Remove blackheads in Marathi | चेहऱ्यावरचे काळे डाग काढून टाकण्यासाठी घरेलू उपाय

सुंदर आणि निर्दोष चेहरा असणे प्रत्येकाची इच्छा असते. पण जर चेहर्यावर काही डाग असतील, तर त्यामुळे आपले सौंदर्य तसेच आपला आत्मविश्वास कमी होतो. बाजारात अनेक लोशन आहेत जे चेहऱ्यावरचे गडद स्पॉट्स व डाग मिटवण्यास मदत करू शकतात. पण ही लोशन चेहऱ्यावर लावल्यावर काही काळच त्यांचे परिणाम चेहऱ्यावर दिसून येतात म्हणूनच आपल्याला अशा उपचारांची आवश्यकता आहे जे बऱ्याच काळासाठी फायदेशीर ठरतात आणि यामुळे डाग कायमस्वरूपी मिटतात. चला तर मग जाणून घेऊया काही घरगुती उपचार.

टोमॅटो (Tomatoes for blemish removal)

टोमॅटोमध्ये असणारे अँटिऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी हे त्क़चेवरिल डाग नष्ट करण्यात अतिशय प्रभावी आहेत. टोमॅटोचा नियमित वापर केल्याने त्वचा प्रकाशमय व तेजोमय होते. टॉमेटोत लाइकोपेन ह्या घटकाचा समावेश आहे जो सूर्याच्या किरणांमुळे काळ्या पडलेल्या त्वचेचे उपचार करतो. चेहऱ्यावर टोमॅटोचा रस १५ ते २० मिनिट लावा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. .

लिंबाचा रस (Lemon or potato Juice)

लिंबू किंवा बटाट्याचा रस काढून चण्याच्या पिठात ( बेसन) टाकून मिक्स करावे. हे मिश्रण १५-२० मिनिटांसाठी चेहर्यावर लावून ठेवा आणि मग चेहरा धुवा. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरीत डाग व चट्टे दूर होतात.

बदाम आणि दूध (Reduce blemishes with almonds and milk)

बदामामध्ये व्हिटॅमिन-ई असते जो त्वचेची काळजी घेते तसंच दूधामध्ये लैक्टिक ऍसिड असते जे त्वचेवरील पुरळ काढते. आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर बदामाच्या तेलाने मालिश करा आणि १५-२० मिनिटानंतर अतिरिक्त तेल चेहऱ्यावरुन पुसून घ्या. नियमितपणे असे केल्याने लवकरच आपल्याला याचा फायदा होईल. दुसऱ्या प्रकारच्या उपायात ७-८ बदाम १२ तास किंवा त्यापेक्षा जास्त पाण्यात भिजवून घ्या आणि नंतर बदामाची सालं काढून त्याची ठेसून पेस्ट बनवा आणि त्यात थोडे दूध घाला. हे पेस्ट चेहऱ्याच्या डागांवर लावा आणि संपूर्ण रात्र तसेच सोडून द्या. सकाळी थंड पाण्याने आपले तोंड धुवून घ्या. १५ दिवसात त्याचे परिणाम दिसून येतील.

बटाटा (Home remedy with potato)

चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी बटाटा हे सगळयात स्वस्त आणि उत्तम उपाय आहे. बटाट्याच्या चकत्या बनवा आणि चेहऱ्यावर १० मिनिटे चोळा. किंवा खिसलेल्या बटाट्याचे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटे सोडून द्या. दिवसातून असे २-३ वेळा केल्याने परिणाम लवकरच दिसून येईल.

पुदीना (Mint leaves to reduce scars)

पुदीना मुरुमांवर चांगले काम करून आणि त्यांना कोरडे करून त्वचेचे फोमामन साफ करते. पुदीनाच्या पानांमधे पाणी घालून त्यांना दळावे. हे पेस्ट चेहऱ्याच्या डागांवर लावा आणि १५-२० मिनीटे चेहऱ्यावर सोडा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून कमीत कमी १ वेळा तरी हे करा.

टीप- जर हे वरील उपाय मदत करत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.