Home Motivation Power of Positive Thinking in Marathi | पॉझिटिव्ह विचार कसे करायचे

Power of Positive Thinking in Marathi | पॉझिटिव्ह विचार कसे करायचे

Power of positive thinking in marathi
Power of positive thinking in marathi

पॉझिटिव्ह विचार कसे करायचे | Power of Positive Thinking in Marathi

म्हणतात की जगात प्रत्येल व्यक्ती हा सारखा आहे, परंतु असे का आहे की जगातील 95% लोक हे 5% लोकांसाठी काम करत असतात? त्या 5% लोकांमध्ये काय असे वेगळेपण आहे जे या बाकी लोकांमध्ये नाहीये? याचे उत्तर आहे विचार…!

“कोणीतरी हिंदीमध्ये म्हणले आहे की,
वो हम सब कुछ कर सकते है
जो हम सोच सकते है,
पर हम सब कुछ सोच सकते है
जो हमने आज तक नहीं सोचा है।।”

परंतु आमची समस्या अशी आहे की आम्हाला विचारच नाही करायचा आहे! आणि जरी विचार केला तरी त्यावर काही करायची इच्छा नसते.

या विश्वातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कंपनी, प्रत्येक साम्राज्य हे कोणाच्या तरी विचारांचे फळ आहे. Apple, Reliance, Disney हे त्यापैकीच काही उदाहरणे आहेत. एखादया मोठ्या कंपनीत जॉब करायचे स्वप्न खूप लोकांचे असते, परंतु लाखात एकच असा व्यक्ती असतो जो असे साम्राज्य किंवा कम्पनी उभी करण्याचा विचार करतो कारण हे लोक फक्त विचार करत नाहीत तर आपल्या विचारांच्या जोरावर ते साम्राज्य उभे देखील करतात.

लोक म्हणतात की फक्त विचार करून काही होत नाही, एकदम बरोबर आहे, परंतु ही गोष्टही तितकीच खरी आहे की प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही एका छोट्याश्या विचारानेच होत असते. मी काही दिवसांपूर्वी एका मित्राला भेटलो होतो आणि भविष्यातील नियोजन या विषयावर चर्चा करत होतो. तेव्हा त्याने सांगितले की पुढील 2 वर्षे तो 15 हजारांची नोकरी करेल, पुढे त्याची सॅलरी ही 25 हजार होईल. अजून 2 वर्षे गेली की 35 हजार सॅलरी तर होईल आणि तो परमनंट देखील होईल. त्यानंतर त्याची लाईफ सेट असे तो म्हणाला!

मला त्याच्या या नियोजनाविषयी नाही तर त्याच्या विचाराविषयीं तिरस्कार आहे. हे असे विचार तुम्हाला तेच जीवन देणार आहेत जे जगातील 95% लोक जगत आहेत. आणि जर तुम्हाला असेच जगायचे असेल तर ऑल द बेस्ट!

जगात असे वेडे लोक देखील असतात जे असे काही करायचा विचार करतात जे कोणी करण्याचा विचार देखील करू शकत नाही. तुम्ही जर त्या लोकांपैकी एक असाल ना तर वर सांगितलेले विचार तुमच्या जवळपास देखील येऊ देऊ नका. कारण हेच ते विचार आहेत जे तुमचे पंख छाटत असतात, त्यामुळे तुम्ही गगनात भरारी घेण्याऐवजी जमिनीवर राहायला प्रवृत्त होत असता. लक्षात ठेवा तुमचा जन्म हा आकाशात भरारी घेण्यासाठी झालेला आहे.

रोज लाखो लोक जन्म घेतात, दररोज लाखो लोक आपले करियर बनवतात, रोज लाखो लोक मृत्युमुखी पडतात, परंतु दुनिया त्याच लोकांना लक्षात आणि आठवणीत ठेवते जे लाखोंच्या गर्दीत काहीतरी वेगळे करून जातात. जगाचा एक नियम आहे की ते या गर्दीला कधी लक्षात ठेवत नाहीत.

मित्रा, हे तुझे विचारच आहेत जे तुझे स्वप्न ठरवत असतात. आणि हेच स्वप्न तुमचे भविष्य ठरवत असतात. जर तुमचे विचारच छोटे असतील तर तुझे स्वप्न ही छोटेच असेल आणि जर स्वप्नच लहान असतील तर तुझे भविष्य कधीच मोठे नसणार आहे! याच्या अगदी उलट जर तुमचे विचार मोठे असतील तर स्वप्नही मोठे असतील आणि त्या मोठ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व अर्पण कराल. याचे आउटपुट काय असेल हे मला सांगायची गरज नाहीये.

धीरूभाई नेहमी म्हणायचे की तुमच्या विचारांवर कोणाचेही नियंत्रण नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोठे बनायचे असेल तर मोठे विचार ठेवा आणि लवकर विचार करा. दया येते अशा लोकांवर जे म्हणतात की तितकेच पाय पसरा जितकी तुमची चादर आहे, मी म्हणजे की नवीन चादर खरेदी करा ना! काय प्रॉब्लेम आहे? आपले विचार हे एका बी प्रमाणे आहेत. जर त्या बी ला एक योग्य माती मिळाली, पाणी मिळाले तर काही कालावधी नंतर तेच बीज एक वृक्ष बनलेले असते. तसेच आपले विचार आहेत, जर याला योग्य दिशा आणि ऍक्शन सोबत हार्ड वर्क मिळाले तर याच विचारांनी साम्राज्य उभे राहते.

मित्रांनो यशापेक्षा दुसरा कोणताही मोठा नशा नाहीये! जर एकदा याची सवय तुम्हाला लागली ना तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकणार नाही. त्यामुळे विचार असे ठेवा की तुमच्यासारखे जीवन जगण्याची स्वप्ने अनेकांनी बघितली पाहिजेत.

मित्रानो आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे विचार देखील अधुरे आहेत जर त्यावर कार्य केले नाही तर… कारण असे लोक खूप आहेत जे खूप मोठे मोठे विचार करतात परंतु त्यावर काहीच कृती करत नाहीत. असे लोक फक्त विचार करण्यातच त्यांचे पूर्ण आयुष्य घालवत असतात. जर विचार ही यशाची पहिली पायरी असेल तर कृती ही दुसरी पायरी असते. कारण फक्त विचार करून आपण बेडरूम पासून हॉल पर्यंत जाऊ शकत नाही, त्यासाठी देखील आपल्याला उठून स्वतःच्या पायावर उभे राहून पुढे जावे लागते. म्हणजेच कृती करावी लागते.

म्हणून आज पासून च विचारानंसोबत कृती करायला देखील सुरुवात करा म्हणजे तुमचे स्वप्न पूर्ण करायला कोणीच तुम्हाला अडवणार नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version