Peaceful Night Affirmation in Marathi | रात्री झोपताना एकदा नक्की वाचत जा

रात्री झोपताना एकदा नक्की वाचत जा | Peaceful Night Affirmation in marathi

मी माझ्या डोक्यातून सर्व चिंता या बाहेर काढत आहे. मी माझ्या आयुष्याचा आणि या सध्याच्या क्षणाचा खूप आनंद घेत आहे. मी आतून खूप खुश आहे आणि खुप प्रेरित असल्याचे जाणवत आहे.

आज मला जे जे काम करायचे होते ते सर्व काम आज मी पूर्ण केलेत आहे आणि उद्या जे करायचे आहे त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. उद्या मला जे काम करायचे आहेत त्यासाठी मी आत्ताच सर्व काही विचार केला आहे. मला जे हवे असते त्यासाठी मी माझे योगदान हे 100% देत असतो.

मला माझ्या कामाशी खूप सलोखा आणि प्रेम आहे. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये शांततेत विचार करतो. मी प्रेम आणि आनंद वाटत असतो आणि लोकांशी बोलून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणत असतो. माझा स्वभाव खूप चांगला आहे. मला स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्या अवचेतन मनावर पूर्ण विश्वास आहे. ज्या गोष्टीचा मी विचार करतो आणि ज्या गोष्टीला मी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो ती मला मिळेलच!

मी सर्वांचा सन्मान करतो आणि सर्व लोक माझा सन्मान करतात. मी ऊर्जेने भरलेलो आहे आणि मी त्या उर्जेला चांगल्या कामांसाठी वापरत असतो. मी आभारी आहे माझ्या आई वडिलांचा जे कायम माझे भलेच जाणतात. मी आभारी आहे त्या मित्रांचा जे माझ्यावर प्रेम करतात. माझा स्वतःवर पूर्ण नियंत्रण आहे.

माझ्यामध्ये ती सर्व योग्यता आहे जी माझ्या स्वप्नांसाठी गरजेची आहे. मी एक खूप मेहनती व्यक्ती आहे. मला स्वतःसोबत वेळ घालवायला खूप आवडते. मी प्रत्येक दिवशी आणखी योग्य बनत चाललो आहे. मी कायम वेळेची कदर करतो. डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस यासारखे सर्व प्रकारचे दुःख हे माझ्यापासून खूप दूर आहेत. मी कधीच रागवत नाही आणि कधीही टेन्शन घेत नाही. मला स्वतःवर खूप गर्व आहे.

मी माझ्या ज्ञानाला आणि कलेला दिवसेंदिवस वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. माझ्या मनात प्रत्येक दिवशी नवनवीन प्रयोगत्मक कल्पना येत असतात. मी फक्त आणि फक्त Positive लोकांच्या सोबत राहतो. माझा मेंदू खूप कुशल आहे. आणि मी एक बुद्धिमान मनुष्य आहे. माझ्या आयुष्यात लवकरच खूप पैसे येणार आहेत आणि माझ्या जीवनातील सर्व समस्या या समाप्त होणार आहेत. मी एक मस्त आणि हसत खेळत जगणार माणूस आहे. मी ते सगळं काही करू शकतो जे मी विचार करू शकतो. माझी तुलना या जगात कोणाशीही केली जाऊ शकत नाही, कारण मी एकमेवाद्वितीय मनुष्य आहे.

लवकरच माझे सर्व स्वप्न हे साकार होणार आहेत आणि माझे जीवन बदलणार आहे. माझ्या अवचेतन मनात ती ताकद आहे जिच्या जोरावर मी जगातील सर्व काही गोष्टी मिळवू शकतो. हे ब्रह्मांड कायम माझ्या सोबत आहे आणि हे पूर्ण ब्रह्मांड मला यशस्वी बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. माझे मन हे शांत…शांत आणि शांत होत आहे. आणि याच शांततेच्या सोबत मी झोपायला जात आहे. उद्या एका नवीन उत्साहाच्या सोबत आणि उत्स्फूर्तपणे नवीन दिवसाची सुरुवात करणार आहे.

हे देखील वाचा

TIME Management tips in Marathi

Habits of highly successful people in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment