उष्मघातापासून सुरक्षेसाठी खालील दक्षता घ्या !!!
हे करू नका …
१) दुपारी १२.०० ते ३.०० उन्हात फिरू नका.
२) उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
३) मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय (सॉफ्ट ड्रिंक ) घेऊ नका त्यामुळे डीहायड्रेशन होते.
४) पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये किंव्हा जागेत मुले व पाळीव प्राण्यांना सोडू नका.
हे करा …
१) तहान नसल्यास देखील हि पुरेसे पाणी प्या.
२) सौम्य रंगाचे , सैल आणि कॉटन चे कपडे घाला.
३) बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंव्हा चप्पल वापरा.
४) प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
५) आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपांना सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
६) उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.
७) अशक्त, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टर चा सल्ला घ्या.
८) ओ.आर.एस, घराची लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या.
९) जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
१०) पंख्याचा वापर करा, थंड पाण्याने अंघोळ करा.
“आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. सावलीचा सहारा उष्मघातापासून निवारा.”
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.