Uses of Mint and its medicinal uses in Marathi | पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुण

सगळ्यांनाच माहीत आहे कि पुदिन्यापासून चटणी तसेच पुदिन्याच्या वापर जलजीरा बनवण्यासाठी ही केला जातो, पण एवढेच नाही तर पुदिन्या मध्ये भरपूर औषधी गुण असतात, आणि यामुळे अनेक समस्यांचे निवारण होते. पुदिन्याचा वापर अनेक प्रतिजैविक (Antibiotic) औषधांमध्ये सुद्धा केला जातो.

या लेखामध्ये मी तुम्हाला पुदिन्याचे फायदे आणि औषधी गुणांबद्दल सांगणार आहे.

पुदिना हि एक साधारण दिसणारी वनस्पती आहे, पण पुदिन्यामध्ये खूप प्रभावशाली तसेच चमत्कारी गुण असतात. उन्हाळ्यात जेवणासोबत पुदिन्याची चटणी खूप लाभदायक असते. पुदिना औषधी गुणांसोबत आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेवर चमक आणण्यासाठी खूप लाभदायक आहे.

पुदिन्याचे फायदे (Benefits Of Mint In Marathi)

१. पुदिन्यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल(चरबी) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात, तसेच याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.

२. जर कोणाला उलटी होत असेल तर २ चमचे पुदिना दर २ तासात त्या व्यक्तीला द्या यामुळे त्याची उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.

३. जर आपल्याला पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.

Benefits Of Mint In Marathi
Benefits Of Mint In Marathi

४. सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळा मीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनवतो त्याच प्रकारे चहा सारखे उकळूवून घ्या व ते प्या, हा काढा सर्दी, खोकला, तसेच तापावर गुणकारी आहे.

५. जर कोणाला खूप वेळ उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची काही पाने खायला सांगा त्यामुळे त्याची उचकी बंद होईल.

६. मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुखी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिसातून दोन वेळा मधात मिसळवून तो नियमित पणे काही दिवस घ्या असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

७. जर कोणाला जखम झाली असेल तसेच खरचटले असेल तर त्याच्यावर पुदिन्याची ताजी पाने वाटून घेऊन लावा यामुळे जखम लवकर माठेल.

८. जर आपल्याला गजकर्ण, खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताजी पुदिन्याची पाने घेऊन ती चांगली वाटून घ्या आणि हा लेप ज्या ठिकाणी खाज किंवा गजकर्ण झाल असेल तिथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.

९. जर आपल्या तोंडाला वास येत असेल तर पुदिन्याची पाने घ्या त्यांना सुकवून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशेरी सारखा वापर करा. असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंध बंद होईल, असे तुम्ही एक महिन्याहून अधिक काळासाठी करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.

१०. पुदिन्याच्या रस मिठाच्या पाण्यात मिसळवून गुरळ्या करा, असे केल्याने आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

mint2 Marathi varsa११. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे फायदे:- कधी कधी गरमीच्या दिवसात अस्वस्थ तसेच घाबरल्या सारखे होते. त्यासाठी काही पुदिन्याची पाने तसेच अर्धा चमचा वेलचीचे चूर्ण एक ग्लास पाण्यात घेऊन ते उकळवा आणि ते पाणी गार झाल्यावर प्या, असे केल्याने आपल्याला बरे वाटेल.

१२. कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचे रस पुदिन्याच्या रसासोबत मिसळवून प्यायल्याने आराम मिळतो.

mint3 Marathi varsa

१३. सौदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग:- जर आपली त्वचा तेलकट असेल तर पुदिन्यापासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल, दोन मोठे चंमचे पुदिन्याचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचा ओट मील (ओटचे जाडे भरडे पीठ) यांना मिसळवून याचा जाड लेप बनवा आणि हा लेप १५ मिनिटासाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा करा. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी होईल, तसेच चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.

पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळवून त्याचा चेहऱ्यावर फेशियल सारखा वापर केल्याने त्वचेचा तेलकट पणा कमी होईल तसेच सुरकुत्या कमी होतील आणि आपल्या चेहऱ्याची चमक वाढेल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment