलेली नाही.

१०. जेव्हा Apple च्या आयपॉडचा (IPOD )एक नमुना स्टीव्ह जॉब्स ला दर्शविला गेला, तेव्हा जॉब्जने ते बघताच पाण्यात फेकले आणि नंतर येणाऱ्या हवेच्या बुडबुड्याने हे सिद्ध केले की ते अजून लहान होऊ शकते.

११. जॉब्स म्हणाले होते, “मला टेलिव्हिजन आवडत नाही.” त्यामुळे Apple कधीही टीव्ही बनवणार नाही. ‘

१२. फारच थोड्या लोकांना माहिती आहे की स्टीव्ह जॉब्स बौद्ध धर्माचे पालन करतात आणि शाकाहारी देखील होते.

१३. स्टीव्ह जॉब्सने नंबर प्लेटशिवाय गाडी चालावायचे .

१४. १९७४ मध्ये जॉब्स हे आपल्या एका जिवलग मित्राबरोबर आध्यात्मिक ज्ञान मिळवण्यासाठी भारतात आलेले . अध्यात्म आणि अस्तित्त्ववादाबद्दल त्यांना अधिक खोलवर माहिती असावी अशी त्याची इच्छा होती. यासाठी ते कांची येथील आश्रमात निम करोली बाबा यांनाही भेटणार होते, पण तोपर्यंत बाबांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

१५. गुगलच्या संस्थापकाला जॉब्स यांनी त्यांच्या कंपनीत काम करावे अशी इच्छा होती.

१६. स्टीव्ह जॉब्सना याहू (Yahoo ) खरेदी करायचा होता.

१७. एकदा एखाद्याला Apple कंपनी मध्ये नोकरी दिली गेली, तर त्याला नोकरीवरून काढून टाकणे जॉब्स याना आवडत नसे .

१८. स्टीव्ह जॉब्स जेव्हा पहिला iPhone लाँच करीत होता तेव्हा संपूर्ण Apple टीम मद्यधुंद झाली होती .

१९. स्टीव्ह जॉब्सने कधीही कोणाला कंपनीचा वारस म्हणून जाहीर केले नाही.

२०. स्टीव्ह जॉब्सच्या मृत्यूच्या 2 वर्षांपूर्वी, Apple चे सध्याचे सीईओ (CEO) टिम कुक यांनी त्यांना स्वतःचे यकृत (लिव्हर ) देण्याची ऑफर दिली. तथापि, स्टीव्ह जॉब्स त्यास नकार दिला.

२१. स्टीव्ह जॉब्स एका न दिसणाऱ्या थडग्यात पुरला आहे.

२२. स्टीव्ह जॉब्सचे शेवटचे शब्द होते, “oh wow !oh wow !oh wow ! ” (अरे वाह्ह ! अरे वाह्ह ! अरे वाह्ह ! )

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.